॥ प्रथमः अंशः ॥ ॥ तृतीयोऽध्यायः ॥
ब्रह्म आदिंचे आयुष्य आणि काळाचे
स्वरूप
मैत्रेय उवाचः
निर्गुणस्याप्रमेयस्य
शुद्धस्याप्यमलात्मनः ।
कथं
सर्गादिकर्तृत्वं ब्रह्मणोऽभ्युपगम्यते ॥ १ ॥
मैत्रेय म्हणाले – हे भगवन ! जे
ब्रह्म निर्गुण, अप्रमेय, शुद्ध आणि
निर्मलात्मा आहे त्याचे सर्ग आदिचे कर्ता होणे सिद्ध कसे होऊ शकते ?
पराशर उवाचः
शक्तयः
सर्वभावानामचिन्त्यज्ञानगोचराः ।
यतोऽतो ब्रह्मणस्तास्तु सर्गाद्या
भावशक्तयः ।
भवन्ति तपतां श्रेष्ठ पावकस्य
यथोष्णता ॥ २ ॥
पराशर म्हणाले – हे तपस्वी
श्रेष्ठ मैत्रेया ! समस्त भाव-पदार्थांची शक्ति हा अचिन्त्य ज्ञानाचा विषय आहे, म्हणून जशी अग्निची
शक्ति उष्णता तसेच ब्रह्माची देखील सर्गादिरचनारूप शक्ति स्वाभाविक आहे.
तन् निबोध यथा सर्गे
भगवान्सम्प्रवर्तते ।
नारायणाख्यो भगवान्ब्रह्मा
लोकपितामहः ॥ ३ ॥
आता ज्या प्रकारे नारायण नामक
लोक-पितामह भगवान ब्रह्मा सृष्टिच्या रचनेत प्रवृत्त होतात ते ऐक .
उत्पन्नः प्रोच्यते
विद्वन्नित्यमेवोपचारतः ॥ ४ ॥
हे विद्वन ! ते सदैव उपचारानेच ‘उत्पन्न झाले’ असे म्हटलं
जातं .
निजेन तस्य मानेन आयुर्वर्षशतं
स्मृतम् ।
तत् पराख्यं तदर्द्धं च
परार्द्धमभिधीयते ॥ ५ ॥
त्यांच्या स्वतःच्या परिमाणाने
त्यांचे आयुष्य शंभर वर्ष मानले गेले आहे . त्या शंभर वर्षाच्या आयुष्याला पर असे
नाव आहे आणि त्याचे अर्धे म्हणजे परार्ध मानले गेले आहे .
कालस्वरूपं विष्णोश्च यन्मयोक्तं
तवानघ ।
तेन तस्य निबोध त्वं परिमाणोपपादनम्
॥ ६ ॥
अन्येषां चैव जन्तूनां चराणामचराश्च
ये ।
भूभूभृत्सागरादीनामशेषाणां च सत्तम ॥
७ ॥
हे अनघा ! मी तुला जो श्रीविष्णुचा
कालस्वरूप सांगितला त्याच द्वारा ब्रह्माचे
तसेच इतरही जे पृथ्वी, पर्वत, समुद्र आदि
चराचर जीव आहेत त्यांच्या आयुष्याचे परिमाण केले जाते .
काष्ठा पञ्चदशाख्याता निमेषा
मुनिसत्तम ।
काष्ठा त्रिंशत्कला त्रिंशत्कला
मौहूर्तिको विधिः ॥ ८ ॥
हे मुनिश्रेष्ठा ! पंधरा निमेष
म्हणजे एक काष्ठा, तीस
काष्ठा म्हणजे एक कला आणि तीस कला म्हणजे एक मुहूर्त होतो .
तावत्संख्यैरहोरात्रं
मुहूर्तैर्मानुषं स्मृतम् ।
अहोरात्राणि तावन्ति मासः
पक्षद्वयात्मकः ॥ ९ ॥
तीस मुहूर्त म्हणजे मनुष्याचा एक
दिवस-रात्र . तितक्याच म्हणजे तीस दिवसांचा एक मास असतो ज्यात दोन पक्ष असतात .
तैः षड्भिरयनं वर्षं द्वेऽयने
दक्षिणोत्तरे ।
अयनं दक्षिणं रात्रिर्देवानामुत्तरं
दिनम् ॥ १० ॥
सहा महिन्यांचे एक अयन असते आणि
दक्षिणायन व उत्तरायण
हे दोन अयन मिळून एक वर्ष होते . दक्षिणायन
म्हणजे देवतांची एक रात्र आणि उत्तरायण म्हणजे त्यांचा एक दिवस .
दिव्यैर्वर्षसहस्रैस्तु
कृतत्रेतादिसंज्ञितम् ।
चतुर्युगं द्वादशभिस्तद्विभागं निबोध
मे ॥ ११ ॥
देवतांच्या बारा हजार वर्षांचे सतयुग, त्रेता, द्वापर आणि
कलियुग नामक चार युग असतात . त्यांचे वेगवेगळे परिमाण मी तुला सांगतो .
चत्वारि त्रीणि द्वे चैकं कृतादिषु
यथाक्रमम् ।
दिव्याब्दानां सहस्राणि युगेष्वाहुः
पुराविदः ॥ १२ ॥
प्राचीन विद्वान सतयुग आदिचे परिमाण क्रमश: चार, तीन, दोन आणि एक हजार दिव्य वर्ष सांगतात .
तत्प्रमाणैः शतैः संध्या पूर्वा
तत्राभिधीयते ।
संध्यांशकश्च तत्तुल्यो
युगस्यानन्तरो हि सः ॥ १३ ॥
प्रत्येक युगाच्या पूर्वकाळात
तितक्याच शंभर वर्षांची संध्या असते आणि प्रत्येक युगानंतर तितक्याच काळाचे संध्यांश असते .
संध्यासंध्यांशयोरन्तर्यः कालो
मुनिसत्तम ।
युगाख्यः स तु विज्ञेयः
कृतत्रेतादिसंज्ञितः ॥ १४ ॥
हे मुनिश्रेष्ठा ! ह्या संध्याशा
मध्ये जितका काळ असतो त्यालाच सतयुग आदि युग मानले गेले आहे .
कृतं त्रेता द्वापरश्च कलिश्चैव
चतुर्युगम् ।
प्रोच्यते तत्सहस्रं च ब्रह्मणो
दिवसं मुने ॥ १५ ॥
हे मुने ! सतयुग, त्रेता, द्वापर आणि कलि
ह्याना मिळून चतुर्युग म्हणतात, असे एक हजार चतुर्युग म्हणजे ब्रह्माचा एक
दिवस होतो .
ब्रह्मणो दिवसे ब्रह्मन्मनवस्तु
चतुर्दश ।
भवन्ति परिमाणं च तेषां कालकृतं शृणु
॥ १६ ॥
हे ब्रह्मन ! ब्रह्माच्या एका दिवसात
चौदा मनु असतात, त्यांचे
कालकृत परिमाण ऐक .
सप्तर्षयः सुराः शक्रो मनुस्तत्सूनवो
नृपाः ।
एककाले हि सृज्यन्ते संह्रियन्ते च
पूर्ववत् ॥ १७ ॥
सप्तर्षि, देवगण, इंद्र, मनु आणि मनुचे
पुत्र राजा इत्यादि पूर्व कल्पानुसार एकच काळात रचले जातात आणि एकच काळात त्यांचा
संहार केला जातो .
चतुर्युगाणां संख्याता साधिका
ह्येकसप्ततिः ।
मन्वन्तरं मनोः कालः सुरादीनां च
सत्तम ॥ १८ ॥
हे सत्तमा ! एकाहत्तर
चतुर्युगापेक्षा थोड्या अधिक काळाचे एक मन्वन्तर असते . हाच मनु आणि देवता आदींचा
काळ आहे .
अष्टौ शतसहस्राणि दिव्यया संख्यया
स्मृतम् ।
द्वापञ्चाशत्तथान्यानि
सहस्राण्यधिकानि तु ॥ १९ ॥
अशाप्रकारे दिव्य वर्ष-गणनेनुसार एका
मन्वन्तरात आठ लाख बावन्न हजार वर्ष असतात असे सांगितले जाते.
त्रिंशत्कोट्यस्तु सम्पूर्णाः
संख्याताः संख्यया द्विज ।
सप्तषष्टिस्तथान्यानि नियुतानि
महामुने ॥ २० ॥
विंशतिश्च सहस्राणि कालोऽयमधिकं विना
।
मन्वन्तरस्य सङ्ख्येयं
मानुषैर्वत्सरैर्द्विज ॥ २१ ॥
तथा हे महामुने ! मानवी वर्ष
गणनेनुसार मन्वन्तराचे परिमाण पूर्ण तीस
करोड़ सदुसष्ठ लाख वीस हजार वर्ष आहे, याहून अधिक नही.
चतुर्दशगुणो ह्येष कालो ब्राह्ममहः
स्मृतम् ।
ब्राह्मो नैमित्तिको नाम तस्यान्ते
प्रतिसञ्चरः ॥ २२ ॥
ह्या काळाच्या चौदा पट म्हणजे
ब्रह्माचा एक दिवस मानला जातो , त्यानंतर नैमित्तिक नामक ब्राह्म-प्रलय होतो.
तदा हि दह्यते सर्वं त्रैलोक्यं
भूर्भुवादिकम् ।
जनं प्रयान्ति तापार्ता
महर्लोकनिवासिनः ॥ २३ ॥
त्यावेळी भूर्लोक, भुवर्लोक और
स्वर्लोक तीनही लोक जळू लागतात आणि महर्लोकात राहणारे सिद्धगण तापाने त्रस्त होऊन
जनलोकात जातात.
एकार्णवे तु त्रैलोक्ये ब्रह्मा
नारायणात्मकः ।
भोगिशय्यां गतः शेते
त्रैलोक्यग्रासबृंहितः ॥ २४ ॥
जनस्थैर्योगिभिर्देवश्चिन्त्यमानोऽब्जसम्भवः
।
तत्प्रमाणां हि तां रात्रिं तदन्ते
सृजते पुनः ॥ २५ ॥
अशाप्रकारे तीनहीलोक जलमय झाल्यावर
जनलोकवासी योगिंच्याद्वारा ध्यान केले जाणारे नारायण स्वरूप कमलयोनि ब्रह्मा
त्रिलोक्याच्या ग्रासाने तृप्त होऊन त्यांच्या एका दिवसाइतकेच परिमाण असलेल्या रात्री
शेषशय्येवर शयन करतात आणि रात्र सरल्यावर परत नव्याने संसारसृष्टिची रचना करतात.
एवं तु ब्रह्मणो वर्षमेवं वर्षशतं च
यत् ।
शतं हि तस्य वर्षाणां
परमायुर्महात्मनः ॥ २६ ॥
अशाप्रकारे पक्ष, मास आदि
गणनेनुसार ब्रह्माचे एक वर्ष आणि शंभर वर्ष असतात. ब्रह्माची १०० वर्ष हीच महात्मा
ब्रह्माची परमायु आहे.
एकमस्य व्यतीतं तु परार्द्धं
ब्रह्मणोऽनघ ।
तस्यान्तेऽभून्महाकल्पः पाद्म
इत्यभिविश्रुतः ॥ २७ ॥
हे अनघा ! त्या ब्रह्माच्या
आयुष्याचा एक परार्ध संपलेला आहे. ह्या परार्धाच्या शेवटी पाद्म नावाचा विख्यात
महाकल्प झाला होता.
द्वितीयस्य
परार्द्धस्य वर्तमानस्य वै द्विज ।
वाराह इति कल्पोऽयं प्रथमः
परिकीर्तितः ॥ २८ ॥
हे द्विजा ! आता वर्तमान ब्रह्माच्या
दुसर्या परार्धाचा
वाराह
नामक पहिला कल्प चालू आहे.
"इति श्रीविष्णुपुराणे
प्रथमे अंशे तृतीयोऽध्यायः"
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा