॥ विष्णुपुराणम्
॥
॥ चतुर्थ: अंशः ॥
अष्टमोऽध्यायः ॥
"काश्यवंशाचे वर्णन"
श्रीपराशर उवाच
पुरूरवसो ज्येष्ठः पुत्रो यस्त्वायुर्नामा स राहोर्दुहितरमुपयेमे ॥ १ ॥
श्रीपराशर म्हणाले;- आयु नामक जो पुरुरवाचा ज्येष्ठ पुत्र होता त्याने राहुच्या
कन्येशी विवाह केला ॥१॥
तस्यां च पञ्च पुत्रानुत्पादयामास ॥ २ ॥ नहुषक्षत्रवृद्धरम्भरजि
संज्ञास्तथैवानेनाः पञ्चमः पुत्रोऽभूत् ॥ ३ ॥
तिच्यापासून त्याला पाच पुत्र झाले ज्यांची नावं क्रमशः नहुष, क्षत्रवृद्ध,
रभ्म, रजि आणि अनेना अशी होती ॥२-३॥
क्षत्रवृद्धात्सुहोत्रः पुत्रोऽभवत् ॥ ४ ॥ काश्यपकाशगृत्समदास्त्रयस्तस्य
पुत्रा बभूवुः ॥ ५ ॥ गृत्समदस्य शौनकश्चातुर्वर्म्यप्रवर्तयिताभूत्
॥ ६ ॥
क्षत्रवृद्धला सुहोत्र नामक पुत्र झाला आणि सुहोत्रला काश्य, काश तसेच गृत्समय
नामक तीन पुत्र झाले. गृत्समदाचा पुत्र शौनक चातुर्वर्ण्याचा
प्रवर्तक झाला ॥४-६॥
काश्यस्य काशेयः काशीराजः
तस्माद्राष्ट्रः राष्ट्रस्य दीर्घतपाः पुत्रोऽभवत् ॥ ७ ॥ धन्वन्तरिस्तु दीर्घतपसः पुत्रोऽभवत् ॥ ८ ॥
काश्यचा पुत्र काशिराज काशेय झाला. त्याला
राष्ट्र, राष्ट्रला दीर्घतपा आणि दीर्घतपाला धन्वन्तरि नामक पुत्र झाला ॥७-८॥
स हि संसिद्धकार्यकरणः सकलसम्भूतिषु अशेषज्ञानविदा भगवता नारायणेन चातीतसम्भूतौ तस्मै
वरो दत्तः ॥ ९ ॥ काशीराजगोत्रेऽवतीर्य त्वमष्टधा सम्यगायुर्वेदं करिष्यसि
यज्ञभागभुग्भविष्यसीति ॥ १० ॥
ह्या धन्वन्तरिचे शरीर आणि इन्द्रिये जरा आदि विकारांपासून रहित होती - तसेच
सर्व जन्मात तो सम्पूर्णं शास्त्रांचा जाणकार होता. पूर्वजन्मी भगवान नारायणाने त्याला वर दिला होता की 'काशिराजाच्या वंशात उत्पन्न
होऊन तु सम्पूर्ण आयुर्वेद आठ भागात विभक्त करशील आणि यज्ञभागाचा भोक्ता होशील' ॥९-१०॥
तस्य च धन्वन्तरेः पुत्रः केतुमान् केतुमतो भीमरथस्तस्यापि दिवोदासस्तस्यापि प्रतर्दनः
॥ ११ ॥
धन्वन्तरिचा पुत्र केतुमान्, केतुमानचा भीमरथ, भीमरथचा दिवोदास तसेच दिवोदसचा
पुत्र प्रतर्दन झाला ॥११॥
स च मद्रश्रेण्यवंशविनाशनाद्
अशेषशत्रवोऽनेन जिता इति शत्रुजिदभवत् ॥ १२ ॥
त्याने मद्रश्रेण्यवंशाचा नाश करून समस्त शत्रुंवर विजय प्राप्त केला, म्हणून
त्याचे नाव 'शत्रुजित' झाले ॥१२॥
तेन च प्रीतिमतात्मपुत्रो वत्सवत्सेत्यभिहितो वत्सोऽभवत् ॥ १३ ॥
दिवोदासने आपल्या ह्या पुत्राला (प्रतर्दन) अत्यन्त प्रेमाने 'वत्स,
वत्स' म्हटले होते, म्हणून त्याचे नाव 'वत्स' असे पडले ॥१३॥
सत्यपरतया ऋतध्वजसंज्ञामवाप ॥ १४ ॥
अत्यन्त सत्यपरायण असल्याने त्याचे नाव ऋतध्वज असेही झाले ॥१४॥
ततश्च कुवलयनामानमश्वं लेभे ततः कुवलयाश्व इत्यस्यां पृथिव्यां प्रथितः ॥ १५ ॥
त्यानन्तर त्याने कुवलय नामक अपूर्व अश्व प्राप्त केला. म्हणून ह्या पृथ्वीतलावर तो 'कुवलयाश्व' नावानेही विख्यात झाला
॥१५॥
तस्यच च वत्सस्य पुत्रोऽलर्कनामाभवत् यस्यायमद्यापि श्लोको गीयते ॥ १६ ॥
ह्या वत्सला अलर्क नामक पुत्र झाला ज्याच्या विषयी हा श्लोक आजही गायला जातो
॥१६॥
षष्टिवर्षसहस्राणि
षष्टिवर्षशतानि च ।
अलर्कादपरो
नान्यो बुभुजे मेदिनीं युवा ॥ १७ ॥
'पूर्वकाळी अलर्क शिवाय इतर कोणीही सहासष्ट हजार वर्षांपर्यंत युवावस्थेत राहून
पृथ्वीचा भोग घेतला नाही’ ॥१७॥
तस्याप्यलर्कस्य सन्नतिनामाभवदात्मजः ॥ १८ ॥ सन्नतेः सुनीथस्तस्यापि सुकेतुस्तस्माच्च धर्मकेतुर्जज्ञे ॥ १९ ॥ ततश्च सत्यकेतुः तस्माद्विभुः तत्तयःसुविभुस्ततश्च सुकुमारस्तस्यापि दृष्टकेतुस्ततश्च
वीतिहोत्रस्तस्माद्भार्गः भार्गस्य भार्गभूमिः ततश्चातुर्वर्ण्यप्रवृत्तिरित्येते
काश्यभूभृतः कथिताः ॥ २० ॥ रजेस्तु सन्ततिः
श्रुयताम् ॥ २१ ॥
ह्या अलर्कला सन्नति नामक पुत्र झाला; सन्नतिला सुनीथ, सुनीथला सुकेतु, सुकेतुला
धर्मकेतु, धर्मकेतुला सत्यकेतु, सत्यकेतुला विभु, विभुला सुविभु, सुविभुला सुकुमार,
सुकुमारला धृष्टकेतु, धृष्टकेतुला वीतिहोत्र, वीतिहोत्रला भार्ग आणि भार्गला भार्गभूमि
नामक पुत्र झाला, भार्गभूमि पासून चातुर्वर्ण्याचा प्रचार झाला. अशा प्रकारे काश्यवंशाच्या राजांचे वर्णन करून झाले आता रजिच्या संततिचे वर्णन
ऐक ॥१८-२१॥
"इति
श्रीविष्णुपुराणे चतुर्थे अंशे अष्टमोऽध्यायः
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा