॥ विष्णुपुराणम्
॥
॥ चतुर्थ: अंशः ॥
षष्ठोऽध्यायः ॥
"सोमवंशाचे
वर्णनः चन्द्रमा, बुध आणि पुरुरवाचे चरित्र"
मैत्रेय उवाच
सूर्यस्य वंश्या भगवन्कथिता भवता मम ।
सोमस्याप्यखिलान्वश्याञ्छ्रोतुमिच्छामि पार्थिवान् ॥ १ ॥
कीर्त्यते स्थिरकीर्तीनां येषामद्यापि सन्ततिः ।
प्रसादसुमुखस्तान्मे ब्रह्मन्नाख्यातुमर्हसि ॥ २ ॥
मैत्रेय म्हणाले ;- भगवन!
आपण सूर्यवंशीय राजांचे वर्णन तर केले, आता मी सम्पूर्ण चन्द्रवंशीय भूपतिंचा वृतान्त
सुद्धा ऐकू इच्छितो. ज्या स्थिरकीर्ति महराजांच्या संततिच्या
सुयशाचे आजही गायन केले जाते, हे ब्रह्मन! प्रसन्न मुखाने आपण त्यांचे वर्णन करा ॥१-२॥
श्रीपराशर उवाच
श्रूयतां मुनिशार्दूल वंशः प्रतिथतेजसः ।
सोमस्यानुक्रमात्ख्याता
यत्रोर्वीपतयोऽभवन् ॥ ३ ॥
श्रीपराशर म्हणाले ;-
हे मुनिशार्दूला! परम तेजस्वी चन्द्रमाच्या वंशाचे क्रमशः श्रवण कर ज्यात अनेक विख्यात
राजा झाले ॥३॥
अयं हि वंशोतिबलपराक्रमद्युतिशीलचेष्टवद्भिः
अतिगुणान्वितैर्नहुष ययाति कार्तवीर्यार्जुनादिभिः
भूपालैरलङ्कृतस्तमहं कथयामि श्रूयताम् ॥ ४ ॥
हा वंश नहूष, ययाति, कार्तवीर्य आणि अर्जुन आदि अनेक अति बल पराक्रमशील कान्तिमान क्रियावान आणि सदगुणसम्पन्न राजांनी अलंकृत झाला आहे. ऐक मी त्यांचे वर्णन करतो ॥४॥
अखिलजगत्स्त्रष्टुर्भगवतो नारायणस्य
नाभिकलोज समुद्भवाब्जयोनेर्ब्रह्मणः पुत्रोऽत्रिः ॥ ५ ॥
अत्रेःसोमः ॥ ६ ॥
सम्पूर्ण जगताचे रचयिता
भगवान नारायणाच्या नाभिकमलातून उप्तन्न झालेल्या भगवान ब्रह्माचे पुत्र अत्रि प्रजापति
होते. ह्या अत्रिचा पुत्र चन्द्र होता ॥५-६॥
तं च भगवानब्जयोनिः अशेषौषधीद्विजनक्षत्राणां आधिपत्येऽभ्यषेचयत् ॥ ७ ॥
कमलयोनि भगवान ब्रम्हाने
त्याला सम्पूर्ण औषधि, द्विजजन आणि नक्षत्रगणाच्या आधिपत्यावर अभिषिक्त केले होते ॥७॥
स च राजसूयमकरोत् ॥ ८ ॥
चंद्राने राजसूय यज्ञाचे अनुष्ठान केले ॥८॥
तत्प्रभावादत्युत्कृष्ट अधिपत्याधिष्ठातृत्वाच्चैनं मद आविवेश ॥ ९ ॥
आपला प्रभाव आणि अति उत्कृष्ट आधिपत्याचा अधिकारी झाल्याने चद्राला राजमद झाला॥९॥
मदावलेपाच्च सकलदेवगुरोर्बृस्पतेस्तारां नाम पत्नीं जहार ॥ १० ॥
तेव्हा मदोन्मत्त झाल्याने
त्याने समस्त देवतांचे गुरु भगवान बृहस्पतिची भार्या तारा हीचे हरण केले ॥१०॥
बहुशश्च बृहस्पतिचोदितेन भगवता ब्रह्मणा
चोद्यमानसकलैश्च देवर्षिभिः याचमानोऽपि न मुमोच
॥ ११ ॥
तसेच बृहस्पतिच्या प्रेरणेने
भगवान ब्रह्माने खूपदा सांगून आणि देवर्षिंनी विनंती करूनही तिला सोडले नाही ॥११॥
तस्य चन्द्रस्य च बृहस्पतेर्द्वषादुशाना पार्ष्णिग्राहोऽभूत् ॥ १२ ॥
अङ्गीरसश्च सकाशादुपलब्धविद्यो
भगवान्रुद्रो बृहस्पतेः सहाय्यमकरोत् ॥ १३ ॥
बृहस्पतिचा द्वेष करणारा शुक्र सुद्धा चन्द्राचा सहायक झाला आणि अंगिरापासून विद्यालाभ झाल्याने भगवान रुद्राने बृहस्पतिची सहायता केली (कारण बृहस्पति अंगिराचे पुत्र होते) ॥१२-१३॥
यतश्चोशना ततो जम्भकुम्भाद्याः समस्ता एव
दैत्यदानवनिकाया महान्तमुद्यमं चक्रुः ॥ १४
॥
ज्या पक्षात शुक्र होता
त्याबाजूने जम्भ आणि कुम्भ आदि समस्त दैत्य - दानव आदिंनीसुद्धा सहाय्य करून मोठे कार्य
केले ॥१४॥
बृहस्पतेरपि
सकलदेवसैन्ययुतः सहायः शक्रोऽभवत् ॥ १५ ॥
तसेच सकल देवसेनेचा इन्द्र बृहस्पतिचा सहायक बनला ॥१५॥
एवं
च तयोरतीवोग्रसङ्ग्रामः तारानिमित्तस्तारकामयो नामाभूत् ॥ १६ ॥
अशाप्रकारे तारा साठी त्यांच्यात तारकामय नामक अत्यन्त घोर युद्ध झाले ॥१६॥
ततश्च
समस्तशस्त्राण्यसुरेषु रुद्रपुरोगमा देवा देवेषु चाशेषदानवा मुमुचुः ॥ १७ ॥
तेव्हा रुद्र आदि देवगण
दानवां प्रति आणि दानवगण देवतां प्रति नाना प्रकारची शस्त्र सोडू लागले ॥१७॥
एवं देवासुराहवसंक्षोभ
क्षुब्धहृदयमशेषमेव जगद्ब्रह्माणं शरणं जगाम् ॥ १८ ॥
अशाप्रकारे देवासुर संग्रामामुळे
क्षुब्ध चित्त होऊन सम्पूर्ण संसार ब्रह्माला शरण गेला ॥१८॥
ततश्च भगवानब्जयोनिरप्युशनसं शंकरमसुरान्देवांश्च निवार्य बृहस्पतये तारामदापयत् ॥
१९ ॥
तेव्हा भगवान कमलयोनिने सुद्धा शुक्र, रुद्र, दानव आणि देवगणांना युद्धातून निवृत्त करून बृहस्पतीला तारा परत दिली ॥१९॥
तां चान्तःप्रसवामवलोक्य बृहस्पतिरप्याह ॥ २० ॥
तिला गर्भिणी पाहून बृहस्पति
म्हणाले - ॥२०॥
नैष
मम क्षेत्रे भवत्यान्यस्य सुतो धार्यःसमुत्सृजैनमलमलमतिधार्ष्ट्येनेति ॥ २१ ॥
"माझ्या क्षेत्रात
तु दुसर्याचा पुत्र धारण करणं उचित नाही, त्याला दूर कर, अधिक धृष्टता करणे ठीक नाहीं"
॥२१॥
स च
तेनैवमुक्तातिपतिव्रता भर्तृवचनानन्तरं तमिषीकास्तम्बे गर्भमुत्ससर्ज ॥ २२ ॥
बृहस्पतीने असे म्हटल्यावर
त्या पतिव्रतेने पतिच्या वचनानुसार तो गर्भ इषीकास्तम्ब झुडूपाखाली सोडून दिला ॥२२॥
स चोत्सृष्टमात्र
एवातितेजसा देवानां तेजांस्याचिक्षेप ॥ २३ ॥
त्या सोडलेल्या गर्भाने
आपल्या तेजाने समस्त देवतांचे तेज मलिन केले ॥२३॥
बृहस्पतिमिन्दुं
च तस्य कुमारस्यातिचारुतया साभिलाषौ दृष्ट्वा देवास्समुत्पन्नसन्देहास्तारां पप्रच्छुः
॥ २४ ॥
त्यानन्तर त्या बालकाचे
सौंदर्य पाहून बृहस्पति आणि चन्द्रमा दोघही त्याला घ्यायला उत्सुक झालेले पाहून देवतांनी
आपला सन्देह दूर करण्यासाठी ताराला विचारले - ॥२४॥
सत्यं
कथयास्माकमिति सुभगे सोमस्याथ वा बृहस्पतेरयं पुत्र इति ॥ २५ ॥
" हे सुभगे! तू आम्हाला
खरंखरं सांग हा पुत्र बृहस्पतिचा आहे की चंद्राचा? " ॥२५॥
एवं
तैरुक्ता सा तारा ह्रिया किञ्चिन्नोवाच ॥ २६ ॥
त्यांनी असे विचारल्यावर
ताराने लाजेमुळे काहीही सांगितले नाही ॥२६॥
बहुशोऽप्यभिहिता यदासौ देवेभ्यो नाचचक्षे ततः स कुमारस्तां शप्तुमुद्यतः प्राह ॥ २७
॥
जेव्हा अनेकदा विचारूनही
ती काही सांगेना तेव्हा तो बालक तिला शाप देण्याच्या उद्देशाने म्हणाला - ॥२७॥
दुष्टेऽम्ब
कस्मान्मम तातं नाख्यासि ॥ २८ ॥
अद्यैव
ते व्यलीकलज्जावत्यास्तथा शास्तिमहं करोमि ॥ २९ ॥
यथा
च नैवमद्याप्यतिमन्थरवचनाभविष्यसीति ॥ ३० ॥
अगं दुष्ट माते! तु माझ्या पित्याचे नाव का नाही सांगत? व्यर्थ लाजणार्या तुझी मी आता अशी अवस्था करेन ज्यामुळे तू आजपासून अत्यंत हळुहळु बोलायचे विसरशील" ॥२८-३०॥
अथाह भगवान् पितामहः तं कुमारं सन्निवार्य स्वयमपृच्छत्तां ताराम् ॥ ३१ ॥
त्यानन्तर पितामह ब्राह्माने त्या बालकाला थांबवून ताराला स्वतःच विचारले ॥३१॥
कथय वत्से कस्यायमात्मजः सोमस्य वा बृहस्पतेर्वा इत्युक्ता लज्जमानाह सोमस्येति ॥ ३२
॥
" पुत्री! खरंखरं
सांग हा पुत्र कोणाचा आहे, बृहस्पतिचा की या चन्द्राचा? " ह्यावर तिने लाजून म्हटले,
'चन्द्राचा' ॥३२॥
ततः
प्रस्फुरदुच्छ्वसितामलकपोलकान्तिर्भगवानुडुपतिः
कुमारमालिङ्ग्य साधु साधु वत्स प्राज्ञोऽसीतिबुध
इति तस्य च नाम चक्रे ॥ ३३ ॥
तेव्हा नक्षत्रपति भगवान
चन्द्राने त्या बालकाला मीठी मारून म्हटले - "खूप छान, खूप छान, बाळा ! तु खूप
बुद्धिमान हो" आणि त्याचे नाव, 'बुध' ठेवले । तेव्हा त्याची निर्मल कपोलकांती
उच्छ्वसित आणि देदीप्यमान होत होती ॥३३॥
तदाख्यातमेवैतत् स च यथेलायामात्मजं पुरूरवममुत्पादयामास ॥ ३४ ॥
बुधाने ज्या प्रकारे इला पासून आपला पुत्र पुरुरवा ह्याला उत्पन्न केले होते त्याचे वर्णन आधीच केले आहे ॥३४॥
पुरूरवास्त्वतिदानशीलोऽतियज्वातितेजस्वी यं
सत्यवादिनमतिरूपवन्तं मनस्विनं मित्रावरुणशापान्मानुषे लोके
