॥ विष्णुपुराणम्
॥
॥ चतुर्थ: अंशः ॥
नवमोऽध्यायः
॥
"महाराज रजि आणि त्याच्या पुत्रांचे चरित्र"
श्रीपराशर उवाच
रजोस्तु पञ्च पुत्र शतानि अतुलबलपराक्रम साराण्यासन् ॥ १ ॥
श्रीपराशर म्हणाले ;- रजिचे अतुलित बलपराक्रमशाली पाचशे पुत्र होते ॥१॥
देवासुरसङ्ग्रामारम्भे च परस्परवधेप्सवो देवाश्चासुराश्च ब्रह्मणामुपेत्य पप्रच्छुः
॥ २ ॥ भगवन्नस्माकमत्र विरोधे कतरः पक्षो जेता भविष्यतीति
॥ ३ ॥
एकदा देवासुरसंग्रामाच्या प्रारंभी एकमेकांना मारण्याची
इच्छा असलेले देवता आणि दैत्यांनी ब्रह्मा जवळ जाऊन विचारले- "भगवन ! आम्हा दोघांच्या
पारस्परिक कलहात कोणता पक्ष जिंकणार?" ॥२-३॥
अथाह भगवान् ॥ ४ ॥
येषामर्थे रजिरात्मात्तायुधो योत्स्यति तत्पक्षो जेतेति
॥ ५ ॥
तेव्हा ब्रह्मा म्हणाले;-
"ज्या पक्षाच्या बाजूने राजा रजि शस्त्र धारण करून युद्ध करेल त्याच पक्षाचा विजय
होईल" ॥४-५॥
अथ दैत्यैरुपेत्य रजिरात्मसाहाय्यदानायाभ्यर्थितः प्राह ॥ ६ ॥
तेव्हा दैत्यांनी रजि
जवळ जाऊन आपल्या सहायतेसाठी प्रार्थना केली, त्यावर रजि म्हणाला - ॥६॥
योत्स्योऽहं भवतामर्थे यद्यहममरजयाद्भवतामिन्द्रो भविष्यामि इत्याकर्ण्यैतत्तैरभिहितम्
॥ ७ ॥
"जर देवतांना जिंकल्यावर
मी तुमचा इन्द्र होणार असेन तर मी तुमच्या पक्षात लढेन ॥७॥
न वयमन्यथा वदिष्यामोऽन्यथा करिष्यामो अस्माकमिन्द्रः प्रह्लादस्तदर्थम् एवायमुद्यम
इत्युक्त्वा गतेष्वसुरेषु देवैरप्यसौ अवनिपतिरेवमेवोक्तस्तेनापि च तथैवोक्ते देवैरिन्द्रस्त्वं
भविष्यसीति समन्विप्सितम् ॥ ८ ॥
हे ऐकून दैत्य म्हणाले;-
" आम्ही एक सांगून त्या विरूद्ध आचरण नाही करत. आमचा
इन्द्र प्रह्लाद आहे आणि त्याच्यासाठीच आमचा हा सर्व उद्योग आहे" असे म्हणून जेव्हा
दैत्यगण निघून गेले तेव्हा देवतांनी सुद्धा येऊन राजाला तशीच विनंती केली आणि त्याची
इंद्र बनण्याची अट मान्य केली ॥८॥
रजिनापि
देवसैन्यसहायेन अनेकैर्महास्त्रैस्तदशेष महासुरबलं निषूदितम् ॥ ९ ॥
म्हणून रजिने देवसेनेची
सहायता करत अनेक महान अस्त्रांनी दैत्यांची सम्पूर्ण सेना नष्ट केली ॥९॥
अथ जितारिपक्षश्च
देवेन्द्रो रजिचरमयुगलमात्मनः शिरसा निपीड्याह ॥ १० ॥
त्यानन्तर शत्रु-पक्षाला
जिंकल्यावर देवराज इन्द्राने रजिचे दोन्ही चरण आपल्या मस्तकावर ठेवून म्हटले - ॥१०॥
भयत्राणाद्
अन्नदानाद् भवानस्मत्पिताऽशेषलोकानां उत्तमोत्तमो भवान् यस्याहं पुत्रस्त्रिलोकेन्द्रः
॥ ११ ॥
"भयापासून रक्षा
केल्याने आणि अन्न दान दिल्याने आपण आमचे पिता आहात, आपण सम्पूर्ण लोकात सर्वोत्तम
आहात कारण मी त्रिलोकेन्द्र आपका पुत्र आहे' ॥११॥
स चापि
राजा प्रहस्याह ॥ १२ ॥ एवमस्त्वेवं अस्त्वनतिक्रमणीया
हि वैरिक्षादप्यनेकविध चाटुवाक्यगर्भा प्रणतिरित्युक्त्वा स्वपुरं जगाम ॥ १३ ॥
ह्यावर राजाने हसून म्हटले
;- 'बरे, ठीक आहे. शत्रुपक्षाच्या सुद्धा नाना प्रकारच्या
चाटुवाक्य युक्त अनुनय-विनयाचे अतिक्रमण करणे उचित नसते, (मग स्वपक्षाची तर गोष्टच
सोडा).' असे म्हणून तो आपल्या राजधानीत परत गेला ॥१२-१३॥
शतक्रतुरपीन्द्रत्वं
चकार ॥ १४ ॥ स्वर्याते तु रजौ नारदर्षिचोदिता रजिपुत्राः शतक्रतुमात्मपितृपुत्रं
समाचाराद्राज्यं याचितवन्तः ॥ १५ ॥
अशाप्रकारे शतक्रतुच इन्द्र
पदावर स्थित झाला. नंतर, रजि स्वर्गवासी झाल्यावर देवर्षि
नारदाच्या प्रेरणेने रजिच्या पुत्रांनी आपल्या पित्याला पुत्रभावाने प्राप्त झालेल्या
शतक्रतु कडून व्यवहारानुसार आपल्या पित्याचे राज्य मागितले ॥१४-१५॥
अप्रदानेन च विजित्येन्द्रमतिबलिनः स्वयमिन्द्रत्वं चक्रुः ॥ १६ ॥
पण जेव्हा त्याने ते दिले
नाही तेव्हा त्या महाबलवान रजि-पुत्रांनी इंद्राला जिंकून स्वतः इन्द्रपदाचा भोग घेतला
॥१६॥
ततश्च बहुतिथे काले ह्यतीते बृहस्पतिमेकान्ते दृष्ट्वा अपहृतत्रैलोक्ययज्ञभागः शतक्रतुरुवाच
॥ १७ ॥
त्यानंतर खूप काळ गेल्यावर
एक दिवस बृहस्पतिला एकान्तात बसलेले पाहून त्रिलोक्याच्या यज्ञभागापासून वञ्चित असलेल्या
शतक्रतुने त्याला म्हटले - ॥१७॥
बदरीफलमात्रमप्यर्हसि ममाप्यायनाय पुरोडाशखण्डं दातुमित्युक्तो बृहस्पतिरुवाच ॥ १८
॥
“माझ्या तृप्तीसाठी एका
बोराएवढा पुरोडाश खण्ड तुम्ही मला देऊ शकता का?” त्याने असे म्हटल्यावर बृहस्पति म्हणाला
- ॥१८॥
यद्येवं त्वयाहं पूर्वमेव चोदितःस्यां तन्मया त्वदर्थं किमकर्तव्यमिति अल्पैरेवाहोभिस्त्वां
निजं पदं प्रपयिष्यामीत्यभिधाय तेषामनुदिनमाभिचारकं बुद्धिमोहाय शक्रस्य तेजोभिवृद्धये
जुहाव ॥ १९ ॥
“असे असेल तर आधीच मला
का नाही सांगितलेस? तुझ्यासाठी मी काय नाही करू शकणार? बरं, आता थोड्याच दिवसात मी
तुला तुझ्या पदावर स्थित करतो.' असे म्हणून बृहस्पति
रजिपुत्रांची बुद्धि मोहित करण्यासाठी अभिचार आणि इंद्राच्या तेजोवृद्धिसाठी हवन करू
लागला ॥१९॥
ते चापि
तेन बुद्धिमोहेनाभिभूयमाना ब्रह्मद्विषो धर्मत्यागिनो वेदवादपराङ्मुखा बभुवूः ॥ २०
॥
बुद्धि मोहित करणार्या
त्या अभिचार कर्माने अभिभृत झाल्याने रजि-पुत्र ब्राह्मण विरोधी, धर्मत्यागी आणि वेदविमुख
बनले ॥२०॥
ततस्तानपेतधर्माचारानिन्द्रो जघान ॥ २१ ॥
तेव्हा धर्माचारहीन झाल्याने
इंद्राने त्यांना मारून टाकले ॥२१॥
पुरोहिताप्यायिततेजाश्च शक्रो दिवमाक्रमत् ॥ २२ ॥
आणि पुरोहिता द्वारा तेजोवृद्ध
होऊन स्वर्गावर आपला अधिकार जमवला ॥२२॥
एतदिन्द्रस्य स्वपदच्यवनादारोहणं श्रुत्वा पुरुषः स्वपदभ्रंशं दौरात्मयं च नाप्नोति
॥ २३ ॥
अशा प्रकारे इंद्राच्या
आपल्या पदावरून खाली येऊन परत आरुढ़ होण्याचा हा प्रसंग ऐकल्याने पुरुष आपल्या पदावरून
कधीच पतित होत नाही आणि त्याच्यात कधीच दुष्ट्ता येत नाही ॥२३॥
रम्भस्त्वपत्त्योऽभवत् ॥ २४ ॥
आयुचा दुसरा पुत्र रम्भ
संततिहीन झाला ॥२४॥
क्षत्रवृद्धसुतः प्रतिक्षत्रोऽभवत् ॥ २५ ॥ तत्पुत्रः
संजयस्तस्यापि जयस्तस्यापि विजयस्तस्माच्च जज्ञे कृतः ॥ २६ ॥ तस्य च हर्यधनः हर्यधनसुतःसहदेवः तस्माददीनस्तस्य जयत्सेनस्ततश्च संकृतिस्तत्पुत्रः
क्षत्रधर्मा इत्येते क्षत्रवृद्धस्य वंश्याः ॥ २७ ॥
क्षत्रवृद्धचा पुत्र प्रतिक्षत्र
झाला, प्रतिक्षत्रचा संजय, संजयचा जय, जयचा विजय, विजयचा कृत, कृतचा हर्यधन, हर्यधनचा
सहदेव, सहदेवचा अदिन, अदीनचा जयत्सने, जयत्सेनचा संस्कृति आणि संस्कृतिचा पुत्र क्षत्रधर्मा
झाला. हे सगळे क्षत्रवृद्धाचे वंशज झाले ॥२५-२७॥
ततो
नहुषवंशं प्रवक्ष्यामि ॥ २८ ॥
आता मी नहुष वंशाचे वर्णन
करतो ॥२८॥
इति श्रीविष्णुमाहापुराणे चतुर्थे अंशे नवमोऽध्यायः (९)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा