॥ विष्णुपुराणम्
॥
॥ चतुर्थ: अंशः ॥
सप्तमोऽध्यायः
॥
"जह्नुचे गंगापान तसेच जगदग्नि आणि विश्वामित्राची उत्पत्ति"
श्रीपराशर उवाच
तस्याप्यायुर्धीमानमावसुर्वनिश्वावसुः श्रुतायुः शतायुरयुतायुरितिसंज्ञाः षट् पुत्रा
अभवन् ॥ १ ॥
श्रीपराशर म्हणाले ;- राजा पुरूरवाला परम बुद्धिमान आयु, अमावसु, विश्वावसु, श्रुतायु,
शतायु आणि अयुतायु नामक सहा पुत्र झाले ॥१॥
तथामावसोर्भीमनामा पुत्रोऽभवत् ॥ २ ॥ भीमस्य काञ्चनः काञ्चनात्सुहोत्रस्तस्यापि जह्नुः
॥३॥ योऽसौ यज्ञवाटमखिलं गङ्गाम्भसा प्लावितमवलोक्य क्रोधसंरक्तलोचनो
भगवन्तं यज्ञपुरुषमात्मनि परमेण समाधिना समारोप्याखिलमेव गङ्गामपिबत् ॥४॥
अमावसुला भीम, भीमला काञ्चन,
काञ्चनला सुहोत्र आणि सुहोत्रला जह्नु, नामक पुत्र झाला ज्याने आपली सम्पूर्ण यज्ञशाला
गंगाजलाने भिजलेली पाहून क्रोधित व रक्तनयन होऊन भगवान यज्ञपुरुषाला परम समाधि द्वारा
आपल्यात स्थापित केले व सम्पूर्ण गंगेला पीऊन टाकले ॥२-४॥
अथैनं
देवर्षयः प्रसादयामासुः ॥ ५ ॥ दुहितृत्वे चास्य
गङ्गामनयन् ॥ ६ ॥
तेव्हा देवर्षिंनी त्याला
प्रसन्न केले आणि गंगेला त्याच्यापासून कन्यारूपात प्राप्त करून घेऊन गेले
॥५-६॥
जह्नोश्च
सुमन्तुर्नाम पुत्रोऽभवत् ॥ ७ ॥
जह्नुला सुमन्तु नामक
पुत्र झाला ॥७॥
तस्याप्यजकस्ततो
बलाकाश्वः तस्मात्कुशस्तस्यापि कुशाम्बुकुशनाभाधूर्तरजसो वसुश्चेति चत्वारः पुत्रा
बभूवुः ॥ ८ ॥
सुमन्तुला अजक, अजकला
बलाकाश्व, बलाकाश्वला कुश आणि कुशला कुशाम्ब, कुशनाभ, अधूर्त्तरजा आणि वसु नामक चार
पुत्र झाले ॥८॥
तेषां
कुशाम्बः शक्रतुल्यो मुत्रो भवेदिति तपश्चकार ॥ ९ ॥
त्यापैकी कुशाम्बने मला
इन्द्रासमान पुत्र व्हावा ह्या इच्छेने तपस्या केली ॥९॥
तं चोग्रतपसमवलोक्य
मा भवत्वन्योऽस्मत्तुल्यवीर्य इत्यात्मनैवास्येन्द्रः पुत्रत्वमगच्छत् ॥ १० ॥
त्याचे उग्र तप पाहून
'बलात कोणी अन्य माझ्या समान असू नये' ह्या भयाने इन्द्र स्वयं त्याचा पुत्र झाला ॥१०॥
स गाधिर्नाम
पुत्रः कौशिकोऽभवत् ॥ ११ ॥
तो गाधि नामक पुत्र कौशिक
म्हणून ओळखला गेला ॥११॥
गाधिश्च
सत्यवतीं कन्यामजनयत् ॥ १२ ॥ तां च भार्गवः ऋचीको वव्रे ॥ १३ ॥
गाधिने सत्यवती नावाच्या
कन्येला जन्म दिला. तिचे भृगुपुत्र ॠचीकने वरण केले ॥१२-१३॥
गाधिरप्यतिरोषणायातिवृद्धाय
ब्राह्मणाय दातुमनिच्छन्नेकतः श्यामकर्मानामिन्दुवर्चसां अनिलरंहसामश्वानां सहस्रं
कन्याशुल्कमयाचत ॥ १४ ॥
गाधिने अति क्रोधी आणि
अति वृद्ध ब्राह्मणाला कन्या न देण्याच्या इच्छेने ऋचीक कडे कन्येसाठी मूल्य म्हणून
चन्द्रासमान कान्तिमान् आणि वायुसारखे वेगवान, एक सहस्त्र श्यामकर्ण घोडे मागितले ॥१४॥
तेनाप्यृषिणा
वरुणसकाशाद् उपलभ्याश्वतीर्थोत्पन्नं तादृशमश्वसहस्रं दत्तम् ॥ १५ ॥
पण महर्षि ऋचीकने अश्वतीर्थातून
उप्तन्न झालेले तसे एक सहस्त्र घोडे त्याला वरूणाकडून आणून दिले ॥१५॥
ततस्तामृचीकः कन्यामुपयेमे ॥ १६ ॥
तेव्हा ऋचीकने त्या कन्येशी
विवाह केला ॥१६॥
ऋचीकश्च तस्याश्चरुमपत्यार्थं चकार ॥ १७ ॥
त्यानंतर एकदा त्याने
संतति प्राप्तीच्या कामनेने सत्यवतीसाठी चरु (यज्ञीय खीर) तयार केला ॥१७॥
तत्प्रसादितश्च
तन्मात्रे क्षत्रवरपुत्रोत्पत्तये चरमपरं साधयामास ॥ १८ ॥
आणि तिच्याच विनंतीवरून
एका क्षत्रियश्रेष्ठ पुत्राच्या उत्पत्तिसाठी आणखी एक चरु तिच्या मातेसाठी सुद्धा बनवला
॥१८॥
एष चरुर्भवत्या अयमपरश्चरुस्त्वन्मात्रा सम्यगुपयोज्य इत्युक्त्वा वनं जगाम ॥१९॥
आणि 'हा चरु तुझ्यासाठी
व हा तुझ्या मातेसाठी - ह्यांचा यथोचित उपयोग कर' असे सांगून तो वनात गेला ॥१९॥
उपयोगकाले च तां माता सत्यवतीमाह ॥ २० ॥
त्या चरुंचा उपयोग करते
वेळी सत्यवतीच्या मातेने तिला म्हटले - ॥२०॥
पुत्रि सर्व एवात्मपुत्रमतिगुणमभिलषति नात्मजायाभ्रातृगुणेष्वतीवादृतो भवतीति ॥२१॥
"पुत्री! सर्व लोग
आपल्यासाठीच सर्वाधिक गुणवान पुत्र इच्छितात, आपल्या पत्नीच्या भावातही गुण असावेत
ह्यात त्यांना विशेष रुचि नसते ॥२१॥
तोर्हसि ममात्मीयं चरुं मदीयं चरुमात्मनोपयोक्तुम् ॥ २२ ॥ मत्पुत्रेण हि सकलभूमण्डलपरिपालनं कार्यं कियद्वा ब्राह्मणस्य बलवीर्यसम्पदेत्युक्ता
सा स्वचरुं मात्रे दत्तवती ॥ २३ ॥
म्हणून तु तुझा चरु मला
दे आणि माझा चरू तु घे; कारण माझ्या पुत्राला सम्पुर्ण भूमण्डलाचे पालन करावे लागेल
आणि ब्राह्मणकुमाराला तर बल, वीर्य तथा सम्पत्ति आदिची गरज नाही." असे म्हटल्यावर सत्यवतीने आपला चरु आपल्या मातेला दिला ॥२२-२३॥
अथ वनादागत्य सत्यवतीमृषिरपश्यत् ॥ २४ ॥ आह चैनामतिपापे
किमिदमकार्यं भवत्या कृतमतिरौद्रं ते वपुर्लक्ष्यते ॥ २५ ॥
वनातून आल्यावर ऋषिने
सत्यवतीला पाहून म्हटले - " अगं पापिणी! तु असं कोणतं कुकर्म केलंस त्यामुळे तुझं
शरीर इतकं भयानक दिसत आहे ॥२४-२५॥
नूनं त्वया त्वन्मातृसात्कृतश्चारुरुपयुक्तो न युक्तामेतत् ॥ २६ ॥
अवश्य तु आपल्या मातेसाठी
तैयार केलेल्या चरुचा उपयोग केला आहेस, हे बरोबर नाही ॥२६॥
मया हि तत्र चरौ सकलैश्वर्यवीर्य शौर्यबलसम्पदारोपिता त्वदीयचरावऽपि अखिलशान्तिज्ञानतितिक्षादि
ब्राह्मणगुणसम्पत् ॥ २७ ॥
मी त्यात सम्पूर्ण ऐश्वर्य,
पराक्रम, शूरता आणि बळाच्या सम्पत्तिचे आरोपण केले होते तसेच तुझ्या चरूत शान्ति, ज्ञान,
तितिक्षा आदि सम्पूर्ण ब्राह्मणोचित गुणांचा समावेश केला होता ॥२७॥
तच्च विपरीतं कुर्वत्याः तवातिरौद्रास्त्रधारणपालननिष्ठः क्षत्रियाचारः पुत्रो भविष्यति
तस्याश्चोपशमरुचिर्ब्राह्मणाचार इत्याकर्ण्यैव सा तस्य पादौ जग्राह ॥ २८ ॥ प्रणिपत्य चैनमाह ॥ २९ ॥
त्यांचा विपरित उपयोग
केल्याने तुला अति भयानक अस्त्र-शस्त्रधारी पालन कर्मात तत्पर क्षत्रिय समान आचरणवाला
पुत्र होईल आणि तिला शान्तिप्रिय ब्राह्मण आचारयुक्त पुत्र होईल." हे ऐकताच सत्यवतीने त्यांचे
चरण पकडले आणि त्यांना प्रणाम करून म्हटले ॥२८-२९॥
भगवन्मयैतदज्ञानादनुष्ठितं प्रसादं मे कुरु मैवंविधः पुत्रो भवतु काममेवंविधः पौत्रो
भवत्वित्युक्ते मुनिरप्याह ॥ ३० ॥ एवमस्त्विति ॥ ३१
॥
"भगवान! अज्ञानामुळेच
मी असे केले, म्हणून प्रसन्न व्हा आणि माझा पुत्र असा होणार नाही असे करा, पाहिजे तर
माझा नातु असा झाला तर चालेल!" ह्यावर मुनि म्हणाले - 'तथास्तु' ।३०-३१॥
अनन्तरं
च सा जमदग्निमजीजनत् ॥ ३२ ॥ तन्माता च विश्वामित्रं
जनयामास ॥ ३३ ॥ सत्यवत्यपि कौशिकी नाम नद्यभवत् ॥ ३४ ॥
त्यानन्तर तिने जमदग्निला
जन्म दिला आणि तिच्या मातेने विश्वामित्राला उत्पन्न केले तसेच
सत्यवती कौशिकी नावाची नदी बनली ॥३२-३४॥
जमदग्निरिक्ष्वाकुवंशोद्भवस्य रेणोस्तनयां रेणुकामुपयेमे ॥ ३५ ॥
जमदग्निने इक्ष्वाकु कुलोद्भव
रेणुची कन्या रेणुका हिच्याशी विवाह केला ॥३५॥
तस्यां चाशेषक्षत्रहन्तारं परशुरामसंज्ञं भगवतः सकललोकगुरोर्नारायणस्यांशं जमदग्निरजीजनत्
॥ ३६ ॥
तिच्यापासून जमदग्निला
सम्पूर्ण क्षत्रियांचा ध्वंस करणारे भगवान परशुराम उप्तन्न झाले जे सकल लोक गुरु भगवान
नारायणाचे अंश होते ॥३६॥
विश्वामीत्रपुत्रस्तु भार्गव एव शुनःशेपो दैवैर्दत्तः ततश्च देवरातनामाभवत् ॥ ३७ ॥
ततश्चान्ये मधुश्चन्दोधनञ्जयकृत
देवाष्टककच्छपहरिराख्या विश्वामित्रपुत्रा बभूवुः ॥ ३८ ॥
देवतांनी विश्वामित्राला भृगुवंशीय शुनःशेप
पुत्ररूपात दिला होता. त्यानंतर त्यांना देवरात नामक एक
पुत्र झाला आणि मग मधुच्छन्द, धनंजय, कृतदेव, अष्टक, कच्छप आणि हारीतक नामक आणखी पुत्र
झाले ॥३७-३८॥
तेषां
च बहूनि कौशिकगोत्राणि ऋष्यन्तरेषु विवाह्यान्यभवत् ॥ ३९ ॥
त्यांच्यापासून अन्यान्य
ऋषिवंशात विवाह करण्या योग्य अनेक कौशिकगोत्री पुत्र पौत्रादि झाले ॥३९॥
इति श्रीविष्णुमहापुराणे चतुर्थे अंशे सप्तमोऽध्यायः (७)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा