॥ विष्णुपुराणम् ॥
॥ चतुर्थ: अंशः ॥
॥ एकादशोऽध्यायः
॥
"यदुवंशाचे
वर्णन आणि सहस्त्रार्जुनाचे चरित्र"
श्रीपराशर उवाच
अतः
परं ययातेः प्रथमपुत्रस्य यदोर्वंशमहं कथयामि ॥ १ ॥ यत्राशेषलोकनिवासो मनुष्यसिद्धगन्धर्व
यक्षराक्षसगुह्यककिम्पुरुषाप्सरोरगविहग दैत्यदानवादित्यरुद्र वस्वश्विमरुद्देवर्षिभिः
मुमुक्षुभिर्धर्मार्थकाममोक्षार्थिभिश्च तत्तत्फललाभाय सदाभिष्टुतोऽपरिच्छेद्यमाहात्म्यांशेन
भगवाननादिनिधनो विष्णुरवततार ॥ २ ॥ अत्र श्लोकः ॥ ३
॥
श्रीपराशर म्हणाले ;- आता मी ययातिचा प्रथम पुत्र यदुच्या वंशाचे वर्णन करतो,
ज्यात मनुष्य, सिद्ध, गन्धर्व, यक्ष, राक्षस गुह्यक, किंपुरुष, अप्सरा,
सर्प, पक्षी, दैत्य, दानव, आदित्य, रुद्र, वसु, अश्विनीकुमार, मरुद्रण, देवर्षि, मुमुक्षु
तसेच धर्म, अर्थ, काम आणि मोक्षाभिलाशी पुरुषांद्वारा, सर्वदा स्तुति केल्या जाणार्या,
अखिललोक-विश्राम आद्यन्तहीन भगवान विष्णुने आपल्या अपरिमित
महत्त्वशाली अंशाने अवतार घेतला होता. ह्या विषयीचा हा श्लोक प्रसिद्ध आहे ॥१-३॥
यदोर्वंशं
नरः श्रुत्वा सर्वपापैः प्रमुच्यते ।
यत्रावतीर्णं
कृष्णाख्यम्परं ब्रह्म निराकृति ॥ ४ ॥
'ज्यात श्रीकृष्ण नामक निराकार परब्रह्माने अवतार घेतला होता त्या यदुवंशाचे
श्रवण केल्याने मनुष्य सम्पूर्ण पापातून मुक्त होतो’ ॥४॥
सहस्रजित्क्रोष्टुनलनहुषसंज्ञाश्चात्वारो
यदुपुत्रा बभुवुः ॥ ५ ॥ सहस्रजित्पुत्रः शतजित्
॥ ६ ॥तस्य हैहयहेहयवेणुहयास्त्रयः पुत्रा बभूवुः ॥ ७ ॥
यदुला सहस्त्रजित, क्रोष्टु, नल आणि नटुष नामक चार पुत्र झाले. सहस्त्राजितला
शतजित आणि शतजितला हैहय, हेहय तसेच वेणुहय नामक तीन पुत्र झाले ॥५-७॥
हैहयपुत्रो
धर्मस्तस्यापि धर्मनेत्रस्ततः कुन्तिः कुन्तेः सहजित् ॥ ८ ॥ तत्तनयो महिष्मान् योऽसौ माहिष्मतीं पुरीं निवासयामास ॥ ९ ॥
हैहयाचा पुत्र धर्म, धर्मचा
धर्मनेत्र, धर्मनेत्रचा कुन्ति, कुन्तिचा सहजित तसेच सहजितचा पुत्र महिष्मान झाला,
ज्याने माहिष्मतीपुरी वसवली ॥८-९॥
तस्माद्भद्रश्रेण्यस्ततो दुर्दमस्तस्माद्धनकः धनकस्य कृतवीर्यकृताग्नि कृतधर्मकृतौजसश्चत्वारः
पुत्रा बभूवुः ॥ १० ॥
महिष्मानला भद्रश्रेण्य,
भद्रश्रेण्यला दुर्दम, दुर्दमला धनक आणि धनकला, कृतवीर्य, कृताग्नि, कृतधर्म आणि कृतौजा
नामक चार पुत्र झाले ॥१०॥
कृतवीर्यादर्जुनसप्तद्वीपाधिपतिर्बाहुसहस्रो
जज्ञे ॥ ११ ॥
कृतवीर्यापासून सहस्त्र
भुजा असलेला सप्तद्वीपाधिपति अर्जुनचा जन्म झाला ॥११॥
योऽसौ
भगवदंशमत्रिकुलप्रसूतं दत्तात्रेयाख्यमाराध्य बाहुसहस्रमधर्मसेवानिवारणं स्वधर्मसेवित्वं
रणे पृथिवीजयं धर्मतश्चानुपालनमरातिभ्योऽपराजयं अखिलजगत्प्रख्यातपुरुषाच्च मृत्युमित्येतान्वरानभिलषितवांल्लेभे
च ॥ १२ ॥
सहस्त्रार्जुनाने अत्रिकुलात उप्तन्न भगवदंशरूप श्रीदत्तात्रेयाची उपासना करून
'सहस्त्र भुजा, अधर्माचरणाचे निवारण, स्वधर्माचे सेवन, युद्ध द्वारा सम्पूर्ण पृथिवीमण्डलाचा
विजय, धर्मानुसार प्रजा-पालन, शत्रुंकडून अपराजय तसेच त्रिलोकप्रसिद्ध पुरुषाकडून मृत्यु'
असे अनेक वर मागितले आणि प्राप्त केले होते ॥१२॥
तेनेयमशेषद्वीपवती पृथिवी सम्यक्परिपालिता ॥१३॥ दशयज्ञसहस्राण्यसावयजत् ॥१४॥
अर्जुनने ह्या सम्पूर्ण सप्तद्वीपवती पृथ्वीचे पालन तसेच दहा हजार
यज्ञांचे अनुष्ठान केले होते ॥१३-१४॥
तस्य
च श्लोकोऽद्यापि गीयते ॥ १५ ॥
ह्या विषयी हा श्लोक आजही सांगितला जातो १५॥
न नूनं
कार्तवीर्यस्य गातिं यास्यन्ति पार्थिवाः ।
यज्ञैर्दानैस्तपोभिर्वा
प्रश्रयेण श्रुतेन च ॥ १६ ॥
'यज्ञ, दान, तप, विनय आणि विद्येत कार्तवीर्य सहस्त्रार्जुनाची बरोबरी कोणताही
राजा करू नाही शकत' ॥१६॥
अनष्टद्रव्यता
च तस्य राज्येऽभवत् ॥ १७ ॥
त्याच्या राज्यात कोणताही पदार्थ नष्ट होत नसे ॥१७॥
एवं
च पञ्चाशीतिवर्षसहस्रणि अव्याहतेरोग्यश्रीबलपराक्रमो राज्यमकरोत् ॥ १८ ॥
ह्या प्रकारे त्याने बल, पराक्रम, आरोग्य आणि सम्पत्ति सर्वथा सुरक्षित राखून
पंच्याऐंशी हजार वर्ष राज्य केले ॥१८॥
माहिष्मत्यां
दिग्विजयाभ्यागतो नर्मदाजल अवगाहनक्रीडातिपानमदाकुलेन अयत्नेनैव तेनाशेषदेवदैत्य गन्धर्वजयोद्भूतमदावलेपोऽपि
रावणः पश्रिव बद्ध्वा स्वनगरैकान्ते स्थापितः ॥ १९ ॥
एके दिवशी जेव्हा तो अतिशय मद्यपानाने व्याकुळ होऊन नर्मदा नदीत जलक्रिडा
करत होता, तेव्हा त्याची राजधानी माहिष्मातीपुरी वर दिग्विजयासाठी आलेल्या समस्त देव,
दानव, गन्धर्व आणि राजांच्या विजयमदाने उन्मत्त रावणाने आक्रमण केले. त्यावेळी त्याने
अगदी सहजपणे रावणाला पशु समान बांधून आपल्या नगरातल्या एका निर्जन स्थानी ठेवले ॥१९॥
यश्च पञ्चाशीतिवर्शसहस्र उपलक्षणकालावसाने भगवन्नारायणांशेन परशुरामेणोपसंहृतः ॥ २०
॥
ह्या सहस्त्रार्जुनाची पंच्याऐंशी हजार वर्ष व्यतीत झाल्यावर नारायणाचा अंशावतार
परशुरामाने त्याचा वध केला होता ॥२०॥
तस्य
च पुत्रशतप्रधानाः पञ्चपुत्रा बभूवुः शुरशूरसेनवृषसेनमधुजयध्वजसंज्ञाः ॥ २१ ॥
त्याच्या शंभर पुत्रांपैकी शूर, शरसेन, वृषसेन, मधु आणि जयध्वज हे पाच मुख्य
होते ॥२१॥
जयध्वजात्तालजङ्घः पुत्रोऽभवत्
॥ २२ ॥ तालजङ्घस्य तालजङ्घाख्यं पुत्रशतमासीत् ॥ २३ ॥ एषां ज्येष्ठे वीतिहोत्रस्तथान्यो भरतः ॥ २४ ॥
जयध्वजाचा पुत्र तालजंघ झाला आणि तालजंघाला तालजंघ नामक शंभर पुत्र झाले. त्यात
सर्वात श्रेष्ठ वीतिहोत्र आणि दुसरा भरत होता ॥२२-२४॥
भरताद्वृषः ॥ २५ ॥
वृषस्य पुत्रो मधुरभवत् ॥ २६ ॥ तस्यापि वृष्णिप्रमुखं पुत्रशतमासीत् ॥ २७ ॥
भरतला वृष, वृषला मधु आणि मधुला वृष्णि आदि शंभर पुत्र झाले ॥२५-२७॥
यतो वृष्णिसंज्ञामेतद्गोत्रमवाप ॥ २८ ॥ मधुसंज्ञाहेतुश्च
मधुरभवत् ॥ २९ ॥ यादवाश्च यदुनामोपलक्षणादिति ॥ ३० ॥
वृष्णि मुळेच हा वंश वृष्णि नावाने ओळखला जातो. मधुमुळे
ह्याला मधु ही संज्ञा मिळाली. आणि
यदुच्या नावावरून ह्या वंशाचे लोक यादव म्हणून ओळखले जातात ॥२८-३०॥
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा