॥ प्रथमः अंशः ॥ ॥ चतुर्थोऽध्यायः ॥
"ब्रह्माची उत्पत्ति वराह भगवान द्वारा
पृथ्वीचा उद्धार आणि ब्रह्माची लोक-रचना"
मैत्रेय उवाचः
ब्रह्मा
नारायणाख्योऽसौ कल्पादौ भगवान् यथा ।
ससर्ज
सर्वभूतानि तदाचक्ष्व महामुने ॥ १ ॥
मैत्रेय म्हणाले - हे महामुने !
कल्पाच्या सुरुवातीला नारायण नामक भगवान ब्रह्माने ज्याप्रकार समस्त भूतांची रचना
केली त्याचे आपण वर्णन करावे.
पराशर उवाचः
प्रजाः ससर्ज भगवान्ब्रह्मा
नारायणात्मकः ।
प्रजापतिपतिर्देवो यथा तन्मे निशामय
॥ २ ॥
पराशर म्हणाले - प्रजापतींचे स्वामी
नारायण स्वरूप ब्रह्मानी ज्या प्रकारे प्रजा सृष्टि निर्माण केली ते आता
माझ्याकडून ऐक .
अतीतकल्पावसाने निशासुप्तोत्थितः
प्रभुः ।
सत्त्वोद्रिक्तस्तथा ब्रह्मा शून्यं
लोकमवैक्षत ॥ ३ ॥
पूर्व कल्पाचा अंत झाल्यानंतर रात्री
झोपून उठल्यावर सत्वगुणांच्या उद्रेकाने युक्त ब्रह्माने संपूर्ण लोक शून्यमय
असल्याचे पाहिले .
नारायणः परोऽचिन्त्यः परेषामपि स
प्रभुः ।
ब्रह्मस्वरूपी
भगवाननादिः सर्वसंभवः ॥ ४ ॥
भगवान नारायण पर आणि अचिंत्य असून, ब्रह्मा शिव
आदि ईश्वरांचे ईश्वर आहेत ते ब्रह्मस्वरूप, अनादी आणि सर्वांच्या उत्पत्तीचे स्थान आहेत .
इमं चोदाहरन्त्यत्र श्लोकं नारायणं
प्रति ।
ब्रह्मस्वरूपिणं देवं जगतः
प्रभवाप्ययम् ॥ ५ ॥
त्या ब्रहमस्वरूप भगवान नारायणा
विषयी जो ह्या जगताच्या उत्पत्ति आणि लयाचे स्थान आहे त्याच्याविषयी हा श्लोक
सांगितला जातो .
आपो नारा इति प्रोक्ता आपो वै
नरसूनवः ।
अयनं तस्य ताः पूर्वं तेन नारायणः
स्मृतः ॥ ६ ॥
नरापासून उत्पन्न झाल्यामुळे जलाला
नार म्हटले जाते . हे नार (जल) त्या भगवानाचे प्रथम अयन म्हणजे निवासस्थान आहे
म्हणून त्याला नारायण म्हणतात.
तोयान्तःस्थां महीं ज्ञात्वा
जगत्येकार्णवे प्रभुः ।
अनुमानात्तदुद्धारं कर्तुकामः
प्रजापतिः ॥ ७ ॥
संपूर्ण जगत जलमय होत होते म्हणून
ब्रह्माने पृथ्वी जलाच्या आत आहे असे अनुमानाने जाणून तिला बाहेर काढण्यासाठी एक
दुसरे शरीर धारण केले .
अकरोत्स्वतनूमन्यां कल्पादिषु यथा
पुरा ।
मत्स्यकूर्मादिकां तद्वद्वाराहं
वपुरास्थितः ॥ ८ ॥
पूर्व कल्पाच्या आदीकालात जसे
त्यांनी मत्स्य आणि कूर्म रूप धारण केले होते ह्या प्रमाणे ह्या वाराह कल्पाच्या
प्रारंभी त्यांनी वेदयज्ञमय वाराह शरीर ग्रहण केले .
वेदयज्ञमयं रूपमशेषजगतः स्थितौ ।
स्थितः स्थिरात्मा सर्वात्मा
परमात्मा प्रजापतिः ॥ ९ ॥
संपूर्ण जगताच्या स्थितित तत्पर होऊन
सर्वांचे अंतरात्मा आणि अविचल रूपी परमात्मा प्रजापति ब्रह्माने जो पृथ्वीला धारण
करणारा आहे आणि आपल्याच आश्रयाने स्थित आहे .
जनलोकगतैस्सिद्धैस्सनकाद्यैरभिष्टुतः
।
प्रविवेश तदा तोयमात्माधारो धराधरः ॥
१० ॥
ज्याची जनलोक स्थित सनक आदि
सिद्धेश्वर योग्यांकडून स्तुति केली जाते तो जलात प्रवेश करता झाला .
निरीक्ष्य तं तदा देवी पातालतलमागतम्
।
तुष्टाव प्रणता भूत्वा भक्तिनम्रा
वसुंधरा ॥ ११ ॥
तेव्हा त्याला पाताळ लोकात आलेले
पाहून देवी वसुंधरा अत्यंत भक्ति भावाने विनम्रतेने त्याची स्तुति करू लागली .
पृथिव्युवाचः
नमस्ते पुण्डरीकाक्ष शङ्खचक्रगदाधर
।
मामुद्धरास्मादद्य त्वं त्वत्तोऽहं
पूर्वमुत्थिता ॥ १२ ॥
पृथ्वी म्हणाली - हे शंख चक्र गदा
पद्म धारण करणाऱ्या कमल नयन भगवान ! तुम्हाला नमस्कार . आज ह्या पाताळातून तुम्ही
माझा उद्धार करा . पूर्वकाली मी तुमच्यापासूनच उत्पन्न झाले होते .
त्वयाहमुद्धृता पूर्वं त्वन्मयाहं
जनार्दन ।
तथान्यानि च भूतानि गगनादीन्यशेषतः ॥
१३ ॥
हे जनार्दना पूर्विदेखील आपणच माझा
उद्धार केला आहे . आणि हे प्रभो मी तसेच आकाशादि अन्य भूतांचे आपणच उपदान कारण
आहात .
नमस्ते
परमात्मात्मन्पुरुषात्मन्नमोऽस्तु ते ।
प्रधानव्यक्तभूताय कालभूताय ते नमः ॥
१४ ॥
हे परमात्मा आपल्याला नमस्कार हे
पुरुषात्मना आपल्याला नमस्कार . हे प्रधान (कारण) आणि व्यक्त (कार्य) रूप आपल्याला
नमस्कार .
त्वं कर्ता सर्वभूतानां त्वं पाता
त्वं विनाशकृत् ।
सर्गादिषु प्रभो
ब्रह्मविष्णुरुद्रात्मरूपधृक् ॥ १५ ॥
हे प्रभो ! जगताच्या सृष्टिसाठी
ब्रह्मा विष्णु आणि रुद्ररूप धारण करणारे आपणच संपूर्ण भूतांची उत्पत्ति पालन आणि
विनाश करणारे आहात .
सम्भक्षयित्वा सकलं
जगत्येकार्णवीकृते ।
शेषे त्वमेव गोविन्द चिन्त्यमानो
मनीषिभिः ॥ १६ ॥
हे गोविन्दा ! सर्वांचे भक्षण करून शेवटी आपणच मनिषिजनांद्वारा चिंतित होऊन जलात शयन करता .
भवतो
यत् परं रूपं तन्न जानाति कश्चन ।
अवतारेषु यद्रूपं तदर्चन्ति दिवौकसः
॥ १७ ॥
हे प्रभो ! आपले जे परतत्त्व आहे
त्याला कोणीही जाणत नाही;
म्हणून आपण ज्या रूपाने अवतारां मध्ये प्रकट
होता त्याचीच देवगण पूजा करतात.
त्वामाराध्य परं ब्रह्म याता मुक्तिं
मुमुक्षवः ।
वासुदेवमनाराध्य को मोक्षं
समवाप्स्यति ॥ १८ ॥
तुमची म्हणजे परब्रह्माचीच आराधना
करून मुमुक्षुजन मुक्त आहेत, वासुदेवाच्या आराधने शिवाय कोण मोक्ष प्राप्त करू
शकेल ?
यत्किञ्चिन्मनसा ग्राह्यं यद्ग्राह्यं
चक्षुरादिभिः ।
बुद्ध्या च यत्परिच्छेद्यं तद्रूपमखिलं
तव ॥ १९ ॥
मनाने जे काही ग्रहण (संकल्प)केले
जाते, चक्षु
आदि इन्द्रियांद्वारे जे काही ग्रहण करण्या योग्य (विषय) आहेत , बुद्धि द्वारा
जे काही विचारणीय आहे ते सर्व आपलेच रूप आहे .
त्वन्मयाहं त्वदाधारा त्वत्सृष्टा
त्वामुपाश्रिता ।
माधवीमिति लोकोऽयमभिधत्ते ततो हि
माम् ॥ २० ॥
हे प्रभो ! मी देखील आपलेच रूप आहे, आपलीच आश्रित आहे आणि
आपल्याचद्वारा रचली गेली आहे म्हणून आपल्याच शरणात आहे. म्हणूनच लोकामध्ये मला ‘माधवी’ देखील म्हटले
जाते.
जयाखिलज्ञानमय जय स्थूलमयाव्यय ।
जयाऽनन्त जयाव्यक्त जय व्यक्तमय
प्रभो ॥ २१ ॥
हे सम्पूर्ण ज्ञानमया ! हे स्थूलमया
! हे अव्यया ! आपला जय असो ! हे अनंता ! हे अव्यक्ता ! हे व्यक्तमय प्रभो !
परापरात्मन्विश्वात्मञ्जय यज्ञपतेऽनघ
।
त्वं यज्ञस्त्वं वषट्कारस्त्वमोङ्कारस्त्वमग्नयः
॥ २२ ॥
आपला जय असो ! हे
परापर-स्वरुपा ! हे विश्वात्मना ! जे यज्ञपते ! हे अनघा ! आपला जय असो ! हे प्रभो ! आपणच यज्ञ आहात, आपणच वषटकार आहात, आपणच ओंकार
आहात आणि आपणच सर्व प्रकारचे अग्नि देखील आहात.
त्वं वेदास्त्वं तदङ्गानि त्वं
यज्ञपुरुषो हरे ।
सूर्यादयो ग्रहास्तारा
नक्षत्राण्यखिलं जगत् ॥ २३ ॥
हे हरे ! आपणच वेद, वेदांग आणि
यज्ञपुरुष आहात तसेच सूर्य आदि ग्रह, तारे, नक्षत्र आणि सम्पूर्ण जगत सुद्धा आपणच आहात .
मूर्तामूर्तमदृश्यं च दृश्यं च
पुरुषोत्तम ।
यच्चोक्तं यच्च नैवोक्तं मयात्र
परमेश्वर ।
तत्सर्वं त्वं नमस्तुभ्यं भूयो भूयो
नमो नमः ॥ २४ ॥
हे पुरुषोत्तमा ! हे परमेश्वरा ! मूर्त-अमूर्त, दृश्य-अदृश्य तसेच जे जे काही मी सांगितले आणि जे नाही सांगितले ते देखील सर्व आपणच आहात, म्हणून आपल्याला नमस्कार , वारंवार नमस्कार .
पराशर उवाचः
एवं संस्तूयमानस्तु पृथिव्या
पृथिवीधरः ।
सामस्वरध्वनिः श्रीमाञ्जगर्ज
परिघर्घरम् ॥ २५ ॥
पराशर म्हणाले – पृथ्वीकडून
अशाप्रकारे स्तुति केली गेल्यावर सामस्वरच ज्यांचा ध्वनि आहे त्या भगवान धरणीधराने
घर्घर शब्दात गर्जना केली .
ततः समुत्क्षिप्य धरां स्वदंष्ट्रया
महावराहः स्फुटपद्मलोचनः ।
रसातलादुत्पलपत्रसन्निभः
समुत्थितो नील इवाचलो महान् ॥ २६ ॥
नंतर विकसित कमळासमान नेत्र असलेल्या
त्या महावराहाने अपल्या दाढांनी पृथ्वीला उचलले आणि ते कमल दलासमान श्याम आणि
नीलाचलासारखे विशालकाय भगवान रसातळातून बाहर आले .
उत्तिष्ठता तेन मुखानिलाहतं
तत्सम्भवाम्भो जनलोकसंश्रयान् ।
प्रक्षालयामास हि तान्महाद्युतीन्
सनन्दनादीनपकल्मषान् मुनीन् ॥ २७ ॥
बाहेर पडताना त्यांच्या तोंडातून व
श्वासातून उसळणार्या जलाने जनलोकी राहाणार्या महातेजस्वी आणि निष्पाप सनंदनादि
मुनीश्वरांना भिजवून टाकले .