मया वस्तव्यमिति कृतमतिरुर्वशी ददर्श ॥ ३५ ॥
पूरुरवा अति दानशील, अति याज्ञिक आणि अति तेजस्वी होता. 'मित्रावरूणाच्या शापामुळे मला मर्त्युलोकात राहावं लागेल' असा विचार करत असताना उर्वशी अप्सराची दृष्टि त्या अति सत्यवादी, रूपाचा धनी आणि मतिमान असलेल्या राजा पुरुरवावर पडली ॥३५॥
दृष्टमात्रे च तस्मिन्नपहाय मानमशेषमपास्य
स्वर्गसुखाभिलाषं तन्मनस्का भूत्वा तमेवोपतस्थे
॥ ३६ ॥
त्याला पाहताच ती सम्पूर्ण
मान आणि स्वर्गसुखाची इच्छा त्यागून तन्मयतेने त्याच्या जवळ आली ॥३६॥
सोऽपि च तामतिशयित सकललोकस्त्रीकान्ति
सौकुमार्यलावण्यगतिविलासहासादि गुणामवलोक्य तदायत्तचित्तवृत्तिर्बभूव ॥ ३७ ॥
राजा पुरुरवाचे चित्त
सुद्धा तिला संसारातील समस्त स्त्रियांमध्ये विशिष्ट तसेच कान्ति सुकुमारता, सुन्दरता,
गतिविलास आणि हास्य आदि गुणांनी युक्त पाहून वशीभूत झाला ॥३७॥
उभयमपि
तन्मनस्कमनन्यदृष्टि
परित्यक्त समस्तान्यप्रयोजनमभूत् ॥ ३८ ॥
अशा प्रकारे ते दोघंही
परस्पर तन्मय आणि अनन्यचित्त होऊन सर्व कर्म विसरले ॥३८॥
राजा तु प्रागल्भ्यात्तामाह ॥ ३९ ॥
सुभ्रु त्वामहमभिकामोऽस्मि प्रसीदानुरागमुद्वहेत्युक्ता
लज्जावखण्डितमुर्वशी तं प्राह ॥ ४० ॥
राजाने निःसंकोच होऊन
म्हटले - ॥३९॥ " हे सुभ्रु ! मी तुझी कामना करतो, तु माझ्यावर प्रसन्न होऊन मला
प्रेमाचे दान दे." राजाने असे म्हटल्यावर उर्वशीने
लाजून स्खलित स्वरात म्हटले - ॥४०॥
भवत्वेवं
यदि मे समयपरिपालनं भवान् करोतीत्याख्याते पुनरपि तामाह ॥ ४१ ॥
"जर तू माझी प्रतिज्ञा
पाळू शकलास तर अवश्य असे होऊ शकेल." हे ऐकून राजा
म्हणाला - ॥४१॥
आख्याहि
मे समयमिति ॥ ४२ ॥
बरं, तु तुझी प्रतिज्ञा
मला सांग ॥४२॥
अथ पृष्टा
पुनरप्यब्रवीत् ॥ ४३ ॥
असे विचारल्यावर ती परत
म्हणाली - ॥४३॥
शयनसमीपे
ममोरणकद्वयं पुत्रभूतं नापनेयम् ॥ ४४ ॥ भवांश्च
मया न नग्नो द्रष्टव्यः ॥ ४५ ॥ घृतमात्रं च ममाहार इति ॥ ४६ ॥
“मला पुत्ररूप असलेल्या
ह्या दोन मेषांना तू कधीच माझ्या शय्येपासून दूर करायचं नाहीस”. मी कधीही तुला नग्न पाहू नये आणि केवळ तूपच माझा आहार असेल -(ह्या माझ्या
तीन प्रतिज्ञा आहेत) " ॥४४-४६॥
एवमेवेति भूपातिरप्याह ॥ ४७ ॥
तेव्हा राजा म्हणाला
;- असेच होईल " ॥४७॥
तया
सह स चावनिपतिरलाकयां चैत्ररथादिवनेष्वमलपद्मखण्डेषु मानसादिसरःस्वतिरमणीयेषु रममाणः
षष्टिवर्षसहस्राण्यनुदिन प्रवर्दधमानप्रमोदोऽनयत् ॥ ४८ ॥
त्यानन्तर राजा पुरूरवाने
दिवसेंदिवस वृद्धिंगत होणार्या आनंदात अलकापुरी मधील चैत्ररथ आदि वनांमध्ये तर कधी
सुन्दर पद्मखंडांनी युक्त अति रमणीय मानस आदि सरोवरांमध्ये विहार करत साठ हजार वर्ष
काढली ॥४८॥
उर्वशीच तदुपभोगात्प्रतिदिनप्रवर्धमानानुरागा अमरलोकवासेऽपि न स्पृहां चकार ॥४९॥
त्याच्या उपभोगसुखामुवे
प्रतिदिन अनुराग वाढत राहिल्याने उर्वशीला सुद्धा देवलोकात राहण्याची इच्छा राहिली
नाही ॥४९॥
विना चोर्वश्या सुरलोकोऽप्सरसां सिद्धगन्धर्वाणां च नातिरमणीयोऽभवत् ॥ ५० ॥
इथे, उर्वशी शिवाय इतर
अप्सरा, सिद्ध आणि गन्धर्वांना स्वर्गलोक रमणीय वाटत नव्हता ॥५०॥
ततश्चोर्वशी पुरूरवसोः समयविद्विश्वासुर्गन्धर्वसमवेतो निशि शयनाभ्याशादेकमुरणकं जहार
॥ ५१ ॥
म्हणून उर्वशी आणि पुरुरवाची
प्रतिज्ञा जाणणार्या विश्वावसुने एके दिवशी रात्रिच्या वेळी गन्धर्वां बरोबर जाऊन
तिच्या शयनगृहा जवळून एका मेषाचे हरण केले ॥५१॥
तस्याकाशे नीयमानस्योर्वशी शब्दमशृणोत् ॥ ५२ ॥
त्याला आकाशात घेऊन जाताना
उर्वशीने त्याचा आवाज ऐकला ॥५२॥
एवमुवाच च ममानाथायाः पुत्रः केनापह्रियते कं शरणमुपयामीति ॥ ५३ ॥
तेव्हा ती म्हणाली -
"अनाथ असलेल्या माझ्यासारखीच्या पुत्राला कोण घेऊन जात आहे? आता मी कोणाला शरण
जाऊ? " ॥५३॥
तदाकर्ण्य राजा मां नग्नं देवी वीक्ष्यतीति न ययौ ॥ ५४ ॥
पण हे ऐकून राणी आपल्याला
नग्न पाहील ह्या भयाने, राजा उठला नाही ॥५४॥
अथान्यमप्युरणकमादाय गन्धर्वा ययुः ॥ ५५ ॥
त्यानन्तर गन्धर्वगण दूसरा
मेष सुद्धा घेऊन गेले ॥५५॥
तस्याप्यपह्रियमाणस्याकर्ण्य शब्दमाकाशे पुनरप्यनाथास्म्यहमभर्तृका कापुरुषाश्रयेत्यार्तराविणी
बभूव ॥ ५६ ॥
त्याचाही आवाज ऐकून उर्वशी
म्हणाली - हाय! मी अनाथा आणि भर्तृहीना आहे आणि एका भित्र्याच्या अधीन आहे. असे म्हणून ती आर्त्तस्वरात विलाप करू लागली ॥५६॥
राजाप्यमर्षवशादन्धकारमेतदिति
खड्गमादाय दुष्ट दुष्ट हतोऽसीति व्याहरन्नभ्यधावत् ॥ ५७ ॥
तेव्हा राजाने विचार केला
की ह्यावेळी काळोख आहे म्हणून राणी मला नग्न पाहू शकणार नाही. आणि क्रोधपुर्वक 'अरे
दुष्टा! तु आता मेलास' असे म्हणत तलवार घेऊन त्याच्या मागे धावला ॥५७॥
तावच्च गन्धर्वैरप्यतीवोज्ज्वला विद्युज्जनिता ॥ ५८ ॥
त्याचवेळी गन्धर्वांनी
अति उज्ज्वल वीज प्रकट केली ॥५८॥
तत्प्रभया चोर्वशी राजानमपगताम्बरं दृष्ट्वापवृत्तसमया तत्क्षणादेवापक्रान्ता ॥ ५९
॥
त्या प्रकाशात राजाला
वस्त्रहीन पाहून प्रतिज्ञा मोडल्याने उर्वशी त्वरित तिथून निघून गेली ॥५९॥
परित्यज्य तावप्युरणकौ गन्धर्वाःसुरलोकमुपगताः ॥ ६० ॥
गन्धर्वगण सुद्धा त्या
मेषांना तिथेच सोडून स्वर्गलोकात निघून गेले ॥६०॥
राजापि च तौ मेषावादायातिहृष्टमनाः स्वशयनमायातो नोर्वशीं ददर्श ॥ ६१ ॥
पण जेव्हा राजा त्या मेषांना
घेऊन प्रसन्नचित्ताने आपल्या शयनगृहात परतला तेव्हा त्याला तिथे उर्वशी दिसली नाही
॥६१॥
तां
चापश्यन् व्यपगताम्बर एवोन्मत्तरूपो बभ्राम ॥ ६२ ॥
तिला तिथे न पाहून त्या
वस्त्रहीन अवस्थेतही तो वेड्यासारखा भटकु लागला ॥६२॥
कुरुक्षेत्रे चाम्भोजसरस्यन्याभिः चतसृभिरप्सरोभिः समवेतामुर्वशीं ददर्श ॥ ६३ ॥
एके दिवशी असाच फिरत असता
कुरुक्षेत्राच्या कमल सरोवरात अन्य चार अप्सरांसोबत त्याने उर्वशीला पाहिले ॥६३॥
ततश्चोन्मत्तरूपो जाये हे तिष्ठ मनसि धोरे तिष्ठ वचसि कपटिके तिष्ठेत्येवमनेकप्रकारं
सूक्तमवोचत् ॥ ६४ ॥
तिला पाहून तो उन्मत्ता
सारखा ' हे जाये! थांब, अगं निष्ठुरे! उठ उभी रहा, अगं कपटी! बोलण्यासाठी जरा थांब'
असे खूप काही म्हणू लागला ॥६४॥
आह चोर्वशी ॥ ६५ ॥
महाराजालमनेनाविवेकचेष्टितेन ॥ ६६ ॥
उर्वशी म्हणाली;-"
महाराज! असे अज्ञाना सारखे प्रयत्न करून काहीही लाभ नहीं ॥६५-६६॥
अन्तर्वत्न्यहमब्दान्ते भवतात्रागन्तव्यं कुमारस्ते भबिष्यति एकां च निशामहं त्वया
सह वत्स्यामीत्युक्तः प्रहृष्टःस्वपुरं जगाम ॥ ६७ ॥
ह्यावेळी मी गर्भवती आहे. एका वर्षानंतर तू इथेच ये, त्यावेळी तुला तुझा पुत्र मिळेल आणि एक रात्र मी देखील
तुझ्या सोबत राहीन. "उर्वशीचे बोलणे एकून राजा पुरुरवा प्रसन्न
चित्ताने आपल्या नगरात परत गेला ॥६७॥
तासां चाप्सरसामूर्वशी कथयामास ॥ ६८ ॥
त्यानन्तर उर्वशीने अन्य
अप्सरांना म्हटले - ॥६८॥
अयं
स पुरुषोत्कृष्टो येनाहमेतावन्तं कालमनुरागाकृष्टमानसा सहोषितेति ॥ ६९ ॥
" हा तोच पुरुषश्रेष्ठ
आहे ज्याच्या सोबत मी इतके दिवस प्रेमाकृष्ट - चित्ताने भुमण्डळी राहिले ॥६९॥
एवमुक्तास्ताश्चाप्सरस ऊचुः ॥ ७० ॥
ह्यावर अन्य अप्सरा म्हणाल्या
- ॥७०॥
साधु
साध्वस्य रूपमप्यनेन सहास्माकमपि सर्वकालमास्या भवेदिति ॥ ७१ ॥
" व्वा! व्वा! खरच
ह्याचं रूप अतिशय मनोहर आहे, ह्याच्या सह सदैव आमचाही सहवास असावा " ॥७१॥
अब्दे च पूर्णे स राजा तत्राजगाम ॥ ७२ ॥
वर्ष समाप्त झाल्यावर
राज पुरूरवा तिथे गेला ॥७२॥
कुमारं
चायुषमस्मै चोर्वशी ददौ ॥ ७३ ॥
तेव्हा उर्वशीने त्याला
'आयु' नामक एक बालक दिले ॥७३॥
दत्त्वा चैकां निशां तेन राज्ञा सहोषित्वा पञ्च पुत्रोत्पत्तये गर्भमवाप ॥ ७४ ॥
तसेच त्याच्या सोबत एक
रात्र राहून पाच पुत्र उप्तन्न करण्यासाठी गर्भ धारण केला ॥७४॥
उवाच
चैनं राजानमस्मत्प्रीत्या महाराजाय सर्व एव गन्धर्वा वरदाःसंवृत्ताः व्रियतां च वर
इति ॥ ७५ ॥
आणि म्हटले - हे महाराजा
तुझ्या पारस्परिक स्नेहामुळे सकल गन्धर्वगण तुला वरदान देऊ इच्छितात म्हणून तुला अभीष्ट
असा वर माग ॥७५॥
आह च राजा ॥ ७६ ॥ विजितसकलाराति रविहतेन्द्रियसामर्थ्यो बन्धुमानमितबलकोशोऽस्मि नान्यदस्माकं
उर्वशीसालोक्यात्प्राप्तव्यमस्तितदहमनया सहोर्वश्या कालं नेतुमभिलषामीत्युक्ते गन्धर्वा
राज्ञेऽग्निस्थालीं ददुः ॥ ७७ ॥ ऊचुश्चैनमग्निमाम्नायानुसारी
भूत्वा त्रिधा कृत्वेर्वशी सलोकतामनोरथमुद्दिश्य सम्यग्यजेथाः ततोऽवश्यमभिलषितमवाप्स्यतीत्युक्तः
तामग्निस्तालीमादाय जगाम ॥ ७८ ॥
राजा म्हणाला ;-
"मी समस्त शत्रुंना जिंकले आहे, माझ्या इन्द्रियांचे सामर्थ्य नष्ट नाही झालेले,
मी बन्धुजन, असंख्य सेना आणि कोशानेही सम्पन्न आहे, आता उर्वशीच्या सहवासा शिवाय मला
आणखी काहीही प्राप्तव्य नाही. म्हणून मी ह्या
उर्वशीसोबतच कालव्यापन करू इच्छितो. " राजाने असे
म्हटल्यावर गन्धर्वांनी त्याला एक अग्निस्थाली (अग्नियुक्त पात्र) दिले व म्हटले -
"ह्या अग्निच्या वैदिक विधिने गार्हपत्य, आहवनीय आणि दक्षिणाग्निरूप असे तीन भाग
करून त्यात उर्वशीच्या सहवासाच्या कामनेने व्यवस्थित यजन करशील तर तुला नक्कीच तुझे
अभीष्ट प्राप्त होईल. " गन्धर्वांनी असे म्हटल्यावर
राजा ती अग्निस्थाली घेऊन गेला ॥७६-७८॥
अन्तरटव्यामचिन्तयत् अहो मेऽतीव मुढता किमहमकरवम् ॥ ७९ ॥ वह्निस्थाली मयैषानीता नोर्वशीति
॥ ८० ॥
मार्गात अरण्यात पोचल्यावर
त्याने विचार केला - 'अरे! मी किती मूर्ख आहे ? हे मी काय केलं? उर्वशीला न आणता ही
अग्निस्थाली घेऊन आलो ' ॥७९-८०॥
अथैनामटव्यामेवाग्निस्थालीं
तत्याज स्वपुरं च जगाम् ॥ ८१ ॥
असा विचार करून ती अग्निस्थाली
वनातच सोडून तो आपल्या नगरात परतला ॥८१॥
व्यतीतेर्द्धरात्रे विनिद्रश्चाचिन्तयत् ॥ ८२ ॥
मध्यरात्री झोपेतून जागा
झाल्यावर राजाने विचार केला - ॥८२॥
ममोर्वशीसालोक्यप्राप्तयर्थमग्निस्थाली गन्धर्वैर्दत्ता सा च मयाटव्यां परित्यक्ता
॥ ८३ ॥
उर्वशीचे सान्निध्य प्राप्त
करण्यासाठीच गन्धर्वांनी मला ती अग्निस्थाली दिली होती आणि मी ती वनातच सोडून आलो ॥८३॥
तदहं तत्र तदाहरणाय यास्यामीत्युत्थाय तत्राप्युपगतो नाग्निस्थालीमपश्यत् ॥ ८४ ॥
म्हणून मला ती परत आणायला
जायला हवे' असा विचार करून तो उठून तिथे गेला पण तिथे त्याला स्थाली सापडली नाही ॥८४॥
शमीगर्भं
चाश्वात्थमग्निस्थालीस्थाने दृष्ट्वाचिन्तयत् ॥ ८५ ॥
अग्निस्थालीच्या जागी
राजा पुरुरवाने एक शमीगर्भ पिंपळाचा वृक्ष पाहून विचार केला ॥८५॥
मयात्राग्निस्थाली
निक्षिप्ता सा चाश्वत्थः शमीगर्भोऽभूत् ॥ ८६ ॥
'मी इथेच ती अग्निस्थाली
फेकली होती. ती स्थालीच हा शमीगर्भ पिंपळ बनली
आहे ॥८६॥
तदेनमेवाहं
अग्निरूपमादाय स्वपुरमभिगम्यारणीं कृत्वा तदुत्पन्नाग्नेरुपास्तिं करिष्यामीति ॥ ८७
॥
म्हणून ह्या अग्निरूप
अश्वत्थालाच आपल्या नगरात नेऊन त्याची अरणि बनवून त्याने उप्तन्न झालेल्या अग्निचीच
उपासना करतो' ॥८७॥
एवमेव
स्वपुरमभिगम्यारणिं चकार ॥ ८८ ॥
असा विचार करून राजा त्या
अश्वत्थाला घेऊन आपल्या नगरात आला आणि त्याची अरणि बनवली ॥८८॥
तत्प्रमाणं चाङ्गुलैः कुर्वन् गायत्रीमपठत् ॥ ८९ ॥
त्यानन्तर त्याने त्या
काष्ठाचे एक-एक अंगुल करून गायत्री-मंत्राचे पठण केले ॥८९॥
पठतश्चाक्षरसंख्यान्येवाङ्गुलान्यरण्यभवत् ॥ ९० ॥
त्याच्या पठणाने गायत्रीमंत्राच्या
अक्षर-संख्यां इतकीच एक-एक अंगुलच्या अरणि झाल्या ॥९०॥
तत्राग्निं निर्मथ्याग्नित्रयमाम्नायानुसारी भूत्वा जुहाव ॥ ९१ ॥
त्यांच्या मन्थनाने तीन्ही
प्रकारचे अग्नि उप्तन्न करून त्याप वैदिक विधिने हवन केले ॥९१॥
उर्वशीसालोक्यं
फलमभिसन्धितवान् ॥ ९२ ॥
आणि उर्वशीच्या सहवासरूपी
फळाची इच्छा केली ॥९२॥
तेनैव
चाग्निविधिना बहुविधान् यज्ञानिष्ट्वा गान्धर्वलोकानवाप्योर्वश्या सहावियोगमवाप ॥
९३ ॥
त्यानन्तर त्याच अग्निने
नाना प्रकारच्या यज्ञांचे यजन करत त्याने गन्धर्व लोक प्राप्त केला आणि मग उर्वशीपासून
त्याचा कधीच वियोग नाही झाला ॥९३॥
एकोऽग्निरादावभवत् एकेन त्वत्र मन्वन्तरे त्रेधा प्रवर्तिताः ॥ ९४ ॥
पूर्वकाळी एकच अग्नि होता,
त्या एकापासूनच ह्या मन्वन्तरात तीन प्रकारच्या अग्निचा प्रचार झाला ॥९४॥
इति श्रिविष्णुमहापुराणे चतुर्थे अंशे षष्ठोऽध्यायः (६)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा