शनिवार, १३ डिसेंबर, २०२५

विष्णुपुराण, प्रथम अंश, दशम अध्याय | Vishnu Puran, Ansh 1, Adhyay 10

 

॥ विष्णुपुराणम् ॥

॥ प्रथमः अंशः   ॥ दशमोऽध्यायः ॥

 

 "भृगु, अग्नि आणि अग्निष्ठात्तादि पितरांच्या संततिचे वर्णन"


मैत्रेय उवाचः
 
कथितं मे त्वया सर्वं यत्पृष्टोऽसि महामुने ।
 
भृगुसर्गात्प्रभृत्येष सर्गो मे कथ्यतां पुनः ॥ १ ॥

मैत्रेय म्हणालेहे मुने ! मी तुम्हाला जे काही विचारलं होतं ते सगळं तुम्ही सांगितलं, आता भृगुंच्या संततिपासून सम्पूर्ण सृष्टिचे तुम्ही परत एकदा वर्णन करावे .

 


 
पराशर उवाचः
 
भृगोः ख्यात्यां समुत्पन्ना लक्ष्मीर्विष्णुपरिग्रहः ।
 
तथा धातृविधातारौ ख्यात्यां जातौ सुतौ भृगोः ॥ २ ॥

पराशर म्हणालेभृगुंच्या द्वारा ख्यातिपासून विष्णुपत्नी लक्ष्मी आणि धाता, विधाता नावाचे दोन पुत्र उत्पन्न झाले .

 


 आयतिर्नियतिश्चैव मेरोः कन्ये महात्मनः ।
 
धातृविधात्रोस्ते भार्ये तयोर्जातौ सुतावुभौ ॥ ३ ॥

प्राणश्चैव मृकण्शुश्च मार्कण्डेयो मृकण्डुतः ।
ततो वेदशिरा जज्ञे प्राणस्यापि सुतं शृणु ॥ ४ ॥

महात्मा मेरुच्या आयति आणि नियति नावाच्या कन्या धाता और विधाताच्या पत्नी होत्या, त्यांच्यापासून त्यांना   प्राण आणि मृकंडू नावाचे दोन पुत्र झाले . मृकंडूपासून मार्कण्डेय आणि  मार्कण्डेयापासून वेदशिराचा जन्म झाला. आता प्राणच्या संततिचे वर्णन ऐक .

 


 
प्राणस्य द्युतिमान्पुत्रो राजवांश्च ततोऽभवत् ।
 
ततो वंशो महाभाग विस्तारं भार्गवो गतः ॥ ५ ॥

प्राणचा पुत्र द्युतिमान् आणि त्याचा पुत्र राजवान झाला . हे महाभागा ! त्या राजवानापासून नंतर भृगुवंशाचा फार मोठा विस्तार झाला .

 


 
पत्नी मरीचेः सम्भूतिः पौर्णमासमसूयत ।
 
विरजाः पर्वतश्चैव तस्य पुत्रौ महात्मनः ॥ ६ ॥

मरीचिची पत्नी सम्भूतिने पौर्णमासाला उत्पन्न केले. त्या  महात्म्याचे विरजा आणि पर्वत हे दोन पुत्र होते .

 

 

वंशसङ्‌कीर्तने पुत्रान्वदिष्येऽहं ततो द्विज ।
 
स्मृतिश्चाङ्‌गिरसः पत्नी प्रसूता कन्यकास्तथा ।
 
सिनीवाली कुहूश्चैव राका चानुमती तथा ॥ ७ ॥

हे द्विजा ! त्यांच्या वंशाचे वर्णन करतेवेळी मी त्या दोघांच्या संततिचे वर्णन करेन. अंगिराची पत्नी स्मृति होती, त्यांना सिनीवाली, कुहू, राका आणि अनुमति नावाच्या कन्या झाल्या .

 

 

अनसूया तथैवात्रेर्जज्ञे पुत्रानकल्मषान् ।
सोमं दुर्वाससं चैव दत्तात्रेयं च योगिनम् ॥ ८ ॥

अत्रिंची भार्या अनसूया हिने चंद्रमा, दुर्वास आणि योगी दत्तात्रेय – ह्या निष्पाप पुत्रांना जन्म दिला .

 

 

 प्रीत्यां पुलस्त्यभार्यायां दत्तोलिस्तत्सुतोऽभवत् ।
 
पूर्वजन्मनि सोऽगस्त्यः स्मृतः स्वायम्भुवेऽन्तरे ॥ ९ ॥

पुलस्त्यांच्या पत्नी प्रीतिपासून दत्तोलिचा जन्म झाला जो त्याच्या पूर्वजन्मी स्वायम्भुव मन्वन्तरात अगस्त्य म्हणून ओळखला जात होता .

 


 
कर्दमश्चार्वरीयांश्च सहिष्णुश्च सुतास्त्रयः ।
 
क्षमा तु सुषुवे भार्या पुलहस्य प्रजापतेः ॥ १० ॥

प्रजापति पुलह ह्यांना पत्नी क्षमापासून कर्दम, उर्वरीयान आणि सहिष्णु हे तीन पुत्र झाले .

 



 
क्रतोश्च सन्ततिर्भार्या वालखिल्यानसूयत ।
 
षष्टिस्तानि सहस्राणि ऋषीणामूर्ध्वरेतसाम् ।
 
अङ्‌गुष्ठपर्वमात्राणां ज्वलद्‌भास्करतेजसाम् ॥ ११ ॥

क्रतुच्या सन्तति नामक पत्नीने अंगठ्याच्या पेरांसारख्या  शरीराचे तसेच प्रखर सूर्या समान तेजस्वी वालखिल्यादि साठ हजार ऊर्ध्वरेता मुनिंना जन्म दिला .

 


ऊर्जायां च वसिष्ठस्य सप्ताजायन्त वै सुताः ॥ १२ ॥

रजो गोत्रोर्ध्वबाहुश्च सवनश्चानघस्तथा ।
 
सुतपाः शुक्र इत्येते सर्वे सप्तर्षयोऽमलाः ॥ १३ ॥

वसिष्ठांच्या ऊर्जा नामक स्त्रीपासून रज, गोत्र, ऊर्ध्वबाहू, सवन, अनघ, सुतपा आणि शुक्र हे सात पुत्र उत्पन्न झाले. हे निर्मळ स्वभावाचे समस्त मुनिगण (तिसर्‍या मन्वन्तरात) सप्तर्षि झाले .

 


योऽसावग्न्यभिमानी स्याद् ब्रह्मणस्तनयोऽग्रजः ।
 
तस्मात्स्वाहा सुताँल्लेभे त्रीनुदारौजसो द्विज ॥ १४ ॥
पावकं पवमानं च शुचिं चापि जलाशिनम् ॥ १५ ॥

हे द्विजा ! अग्निचा अभिमानी देव, जो ब्रह्माचा ज्येष्ठ पुत्र आहे, त्याला स्वाहा नामक पत्नीपासून अति तेजस्वी पावक, पवमान और जलभक्षण कणारा शुचि हे तीन पुत्र झाले .

 


तेषां तु संततावन्ये चत्वारिंशच्च पञ्च च ।
कथ्यन्ते वह्नयश्चैते पिता पुत्रत्रयं च यत् ॥ १६ ॥

एवमेकोनपञ्चाशद्‌वह्नयः परिकीर्तिताः ॥ १७ ॥

ह्या तिघांना (प्रत्येकी पंधरा-पंधरा पुत्र अशा क्रमाने) पंचेचाळीस संतति झाली. पिता अग्नि आणि त्याचे तीन पुत्र व त्यांचे पुत्र सर्वांना अग्निच म्हटलं जातं. अशाप्रकारे एकूण एकोणपन्नास (४९) अग्नि सांगितले आहेत .

 


पितरो ब्रह्मणा सृष्टा व्याख्याता ये मया तव ।
 
अग्निष्वात्ता बर्हिषदोऽनग्नयः साग्नयश्च ये ॥ १८ ॥
 
तेभ्यः स्वधा सुते जज्ञे मेनां वै धारिणीं तथा ।
 
ते उभे ब्रह्मवादिन्यौ योगिन्यावप्युभे द्विज ॥ १९ ॥
 
उत्तमज्ञानसम्पन्ने सर्वैः समुदितैर्गुणैः ॥ २० ॥

हे द्विजा ! ब्रह्माद्वारा रचल्या गेलेल्या ज्या अनग्निक अग्निष्ठात्ता और साग्निक बर्हिषद आदि पितरां विषयी मी तुला सांगितलं होतं त्यांच्या द्वारा स्वधाने मेना आणि धारिणी नामक दोन कन्या उत्पन्न केल्या. त्या दोघी उत्तम ज्ञानसम्पन्न आणि सर्व गुणांनी युक्त ब्रह्मवादिनी व योगिनी होत्या .

 



 
इत्येषा दक्षकन्यानां कथितापत्यसंततिः ।
 
श्रद्धावान्संस्मरन्नेतामनपत्यो न जायते ॥ २१ ॥

अशाप्रकारे ह्या दक्षकन्यांच्या वंशपरम्परेचं वर्णन केलं. जो कोणी श्रद्धापूर्वक ह्याचे स्मरण करतो तो नि:सन्तान राहात नाही.

 


   "इति श्रीविष्णुपुराणे प्रथमे अंशे दशमोऽध्याय
"


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

विष्णुपुराण, तृतीय अंश, त्रयोदश अध्याय | Vishnu Puran, Ansh 3 , Adhyay 13

  ॥ विष्णुपुराणम् ॥ ॥ तृतीयः अंशः ॥ त्रयोदशोऽध्यायः ॥   आभ्युदयिक श्राद्ध , प्रेतकर्म तथा श्राद्धादि विचार और्व उवाच सचैलस्य पितुः ...