प्रयान्ति तोयानि खुराग्रविक्षत-
रसातलेऽधः
कृतशब्दसंततम् ।
श्वासानिलास्ताः
परितः प्रयान्ति
सिद्धा
जने ये नियतं वसन्ति ॥ २८ ॥
जल मोठ्याने आवाज करत त्यांच्या
खुरांनी विदीर्ण झालेल्या रसातळात खालच्या बाजूने जाऊ लागले व जनलोकात राहणारे
सिद्धगण त्यांच्या श्वास-वायुने विक्षिप्त होऊन इथे तिथे धावू लागले.
उत्तिष्ठतस्तस्य जलार्द्रकुक्षे-
र्महावराहस्य महीं विगृह्य ।
विधुन्वतो वेदमयं शरीरं
रोमान्तरस्था मुनयः स्तुवन्ति ॥ २९ ॥
ज्यांची कुक्षि जलाने भिजलेली आहे
असे ते महावराह
ज्यावेळी आपल्या वेदमय कंपमान शरीराने पृथ्वीला घेऊन बाहेर आले तेव्हा
त्यांच्या रोमावलीत स्थित मुनिजन त्यांची स्तुति करू लागले.
तं
तुष्टुवुस्तोषपरीतचेतसो
लोके
जने ये निवसन्ति योगिनः ।
सनन्दनाद्या
ह्यतिनम्रकन्धरा
धराधरं
धीरतरोद्धतेक्षणम् ॥ ३० ॥
त्या निश्शंक और उन्नत दृष्टिधारी
धराधर भगवानांची जनलोकी राहणार्या सनन्दनादि योगीश्वरांनी प्रसन्नचित्ताने अति
नम्रतापूर्वक मस्तक झुकवून अशाप्रकारे स्तुति केली .
जयेश्वराणां परमेश केशव
प्रभो गदाशङ्खधरासिचक्रधृक् ।
प्रसूतिनाशस्थितिहेतुरीश्वर-
स्त्वमेव नान्यत्परमं च यत्पदम् ॥ ३१ ॥
‘हे ब्रह्मादि ईश्वरांच्या परम ईश्वरा! हे केशवा !
हे शंख-गदाधरा ! हे खंड-चक्रधारी प्रभो ! आपला जयजयकार . तुम्हीच संसाराच्या
उत्पत्ति, स्थिति
आणि नाशाचे कारण आहात, तसेच
तुम्हीच ईश्वर आहात
आणि ज्याला परमपद म्हणतात ते देखील तुमच्या अतिरिक्त आणि काहीच नाही.
पादेषु वेदास्तव यूपदंष्ट्र
दन्तेषु यज्ञाश्चितयश्च वक्त्रे ।
हुताशजिह्वोऽसि तनूरुहाणि
दर्भाः प्रभो यज्ञपुमांस्त्वमेव ॥ ३२ ॥
हे यूपरूपी दंष्ट्राधारी प्रभु !
तुम्हीच यज्ञपुरुष आहात. तुमच्या चरणात चारही वेद आहेत, दातांमध्ये
यज्ञ आहे, मुखात
[श्येन चित्त आदि] चित्ति आहेत, हुताशन (यज्ञाग्नि) तुमची जिव्हा आहे आणि कुशा
तुमची रोमावली आहे
.
विलोचने रात्र्यहनी महात्म-
न्सर्वाश्रयं ब्रह्म परं शिरस्ते ।
सूक्तान्यशेषाणि सटाकलापो
घ्राणं समस्तानि हवींषि देव ॥ ३३ ॥
हे
महात्मना ! रात्र आणि दिवस तुमचे नेत्र आहेत तसेच सर्वांचे आधारभूत परबह्म तुमचे
मस्तक आहे. हे देवा ! वैष्णव आदि समस्त सूक्त तुमच्या स्कंधावरील रोम गुच्छ आहेत
आणि समस्त हवि तुमचे प्राण आहेत.
स्रुक्तुण्ड सामस्वरधीरनाद
प्राग्वंशकायाखिलसत्रसन्धे ।
पूर्तेष्टधर्मश्रवणोऽसि देव
सनातनात्मन्भगवन्प्रसीद ॥ ३४ ॥
हे प्रभो ! स्रुक तुमचे तोंड आहे, सामस्वर
धीर-गम्भीर शब्द आहे, प्राग्वंश
म्हणजे यजमानगृह तुमचे शरीर आहे तथा सत्र शरीराच्या संधि आहेत. हे देवा ! इष्ट
(श्रौत) आणि पुर्त (स्मार्त) धर्म तुमचे कान आहेत. हे नित्यस्वरूप भगवन ! प्रसन्न
व्हा.
पदक्रमाक्रान्तभुवं भवन्त-
मादिस्थितं
चाक्षर विश्वमूर्ते ।
विश्वस्य
विद्मः परमेश्वरोऽसि
प्रसीद
नाथोऽसि चराचरस्य ॥ ३५ ॥
हे अक्षरा ! हे विश्वमूर्ते ! आपल्या
पाद-प्रहाराने भूमंडलाला
व्याप्त करणार्या तुम्हाला आम्ही विश्वाचे आदिकारण मानतो. तुम्ही संपूर्ण
चराचर जगताचे परमेश्वर आणि नाथ आहात , म्हणून प्रसन्न व्हा.
दंष्ट्राग्रविन्यस्तमशेषमेतद्-
भूमण्डलं
नाथ विभाव्यते ते ।
विगाहतः
पद्मवनं विलग्नं
सरोजिनीपत्रमिवोढपङ्कम्
॥ ३६ ॥
हे नाथा ! तुमच्या दाढांवर
ठेवलेले हे संपूर्ण भूमंडल असे भासते जणू कमलवनाला चिरडणार्या गजराजाच्या दातातील
चिखलाने भरलेले एखादे कमळाचे पान.
द्यावापृथिव्योरतुलप्रभाव यदन्तरं
तद्वपुषा तवैव ।
व्याप्तं जगद्व्याप्तिसमर्थदीप्ते हिताय विश्वस्य विभो भव त्वम् ॥ ३७ ॥
हे अनुपम प्रभावशाली प्रभो ! पृथ्वी
आणि आकाशा मध्ये जितके अंतर आहे ते तुमच्या शरीरानेच व्याप्त आहे. हे विश्वाला
व्याप्त करण्यास समर्थ असणार्या तेजयुक्त प्रभो ! तुम्ही विश्वाचे कल्याण करा .
परमार्थस्त्वमेवैको नान्योऽस्ति जगतः
पते ।
तवैष महिमा येन व्याप्तमेतच्चराचरम्
॥ ३८ ॥
हे जगत्पते ! परमार्थ (सत्य वस्तु)
केवळ एकमात्र तुम्हीच आहात,
तुमच्या
व्यतिरिक्त आणि काहीही नाही, हा तुमचाच महिमा आहे ज्यामुळे हे
संपूर्ण चराचर जगत व्याप्त आहे.
यदेतद् दृश्यते
मूर्तमेतज्ज्ञानात्मनस्तव ।
भ्रान्तिज्ञानेन
पश्यन्ति जगद्रूपमयोगिनः ॥ ३९ ॥
हे जे काही मूर्तिमान जगत दिसतं ते
ज्ञानस्वरूप अशा आपलेच रूप आहे. अजितेन्द्रिय लोक भ्रमाने ह्याला जगत-रूपात
पाहतात.
ज्ञानस्वरूपमखिलं
जगदेतदबुद्धयः ।
अर्थस्वरूपं
पश्यन्तो भ्राम्यन्ते मोहसम्प्लवे ॥ ४० ॥
ह्या संपूर्ण ज्ञान-स्वरूप जगताला
बुद्धिहीन लोक अर्थरूप मानतात म्हणून ते निरंतर मोहमयी संसार-सागरात भटकत राहतात .
ये तु ज्ञानविदः शुद्धचेतसस्तेऽखिलं
जगत् ।
ज्ञानात्मकं प्रपश्यन्ति त्वद्रूपं
परमेश्वर ॥ ४१ ॥
हे परमेश्वरा ! जे लोक शुद्धचित्त
आणि विज्ञानवेत्ता आहेत ते ह्या संपूर्ण संसारात तुमचेच ज्ञानात्मक स्वरूप पाहतात.
प्रसीद सर्वसर्वात्मन्वासाय
जगतामिमाम् ।
उद्धरोर्वीममेयात्मञ्छन्नो
देह्यब्जलोचन ॥ ४२ ॥
हे सर्वा ! जे सर्वात्मना ! प्रसन्न
व्हा. हे अप्रमेयात्मना ! हे कमलनयना ! संसाराच्या निवासासाठी पृथ्वीचा उद्धार
करून आम्हाला शांति प्रदान करा .
सत्त्वोद्रिक्तोऽसि भगवन् गोविन्द
पृथिवीमिमाम् ।
समुद्धर भवायेश शं नो देह्यब्जलोचन ॥
४३ ॥
हे भगवन ! हे गोविन्दा ! ह्यावेळी
तुम्ही सत्त्वप्रधान आहात म्हणून हे इश्वरा ! जगताच्या उद्भवासाठी तुम्ही ह्या
पृथ्वीचा उद्धार करा आणि हे कमलनयना ! आम्हाला शांति प्रदान करा .
सर्गप्रवृत्तिर्भवतो
जगतामुपकारिणी ।
भवत्वेषा
नमस्तेऽस्तु शन्नो देह्यब्जलोचन ॥ ४४ ॥
तुमच्या द्वारा ह्या सर्गाची
प्रवृत्ति संसाराचे उपकार करणारी होओ , हे कमलनयना ! तुम्हाला नमस्कार, तुम्ही आम्हाला
शांति प्रदान करा .
पराशर उवाचः
एवं संस्तूयमानस्तु परमात्मा महीधरः
।
उज्जहार क्षितिं क्षिप्रं
न्यस्तवांश्च महार्णवे ॥ ४५ ॥
पराशर म्हणाले– अशाप्रकारे
स्तुति केल्यावर पृथ्वीला धारण करणार्या परमात्मा वराहाने पृथ्वीला लगेच उचलून
अपार जलावर स्थापित केले.
तस्योपरि जलौघस्य महती नौरिव स्थिता
।
विततत्वात्तु देहस्य न मही याति
सम्प्लवम् ॥ ४६ ॥
त्या जलसमूहावर ती पृथ्वी एका भल्या
मोठ्या नौके सारखी स्थित आहे आणि आकाराने प्रचंड असल्याने ती जलात बुडत नाही.
ततः क्षितिं समां कृत्वा पृथिव्यां
सोऽचिनोद्गिरीन् ।
यथाविभागं
भगवाननादिः सर्वसम्भवः ॥ ४७ ॥
नंतर त्या अनादि परमेश्वराने
पृथ्वीला समतल करून तिच्यावर जिथेतिथे पर्वतांना विभागून स्थापित केले .
प्राक्सर्गदग्धानखिलान्पर्वतान्पृथिवीतले
।
अमोघेन प्रभावेन ससर्जामोघवाञ्छितः ॥
४८ ॥
सत्यसंकल्प भगवानांनी आपल्या अमोघ
प्रभावाने पूर्वकल्पाच्या
शेवटी दग्ध झालेल्या समस्त पर्वतांना पृथ्वीतलावर यथास्थान रचले.
भूविभागं
ततः कृत्वा सप्तद्वीपान्यथातथम् ।
भूराद्यांश्चतुरो
लोकान्पूर्ववत्समकल्पयत् ॥ ४९ ॥
त्यानंतर त्यांनी सप्तद्वीपादि
क्रमाने पृथ्वीचे यथायोग्य विभाग करून भूलोकादि चारही लोकांची पूर्ववत कल्पना
म्हणजे रचना केली .
ब्रह्मरूपधरो देवस्ततोऽसौ रजसा वृतः
।
चकार सृष्टिं भगवांश्चतुर्वक्त्रधरो
हरिः ॥ ५० ॥
नंतर त्या भगवान हरिने रजोगुण युक्त होऊन चतुर्मुखधारी ब्रह्मारूप धारण करून सृष्टिची रचना केली .
निमित्तमात्रमेवाऽसौ सृज्यानां
सर्गकर्मणि ।
प्रधानकारणीभूता यतो वै सृज्यशक्तयः
॥ ५१ ॥
सृष्टिच्या रचनेत भगवान केवळ
निमित्तमात्रच आहेत, कारण
त्यांचे प्रधान कारण स्रुज्य पदार्थांच्या शक्तिच आहेत.
निमित्तमात्रं मुक्त्वैवं
नान्यत्किञ्चिदपेक्ष्यते ।
नीयते तपतां श्रेष्ठ स्वशक्त्या
वस्तु वस्तुताम् ॥ ५२ ॥
हे तपस्विंमध्ये श्रेष्ठ मैत्रेया !
वस्तुंच्या रचनेत निमित्तमात्राला सोडून ईतर कोणत्याही गोष्टीची आवश्यकताच नाही, कारण वस्तुला
आपल्याच (परिणाम) शक्तिने वस्तुता (स्थूलरूपता) प्राप्त होते .
"इति श्रीविष्णुपुराणे प्रथमे अंशे चतुर्थोऽध्यायः"
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा