॥ प्रथमः अंशः ॥ ॥ द्वादशोऽध्यायः ॥
"ध्रुवच्या
तपस्येने प्रसन्न होऊन भगवंताचे अवतरणे आणि त्याला ध्रुवपद – दान"
पराशर उवाच
निशम्यैतदशेषेण मैत्रेय नृपतेः सुतः
।
निर्जगाम वनात्तस्मात्प्रणिपत्य स
तानृषीन् ॥ १ ॥
श्रीपराशर म्हणाले– हे मैत्रेया ! हे सर्व ऐकून राजपुत्र
ध्रुव त्या ऋषिंना प्रणाम करून त्या वनातून निघाला .
कृतकृत्यमिवात्मानं
मन्यमानस्ततो द्विज ।
मधुसंज्ञं महापुण्यं जगाम यमुनातटम्
॥ २ ॥
पुनश्च मधुसंज्ञेन दैत्येनाधिष्ठितं
यतः ।
ततो मधुवनं नाम्ना ख्यातमत्र महीतले
॥ ३ ॥
आणि हे द्विजा ! स्वतःला कृतकृत्य मानून तो
यमुनातटा जवळील अति पवित्र मधु-नामक वनात आला. पुढे ह्याच वनात मधु नामक दैत्य
राहू लागल्याने ते पृथ्वीतलावर मधुवन नावाने विख्यात झाले .
हत्वा च लवणं रक्षो मधुपुत्रं
महाबलम् ।
शत्रुघ्नो मधुरां नाम पुरीं यत्र
चकार वै ॥ ४ ॥
ह्याच मधुच्या लवण नामक महाबली राक्षसपुत्राला
मारून शत्रुघ्नाने मधुरा (मथुर) नामक पूरी वसविली .
यत्र वै देवदेवस्य सांनिध्यं हरिमेधसः ।
सर्वपापहरे
तस्मिंस्तपस्तीर्थे चकार सः ॥ ५ ॥
ज्या मधुवनात निरंतर देवदेव श्रीहरिचे सान्निध्य
असते त्याच सर्वपापहारी तीर्थात ध्रुवाने तपस्या केली .
मरीचिमिश्रैर्मुनिभिर्यथोद्दिष्टमभूत्तथा
।
आत्मन्यशेषदेवेशं स्थितं
विष्णुममन्यत ॥ ६ ॥
मरीचि आदि मुनीश्वरांनी ज्याप्रकारे त्याला उपदेश
केला होता त्याचप्रकारे आपल्या ह्रद्यात विराजमान निखिलदेवेश्वर श्रीविष्णु
भगवानांचे ध्यान करायला त्याने आरम्भ केला .
अनन्यचेतसस्तस्य ध्यायतो भगवान् हरिः
।
सर्वभूतगतो विप्र सर्वभावगतोऽभवत् ॥
७ ॥
अशाप्रकारे हे विप्रा ! अनन्य-चित्त होऊन ध्यान
करत राहिल्याने त्याच्या ह्रदयात सर्वभूत अंतर्यामी भगवान हरि सर्वतोभावाने प्रकट झाले .
मनस्यवस्थिते तस्य विष्णौ मैत्रेय
योगिनः ।
न शशाक धरा भारमुद्वोढुं भूतधारिणी ॥
८ ॥
हे मैत्रेया ! योगी ध्रुवाच्या चित्तात भगवान
विष्णु स्थित झाल्याने सर्वभूतांना धारण कणारी पृथ्वी त्याचा भार सांभाळू शकली
नाही .
वामपादस्थिते तस्मिन्नामार्धेन
मेदिनी ।
द्वितीयं च ननामार्धं
क्षितेर्दक्षिणतः स्थिते ॥ ९ ॥
त्याच्या उजव्या पायावर उभ्या राहण्याने पृथ्वीचा
उजवा अर्धा भाग वाकला आणि मग डाव्या पायावर उभ्या राहण्याने डावा भाग वाकला .
पादाङ्गुष्ठेन सम्पीड्य यदा स
वसुधां स्थितः ।
तदा समस्ता वसुधा चचाल सह पर्वतैः ॥
१० ॥
आणि जेव्हा तो आपल्या पायाच्या अंगठ्याने
पृथ्वीला मध्ये दाबून ऊभा राहिला तेव्हा पर्वतां सहित समस्त भूमंडल विचलित झाले .
नद्यो
नदाः समुद्राश्च सङ्क्षोभं परमं ययुः ।
तत्क्षोभादमराः क्षोभं परं
जग्मुर्महामुने ॥ ११ ॥
हे महामुने ! त्यावेळी नदी, नद आणि समुद्र
आदि सगळेच अत्यंत क्षुब्ध झाले आणि त्यांच्या क्षोभाने देवतांमध्येही मोठा गोंधळ
उडाला .
यामा नाम तदा देवा मैत्रेय परमाकुलाः ।
इन्द्रेण सह संमन्त्र्य ध्यानभङ्गं
प्रचक्रमुः ॥ १२ ॥
हे मैत्रेया ! तेव्हा याम नामक देवतांनी अत्यंत
व्याकुळ होऊन इंद्रासोबत परामर्श करून त्याचे ध्यान भंग करण्याचे आयोजन केले .
कूष्माण्डा विविधै रूपैर्महेन्द्रेण महामुने ।
समाधिभङ्गमत्यन्तमारब्धाः
कर्तुमातुराः ॥ १३ ॥
हे महामुने ! इंद्रा सोबत अति आतुर कुष्मांड नामक
उपदेवतांनी नानारूपे धारणकरून त्याची समाधि भंग करण्याचे प्रयत्न आरम्भ केले .
सुनीतिर्नाम तन्माता सास्रा तत्पुरतः
स्थिता ।
पुत्रेति करुणां वाचमाह मायामयी तदा
॥ १४ ॥
पुत्रकास्मान्निवर्तस्व
शरीरात्ययदारुणात् ।
निर्बन्धतो मया लब्धो बहुभिस्त्वं
मनोरथैः ॥ १५ ॥
त्यावेळी मायेने रचलेली त्याची माता सुनीति
डोळ्यात अश्रु आणून त्याच्या समोर प्रकट झाली आणि ‘हे पुत्र ! हे पुत्र ! ‘ असे म्हणून
करुणेने बोलू लागली – बाळा ! तू शरीराला त्रासदायक अशा ह्या भयंकर तपाचा आग्रह
सोडून दे. मी अनेक मोठमोठ्या कामनांद्वारा तुला प्राप्त केले आहे .
दीनामेकां
परित्यक्तुमनाथां न त्वमर्हसि ।
सपत्नीवचनाद्वत्स
अगतेस्त्वं गतिर्मम ॥ १६ ॥
अरे ! एकटी, अनाथ, दुःखि अशा मला सवतीच्या कटु वाक्यांमुळे सोडून
जाणं उचित नाही. बाळा ! आश्रयहीन अशा माझा तुच एकमात्र सहारा आहेस .
क्व च त्वं पञ्चवर्षीयः क्व चैतद्दारुणं
तपः ।
निवर्त्यतां मनः
कष्टान्निर्बन्धात्फलवर्जितात् ॥ १७ ॥
कुठे तुझे पाच वर्ष वय आणि कुठे तुझे हे अति उग्र
तप ? अरे !
हा निष्फल क्लेशकारी आग्रह आपल्या मनातून काढून टाक .
कालः क्रीडनकानान्ते तदन्तेऽध्ययनस्य
च ।
ततः समस्तभोगानां तदन्ते चेष्यते तपः
॥ १८ ॥
ही तर तुझ्या खेळण्या बागडण्याची वेळ आहे. मग
अध्ययनाची वेळ येईल, त्यानंतर
समस्त भोग भोगायची आणि मग शेवटी तपस्या करणं बरोबर आहे .
कालः क्रीडनकानां यस्तव बालस्य पुत्रक ।
तस्मिंस्त्वमिच्छसि
तपः किं नाशायात्मनो रतः ॥ १९ ॥
बेटा ! तुझा सुकुमार बालपणीचा ‘जो खेळाचा वेळ आहे त्यातच तू तपस्या
करू इच्छितोस . तू अशाप्रकारे का आपल्या सर्वनाशासाठी तत्पर झाला आहेस ? .
मत्प्रीतिः परमो धर्मो
वयोऽवस्थाक्रियाक्रमम् ।
अनुवर्तस्व मा मोहं
निवर्तास्मादधर्मतः ॥ २० ॥
तुझा परम धर्म मला प्रसन्न ठेवणं आहे, म्हणून तू आपल्या
वयाला व अवस्थेला अनुकूल अशीच कर्म कर, मोहाचे अनुवर्तन करू नकोस आणि ह्या तपरूपी
अधर्मापासून निवृत्त हो .
परित्यजति वत्साद्य यद्येतन्न
भवांस्तपः ।
त्यक्ष्याम्यहमिह प्राणांस्ततो वै
पश्यतस्तव ॥ २१ ॥
बेटा ! जर आज तू ही तपस्या थांबवली नाहीस तर पाहा
तुझ्या समोरच मी माझ्या प्राणांचा त्याग करेन .
पराशर उवाच
तां प्रलापतीमेवं
बाष्पव्याकुललोचनाम् ।
समाहितमना विष्णौ पश्यन्नपि न
दृष्टवान् ॥ २२ ॥
पराशर म्हणाले – हे मैत्रेया ! भगवान विष्णु चित्तात
स्थिर असल्याने ध्रुवाने तिला डोळ्यात पाणी आणून अशाप्रकारे विलाप करताना पाहून
देखील पाहिले नाही
.
वत्स वत्स सुघोराणि रक्षांस्येतानि
भीषणे ।
वनेऽभ्युद्यतशस्त्राणि
समायान्त्यपगम्यताम् ॥ २३ ॥
इत्युक्त्वा प्रययौ साथ
रक्षांस्याविर्बभुस्ततः ।
अभ्युद्यतोग्रशस्त्राणि
ज्वालामालाकुलैर्मुखैः ॥ २४ ॥
तेव्हा, अरे बाळा ! धावधाव इथून ! बघ, ह्या महाभयंकर
वनात हे कसे घोर राक्षस अस्त्र-शस्त्र घेऊन येत आहेत' – असे बोलून ती
निघून गेली आणि तिथे अनेक राक्षसगण ज्यांच्या मुखातून आगीच्या ज्वाळा येत होत्या
अस्त्र-शस्त्र सांभाळत प्रकट झाले .
ततो नादानतीवोग्रान्राजपुत्रस्य ते
पुरः ।
मुमुचुर्दीप्तशस्त्राणि भ्रामयन्तो
निशाचराः ॥ २५ ॥
त्या राक्षसांनी आपली चमकदार शस्त्र फिरवत त्या
राजपुत्रासमोर मोठा भयंकर कोलाहल केला .
शिवाश्च शतशो नेदुः
सज्वालकवलैर्मुखैः ।
त्रासाय तस्य बालस्य योगयुक्तस्य
सर्वतः ॥ २६ ॥
त्या नित्य-योगयुक्त बालकाला भयभीत करण्यासाठी
आपल्या मुखातून आगीच्या ज्वाळा काढू लागले .
हन्यतां हन्यतामेष छिद्यतां
छिद्यतामयम् ।
भक्ष्यतां भक्ष्यतां चायमित्यूचुस्ते
निशाचराः ॥ २७ ॥
ते राक्षसगण देखील ‘ह्याला मारा, कापा, खा’ असे ओरडू लागले .
ततो नानाविधान्नादान्
सिंहोष्ट्रमकराननाः ।
त्रासाय राजपुत्रस्य नेदुस्ते
रजनीचराः ॥ २८ ॥
मग सिंह, उंट आणि मगरीचे तोंड असलेले राक्षस राजपुत्राला
त्रास देण्यासाठी नाना प्रकारे गर्जना करू लागले .
रक्षांसि तानि ते नादाः
शिवास्तान्यायुधानि च ।
गोविन्दासक्तचित्तस्य
ययुर्नेन्द्रियगोचरम् ॥ २९ ॥
पण त्या भगवदासक्तचित्त बालकाला ते राक्षस, त्यांचे शब्द, आणि अस्त्र-शस्त्रादि
काहीही दिसले नाही .
एकाग्रचेताः सततं विष्णुमेवात्मसंश्रयम् ।
दृष्टवान्पृथिवीनाथपुत्रो नान्यं
कथञ्चन ॥ ३० ॥
तो राजपुत्र एकाग्रचित्ताने निरंतर आपल्या
आश्रयभूत विष्णुभगवानांना पाहात राहिला व त्याने कोणाचाही व कशाही प्रकारचा
दृष्टिपात नाही केला .
ततः
सर्वासु मायासु विलीनासु पुनः सुराः ।
सङ्क्षोभं
परमं जग्मुस्तत्पराभवशङ्किताः ॥ ३१ ॥
तेव्हा सम्पूर्ण माया लीन झाली आणि तिची हार
होण्याच्या आशंकेने देवता खूप भयभीत झाले .
ते समेत्य जगद्योनिमनादिनिधनं हरिम्
।
शरण्यं शरणं यातास्तपसा तस्य तापिताः
॥ ३२ ॥
म्हणून त्याच्या तपाने त्रस्त होऊन ते सगळे मिळून
जगताचे आदि-कारण, शरणागतवत्सल, अनादि आणि अनंत
श्रीहरिला शरण आले
.
देवा ऊचुः
देवदेव जगन्नाथ परेश पुरुषोत्तम ।
ध्रुवस्य
तपसा तप्तास्त्वां वयं शरणं गताः ॥ ३३ ॥
देवता म्हणाले – हे देवाधिदेवा, जगन्नाथा, परमेश्वरा, पुरुषोत्तमा !
आम्ही सगळे ध्रुवाच्या तपस्येने संतप्त होऊन आपल्या शरणी आलो आहोत .
दिने दिने कलालेषैः शशाङ्कः पूर्यते यथा ।
तथायं तपसा देव
प्रयात्यृद्धिमहर्निशम् ॥ ३४ ॥
हे
देवा ! ज्याप्रमाणे चन्द्रमा आपल्या कलांनी प्रतिदिन बाढतो त्याचप्रमाणे हा
तपस्येमुळे रात्रं-दिवस
उन्नत होत आहे .
औत्तानपादितपसा वयमित्थं जनार्दन ।
भीतास्त्वां शरणं यातास्तपसस्तं
निवर्तय ॥ ३५ ॥
हे जनार्दना ! ह्या उत्तानपादाच्या पुत्राने
केलेल्या तपस्येने भयभीत होऊन आम्ही तुम्हाला शरण आलो आहोत, आपण त्याला तपापासून
निवृत्त करा .
न विद्मः किं शक्रत्वं सूर्यस्त्वं किमभीप्सति ।
वित्तपाम्बुपसोमानां साभिलाषः पदेषु
किम् ॥ ३६ ॥
आम्हाला
माहीत नाही की त्याला ईन्द्रत्व हवे की सूर्यत्व अथवा त्याला कुबेर, वरुण किंवा
चन्द्रमाच्या पदाची अभिलाषा आहे .
तदस्माकं प्रसीदेश हृदयाच्छल्यमुद्धर
।
उत्तानपादतनयं तपसः संनिवर्तय ॥ ३७ ॥
अत: हे ईश ! तुम्ही आमच्यावर प्रसन्न व्हा आणि
ह्या उत्तानपादाच्या पुत्राला तपापासून निवृत्त करून आमच्या ह्रदयातील सल काढून
टाका .
श्रीभगवान् उवाच
नेन्द्रत्वं न च सूर्यत्वं
नैवाम्बुपधनेशताम् ।
प्रार्थयत्येष यं कामं तं करोम्यखिलं
सुराः ॥ ३८ ॥
श्रीभगवान म्हणाले – हे सुरगणांनो ! त्याला इंद्र, सूर्य, वरुण अथवा
कुबेर आदि कोणाच्याही पदाची अभिलाषा नाही आहे , त्याची जी काही इच्छा ती सगळी मी पूर्ण करणार .
यात देवा यथाकामं स्वस्थानं विगतज्वराः ।
निवर्तयाम्यहं बालं तपस्यासक्तमानसम्
॥ ३९ ॥
हे देवगणांनो ! तुम्ही निश्चिन्त होऊन इच्छेनुसार
आपापल्या स्थानी जा. मी तपस्या करणार्या त्या बालकाला निवृत्त करतो .
पराशर उवाच
इत्युक्ता देवदेवेन प्रणम्य
त्रिदशास्ततः ।
प्रययुः स्वानि धिष्ण्यानि
शतक्रतुपुरोगमाः ॥ ४० ॥
श्रीपराशर म्हणाले – देवाधिदेव भगवंतांनी असे सांगितल्यावर
इंद्र आदि समस्त देवगण त्यांना प्रणाम करून आपापल्या स्थानी गेले .
भगवानपि सर्वात्मा तन्मयत्वेन तोषितः
।
गत्वा ध्रुवमुवाचेदं
चतुर्भुजवपुर्हरिः ॥ ४१ ॥
सर्वात्मा भगवान हरिने देखील ध्रुवाच्या तन्मयतेने प्रसन्न होऊन त्याच्या जवळ चतुर्भुजरूपात
जाऊन असे म्हटले .
श्रीभगवान् उवाच
औत्तानपादे भद्रं ते तपसा परितोषितः
।
वरदोऽहमनुप्राप्तो वरं वरय सुव्रत ॥
४२ ॥
श्रीभगवंत म्हणाले – हे उत्तानपादाच्या पुत्र ध्रुवा !
तुझे कल्याण असो | मी
तुझ्या तपस्येने प्रसन्न
होऊन तुला वर देण्यासाठी प्रकटलो आहे. हे सुव्रता ! वर माग .
बाह्यार्थनिरपेक्षं ते मयि चित्तं यदाहितम् ।
तुष्टोऽहं भवतस्तेन तद्वृणीष्व वरं
परम् ॥ ४३ ॥
तू सम्पूर्ण बाह्य विषयांपासून उपरत होऊन आपले
चित्त केवळ माझ्यात लावलेस म्हणून मी तुझ्यावर अति संतुष्ट आहे. तू आपल्या
इच्छेनुसार श्रेष्ठ वर माग .
पराशर उवाच
श्रुत्वेत्थं गदितं तस्य देवदेवस्य
बालकः ।
उन्मीलिताक्षो ददृशे ध्यानदृष्टं
हरिं पुरः ॥ ४४ ॥
श्रीपराशर म्हणाले– देवाधिदेव
भगवंताचे हे वचन ऐकून बालक ध्रुवाने डोळे उघडले व आपल्या ध्यानावस्थेत पाहिलेल्या
भगवंत हरिला साक्षात आपल्या सम्मुख उभे पाहिले .
शङ्खचक्रगदाशार्ङ्गवरासिधरमच्युतम् ।
किरीटिनं समालोक्य जगाम शिरसा महीम्
॥ ४५ ॥
श्रीअच्युताला किरीट तथा शंख, चक्र, गदा, शांर्ङगधनुष्य
आणि खड्ग धारण केलेले पाहून त्याने पृथ्वीवर मस्तक ठेवून प्रणाम केला .
रोमाञ्चिताङ्गः सहसा साध्वसं परमं
गतः ।
स्तवाय देवदेवस्य स चक्रे मानसं
ध्रुवः ॥ ४६ ॥
आणि रोमांचित तसेच परम भयभीत होऊन त्याने
देवदेवाची स्तुति करण्याचे मनात आणले .
किं वदामि स्तुतावस्य केनोक्तेनास्य
संस्तुतिः ।
इत्याकुलमतिर्देवं तमेव शरणं ययौ ॥
४७ ॥
परंतु ह्याच्या स्तुतिसाठी मी काय बोलू ? ह्या विचाराने
त्याचे चित्त व्याकुळ झाले व शेवटी तो त्या देवदेवालाच शरण गेला .
ध्रुव उवाच
भगवन्यदि मे तोषं तपसा परमं गतः ।
स्तोतुं तदहमिच्छामि वरमेनं प्रयच्छ
मे ॥ ४८ ॥
ध्रुव म्हणाला – भगवंता ! जर तुम्ही माझ्या तपस्येने
संतुष्ट आहात तर मी तुमची स्तुति करू इच्छितो, तुम्ही मला हाच वर द्या .
[ ब्रह्माद्यैर्वेदवेदज्ञैर्ज्ञायते
यस्य नो गतिः ।
तं त्वां कथमहं देव स्तोतुं शक्नोमि
बालकः ॥
त्वद्भक्तिप्रवणं ह्येतत्परमेश्वर
मे मनः ।
स्तोतुं प्रवृत्तं त्वत्पादौ तत्र
प्रज्ञां प्रयच्छ मे ॥]
पराशर उवाच
शङ्खप्रान्तेन गोविन्दस्तं पस्पर्श
कृताञ्जलिम् ।
उत्तानपादतनयं द्विजवर्य जगत्पतिः ॥
४९ ॥
श्रीपराशर म्हणाले– हे द्विजवर्या ! तेव्हा जगत्पति
श्रीगोविंदाने आपल्या समोर हात जोडून उभा असलेल्या त्या उत्तानपादाच्या पुत्राला
आपल्या (वेदमय) शब्दांच्या अंत (वेदान्तमय) भागाने स्पर्श केला .
अथ प्रसन्नवदनः तत्क्षणान्नृपनन्दनः ।
तुष्टाव प्रणतो भूत्वा
भूतधातारमच्युतम् ॥ ५० ॥
तेव्हा केवळ एका क्षणातच तो राजकुमार
प्रसन्न-मुखाने अति विनीत होऊन सर्वभूताधिष्ठान श्रीअच्युताची स्तुति करू लागला .
ध्रुव उवाच
भूमिरापोऽनलो वायुः खं मनो बुद्धिरेव
च ।
भूतादिरादिप्रकृतिर्यस्य रूपं
नतोऽस्मि तम् ॥ ५१ ॥
ध्रुव म्हणाला – पृथ्वी, जल, अग्नि, वायु, आकाश, मन, बुद्धि, अहंकार आणि
मूल-प्रकृति – ही सर्व ज्यांचे रूप आले त्या भगवंताला मी नमस्कार करतो .
शुद्धः सूक्ष्मोऽखिलव्यापी
प्रधानात्परतः पुमान् ।
यस्य रूपं नमस्तस्मै पुरुषाय
गुणाशिने ॥ ५२ ॥
जो अति सूक्ष्म, सर्वव्यापक आणि प्रधानाहूनही परे आहे, तो पुरुष
ज्याला रूप आहे त्या गुण-भोक्ता परमपुरुषाला मी नमस्कार करतो.
भूरादीनां समस्तानां गन्धादीनां च
शाश्वतः ।
बुद्ध्यादीनां प्रधानस्य पुरुषस्य च
यः परः ॥ ५३ ॥
तं ब्रह्मभूतमात्मानमशेषजगतः पतिम् ।
प्रपद्ये शरणं शुद्धं त्वद्रूपं
परमेश्वर ॥ ५४ ॥
हे परमेश्वरा ! पृथ्वी, आदि समस्त भूत, गंधादि त्यांचे
गुण, बुद्धि
आदि अंत:करण चतुष्टय तथा प्रधान आणि पुरुष (जीव) ह्यांच्याही परे जो सनातन पुरुष
आहे, त्या
आपल्याला निखिल ब्रह्मांडनायकाच्या ब्रह्मभूत शुद्धस्वरूप आत्म्याला मी शरण आलो
आहे .
बृहत्त्वाद्बृंहणत्वाच्च यद्रूपं
ब्रह्मसंज्ञितम् ।
तस्मै नमस्ते
सर्वात्मन्योगिचिन्त्याविकारिणे ॥ ५५ ॥
हे सर्वात्मना ! हे योग्यांच्या चिन्तनीया !
व्यापक आणि वर्धनशील असल्या कारणाने आपले जे ब्रह्म नामक स्वरूप आहे, त्या विकाररहित
रूपाला मी नमस्कार करतो .
सहस्रशीर्षा पुरुषः सहस्राक्षः
सहस्रपात् ।
सर्वव्यापी भुवः स्पर्शादत्यतिष्ठद्दशाङ्गुलम्
॥ ५६ ॥
हे प्रभो ! आपण हजारों मस्तक, हजारों नेत्र व
हजारों चरणांचे परमपुरुष आहात, आपण सर्वत्र व्याप्त आहात व सम्पूर्ण
ब्रह्माण्डाला व्याप्त करून दहा गुण महाप्रमाण स्थित आहात .
यद्भूतं यच्च वै भव्यं पुरुषोत्तम
तद्भवान् ।
त्वत्तो विराट् स्वराट् सम्राट्
त्वत्तश्चाप्यधिपूरुषः ॥ ५७ ॥
हे पुरुषोत्तमा ! भूत व भविष्यात जे काही पदार्थ
आहेत ते सर्व आपणच आहात तथा विराट, खराट सम्राट आणि अधिपुरुष (ब्रह्म) आदि देखील
सगळे आपल्यापासूनच उप्तन्न झाले आहेत .
अत्यरिच्यत सोऽधश्च तिर्यगूर्ध्वं च वै भुवः ।
त्वत्तो विश्वमिदं जातं त्वत्तो
भूतभविष्यती ॥ ५८ ॥
तेच
आपण ह्या पृथ्वीच्या खाली वर आणि इथे तिथे सर्व बाजूंनी विस्तारलेले आहात . हे
सम्पूर्ण जगत् आपल्यापासूनच उप्तन्न झाले आहे आणि आपल्यापासूनच भूत आणि भविष्य
होतात .
त्वद्रूपधारिणश्चान्तः सर्वभूतमिदं
जगत् ।
त्वत्तो यज्ञः सर्वहुतः पृषदाज्यं
पशुर्द्विधा ॥ ५९ ॥
हे सम्पूर्ण जगत आपल्या स्वरूपभूत
ब्रह्माण्डाच्या अन्तर्गत आहे . ज्यापासून सर्व पुरोडाशांचे हवन होते ते यज्ञ, पृषदाज्य (दधि
आणि घृत) तथा (ग्राम आणि वन्य) दोन प्रकारचे पशु, आपल्यापासूनच उप्तन्न झाले आहेत .
त्वत्त ऋचोऽथ सामानि त्वत्तश्छन्दांसि जज्ञिरे ।
त्वत्तो यजूंष्यजायन्त
त्वत्तोऽश्वाश्चैकतो दतः ॥ ६० ॥
आपल्यापासूनच ऋक् साम व गायत्री आदि छन्द प्रकट
झाले आहेत, आपल्यापासूनच
यजुर्वेदाचा प्रादुर्भाव झाला आहे आणि आपल्यापासूनच अश्व तथा आणखी एका दाताचा महिष
आदि जीव उप्तन्न झाले आहेत .
गावस्त्वत्तः समुद्भूतास्त्वत्तोऽजा
अवयो मृगाः ।
त्वन्मुखाद्ब्राह्मणास्त्वत्तो
बाहोः क्षत्रमजायत ॥ ६१ ॥
वैश्यास्तवोरुजाः शूद्रास्तव पद्भ्यां
समुद्गताः ।
अक्ष्णोः सूर्योऽनिलः
प्राणाच्चन्द्रमा मनसस्तव ॥ ६२ ॥
प्राणोऽन्तःसुषिराज्जातो मुखादग्निरजायत ।
नाभितो गगनं द्यौश्च शिरसः समवर्तत ॥
६३ ॥
दिशः श्रोत्रात्क्षितिः पद्भ्यां
त्वत्तः सर्वमभूदिदम् ॥ ६४ ॥
आपल्यापासूनच गाय, बकरी, मेंडी व इतर पशुंची
उप्तत्ति झाली आहे, आपल्याच
मुखतून ब्राह्मण, बाहुमधून
क्षत्रिय, जांघेतून
वैश्य आणि चरणांपासून शुद्र प्रकट झाले आहेत. आपल्याच नेत्रांपासून सूर्य, प्राणापासून
वायु, मनापासून
चन्द्रमा, आतील
छिद्रापासून (नासारन्ध्र) प्राण, मुखापासून अग्नि, नाभिपासून आकाश, शिरापासून
स्वर्ग, कानांपासून
दिशा आणि चरणांपासून पृथ्वी आदि उप्तन्न झाले आहेत, अशाप्रकारे हे प्रभो ! हे सम्पूर्ण
जगत् आपल्यापासूनच प्रकट झाले आहे .
न्यग्रोधः सुमहानल्पे यथा बीजे व्यवस्थितः ।
संयमे विश्वमखिलं बीजभूते तथा त्वयि
॥ ६५ ॥
ज्याप्रकारे सूक्ष्म बीजात भारी विशाल वट वृक्ष
राहतो तसेच प्रलय काळी हे सम्पूर्ण जगत बीज स्वरूप आपल्यातच लीन राहाते .
बीजादङ्कुरसम्भूतो न्यग्रोधः स समुच्छ्रितः ।
विस्तारं च यथा याति त्वत्तः सृष्टौ
तथा जगत् ॥ ६६ ॥
ज्याप्रकारे बीजापासून अंकुरूपाने प्रकट झालेला
वट वृक्ष वाढून अत्यन्त विस्तारित होतो तसेच सृष्टिकाळी हे जगत आपल्यापासूनच प्रकट
होऊन विस्तारित होते .
यथा हि कदली नान्या त्वक्पत्रादपि दृश्यते ।
एवं विश्वस्य नान्यस्त्वं
त्वत्स्थायीश्वर दृश्यते ॥ ६७ ॥
हे ईश्वरा ! ज्याप्रकारे केळीचे झाड साल आणि
पानांनी वेगवेगळे दिसत नाही त्याचप्रकारे आपण जगाहून वेगळे नाही, ते आपल्यातच
स्थित दिसते .
ह्लादिनी संधिनी संवित्त्वय्येका
सर्वसंस्थितौ ।
ह्लादतापकरी मिश्रा त्वयि नो
गुणवर्जिते ॥ ६८ ॥
आपल्या आधारे आपली ह्लादिनी (निरन्तर आह्लदित
करणारी) व सन्धिनी (विच्छेदरहित) संवित (विद्याशक्ति) अभिन्नरूपाने राहातात.
आपल्यात (विषयजन्य) आह्लाद किंवा ताप देणारी (सात्त्विकी किंवा तामसी) किंवा
उभयमिश्रा (राजसी) कोणतीही संवित नाही, कारण आपण निर्गुण आहात .
पृथग्भूतैकभूताय भूतभूताय ते नमः ।
प्रभूतभूतभूताय तुभ्यं भूतात्मने नमः
॥ ६९ ॥
आपण (कार्यदृष्टिने) पृथक रूप व (कारणदृष्टिने)
एकरूप आहात. आपणच भूतसूक्ष्म व आपणच नाना जीवरूप आहात. हे भूतान्तरात्मना ! अशा
आपल्याला मी नमस्कार करतो .
व्यक्तं प्रधानपुरुषौ विराट् सम्राट्
स्वराट् तथा ।
विभाव्यतेऽन्तःकरणे पुरुषेष्वक्षयो
भवान् ॥ ७० ॥
(योगिंच्या
द्वारा) अन्तःकरणात आपणच महत्तत्त्व, प्रधान, पुरुष विराट, सम्राट आणि स्वराट् आदि रूपांनी भावित केले जाता
व (क्षयशील) पुरुषांमध्ये आपण नित्य अक्षय आहात .
सर्वस्मिन् सर्वभूतस्त्वं सर्वः
सर्वस्वरूपधृक् ।
सर्वं त्वत्तस्ततश्च त्वं नमः
सर्वात्मनेऽस्तु ते ॥ ७१ ॥
आकाशादि सर्वभूतांमधील सार अर्थात त्यांचे गुणरूप
आपणच आहात; समस्त
रूपांना धारण करणारे असल्याने सर्व काही आपणच आहात, सर्व काही आपल्यापासूनच झाले आहे; म्हणून
सर्वांच्या द्वारा आपणच होत आहात म्हणून आपल्याला सर्वात्माला नमस्कार .
सर्वात्मकोऽसि सर्वेश सर्वभूतस्थितो यतः ।
कथयामि ततः किं ते सर्वं वेत्सि हृदि
स्थितम् ॥ ७२ ॥
हे सर्वेश्वरा ! आपण सर्वात्मक आहात; कारण सम्पूर्ण
भूतांमध्ये व्याप्त आहात;
म्हणून
मी काय बोलू ? मी
आपल्याला काय सांगू ? आपण
स्वयं सर्वांच्या हृदयस्थित आहात व सर्व काही जाणता .
सर्वात्मन्सर्वभूतेश सर्वसत्त्वसमुद्भव
।
सर्वभूतो भवान्वेत्ति
सर्वसत्त्वमनोरथम् ॥ ७३ ॥
हे सर्वात्मना ! हे सर्वभूतेश्वरा ! हे सर्व
भूतांच्या आदि स्थाना ! आपण सर्वभूतरूपाने सर्व प्राण्यांने मनोरथ जाणता .
यो मे मनोरथो नाथ सफलः स त्वया कृतः ।
तपश्च तप्तं सफलं यद्दृष्टोऽसि
जगत्पते ॥ ७४ ॥
हे नाथा ! माझे जे काही मनोरथ होते ते तर आपण सफल
केले आणि हे जगत्पते ! माझी तपस्या सुद्धा सफल झाली, कारण मला तुमचं साक्षात दर्शन
प्राप्त झालं .
श्रीभगवान् उवाच
तपसस्तत्फलं प्राप्तं यद्दृष्टोऽहं
त्वया ध्रुव ।
मद्दर्शनं हि विफलं राजपुत्र न जायते
॥ ७५ ॥
श्रीभगवंत म्हणाले – हे ध्रुव ! तुला माझे साक्षात दर्शन
प्राप्त झाले, त्यामुळे
अवश्य तुझी तपस्या
सफळ झाली, परन्तु
हे राजकुमारा ! माझे दर्शन कधीच निष्फळ होत नाही .
वरं वरय तस्मात्त्वं यथाभिमतमात्मनः ।
सर्वं सम्पद्यते पुंसां मयि
दृष्टिपथं गते ॥ ७६ ॥
म्हणून तुला ज्या वराची इच्छा आहे ते माग. माझे दर्शन
झाल्यावर पुरुष काहीही प्राप्त करू शकतो .
ध्रुव उवाच
भगवन्सर्वभूतेश सर्वस्यास्ते भवान्
हृदि ।
किमज्ञातं तव स्वामिन्मनसा
यन्मयेप्सितम् ॥ ७७ ॥
ध्रुव म्हणाला – हे भूतभव्येश्वरा भगवंता ! आपण
सर्वांच्या अंत:करणात विराजमान आहात. हे ब्रह्मन ! माझ्या मनाची अभिलाषा
आपल्यापासून लपलेली आहे का
? .
तथापि तुभ्यं देवेश कथयिष्यामि
यन्मया ।
प्रार्थ्यते दुर्विनीतेन
हृदयेनातिदुर्लभम् ॥ ७८ ॥
तरीही , हे देवेश्वरा ! मी दुर्विनीत ज्या अति दुर्लभ
वस्तुची मनापासून इच्छा करतो ते आपल्या आज्ञेनुसार आपल्याला निवेदन करतो .
किं वा सर्वजगत्स्रष्टः प्रसन्ने
त्वयि दुर्लभम् ।
त्वत्प्रसादफलं भुङ्क्ते त्रैलोक्यं
मघवानपि ॥ ७९ ॥
हे समस्त संसार रचणार्या परमेश्वरा ! आपण
प्रसन्न झाल्यावर (संसारात ) काय दुर्लभ है ? इंद्र देखील तुमच्या कृपेचे प्रसादफळ म्हणूनच
त्रैलोक्य भोगत आहे .
नैतद्राजासनं योग्यमजातस्य ममोदरात् ।
इति
गर्वादवोचन्मां सपत्नी मातुरुच्चकैः ॥ ८० ॥
प्रभो ! माझ्या सावत्र आईने खूप गर्वाने मला
म्हटले की, "जो
माझ्या उदरातून उत्पन्न नाही झालेला त्याच्या योग्य हे राजासन नाही" .
आधारभूतं जगतः सर्वेषामुत्तमोत्तमम् ।
प्रार्थयामि प्रभो स्थानं
त्वत्प्रसादादतोऽव्ययम् ॥ ८१ ॥
अत: हे प्रभो ! आपल्या प्रसादाने मी ते सर्वोत्तम
एवं अव्यय स्थान प्राप्त करू इच्छितो जे सम्पूर्ण विश्वाचे आधारभूत असेल .
श्रीभगवान् उवाच
यत्त्वया प्रार्थितं
स्थानमेतत्प्राप्स्यति वै भवान् ।
त्वयाहं तोषितः पूर्वमन्यजन्मनि बालक
॥ ८२ ॥
श्रीभगवंत म्हणाले – अरे बालका ! तू आपल्या पूर्वजन्मी
सुद्धा मला संतुष्ट केले होतेस, म्हणून तु ज्या स्थानाची इच्छा करत आहेस ते अवश्य
प्राप्त करशील .
त्वमासीर्ब्राह्मणः पूर्वं
मय्येकाग्रमतिः सदा ।
मातापित्रोश्च
शुश्रूषुर्निजधर्मानुपालकः ॥ ८३ ॥
पूर्व-जन्मी तू एक ब्राह्मण होतास व माझ्यात
निरंतर एकाग्रचित्त राहून,
माता
पित्याचा सेवक तथा स्वधर्माचे पालन करणारा होतास .
कालेन गच्छता मित्रं
राजपुत्रस्तवाभवत् ।
यौवनेऽखिलभोगाढ्यो
दर्शनीयोज्ज्वलाकृतिः ॥ ८४ ॥
कालान्तराने एक राजपुत्र तुझा मित्र झाला. तो
आपल्या युवावस्थेत सम्पूर्ण भोगांनी सम्पन्न आणि अति दर्शनीय रूपलावण्ययुक्त होता .
तत्सङ्गात्तस्य
तामृद्धिमवलोक्यातिदुर्लभाम् ।
भवेयं राजपुत्रोऽहमिति वाञ्छा त्वया
कृता ॥ ८५ ॥
त्याच्या संगतीमुळे आणि त्याचे दुर्लभ वैभव पाहून
तुझी अशी इच्छा झाली कि ‘मी
सुद्धा राजपुत्र व्हावे’ .
ततो यथाभिलषिता प्राप्ता ते
राजपुत्रता ।
उत्तानपादस्य गृहे जातोऽसि ध्रुव
दुर्लभे ॥ ८६ ॥
अन्येषां तद्वरं स्थानं कुले
स्वायम्भुवस्य यत् ॥ ८७ ॥
अत: हे ध्रुवा ! तुला आपली मनोवांछित राजपुत्रता
प्राप्त झाली आणि ज्या स्वायम्भुव मनुच्या कुळात इतर कोणाला स्थान मिळणे अति
दुर्लभ असते, त्याच्याच
घरी तु उत्तानपादाकडे जन्म घेतलास .
तस्यैतदपरं बाल येनाहं परितोषितः ।
मामाराध्य नरो
मुक्तिमवाप्नोत्यविलम्बितम् ॥ ८८ ॥
मय्यर्पितमना बाल किमु स्वर्गादिकं
पदम् ॥ ८९ ॥
अरे बालका ! ज्याला तु संतुष्ट केले आहेस
त्याच्यासाठी हे अत्यंत तुच्छ आहे. माझी आराधना केल्याने तर मोक्षपद सुद्धा तत्काळ
प्राप्त होते, मग
ज्याचे चित्त निरंतर माझ्यातच गुंतलेलं आहे त्याच्यासाठी स्वर्गादि लोकांचं काय ? .
त्रैलोक्यादधिके स्थाने सर्वताराग्रहाश्रयः ।
भविष्यति
न संदेहो मत्प्रसादाद्भवान्ध्रुव ॥ ९० ॥
हे ध्रुवा ! माझ्या कृपेने तू निस्संदेह ते स्थान
प्राप्त करशील, जे
त्रैलोक्यात सर्वात उत्कृष्ट आहे, तु सम्पूर्ण ग्रह आणि तारामंडळाचा आश्रय बनशील .
सूर्यात्सोमात्तथा भौमात्सोमपुत्राद्बृहस्पतेः
।
सितार्कतनयादीनां सर्वर्क्षाणां तथा
ध्रुव ॥ ९१ ॥
सप्तर्षीणामशेषाणां ये च वैमानिकाः
सुराः ।
सर्वेषामुपरि स्थानं तव दत्तं मया
ध्रुव ॥ ९२ ॥
हे ध्रुवा ! मी तुला ते ध्रुव (निश्चल) स्थान
देतो जे सूर्य, चन्द्र, मंगळ, बुध, बृहस्पति, शुक्र व शनि
आदि ग्रह, सर्व
नक्षत्र, सप्तर्षि
व सम्पूर्ण विमान चारही देवगणांच्याही वरचे आहे .
केचिच्चतुर्युगं
यावत्केचिन्मन्वन्तरं सुराः ।
तिष्ठन्ति भवतो दत्ता मया वै
कल्पसंस्थितिः ॥ ९३ ॥
देवतांपैकी कोणी केवळ चार युगांपर्यंत तर कोणी
एका मन्वन्तरा पर्यंतच राहातात; पण तुला मी एक कल्पापर्यंतची स्थिति देतो .
सुनीतिरपि ते माता
त्वदासन्नातिनिर्मला ।
विमाने तारका भूत्वा तावत्कालं
निवत्स्यति ॥ ९४ ॥
तुझी माता सुनीति देखील अति स्वच्छ तारारूपात
तितक्याच काळापर्यंत तुझ्या जवळ एका विमानावर निवास करेल .
ये च त्वां मानवाः प्रातः सायं च सुसमाहिताः ।
कीर्तयिष्यन्ति
तेषां च महत् पुण्यं भविष्यति ॥ ९५ ॥
आणि जे लोक समाहित चित्ताने सायंकाळी व प्रात:काळी
तुझे गुण-कीर्तन करतील त्यांना महान पुण्य लाभेल .
पराशर उवाच
एवं पूर्वं जगन्नाथाद्देवदेवाज्जनार्दनात्
।
वरं प्राप्य ध्रुवं स्थानमध्यास्ते स
महामते ॥ ९६ ॥
श्रीपराशर म्हणाले – हे महामते ! अशाप्रकारे पूर्वकाळी
जगत्पति देवाधिदेव भगवान जनार्दनाकडून असा वर प्राप्त करून ध्रुव त्या अत्युत्तम
स्थानी स्थित झाला
.
स्वयं शुश्रूषणार्धर्म्यान्मातापित्रोश्च वै तथा
।
द्वादशाक्षरमाहात्म्यात्तपसश्च
प्रभावतः ॥ ९७ ॥
तस्याभिमानमृद्धिं च महिमानं
निरीक्ष्य च ।
देवासुराणामाचार्यः श्लोकमत्रोशना
जगौ ॥ ९८ ॥
हे मुने ! आपल्या माता-पित्याची धर्मपूर्वक सेवा
केल्याने तसेच द्वादशाक्षर मन्त्राच्या माहात्म्य आणि तपाच्या प्रभावाने त्याच्या
मान, वैभव
आणि प्रभावाची वृद्धि पाहून देव आणि असुरांचे आचार्य शुक्रदेव ह्यांनी हा श्लोक
म्हटला आहे .
अहोऽस्य तपसो वीर्यमहोऽस्य तपसः फलम्
।
यदेनं पुरतः कृत्वा ध्रुवं सप्तर्षयः
स्थिताः ॥ ९९ ॥
‘अहो !
ह्या ध्रुवच्या तपाचा हा कसा प्रभाव आहे ? अहो ! ह्याच्या तपस्येचे कसे अद्भूत फळ आहे की
ह्या ध्रुवलाच पुढे ठेऊन सप्तर्षिगण स्थित झाले आहेत .
ध्रुवस्य जननी चेयं सुनीतिर्नाम सूनृता ।
अस्याश्च
महिमानं कः शक्तो वर्णयितुं भुवि ॥ १०० ॥
त्रैलोक्याश्रयतां
प्राप्तं परं स्थानं स्थिरायति ।
स्थानं
प्राप्ता परं कृत्वा या कुक्षिविवरे ध्रुवम् ॥ १०१ ॥
त्याची ही सुनीति नामक माता देखील अवश्य सत्य व
हितकर वचन बोलणारी आहे. जगात असा कोण आहे जो ह्याचा महिमा वर्णन करू शकेल ? जिने आपल्या
गर्भात ध्रुवला धारण करून त्रैलोक्याचे आश्रयभूत अति उत्तम स्थान प्राप्त केले, जे भविष्यातही
स्थिर राहणार आहे .
यश्चैतत्कीर्तयेन्नित्यं
ध्रुवस्यारोहणं दिवि ।
सर्वपापविनिर्मुक्तः स्वर्गलोके
महीयते ॥ १०२ ॥
जो व्यक्ति ध्रुवच्या ह्या दिव्यलोक प्राप्तिच्या
प्रसंगाचे कीर्तन करतो तो सर्व पापातून मुक्त होऊन स्वर्गलोकी पूज्य होतो .
स्थानभ्रंशं न चाप्नोति दिवि वा यदि
वा भुवि ।
सर्वकल्याणसंयुक्तो दीर्घकालं च
जीवति ॥ १०३ ॥
तो स्वर्गात राहो किंवा पृथ्वीवर, कधीच आपल्या
स्थानापासून च्युत होत नाही तसेच त्याचे भरपूर मंगल होते व तो खूप काळ जीवित
राहातो .
"इति श्रीविष्णुपुराणे प्रथमे अंशे द्वादशोऽध्याय"
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा