॥ विष्णुपुराणम्
॥
॥ चतुर्थ: अंशः ॥
पञ्चमोऽध्यायः ॥
"निमि-चरित्र आणि निमिवंशाचे वर्णन"
श्रीपराशर उवाच
इक्ष्वाकुतिनयो
योऽसौ निमिर्नाम्ना सहस्रं वत्सरं सत्रमारेभे ॥ १ ॥
श्रीपराशर म्हणाले ;- इक्ष्वाकुचा जो निमि नामक पुत्र होता त्याने एक सहस्त्रवर्षाने समाप्त होणारा यज्ञ आरभ्म केला ॥१॥
वसिष्ठिं च होतारं वरयामास ॥ २ ॥
त्या यज्ञात त्याने वसिष्ठांची होता म्हणून निवड केली ॥२॥
तमाह वसिष्ठोहमिन्द्रेण पञ्चवर्षशतयागार्थं प्रथमं वृतः ॥ ३ ॥
वसिष्ठ त्याला म्हणाले की पाचशे वर्षांच्या यज्ञासाठी इन्द्राने मला आधीच निवडले आहे ॥३॥
तदनन्तरं प्रतिपाल्यतामागतस्तवापि ऋत्विक् भविष्यमीत्युक्ते स पृथिवीपतिर्न किञ्चिदुक्तवान्
॥ ४ ॥
म्हणून तोपर्यंत तु थांब, तिथून आल्यावर मी तुझा सुद्धा ऋत्विक होईन. त्यांनी असे म्हटल्यावर राजाने त्यांना काहीच उत्तर दिले नाही ॥४॥
वसिष्ठोप्यनेन समन्विप्सितमित्यमरपतेर्यागमकरोत् ॥ ५ ॥
वसिष्ठना वाटले की राजाने त्यांचे म्हणणे ऐकले आणि त्यांनी इन्द्राचा यज्ञ आरम्भ केला ॥५॥
सोऽपि तत्काल एवान्यैर्गौतमादिभिर्यागमकरोत् ॥ ६ ॥
पण राजा निमि सुद्धा त्याचवेळी गौतम आदि अन्य होतांद्वारा आपला यज्ञ करू लागला ॥६॥
समाप्ते चामरपतेर्यागे त्वरया वसिष्ठोनिमियज्ञं करिष्यामीत्याजगाम् ॥ ७ ॥
देवराज इंद्राचा यज्ञ समाप्त होताच “मला निमिचा यज्ञ करायचा आहे' असा विचार करून वसिष्ठ देखील त्वरित तिथे आले ॥७॥
तत्कर्मकर्तृत्वं च गौतमस्य दृष्ट्वा स्वपते तस्मै राज्ञे मां प्रत्याख्यायैतदनेन
गौतमाय कर्मान्तरं समर्पितं यस्मात्तस्मादयं विदेहो भविष्यतीति शापं ददौ ॥ ८ ॥
त्या यज्ञात आपले (होताचे) कर्म गौतमांना करताना पाहून त्यांनी झोपलेल्या राजा निमिला शाप दिला की ' ह्याने माझी अवज्ञा करून सम्पूर्ण कर्मभार गौतमाला सोपवला आहे म्हणून हा देहहीन होईल' ॥८॥
प्रबुद्धश्चासाववनिपतिरपि प्राह ॥ ९ ॥ यस्मान्मामसम्भाष्याज्ञानत एव शयानस्य शापोत्सर्गमसौ
दुष्टगुरुश्चकार तस्मात्तस्यापि देहः पतिष्यतीति शापं दत्त्वा देहमत्यजत् ॥ १० ॥
झोपून उठल्यावर राजा निमिने सुद्धा म्हटले - ॥९॥ " ह्या दुष्ट गुरुने माझ्याशी बोलल्या शिवायच अज्ञानतापूर्वक झोपेत असलेल्या मला शाप दिला आहे, म्हणून ह्याचा देह सुद्धा नष्ट होईल. " अशा प्रकारे शाप देऊन राजाने आपले शरीर त्यागले ॥१०॥
तच्छापाच्च मित्रावरुणयोस्तेजसि
वसिष्ठस्य चेतः प्रविष्टम् ॥ ११ ॥
राजा निमिच्या शापामुळे वसिष्ठाचा लिंगदेह मित्रावरुणच्या वीर्यात प्रविष्ट झाला ॥११॥
उर्वशीदर्शनादुद्भुतबीजप्रपातयोः तयोः सकाशाद्वसिष्ठो देहमपरं लेभे ॥ १२ ॥
आणि उर्वशीला बघितल्यावर त्याचे वीर्य स्खलित झाल्यावर त्यापासूनच त्यांनी दूसरा देह धारण केला ॥१२॥
निमेरपि तच्छरीरमतिमनोहरगन्धतैलादिभिः उपसंस्क्रियमाणं नैव क्लेदादिकं दोषमवाप
सद्यो मृत इव तस्थौ ॥ १३ ॥
निमिचे शरीरसुद्धा अति मनोहर गन्ध आणि तैल आदिने सुरक्षित राहिल्याने ते कुजले नाही तर नुकताच मृत्यु झालेल्या देहासारखे राहिले ॥१३॥
यज्ञसमाप्तौ भागग्रहणाय
देवानागतानृत्विज ऊचुयजमानाय वरो दीयतामिति ॥१४॥
यज्ञ समाप्त झाल्यावर जेव्हा देवगण आपला भाग ग्रहण करण्यासाठी आले तेव्हा त्यांना ऋत्विक गण म्हणाले " यजमानाला वर द्या " ॥१४॥
देवैश्च छन्दितोऽसौ निमिराह ॥ १५ ॥
देवतांद्वारा प्रेरीत केल्यावर राजा निमिने त्यांना म्हटले - ॥१५॥
भगवन्तोखिलसंसारदुःखहन्तारः ॥ १६ ॥
"भगवन ! आपण सम्पूर्ण संसार दुःख दूर करणारे आहात ॥१६॥
न ह्येतादृगन्यद्दुःखमस्ति यच्छरीरात्मनोर्वियोगे भवति ॥ १७ ॥
माझ्या मते शरीर आणि आत्माचा वियोग झाल्याने जसे दुःख होते तसे दुसरे कोणतेच दुःख नाही ॥१७॥
तदहमिच्छामि
सकललोकलोचनेषु वस्तुं न पुनः शरीरग्रहणं कर्तुमित्येवमुक्तैः देवैरसावशेषभूतानां नेत्रेष्ववतारितः
॥ १८ ॥ ततो भूतान्युन्मेषनिमेषं चक्रुः ॥ १९ ॥
म्हणून मला परत शरीर ग्रहण करण्याची इच्छा नाही, समस्त लोकांच्या नेत्रातच मी वास करू इच्छितो. "म्हणून देवतांनी त्याला समस्त लोकांच्या नेत्रात अवस्थित केला. तेव्हापासून प्राणी निमेषोन्मेष (पापण्यांची उघडझाप) करू लागले ॥१८-१९॥
अपुत्रस्य
च तस्य भूभुजः शरीरमराजकभीरवो मुनयोऽरण्या ममन्थुः ॥ २० ॥
त्यानन्तर अराजकतेच्या भयाने मुनिजनांनी त्या पुत्रहीन राजाच्या शरीराचे अरणिने (शमीदण्ड) मंथन केला ॥२०॥
तत्र
च कुमारो जज्ञे ॥ २१ ॥ जननाज्जनकसंज्ञां चावाप ॥ २२ ॥
त्यापासून एक कुमार उत्पन्न झाला ज्याने जन्म घेतल्या कारणाने त्याचे 'जनक' नाव पडले ॥२१-२२॥
अभूद्विदेहोऽस्य पितेति वैदेहः, मथनान्मिथिरिति ॥
२३ ॥
त्याचे पिता विदेह होते म्हणून हा ' वैदेह ' म्हणूनही ओळखला गेला, आणि मन्थनातून उप्तन्न झाल्याने त्याला ' मिथि' सुद्धा म्हणतात॥२३॥
तस्योदावसुः पुत्रोऽभवत् ॥ २४ ॥
त्याला उदावसु नामक पुत्र झाला ॥२४॥
उदावसोर्नन्दिवर्धनः ततःसुकेतुस्तस्माद्देवरातः
ततश्च बृहदुक्थः तस्य चे महावीर्यस्तस्यापि सुधृति ॥ २५ ॥ ततश्च धृष्टकेतुरजायत ॥ २६
॥
धृष्टकेतोर्हर्यश्वस्तस्य च मनुः मनोः पतिकः, तस्मात्कृतरथस्तस्य देवमीढः, तस्य च विबुधः विबुधस्य
महाधृतिस्ततश्च कृतरातस्ततो महारोमा तस्य स्वर्णरोमा तत्पुत्रो ह्रस्वरोमा ह्रस्वरोम्णःसीरध्वजोऽभवत्
॥ २७ ॥
उदावसुला नन्दिवर्द्धन, नन्दिवर्द्भनला सुकेतु, सुकेतुला देवरात, देवरातला बृहदुक्थ, बृहदुक्थला महावीर्य, महावीर्यला सुधृति, सुधृतिला धृष्टकेतु, धृष्टकेतुला हर्यश्व, हर्यश्वला मनु, मनुला प्रतिक, प्रतिकला कृतरथ, कृतरथला देवमीढ, देवमीढला विबुध, विबुधला महधृति, महाधृतिला कृतरात, कृतरातला महारोमा, महरोमाला सुवर्णरोमा, सुवर्णरोमाला हॄस्वरोमा आणि हृस्वरोमाला सीरध्वज नामक पुत्र झाला ॥२५-२७॥
तस्य पुत्रार्थं यजनभुवं
कृषतः सीरे सीता दुहिता समुत्पन्ना ॥ २८ ॥
तो पुत्राच्या इच्छेने यज्ञभूमि नांगरत होता. त्यावेळी हलाच्या अग्र भागातून त्याला सीता नावाची कन्या उप्तन्न झाली ॥२८॥
सीरध्वजस्य भ्राता ससांकाश्यधिपतिः कुशध्वजनामासीत् ॥ २९ ॥
सीरध्वजाचा भाऊ सांक्ष्यनरेश कुशध्वज होता ॥२९॥
सीरध्वजस्यापत्यं भानुमान् भानुमतः शतद्युम्नस्तस्य तु शुचिः तस्माच्चोर्जनामा पुत्रो
जज्ञे ॥ ३० ॥
तस्यापि शतध्वजस्ततः कृतिः
कृतेरञ्जनः, तत्पुत्रः कुरुजित् ततोऽरिष्टनेमिः तस्माच्छ्रुतायुः
श्रुतायुषः सुपार्श्वः तस्मात्सृंजयः ततः क्षेमावी क्षेमाविनोऽनेनाः तस्माद्भौमरथः
तस्य सत्यरथः तस्मादुपगुः उपगोरुपगुप्तः तत्पुत्रः स्वागतस्तस्य च स्वानन्दः तस्माच्च
सुवर्चाः तस्य सुपार्श्वः तस्यापि सुभाषः तस्य सुश्रुतस्तस्मात्सुश्रुताञ्जयस्तस्य
पुत्रो विजयः विजयस्य ऋतः ऋतात्सुनयः सुनयाद्वीतहव्यः स्तस्माद्धृतिः धृतेर्बहुलाश्वः, तस्य पुत्रः कृतिः ॥ ३१ ॥
सीरध्वजाला धातुमान नामक पुत्र झाला. धातुमानला शतद्युम्र, शतद्युम्रला शुचि, शुचिला ऊर्जनामा, ऊर्जनामाला शतध्वज, शतध्वजला कृति, कृतिला अञ्जन, अञ्जनला कुरुजित् , करुजितला अरिष्टनेमि, अरिष्टनेमिला श्रुतायु, श्रुतायुला सुपार्श्व, सुपार्श्वला सुज्जय, सुज्जयला क्षेमावी, क्षेमावीला अनेना, अनेनाला भौमरथ, भौमरथला सत्यरथ, सत्यरथला उपगु, उपगुला उपगुप्त, उपगुप्तला स्वागत, स्वागतला स्वानन्द, स्वानन्दला सुवर्चा, सुवर्चाला सुपार्श्व, सुपार्श्वला सुभाष, सुभाषला सुश्रुत, सुश्रुतला जय, जयला विजय, विजयला ऋत, ऋतला सुनय, सुनयला वीतहव्य, वीतहव्यला धृति, धृतिला बहुलाश्व आणि बहुलाश्वला कृति नामक पुत्र झाला ॥३०-३१॥
कृतौ सन्तिष्ठतेऽयं जनकवंशः ॥ ३२ ॥
कृति नंतर ह्या जनकवंशाची समाप्ती होते ॥३२॥
इत्येते
मैथिलाः ॥ ३३ ॥
हेच मैथिलभुपालगण आहेत ॥३३॥
प्रायेणैते आत्मविद्याश्रयिणो भूपाला भवन्ति ॥ ३४
॥
प्रायः हे सर्व राजालोग आत्मविद्येला आश्रय देणारे होते ॥३४॥
इति श्रीविष्णुमहापुराणे चतुर्थे अंशे पञ्चमोऽध्यायः (५)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा