बुधवार, २ सप्टेंबर, २०२६

विष्णुपुराण, पंचम अंश, अष्टम / नवम अध्याय | Vishnu Puran, Ansh 5 , Adhyay 8 , 9

 

॥ विष्णुपुराणम् ॥

॥ पञ्चमः अंशः ॥ ॥ अष्टमोऽध्यायः ॥


 

 "धेनुकासुर-वध"

श्रीपराशर उवाच
 गाः पालयन्तौ च पुनः सहितौ बलकेशवौ ।
 भ्रममाणौ वने तस्मिन् रम्यं तालवनं गतौ ॥ १ ॥

 श्रीपराशर म्हणाले ;- एके दिवशी बलराम आणि कृष्ण एकत्र गाईंना चारवत असताना अति रमणीय तालवनात आले ॥१॥



 तत्तु तालवनं दिव्यं धेनुको नाम दानवः ।
 मृगमांसकृताहारः सदाध्यास्ते खराकृतिः ॥ २ ॥

त्या दिव्य तालवनात धेनुक नावाचा एक गाढवाच्या आकाराचा मृगमांसाचा आहार करणारा दैत्य रहात होता ॥ २ ॥


 तत्तु तालवनं पक्वफलसम्पत्समन्वितम् ।
 दृष्ट्‍वा स्पृहान्विता गोपा फलादानेऽब्रुवन्वचः ॥ ३ ॥

त्या तालवनात भरपूर पिकलेली फळं पाहून त्यांना तोडण्याच्या इच्छेने गोपगण म्हणाले ॥ ३॥


 गोपा ऊचुः
 हे राम हे कृष्ण सदा धेनुकेनैष रक्ष्यते ।
 भूप्रदेशो यतस्तस्मात्पक्वानीमानि सन्ति वै ॥ ४ ॥

गोपी म्हणाले ;- राम आणि कृष्ण ! ह्या भूमिची रक्षा नेहमी धेनुकासुर करतो, म्हणून इथे अशी पिकलेली फळं लगडली आहेत ॥ ४ ॥


 फलानि पश्य तालानां गन्धामोदितदिंशि वै ।
 वयमेतान्यभीप्सामः पात्यन्तां यदि रोचते ॥ ५ ॥

आपल्या दरवळाने सम्पूर्ण दिशांना सुगंधित करणारी ही तालफळं आम्हाला खाविशी वाटत आहेत. आमच्यासाठी फळं पाडायला जरा झाड हलवा ना ॥ ५॥



 श्रीपराशर उवाच
 इति गोपकुमाराणां श्रुत्वा संकर्षणो वचः ।
 एतत्कर्तव्यमित्युक्त्वा पातयामास तानि वै ।
 कृष्णश्च पातयामास भुवितानि फलानि वै ॥ ६ ॥

श्रीपराशर म्हणाले ;- गोपींचे हे बोलणे ऐकून बलरामाने 'असेच करुया' असं म्हणून फळं पाडली आणि मग कृष्णानेही काही फळं जमिनीवर पाडली ॥६॥


 फलानां पततां शब्दमाकर्ण्य सुदुरासदः ।
 आजगाम स दुष्टात्मा कोपाद्दैतेयगर्दभः ॥ ७ ॥

पडणार्‍या फळांचा आवाज ऐकून दुद्धर्प आणि दुरात्मा गर्दभासुर चिडून धावून आला ॥ ७ ॥

 


 पद्‍भ्यामुभाभ्यां स तदा पश्चिमाभ्यां बलं बली ।
 जघानोरसि ताभ्यां च स च तेनाभ्यगृह्यत ॥ ८ ॥

त्या महाबलवान असुराने आपल्या मागच्या दोन पायांनी बलरामाच्या छातीवर लाथ मारली. बलरामाने त्याचे ते पायच पकडले ॥ ८ ॥

 


 गृहीत्वा भ्रामयामास सोऽम्बरे गतजीवितम् ।
 तस्मिन्नेव स चिक्षेप वेगेन तृणराजनि ॥ ९ ॥

आणि त्याला पाकडून आकाशात फिरवू लागला. जेव्हा तो निर्जीव झाला तेव्हा अत्यन्त वेगाने त्याला त्या तालवृक्षावरच आपटला ॥९॥


 ततः फलान्यनेकानि तालाग्रान्निपतन्खरः ।
 पृथिव्यां पातयामास महावातो घनानिव ॥ १० ॥

प्रचण्ड वायु मेघवृष्टी करतो तशी त्या गर्दभासूराने पडता पडता त्या तालवृक्षाची भरपूर फळं खाली पाडली ॥ १० ॥


 अन्या नथ सजातीयानागतान्दैत्यगर्दभान् ।
 कृष्णश्चिक्षेप तालाग्रे बलभद्रश्च लीलया ॥ ११ ॥

त्याचे सजातीय अन्य गर्दभासुर आल्यावरही कृष्ण आणि रामाने त्यांना सहजपणे तालवक्षांवर आपटले ॥ ११ ॥


 क्षणेनालङ्‍कृता पृथ्वी पक्वैस्तलफलैस्तदा ।
 दैत्य गर्दभदेहैश्च मैत्रेय शुशुभेऽधिकम् ॥ १२ ॥

हे मैत्रेया ! अशाप्रकारे एका क्षणातच पिकलेल्या तालफळांनी आणि गर्दभासुराच्या देहाने   विभूषिता होऊन पृथ्वी, अत्यन्त सुशोभित झाली ॥ १२ ॥


 ततो गावो निराबाधास्तस्मिंस्तलवने द्विज ।
 नवशष्पं सुखं चेरुर्यन्न भुक्तमभूत्पुरा ॥ १३ ॥

हे द्विजा ! तेव्हापासून त्या तालवनात गाई निर्विघ्न होऊन सुखपूर्वक नवीन तृण चरू लागल्या जे त्यांना आधी कधीच चरायला मिळाले नव्हते ॥ १३ ॥



 इति श्रीविष्णुमहापुराणे पञ्चमे अंशे अष्टमोऽध्यायः (८)







॥ विष्णुपुराणम् ॥

॥ पञ्चमः अंशः ॥ ॥ नवमोऽध्यायः ॥

 

"प्रलम्ब-वध"

श्रीपराशर उवाच
 तस्मिन् रासभदैतेये सानुगे विनिपातिते ।
 सौम्यं तद्‍गोपगोपीनां रम्यं तालवनं बभौ ॥ १ ॥

 श्रीपराशर म्हणाले ;- आपल्या अनुचरांसहित तो गर्दभासुर मारला गेल्यावर ते सुरम्य तालवन गोप आणि गोपींसाठी सुखदायक झाले ॥ १ ॥

 

 ततस्तौ जातहर्षौ तु वसुदेवसुतावुभौ ।
 हत्वा धेनुकदैतेयं भाण्डीरवटमागतौ ॥ २ ॥

त्यानन्तर धेनुकासुराला मारून ते दोघे वसुदेव पुत्र प्रसन्न मनाने भाण्डीर नामक वटवृक्षाच्या खाली आले ॥२॥


क्ष्वेलमानौ प्रगायन्तौ विचिन्वन्तौ च पादपान् ।
 चारयन्तौ च गा दूरे व्याहरन्तौ च नामभिः ॥ ३ ॥
 निर्योगपाशस्कन्धौ तौ वनमालाविभूषितौ ।
 शुशुभाते महात्मानौ बलाशृङ्‍गाविवर्षभौ ॥ ४ ॥

खांद्यावर गाईंना बांधण्याची दोरी घालून वनमालांनी विभूषित ते दोन्ही महात्मा बालक सिंहनाद करत, गात, झाडांवर चढत, दूरपर्यंत गाई चारत असत, त्यांची नावे घेऊन त्यांना हाकारत नवीनच शिंग फुटलेल्या वासरांप्रमाणे शोभून दिसत ॥ ३-४ ॥


 सुवर्णाञ्जनचूर्णाभ्यां तौ तदा रूषिताम्बरौ ।
 महेन्द्रायुधसंयुक्तौ श्वेतकृष्णाविवाम्बुदौ ॥ ५ ॥

त्या दोघांची वस्त्रे क्रमशः सोनेरी आणि श्याम वर्णाची असत म्हणून ते इन्द्रधनुष्य युक्त श्वेत आणि श्याम मेघांसमान दिसायचे ॥ ५॥


 चेरतुर्लौकसिद्धाभिः क्रीडाभिरितरेतरम् ।
 समस्तलोकनाथानां नाथभूतौ भुवं गतौ ॥ ६ ॥

ते समस्त लोकपालांचे प्रभु पृथ्वीवर अवतीर्ण होऊन नाना प्रकारच्या लौकिक लीलांनी आपसात खेळायचे ॥६॥


 मनुष्यधर्माभिरतौ मानयन्तौ मनुष्यताम् ।
 तज्जातिगुणयुक्ताभिः क्रिडाभिश्चेरतुर्वनम् ॥ ७ ॥

मनुष्य-धर्मात तत्पर राहून मनुष्यतेचा सम्मान करत ते माणसांसारख्या क्रिडा करत वनात फिरायचे ॥ ७ ॥


 ततस्त्वान्दोलिकाभिश्च नियुद्धैश्च महाबलौ ।
 व्यायामं चक्रतुस्तत्र क्षेपणीयैस्तथाश्मभिः ॥ ८ ॥

ते दोन्ही महाबली बालक कधी झोपाळ्यावर झुलून, तर कधी परस्पर मल्लयुद्ध करून आणि कधी दगड मारून नाना प्रकारे व्यायाम करायचे ।॥ ८॥


 तल्लिप्सुरसुरस्तत्र ह्युभयो रममाणयोः ।
 आजगाम प्रलम्बाख्यो गोपवेषतिरोहितः ॥ ९ ॥

ह्याचवेळी त्या दोन्ही खेळणार्‍या बालकांना उचलून घेऊन जाण्याच्या इच्छेने प्रलम्ब नामक दैत्य लपतछपत गोपवेषात तिथे आला ॥ ९ ॥

 


 सोऽवगाहत निःशङ्‍कस्तेषां मध्यममानुषः ।
 मानुषं वपुरास्थाय प्रलम्बो दानवोत्तमः ॥ १० ॥

दानवश्रेष्ठ प्रलम्ब मनुष्य नसतानाही मनुष्य रुप धारण करून निश्शङ्क भावाने त्या उन बालकांमध्ये घुसला ॥ १० ॥


 तयोश्छिद्रान्तरप्रेप्सुरविषह्यममन्यत ।
 कृष्णं ततो रौहिणेयं हन्तुं चक्रे मनोरथम् ॥ ११ ॥

ते दोघं कधी असावधान राहतात हे पाहणार्‍या त्या दैत्याने कृष्णाला सर्वथा अजेय समजून; बलरामाला मारायचा निश्चय केला ॥ ११ ॥


 हरिणाक्रीडनं नाम बालक्रीडनकं ततः ।
 प्रकुर्वन्तो हि ते सर्वे द्वौ द्वौ युगपदुत्थितौ ॥ १२ ॥

त्यानन्तर वे समस्त ग्वाल-बाल हरिणा क्रीडन नावाचा खेळ खेळत एकावेळी दोन-दोन असे एकत्र उठले ॥ १२ ॥


 श्रीदाम्ना सह गोविन्दः प्रलम्बेन तथा बलः ।
 गोपालौरपरैश्चान्ये गोपालाः पुप्लुवुस्ततः ॥ १३ ॥

तेव्हा सुदामा सोबत कृष्ण, प्रलम्बसोबत बलराम आणि अशाच प्रकारे इतर गोपही अन्य गोपांसह मस्ती करत चालू लागले. ॥ १३ ॥


 श्रीदामानं ततः कृष्णः प्रलम्बं रोहिणीसुतः ।
 जितवान्कृष्णपक्षीयैर्गोपैरन्ये पराजिताः ॥ १४ ॥

शेवटी कृष्णाने सुदामाला, बलरामाने प्रलम्बला तसेच अन्यान्य कृष्णपक्षी गोपींनी आपल्या प्रतिपक्ष्यांना हरविले ॥ १४ ॥



 ते वाहयन्तस्त्वन्योन्यं भाण्डीरं वटमेत्य वै ।
 पुनर्निववृतुःसर्वे ये ये तत्र परिजिताः ॥ १५ ॥

ह्या खेळात जे बालक हरले ते जिंकणार्‍या बालकांना आपल्या खांद्यावर बसवून भाण्डीरवट पर्यंत जाऊन तिथून परतून परत आले ॥१५॥


 संकर्षणं तु स्कन्धेन शीघ्रमुत्क्षिप्य दानवः ।
 नभःस्थलं जगामाशु सचन्द्र इव वारिदः ॥ १६ ॥

पण प्रलम्बासुर आपल्या खांद्यावर बलरामाला घेऊन चन्द्रमा सहित मेघांसमान अंत्यन्त वेगाने आकाश मंडळात जाऊ लागला ॥१६॥

 

 असहन् रौहिणेयस्य स भारं दानवोत्तमः ।
 ववृधे स महाकायः प्रावृषीव बलाहकः ॥ १७ ॥

तो दानवश्रेष्ठ रोहिणी नन्दन श्रीबलभद्राचा भार सहन न झाल्याने वर्षाकालीन मेघांसमान वाढून अत्यन्त स्थूल शरीराचा झाला ॥ १७।। 



 संकर्षणस्तु तं दृष्ट्‍वा दग्धशैलोपमाकृतिम् ।
 स्रग्दामलम्बाभरणं मकुटाटोपमस्तकम् ॥ १८ ॥

रौद्रं शकटचक्राक्षं पादन्यासचलत्क्षितिम् ।
 अभीतमनसा तेन रक्षसा रोहिणीसुतः ।
 ह्रियमामस्ततः कृष्णमिदं वचनमब्रवीत् ॥ १९ ॥

तेव्हा माळा व आभूषण धारण केलेल्या, मस्तकावर मुकुट घातलेल्या, गाडीच्या चाकांसारखे भयानक नेत्र असलेल्या, आपल्या पादप्रहाराने पृथ्वी कम्पायमान करणार्‍या दग्धर्पवतासमान आकाराच्या त्या दैत्याला पाहून तो राक्षस नेत असलेला निर्भय बलभद्र कृष्णचन्द्राला म्हणाला-॥ १८-१९ ॥

 


 कृष्ण कृष्ण ह्रियाम्येष पर्वतोदग्रमूर्तिना ।
 केनापि पश्य दैत्येन गोपालच्छद्मरूपिणा ॥ २० ॥

"अरे भावा कृष्णा ! बघ, छद्मपूर्वक गोप वेष धारण करणारा कोणीतरी पर्वतासमान महाकाय दैत्य मला पळवून नेत आहे ॥ २० ॥


 यदत्र साम्प्रतं कार्यं मया मधुनिषूदन ।
 तत्कथ्यतां प्रयात्येष दुरात्मातित्वरान्वितः ॥ २१ ॥

हे मधुसूदना ! आता मी काय करावं ते सांग । बघ, हा दुरात्मा शीघ्रतेने धावतो आहे" ॥२१॥


 श्रीपराशर उवाच
 तमाह रामं गोविन्दः स्मितभिन्नोष्ठसम्पुटः ।
 महात्मा रौहिणेयस्य बलवीर्यप्रमाणवित् ॥ २२ ॥

श्रीपराशर म्हणाले ;- तेव्हा रोहिणीनन्दनाचे बलवीर्य जाणणार्‍या महात्मा श्रीकृष्णचन्द्राने मधुर हास्य करत ओठ उघडले आणि त्या बलरामाला म्हटले ॥ २२ ॥


 श्रीकृष्ण उवाच
 किमयं मानुषो भावो व्यक्तमेवावलम्ब्यते ।
 सर्वात्मन् सर्वगुह्यानां गुह्यगुह्यात्मना त्वया ॥ २३ ॥

श्रीकृष्णचन्द्र म्हणाले ;- हे सर्वात्मना ! आपण सम्पूर्ण गुह्य पदार्थात अत्यन्त गुह्यस्वरूप असूनही असा स्पष्ट मानव-भाव का धारण केला आहे ? ॥ २३ ॥


 स्मराशेषजगद्‍बीजकारणं कारणाग्रजम् ।
 आत्मानमेकं तद्वच्च जगत्येकार्णवे च यत् ॥ २४ ॥

आपण आपल्या त्या स्वरूपाचे स्मरण करा जे समस्त संसाराचे कारण तसेच कारणाचेही पूर्ववर्ती आहे व प्रलयकाळातली स्थित राहणारे आहे ॥ २४ ॥


 किं न वेत्सि यथाहं च त्वं चैकं कारणं भुवः ।
 भारावतारणार्थाय मर्त्यलोकमुपागतौ ॥ २५ ॥

आपणच ह्या संसाराचे एकमात्र कारण आहोत आणि पृथ्वीचा भार उतरविण्यासाठीच मर्त्यलोकात आलो आहोत हे तुम्हाला माहीत नाही का? ॥ २५ ॥


 नभशिरस्तेऽम्बुवहाश्च केशाः पादौ क्षितिर्वत्र्क्रमनन्त वह्नि ।
 सोमो मनस्ते श्वसितं समीरणो दिशश्चतस्रोऽव्यय बाहवस्ते ॥ २६ ॥

हे अनन्ता ! आकाश आपले मस्तक आहे, मेघ केस, पृथ्वी चरण, अग्नि मुख , चन्द्रमा मन , वायु श्वासोश्वास आणि चारही दिशा बाहू आहेत ॥ २६ ॥



 सहस्रवक्त्रो भगवान्महात्मा सहस्रहस्ताङ्‍घ्रिशरीरभेदः ।
 सहस्रपद्मोद्‍भवयोनिराद्यः सहस्रशस्त्वां मुनयो गृणन्ति ॥ २७ ॥

हे भगवन ! आपण महाकाय आहात, आपली सहस्र मुखे, सहस्र हात, पाय आदि शरीराचे भेद आहेत. आपण सहस्र ब्रह्मांचे आदिकारण आहात, मुनिजन आपले सहस्र प्रकारे वर्णन करतात ॥ २७॥


 दिव्यं हि रूपं तव वेत्ति नान्यो देवैरशेषैरवताररूपम् ।
 तदर्च्यते वेत्सि न किं यदन्ते त्वय्येव विश्वं लयमभ्युपैति ॥ २८ ॥

आपले दिव्य रूप इतर कोणीही जाणत नाही म्हणून समस्त देवगण आपल्या अवतार रूपाचीच उपासना करतात. शेवटी हे सम्पूर्ण विश्व तुमच्यातच लीन होते हे तुम्हाला माहीत नाही का? ॥२८॥

 


 त्वया धृतेयं धरणी बिभर्ति चराचरं विश्वमनन्तमूर्ते ।
 कृतादिभेदैरज कालरूपो निमेषपूर्वो जगदेतदत्सि ॥ २९ ॥

हे अनन्तमूर्ते ! आपणच धारण केलेली ही पृथ्वी सम्पूर्ण चराचर विश्वाला धारण करते. हे अजा ! निमेषादि कालस्वरूप असलेले आपणच कृतयुग आदि भेदांनी ह्या जगताचा ग्रास करता ॥ २९ ॥


 अत्तं यथा बाडववह्निनाम्बु हिमस्वरूपं परिगृह्य कास्तम् ।
 हिमाचले भानुमतोंऽशुसङ्‍गाज्जलत्वमभ्येति पुनस्तदेव ॥ ३० ॥
 एवं त्वया संहरणेऽत्तमेतज्जगत्समस्तं त्वदधीनकं पुनः ।
 तवैव सर्गाय समुद्यतस्य जगत्त्वमभ्येत्यसुकल्पमीश ॥ ३१ ॥

जसे वडवानलाने प्यायलेले जल वायुद्वारा हिमालयपर्यंत पोहोचविल्यावर हिम रूप धारण करते आणि मग सूर्य-किरणांचा संयोग झाल्यावर जलरूप होते तसेच हे ईशा ! हे समस्त जगत आपल्याच द्वारा रुद्रादिरूपात विनष्ट होऊन आपल्याच अधिन राहते आणि मग प्रत्येक कल्पात आपण हिरण्यगर्भ रूपात सृष्टि-रचनेत प्रवृत्त झाल्यावर हे स्थूल जगत सृष्टरूप होते ॥ ३०-३१ ॥

 


 भवानहं च विश्वात्मन्नेकमेव च कारणम् ।
 जगतोऽस्य जगत्यर्थे भेदेनावां व्यवस्थितौ ॥ ३२ ॥

हे विश्वात्मना ! आपण आणि मी दोघेच ह्या जगताचे एकमात्र कारण आहोत. संसाराच्या हितासाठीच आपण दोघांनी भिन्न-भिन्न रूपे धारण केली आहेत ॥ ३२ ॥


 तत्स्मर्यताममेयात्मंस्त्वयात्मा जहि दानवम् ।
 मानुष्यमेवावलम्ब्य बन्धूनां क्रियतां हितम् ॥ ३३ ॥

म्हणून हे अमेयात्मना ! आपण अपल्या स्वरूपाचे स्मरण करा आणि केवळ मनुष्य भावाचेच अवलम्बन करून ह्या दैत्याला मारून बन्धुजनांचे हित साधा ॥ ३३ ॥



 श्री पराशर उवाच
 इति संस्मारितो विप्र कृष्णेन सुमहात्मना ।
 विहस्य पीडयामास प्रलम्बं बलवान्बलः ॥ ३४ ॥

श्रीपराशरजी म्हणाले ;- हे विप्रा ! महात्मा कृष्ण चन्द्र द्वारा अशा प्रकारे स्मरण करविले गेल्यावर महाबलवान बलराम हसत हसत प्रलम्बासुराला त्रास देऊ लागला ॥३४ ॥

 


 मुष्टिना सोऽहनन्मूर्ध्नि कोपसंरक्तलोचनः ।
 तेन चास्य प्रहारेण बहिर्याते विलोचने ॥ ३५ ॥

रागाने डोळे लाल करून त्यांनी असुराच्या मस्तकावर एक ठोसा मारला, ज्याच्या मुळे त्या दैत्याचे दोन्ही नेत्र बाहेर आले ॥ ३५ ॥

 


 स निष्कासितमस्तिष्को मुखाच्छोणितमुद्वमन् ।
 निपपात महीपृष्ठे दत्यवर्यो ममार च ॥ ३६ ॥

त्यानन्तर तो दैत्य त्याचे विशाल मस्तक फुटल्याने रक्त ओकत पृथ्वीवर पडला आणि मेला ॥ ३६॥


 प्रलम्बं निहतं दृष्ट्‍वा बलेनाद्‍भुतकर्मणा ।
 प्रहृष्टास्तुष्टुवुर्गौपाः साधुसाध्विति चाब्रुवन् ॥ ३७ ॥

अद्भुतकर्म करणार्‍या बलरामद्वारा प्रलम्बासुर मारला गेलेला पाहून गोपगण प्रसन्न होऊन ‘छान,छान म्हणत त्यांची प्रशंसा करू लागले ॥ ३७ ॥


 संस्तूयमानो गोपैस्तु रामो दैत्ये निपातिते ।
 प्रलम्बं सह कृष्णेन पुनर्गोकुलमाययौ ॥ ३८ ॥

प्रलम्बासुर मेल्यानंतर गोपांकडून प्रशंसित होत असलेले बलराम, कृष्णचन्द्रा सोबत गोकुळात परतले ॥ ३८ ॥




 इति श्रीविष्णुमहापुराणे पञ्चमे अंशे
नवमोऽध्यायः (९)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

विष्णुपुराण, पंचम अंश, त्रिंश अध्याय | Vishnu Puran, Ansh 5 , Adhyay 30

  ॥ विष्णुपुराणम् ॥ ॥ पञ्चमः अंशः ॥ ॥ त्रिंशोऽध्यायः ॥   "पारिजात-हरण"   श्रीपराशर उवाच गरुडो वारुणं छत्रं तथैव मणिपर...