मंगळवार, ३० जून, २०२६

विष्णुपुराण, चतुर्थ अंश, दशम अध्याय | Vishnu Puran, Ansh 4 , Adhyay 10

 

विष्णुपुराणम्

चतुर्थ: अंशः दशमोऽध्यायः

 

"ययाति चे चरित्र"


श्रीपराशर उवाच
 यतिययातिसंयात्या यातिवियातिकृतिसंज्ञा नहुषस्य षट् पुत्रा महाबलपराक्रमा बभूवुः ॥ १ ॥
श्रीपराशर म्हणाले ;- नहुषला यति, ययाति, संयाति, आयति, वियाति और कृति नामक सहा महाबल-विक्रमशाली पुत्र झाले ॥१॥


 यतिस्तु राज्यं नैच्छत् ॥ २ ॥ ययातिस्तु भूभृदभवत् ॥ ३ ॥

यतिला राज्याची इच्छा नव्हती, म्हणून ययाति राजा झाला ॥२-३॥


उशनसश्च दुहितरं देवयानीं वार्षपर्वणीं शर्मिष्ठामुपयेमे ॥ ४ ॥

ययातिने शुक्राचार्यांची कन्या देवयानी आणि वृषपर्वाची कन्या शर्मिष्ठाशी विवाह केला होता ॥४॥



 अत्रानुवंशश्लोको भवति ॥ ५ ॥

त्याच्या वंशा संबंधी हा श्‍लोक प्रसिद्ध आहे ॥५॥



 यदुं च दुर्वसुं चैव देवयानी व्यजायत ।
 द्रुह्युं चानुं च पूरुं च शर्मिष्ठा वार्षपर्वणी ॥ ६ ॥

‘देवयानीने यदु आणि तुर्वसुला जन्म दिला तसेच वृषपर्वाची पुत्री शर्मिष्ठाने द्रुह्यु, अनु आणि पुरुला जन्म दिला' ॥६॥


 काव्यशापाच्च कालेनैव ययातिर्जरामवाप ॥ ७ ॥

ययातिला शुक्राचार्यांच्या शापामुळे अकालीच वृद्धावस्था प्राप्त झाली होती ॥७॥


 प्रसन्नशुक्रवचनाच्च स्वजरां संक्रामयितुं ज्येष्ठं पुत्रं यदुमुवाच ॥ ८ ॥

नंतर शुक्र प्रसन्न झाल्यावर त्यांच्या सांगण्यावरून राजाने आपली वृद्धावस्था ग्रहण करण्यास श्रेष्ठ पुत्र यदुला म्हटले - ॥८॥


 वत्स त्वन्मातामहशापादि यमकालेनैव जरा ममोपस्थिता तामहं तस्यै वानुग्रहाद् भवतःसञ्चारयामि ॥ ९ ॥

'वत्सा ! तुझ्या आजोबांच्या शापामुळे मला अकाली ही वृद्धवस्था प्राप्त झाली आहे, आता त्यांच्याच कृपेमुळे मी ही तुला देऊ इच्छितो ॥९॥

 

एकं वर्षसहस्रमतृप्तोऽस्मि विषयेषु त्वद्वयसा विषयानहं भोक्तुमिच्छमि ॥ १० ॥

मी अजूनही विषय भोगांनी तृप्त नाही झालेलो, म्हणून एक सहस्त्र वर्षांपर्यंत मी तुझ्या युवावस्थेत राहून ते भोग भोगू इच्छितो ॥१०॥


नात्र भवता प्रत्याख्यानं कर्तव्यमित्युक्तःस यदुर्नैच्छत्तां जरामादातुम् ॥ ११ ॥

ह्या विषयी तु कोणत्याही प्रकारे टाळाटाळ करणे योग्य नाही.' पण पित्याने असे म्हटल्यावर देखील यदुने वृद्धवस्था ग्रहण करण्यास नकार दिला ॥११॥

 


 तं च पिता शशाप त्वत्प्रसूतिर्न राज्यार्हा भविष्यतीति ॥ १२ ॥

तेव्हा पित्याने त्याला शाप दिला की तुझी संतति राज्यपदाला योग्य ठरणार नाही ॥१२॥


 अनन्तरं च तुर्वसुं द्रुह्यमनुं च पृतिवीपतिर्जराग्रहणार्थं स्वयौवनप्रदानाय चाभ्यर्थयामास ॥ १३ ॥ तैर् अप्येकैकेन प्रत्याख्यातस्ताञ्छशाप ॥ १४ ॥

मग राजा ययातिने तुर्वस, द्रुह्यु आणि अनुला सुद्धा आपले यौवन देऊन वृद्धावस्था ग्रहण करण्याबाबत विचारले पण प्रत्येकाने ह्या प्रस्तावाचा अस्वीकार केला तेव्हा ययातीने त्या सर्वांना शाप दिला ॥१३-१४॥


 अथ शर्मिष्ठातनयं अशेषकनीयांसं पुरुं तथैवाह ॥ १५ ॥ स चातिप्रवणमतिः सबहुमानं पितरं प्रणम्य महाप्रसादोयं अस्माकमित्युदारं अभिधायजरां जग्राह ॥ १६ ॥ स्वकीयं च यौवनं स्वपित्रे ददौ ॥ १७ ॥

शेवटी सर्वात छोटा असलेल्या शर्मिष्ठाचा पुत्रकडे तीच मागणी केली तेव्हा तो अति नम्रतेने आणि आदराने  पित्याला प्रणाम करून उदारतापूर्वक म्हणाला, 'हा तर माझ्यावर तुम्ही केलेला महान अनुग्रह आहे.' असे म्हणून पुरुने आपल्या पित्याची वृद्धावस्था ग्रहण करून त्यांना आपले यौवन दिले ॥१५-१७॥



 सोऽपि पौरवं यौवनमासाद्य धर्माविरोधेन यथाकामं यथाकालोपपन्नं यथोत्साहं विषयांश्चचार ॥ १८ ॥ सम्यक् च प्रजापालनमकरोत् ॥ १९ ॥

राजा ययातिने पुरुचे यौवन घेऊन समयानुसार प्राप्त झालेल्या विषयांचे आपल्या उत्साहानुसार धर्मपूर्वक यथेच्छ भोग घेतले आणि आपल्या प्रजेचे भल्या प्रकारे पालन केले ॥१८-१९॥



विश्वाच्या देवयान्या च सहोपभोगं भुक्त्वा कामानामन्तं प्राप्स्यामीत्यनुदिनं तन्मनस्को बभूव ॥ २० ॥

मग विश्वाची आणि देवयानीसह विविध भोग भोगून मी माझ्या कामनांचा अन्त करेन असा विचार करत तो प्रतिदिन अधिक भोग भोगण्यासाठी उत्कण्ठित राहू लागला ॥२०॥

 


 अनुदिनं चोपभोगतः कामानतिरम्यान्मेने ॥ २१ ॥ ततश्चैनमगायत ॥ २२ ॥

आणि निरन्तर भोग भोगत राहिल्याने त्या कामनांनाच अत्यन्त प्रिय मानू लागला; त्यानंतर त्याने विचार केला ॥२१-२२॥


 न जातु कामः कामानामुपभोगेन शाम्यति ।
 हविषा कृष्णवर्त्मेव भूय एवाभिवर्धते ॥ २३ ॥

'भोग तृष्णा भोगल्याने कधी शान्त होत नाही, उलट घृताहुति दिलेल्या अग्नी समान ती वाढतच जाते ॥२३॥


 यत्पृथिव्यां व्रीहियवं हिरण्यं पशवः स्त्रियः ।
 एकस्यापि न पर्याप्तं तस्मात्तृष्णां परित्यजेत् ॥ २४ ॥

सम्पूर्ण पृथ्वीवर जितके धान्य, यव सुवर्ण, पशु आणी स्त्रिया आहेत ती सर्व एका मनुष्यासाठी सुद्धा सन्तोषदायी नाहीत, म्हणून तृष्णेचा सर्वथा त्याग करायला हवा ॥२४॥

 


यदा न कुरुते भावं सर्वभूतेषु पापकम् ।
 समदृष्टोस्तदा पुंसः सर्वाःसुखमया दिशः ॥ २५ ॥

जेव्हा कोणी पुरुष कोणत्याही प्राण्याविषयी पापमयी भावना करत नाही तेव्हा समदशीसाठी सर्व दिशा सुखमय होतात ॥२५॥


 या दुस्त्यजा दुर्मतिभिर्या न जीर्यति जीर्यतः ।
 तां तृष्णां सन्त्यजेत्प्राज्ञःसुखेनैवाभिपूर्यते ॥ २६ ॥

दुर्मतिंसाठी जीला त्यागणं अतिशय कठीण आहे आणि वृद्धावस्थेतही जी शिथिल होत नाही, बुद्धिमान पुरुष त्या तृष्णेचा त्याग करून सुखाने परिपूर्ण होतो ॥२६॥


 जीर्यन्ति जीर्यतः केशा दन्ता जीर्यन्ति जीर्यतः ।
 धनाशा जीविताशा च जीर्यतोऽपि न जीर्यतः ॥ २७ ॥

जीर्णावस्था झाल्यावर केस आणि दात जीर्ण होतात पण जीवन आणि धनाची आशा कधीच जीर्ण होत नाही ॥२७॥


 पूर्णं वर्षसहस्रं मे विषयासक्तचेतसः ।
 तथाप्यनुदिनं तृष्णा मम देषूपजायते ॥ २८ ॥

विषयांमध्ये आसक्त राहून मला एक सहस्त्र वर्ष झाली, तरीही मला त्यांच्या बद्दल इच्छा होते ॥२८॥

 


 तस्मादेतामहं त्यक्त्वा ब्रह्मण्याधाय मानसम् ।
 निर्द्वन्द्वो निर्ममो भूत्वा चरिष्यामि मृगैः सह ॥ २९ ॥

म्हणून आता हे सर्व त्यागून मी माझे चित्त भगवंतात स्थिर करून निर्द्वन्द्व आणि निर्मम होऊन वनात पशुंसोबत विचरण करणार ॥२९॥


 श्रीपराशर उवाच
 पुरोःसकाशादादाय जरां दत्त्वा च यौवनम् ।
 राज्येभिषिच्च पूरुं च प्रययौ तपसे वनम् ॥ ३० ॥

श्रीपराशर म्हणाले;- त्यानन्तर राजा ययातिने पुरुकडून आपली वृद्धावस्था घेऊन त्याचे यौवन त्याला परत दिले आणि त्याला राज्यपदावर अभिषक्त करून वनात निघून गेला ॥३०॥


 दिशि दक्षिणपूर्वस्यां दुर्वसुं च समादिशत् ।
 प्रतीच्यां च तथा द्रुह्युं दक्षिणायां ततो यदुम् ॥ ३१ ॥

 उदीच्यां च तथैवानुं कृत्वा मण्डलिनो नृपान् ।
 सर्वपृथ्वीपतिं पूरुं सोभिषिच्य वनं ययौ ॥ ३२ ॥

त्याने दक्षिण पूर्व दिशेला तुर्वसुला पश्चिम दिशेला दृह्युला, दक्षिणेत यदुला आणि उत्तरेत अनुला माण्डलिक पदावर नियुक्त केले. पसेच पुरुला सम्पूर्ण भूमण्डलाच्या राज्यावर अभिषिक्त करून स्वतः वनात निघून गेला ॥३१-३२॥


 इति श्रीविष्णुमहापुराणे चतुर्थे अंशे
दशमोऽध्यायः (१०)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

विष्णुपुराण, चतुर्थ अंश, त्रयोदश अध्याय | Vishnu Puran, Ansh 4 , Adhyay 13

  ॥ विष्णुपुराणम् ॥ ॥ चतुर्थ: अंशः ॥ त्रयोदशो ऽध्यायः ॥   "सत्वतच्या सन्ततिचे वर्णन आणि स्यमन्तक मण्याची कथा" श्रीप...