॥ विष्णुपुराणम्
॥
॥ चतुर्थ: अंशः ॥
चतुर्थोऽध्यायः ॥
"सगर, सौदास, खट्वांग आणि भगवान रामाच्या चरित्राचे वर्णन"
श्रीपराशर उवाच
काश्यपदुहिता
मुमतिर्विदर्भराजतनया केशिनी च द्वे भार्ये सगरस्यास्ताम् ॥ १ ॥
श्रीपराशर म्हणाले;- काश्यपसुता सुमति आणि विदर्भराजकन्या
केशिनी ह्या राजा सगराच्या दोन स्त्रिया होत्या ॥१॥
ताभ्यां
चापत्यार्थमौर्वः परमेण समाधिनाराधितो वरमदात् ॥ २ ॥
त्यांच्यापासून सन्तानोत्पत्तीसाठी परम समाधी द्वारा आराधना केल्यावर
भगवान और्वनी हा वर दिला ॥२॥
एका वंशकरमेकं पुत्रमपरा षष्टिं पुत्रसहस्राणां जनयिष्यतीति यस्या यदभिमतं तदिच्छया
गृह्यतामित्युक्ते केशिन्येकं वरयामास ॥ ३ ॥ सुमतिः
पुत्रसहस्राणि षष्टिं वव्रे ॥ ४ ॥
'एकीला वंशाची वृद्धि करणारा एक पुत्र तथा
दुसरीला साठ हजार पुत्र होतील, ह्यांच्यातील जीला जे अभीष्ट असेल ती इच्छापूर्वक
त्याचे ग्रहण करू शकते.' त्यांनी असे म्हटल्यावर केशिनीने एक आणि सुमतीने साठ हजार
पुत्रांचा वर मागितला ॥३-४॥
तथेत्युक्ते
अल्पैरहोभिः केशिनी पुत्रमेकमसमञ्जसनामानं वंशकरमसूत ॥ ५ ॥
काश्यपतनयायास्तु
सुमत्याः षष्टिः पुत्रसहस्राण्यभवन् ॥ ६ ॥
महर्षिंनी 'तथास्तु' म्हटले व काही दिवसातच
केशिनीने वंशाची वृद्धी करणार्या असमञ्जस नामक एका पुत्राला जन्म
दिला व काश्यप कुमारी सुमतिला साठ हजार पुत्र झाले ॥५-६॥
तस्मादसमञ्जसादंशुमान्नाम कुमारो जज्ञे ॥ ७ ॥
राजकुमार असमञ्जसला
अंशुमान नावाच पुत्र झाला ॥७॥
स त्वसमञ्जसो बालो बाल्यादेवासद्वृत्तोऽभूत् ॥ ८ ॥
हा असमञ्जस
लहानपणापासूनच मोठा दुराचारी होता ॥८॥
पिता चास्याचिन्तयदयमतीतबाल्यः सुबुद्धिमान् भविष्यतीति ॥ ९ ॥
पित्याने विचार केला की मोठा झाल्यावर तो
समजूतदार होईल ॥९॥
अथ तत्रापि च वयस्यतीते असच्चारीतमेनं पिता तत्याज ॥ १० ॥
पण मोठेपणी देखील जेव्हा त्याच्या आचरणात
सुधारणा झाली नाही तेव्हा पित्याने त्याचा त्याग केला ॥१०॥
तान्यपि
षष्टिः पुत्रसहस्राण्यसमञ्जसचारितमेवानुचक्रुः ॥ ११ ॥
त्याच्या साठ हजार पुत्रांनीही असमञ्जसच्या
चरित्राचेच अनुकरण केले ॥११॥
ततश्चासमञ्जसचरितानुकारिभिः
सागरैरपध्वस्तयज्ञादिसन्मार्गे जगति देवाःसकलविद्यामयमसंस्पृष्टमशेषदोषैर्भगवतः पुरुषोत्तमस्यांशभूतं
कपिलं प्रणम्य तदर्थमूचुः ॥ १२ ॥
तेव्हा, असमञ्जसच्या
चरित्राचे अनुकरण करणार्या त्या सगरपुत्रांद्वारा जगात यज्ञादि सन्मार्गांचा
उच्छेद झाल्यावर सकल विद्यानिधान, अशेषदोषहीन, भगवान पुरुषोत्तमाचे अंशभूत
असलेल्या श्रीकपिलदेवांना प्रणाम करून देवतांनी त्यांच्या विषयी सांगितले. ॥१२॥
भगवन्नेऽभिः
सगरतनयैरसमञ्जसचरितमनुगम्यते ॥ १३ ॥
"भगवान!
राजा सगरचे हे सर्व पुत्र असमञ्जसच्या चरित्राचेच अनुसरण
करत आहेत ॥१३॥
कथमेभिरसद्वृत्तमनुसरद्भिर्जगद्भविष्यतीति
॥ १४ ॥
ह्या सर्वांच्या असन्मार्गात प्रवृत्त
राहण्याने जगताची काय दशा होईल? ॥१४॥
अत्यार्तजगत्परित्राणाय च भगवतोऽत्र शरीरग्रहणमित्याकर्ण्य भगवानाहाल्पैरेव दिनैर्विनङ्क्ष्यन्तीति
॥ १५ ॥
प्रभो! जगतात दीनजनांच्या रक्षणासाठीच आपण
हे शरीर ग्रहण केले आहे (म्हणून ह्या घोर आपत्तितून संसाराची रक्षा करावी).
"हे ऐकून भगवान कपिल म्हणाले, "हे सर्व थोड्याच दिवसात नष्ट होतील
" ॥१५॥
अत्रान्तरे
च सगरो हयमेधमारभत ॥ १६ ॥
त्याच वेळी सगराने अश्वमेध यज्ञ आरम्भ केला
॥१६॥
तस्य च पुत्रैरधिष्ठितमस्याश्वं कोऽप्यपहृत्य भुवो
बिलं प्रविवेश ॥ १७ ॥
त्यात त्याच्या पुत्रांद्वारा सुरक्षित
घोड्याला कोणीतरी चोरले व तो पृथ्वीच्या आत घुसला ॥१७॥
ततस्तत्तनयाश्चाश्वखुरगतिनिर्वन्धेनावनीमेकैको
योजनं चख्नुः ॥ १८ ॥
तेव्हा त्या घोड्याच्या खुरांच्या चिन्हांचा
मागोवा घेत त्याच्या पुत्रांपैकी प्रत्येकाने एक-एक योजन पृथ्वी खोदली ॥१८॥
पाताले चाश्वं परिभ्रमन्तं तमवनीपतितनयास्ते ददृशुः ॥ १९ ॥
आणि पाताळात पोहोचल्यावर त्या राजकुमारांनी
आपल्या घोड्याला तिथे फिरताना पाहिले ॥१९॥
नातिदूरेऽवस्थितं च भगवन्तमपघने शरत्कालेऽर्कमिव तेजोभि- रनवरतमूर्ध्वमधश्चाशेष दिशश्चोद्भासयमानं
हयहर्तारं कपिलर्षिमपश्यन् ॥ २० ॥
जवळच मेघावर्णहीन
शरत्कालच्या सूर्यासमान आपल्या तेजाने सम्पूर्ण दिशांना प्रकाशित करत घोडा चोरणारे
परमर्षि कपिलांना मान खाली घालून बसलेले पाहीले ॥२०॥
ततश्चोद्यतायुधा
दुरात्मानोऽयमस्मदपकारी यज्ञविध्नकारी हन्यतां हयहर्ता हन्यतामीत्यवोचन्नभ्यधावंश्च
॥ २१ ॥
तेव्हा ते दुरात्मा आपापली अस्त्र-शस्त्र
घेऊन 'हाच आमचा अपकारी आणि यज्ञात विघ्न आणणारा आहे, ह्या घोडा चोरणार्याला मारा
मारा' असे ओरडत त्यांच्यावर हल्ला केला ॥२१॥
ततस्तेनापि भगवता किञ्चिदीषत्परिवर्तितलोचनेनावलोकिताः
स्वशरीर समुत्थेनाऽग्निनादह्यमाना विनेशुः ॥ २२ ॥
तेव्हा भगवान् कपिलदेवांनी त्यांच्याकडे
डोळे उघडून बघताच ते सर्व आपल्याच शरीरातून उप्तन्न झालेल्या आगीत जळून नष्ट झाले
॥२२॥
सगरोप्यवगम्याश्वानुसारि तत्पुत्रबलमशेषं परमर्षिणा कपिलेन तेजसा दग्धं ततोंऽशुमन्तमसमञ्जसपुत्रमश्वानयनाय
युयोज ॥ २३ ॥
महाराज सगरला जेव्हा कळले की घोड्याचे
अनुसरण करणारे त्याचे सर्व पुत्र महर्षि कपिलांच्या तेजाने दग्ध झाले तेव्हा
त्याने असमञ्जसचा पुत्र अंशुमान ह्याला
घोडा परत आणायला पाठवले ॥२३॥
स तु सगरकतयखातमार्गेण कपिलमुपगम्य भक्तिनम्रस्तदा
तृष्टाव ॥ २४ ॥
तो सगर-पुत्रांद्वारा खोदलेल्या मार्गाने
कपिल मूनींजवळ पोहोचला आणि भक्तिविनम्र होऊन त्यांची स्तुति केली ॥२४॥
अथैनं
भगवानाह ॥ २५ ॥ गच्छैनं पितामहायाश्वं प्रापय वरं वृणीष्व च पुत्रक
पौत्रश्च ते स्वर्गाद्गङ्गां भुवमानेष्यत इति ॥ २६ ॥
तेव्हा भगवान् कपिल त्याला म्हणाले,
"बाळा! जा, हा घोडा आपल्या आजोबांना नेऊन दे व तुझी जी इच्छा असेल तो वर माग. तुझा पौत्र गंगेला स्वर्गातून पृथ्वीवर
आणेल" ॥२५-२६॥
अथांशुमानपि स्वर्यातानां ब्रह्मदण्डहतानामस्मत्पितॄणामस्वर्गयोग्यानां
स्वर्गप्राप्तिकरं वरमस्माकं प्रयच्छेति प्रत्याह ॥ २७ ॥
ह्यावर अंशुमानाने म्हटले की मला असा वर
द्या जो ब्रह्मदण्डामुळे मृत्यु पावलेल्या माझ्या अस्वर्ग्य पितृगणांना स्वर्गाची
प्राप्ति करणारा असेल ॥२७॥
तदाकर्ण्य तं च भगवानाह उक्तमेवैतन्मयाद्य पौत्रस्ते त्रिदिवाद्गङ्गाम्भुवमानयिष्यतीति
॥ २८ ॥
हे ऐकून भगवान म्हणाले, "मी तुला आधीच
सांगितले की तुझा पौत्र गंगेला स्वर्गातून पृथ्वीवर आणेल ॥२८॥
तदम्भसा
च संस्पृष्टेष्वस्थिभस्मसु एते च स्वर्गमारोक्ष्यन्ति ॥ २९ ॥
तिच्या जलाने ह्यांच्या अस्थिंच्या भस्माला
स्पर्श होताच हे सर्व स्वर्गात जातील ॥२९॥
भगवद्विष्णुपादाङ्गुष्ठनिर्गतस्य हि जलस्यैतन्माहात्म्यम्
॥ ३० ॥
यन्न केवलमभिसन्धिपूर्वकं स्नानाद्युपभोगेषूपकारकमनभिसंहितं अप्यपेतप्राणस्य अस्थिचर्मस्नायुकेशाद्युपस्पृष्टं
शरीरजमपि पतितं सद्यः शरीरिणं स्वर्गं नयतीत्युक्तः प्रणम्य भवगतेऽश्वमादाय पितामहायज्ञमाजगाम्
॥ ३१ ॥
भगवान विष्णूंच्या चरणनखातून निर्माण
झालेल्या ह्या जलाचे असे माहात्म्य आहे की ते कामनापूर्वक केवळ स्नानादि कार्यातच
उपयोगी होईल. पण इच्छेशिवाय मृत पुरुषाची अस्थि, चर्म, स्नायु अथवा केश आदिला
किंवा त्याच्या शरीराच्या कोणत्याही अंगाला ह्या जलाचा स्पर्श झाला तरी त्या
देहधारीला त्वरीत स्वर्गात घेऊन जाते."
भगवान कपिलांनी असे म्हटल्यावर त्याने त्यांना प्रणाम केला आणि घोड्याला घेऊन
आपल्या आजोबांच्या यज्ञशाळेत आला ॥३०-३१॥
सगरोप्यश्वमासाद्य
तं यज्ञं समापयामास ॥ ३२ ॥ सागरं चात्मजप्रीत्या
पुत्रत्वे कल्पितवान् ॥ ३३ ॥
राजा सगराने सुद्धा घोडा सापडल्यावर आपला
यज्ञ समाप्त केला व अपत्य स्नेहाने त्यालाच आपला पुत्र मानले ॥३२-३३॥
तस्यांशुमतो
दिलीपः पुत्रोऽभवत् ॥ ३४ ॥ दिलीपस्य भगीरथः
योऽसौ गङ्गां स्वर्गादिहानीय भगीरथीसंज्ञां चकार ॥ ३५ ॥
त्या अंशुमानला दिलीप
नामक पुत्र झाला आणि दिलीपला भगीरथ झाला ज्याने
गंगेला स्वर्गातून पृथ्वीवर आणून तिचे नाव भागीरथी केले ॥३४-३५॥
भगीरथात्सुहोत्रः सुहोत्राच्छुतः, तस्यापि नाभागः ततोऽम्बरीषः तत्पुत्रःसिन्धुद्वीपः सिन्धुद्वीपादयुतायुः ॥३६॥ तत्पुत्रश्च ऋतुपर्णः योऽसौ नलसहायोऽक्षहृदयज्ञोऽभूत् ॥३७॥
भगीरथला सुहोत्र, सुहोत्रला श्रुति,
श्रुतिला नाभाग, नाभागला अम्बरीष, अम्बरीषला सिन्धुद्वीप, सिन्धुद्विपला अयुतायु
आणि अयुतायुला ऋतुपर्ण नामक पुत्र झाला जो राजा नलचा सहायक आणि द्युतक्रीडेतील
पारदर्शीं होता ॥३६-३७॥
ऋतुपर्णपुत्रःसर्वकामः॥३८॥ तत्तनयःसुदासः ॥३९॥ सुदासात्सौदासो मित्रसहनामा ॥४०॥
ऋतुपर्णचा पुत्र सर्वकाम होता, त्याचा सुदास
आणि सुदासचा पुत्र सौदास मित्रसह झाला ॥३८-४०॥
स चाटव्यां मृगयार्थो पर्यटन् व्याघ्रद्वयमपश्यत् ॥ ४१ ॥
एके दिवशी मृगयेसाठी वनात फिरताना त्याला
दोन वाघ दिसले ॥४१॥
ताभ्यां तद्वनमपमृगं कृतं मत्वैकं तयोर्बाणेन जघान ॥ ४२ ॥
त्यांनी सम्पूर्ण वन मृगहीन केले असे वाटून
त्याने त्यातील एकाला बाणाने मारून टाकले ४२॥
म्रियमाणश्चासावतिभीषणाकृतिरतिकरालवदनो
राक्षसोऽभूत् ॥ ४३ ॥
मरते वेळी तो अति भयंकररूप क्रूरवदन राक्षस
बनला ॥४३॥
द्वितीयोऽपि
प्रतिक्रियां ते करिष्यामीत्युक्त्वान्तर्धानं जगाम ॥ ४४ ॥
आणि दुसरा सुद्धा मी ह्याचा बदला घेईन असे
म्हणून अन्तर्धान पावला ॥४४॥
कालेन
गच्छता सौदासो यज्ञमयजत् ॥ ४५ ॥
कालान्तराने सौदासने एक यज्ञ केला ॥४५॥
परिनिष्ठितयज्ञे आचार्ये वसिष्ठे निष्क्रान्ते तद्रक्षो वसिष्ठरूपमास्थाय यज्ञावसाने
मम नरमांसभोजनं देयमिति तत्संस्क्रियतां क्षणादागमिष्यामीत्युक्त्वा निष्क्रान्तः ॥
४६ ॥
यज्ञ समाप्त झाल्यावर जेव्हा आचार्य वसिष्ठ
बाहेर गेले तेव्हा तो राक्षस वसिष्ठांचे रूप घेऊन म्हणाला, 'यज्ञ पूर्ण झाल्यावर
मला नर मांसयुक्त भोजन हवे, म्हणून तु तसे अन्न तयार करायला सांग, मी आत्ता येतो’
असे म्हणून तो बाहेर गेला ॥४६॥
भूयश्च सूदवेषं कृत्वा राजाज्ञया मानुषं मांसं संस्कृत्य
राज्ञे न्यवेदयत् ॥ ४७ ॥
मग स्वयंपाकगृहात आचार्याच्या वेषात
राजाच्या आज्ञेने मनुष्याचे मांस शिजवून ते राजाला दिले ॥४७॥
असावपि हिरण्यपात्रे मांसमादाय
वसिष्ठागमनप्रतीक्षकोऽभवत् ॥ ४८ ॥ आगताय वसिष्ठाय निवेदितवान्
॥ ४९ ॥
राजा सुद्धा ते मांस सुवर्णपात्रात ठेऊन
वसिष्ठांची प्रतीक्षा करू लागला आणि ते येताच त्यांना ते मांस दिले ॥४८-४९॥
स चाप्यचिन्तयदहो अस्य राज्ञो दौःशील्यं येनैतन्मांसमस्माकं प्रयच्छति किमेतद्द्रव्यजातमिति
ध्यानपरोऽभवत् ॥ ५० ॥
वसिष्ठांनी विचार केला, 'अरेच्चा! ह्या
राजाची कुटिलता तरी पहा मुद्दाम मला हे मांस खायला देत आहे.' मग हे मांस कोणाचं म्हणून कळण्यासाठी ते
ध्यानस्थ झाले ॥५०॥
अपश्यच्च तन्मांसंमानुषम् ॥५१॥ अतः क्रोधकलुषीकृतचेता
राजनि सापमुत्ससर्ज ॥५२॥
ध्यानावस्थेत त्यांनी पाहिले की हे नरमांस
आहे. तेव्हा क्रोधाने
क्षुब्धचित्त होऊन त्यांनी राजाला शाप दिला ॥५१-५२॥
यस्मादभोज्यमेतदस्मद्विधानां तपस्विनामवगच्छन्नपि
भवान्मह्यं ददाति तस्मात्तवैवात्र लोलुपता भविष्यतीति ॥ ५३ ॥
‘माझ्यासारख्या तपस्व्याला तू जाणूनबुजून
अत्यन्त अभक्ष्य असे हे नरमांस खायला दिलेस म्हणून तुझी देखील ह्यातच लोलुपता असेल
(अर्थात तू राक्षस होशील) ॥५३॥
अनन्तरं च तेनापि भगवतैवाभिहितोस्मीत्युक्ते किं किं मयाभहितमिति मुनिः पुनरपि समाधौ
तस्थौ ॥ ५४ ॥
त्यानन्तर राजाने म्हटले 'भगवान आपणच तर तशी
आज्ञा केलेलीत, त्यावर वसिष्ठ असे म्हणून की' काय मीच असे सांगितलेले?' परत
समाधिस्थ झाले ॥५४॥
समाधिविज्ञानावगतार्थश्चानुग्रहं
तस्मै चकार नात्यन्तिकमेतद्द्वादशाब्दं तव भोजनं भविष्यतीति ॥ ५५ ॥
समाधिद्वारा यथार्थ गोष्ट जाणून त्यांनी
राजावर अनुग्रह करत म्हटले, ‘तु अधिक दिवस नरमांस भोजन करणार नाहीस, केवळ बारा
वर्षच तुला असे करावे लागेल’ ॥५५॥
असावपि प्रतिगृह्योदकाञ्जलिं मुनिशापप्रदानायोद्यतो भगवन्नयमस्मद्गुरुर्नार्हस्येनं
कुलदेवताभूतमाचार्यं शप्तुमिति मदयन्त्या स्वपत्न्या प्रसादितःसस्याम्बुदरक्षणार्थं
तच्छापाम्बु नोर्व्यां न चाकाशे चिक्षेप किं तु तेनैव स्वपदौ सिषेच ॥ ५६ ॥
वसिष्ठांनी असे म्हटल्यावर राजा सौदास देखील
आपल्या ओंजळीत जल घेऊन मुनीश्वरांना शाप द्यायला उद्यत झाला. परंतु आपली पत्नी मदयन्तीद्वारा 'भगवान! हे
आपले कुलगुरु आहेत, ह्या कुलदेवरूप आचार्यांना शाप देणं उचित नाही”
असे सांगितल्यावरून शान्त झाला आणि अन्न व मेघांचे रक्षण करण्यासाठी ते शाप - जल
पृथ्वी किंवा आकाशात न फेकता त्या जलाने आपलेच पाय भिजवले ॥५६॥
तेन च क्वोधाश्रितेनाम्बुना दग्धच्छायौ तत्पादौ कल्माषतामुपगतौ ततःस कल्माषपादसंज्ञामवाप
॥ ५७ ॥
त्या क्रोधयुक्त जलामुळे त्याचे पाय
भाजल्याने कल्माषवर्ण झाले.
तेव्हापासून त्याचे नाव कल्पाषपाद झाले ॥५७॥
वसिष्ठशापाच्च षष्ठे षष्ठे काले राक्षसस्वभावमेत्याटव्यां पर्यटन्ननेकशो मानुषानभक्षयत्
॥ ५८ ॥
तसेच वसिष्ठांच्या शापाच्या प्रभावामुळे
सहाव्या काळात म्हणजेच तिसर्या दिवसाच्या अंतिम भागात तो राक्षस स्वभाव धारण करून
वनात फिरून अनेक माणसांना खाऊ लागला ॥५८॥
एकदा तु कञ्चिन्मुनिमृतुकाले
भार्यासङ्गतं ददर्श ॥ ५९ ॥
एके दिवशी त्याने एका मुनीश्वराला ऋतुकाळी
आपल्या भार्येसोबत संग करत असता पाहिले ॥५९॥
तयोश्च
तमतिभीषणं राक्षसस्वरूपमवलोक्य त्रासाद्दम्पत्योः प्रधावितयोर्ब्रह्मणं जग्रह ॥ ६०
॥
ते अति भीषण राक्षसरुप पाहून धावत असलेल्या
त्या दम्पतितील ब्राह्मणाला त्याने पकडले ॥६०॥
ततःसा
ब्रह्मणी बहुशस्तमभियाचितवती ॥ ६१ ॥ प्रसीदेक्ष्वाकुकुलतिलकभूतस्त्वं
महाराजो मियत्रसहो न राक्षसः ॥ ६२ ॥
तेव्हा ब्राह्मणीने त्याची नाना प्रकारे
प्रार्थना करून म्हटले- " हे राजन्! प्रसन्न व्हा! आपण राक्षस नाही तर
इक्ष्वाकु कुलतिलक महाराज मित्रसह आहात ॥६१-६२॥
नार्हसि
स्त्रीधर्मसुखाभिज्ञो मय्यकृतार्थायामस्मद्भर्तारं हन्तुमित्येवं बहुप्रकारं विलपन्त्यां
व्याघ्रः पशुमिवारण्येऽभिमतं तं ब्राह्मणमभक्षयत् ॥ ६३ ॥
आपण स्त्री-संयोगाचे सुख जाणणारे आहात; मी
अतृप्त आहे, माझ्या पतीला मारणे तुमच्या साठी उचित नाही.'
अशा प्रकारे तिने नाना प्रकारे विलाप केल्यावरही त्याने त्या ब्राह्मणाचे असे
भक्षण केले जसे वाघ आपल्या आवडीच्या
पशुला वनात पकडून खाऊन टाकतो ॥६३॥
ततश्चातिकोपसमन्विता ब्राह्मणी तं राजानं शशाप ॥ ६४
॥ यस्मादेवं मय्यतृप्तायां त्वयायं मत्पतिर्भक्षितः तस्मात्त्वमपि कामोपभोगप्रवृत्तोऽन्तं
प्राप्स्यसीति ॥ ६५ ॥
तेव्हा ब्राह्मणीने अत्यन्त क्रोधित होऊन
राजाला शाप दिला - 'अरे! तु मी अतृत्प असतानाही अशाप्रकारे माझ्या पतिला खाऊन
टाकलेस, म्हणून कामोपभोगात प्रवृत्त होताच तुझा अन्त होईल' ॥६४-६५॥
शप्त्वा चैव साग्निं प्रविवेश
॥ ६६ ॥
असा शाप देऊन ती अग्नीत प्रविष्ट झाली ॥६६॥
ततस्तस्य
द्वादशाब्दपर्यये विमुक्तशापस्य स्त्रीविषयाभिलाषिणो मदयन्ती तं स्मारयामास ॥ ६७ ॥
त्यानन्तर बारा वर्षांनी शापमुक्त झाल्यावर
एक दिवस विषय कामनेने प्रवृत्त झाला असता राणी
मदयन्तीने त्याला ब्राह्मणीच्या शापाचे स्मरण करून दिले ॥६७॥
ततः
परमसौ स्त्रीभोगं तत्याज ॥ ६८ ॥
तेव्हापासून राजाने स्त्री सम्भोगाचा त्याग
केला ॥६८॥
वसिष्ठश्चापुत्रेण राज्ञा
पुत्रार्थमभ्यर्थितो मदयन्त्यां गर्भाधानं चकार ॥ ६९ ॥
नंतर पुत्रहीन राजाच्या सांगण्यावरून
वसिष्ठांनी मदयन्तीचे गर्भाधान केले ॥६९॥
यदा च सप्तवर्षाण्यसौ गर्भेण जज्ञे ततस्तं गर्भमश्मना सा देवी जघान ॥ ७० ॥
जेव्हा तो गर्भ सात वर्ष होऊन गेल्यावरही
जन्मला नाही तेव्हा देवी मदयन्तीने त्याच्यावर दगडाने प्रहार केला ॥७०॥
पुत्रश्चाजायत ॥ ७१ ॥ तस्य चाश्मक इत्येव नामाभवत्
॥ ७२ ॥
त्यामुळे त्याचवेळी पुत्र उप्तन्न झाला व
त्याचे नाव अश्मक ठेवले ॥७१-७२॥
अश्मस्य
मूलको नाम पुत्रोऽभवत् ॥ ७३ ॥
अश्मकला मुलक नावाचा पुत्र झाला ॥७३॥
योसौ
निःक्षत्रे क्ष्मातलेऽस्मिन् क्रियमाणे स्त्रीभिर्विवस्त्रभिः परिवार्य रक्षितस्ततस्तं
नारीकवचमुदाहरन्ति ॥ ७४ ॥
जेव्हा परशुराम पृथ्वी क्षत्रियहीन करत होता
तेव्हा त्याला (मुलक) घेरून वस्त्रहीन स्त्रियांनी त्याची रक्षा केली होती, म्हणून
त्याला नारीकवच असेही म्हणतात ॥७४॥
मूलकाद्दशरथस्तस्मादिलिविलस्ततश्च
विश्वसहः ॥ ७५ ॥ तस्माच्च खट्वाङ्गो योऽसौ देवासुरसङ्ग्रामे देवैरभ्यर्थितोऽसुराञ्जघान
॥ ७६ ॥
मूलकला दशरथ, दशरथला इलिविक, इलिविलला
विश्वसह आणि विश्वसहला खट्वांग नावाचा पुत्र झाला, ज्याने देवासुरसंग्रामात
देवतांनी विनंती केल्यावर दैत्यांचा वध केला होता ॥७५-७६॥
स्वर्गे च कृतप्रियैर्देवैर्वरग्रहणाय चोदितः प्राह ॥ ७७ ॥
अशा प्रकारे स्वर्गात देवतांचे प्रिय
केल्याने त्यांनी वर मागण्यासाठी त्याला प्रेरित केल्यावर तो म्हणाला - ॥७७॥
यद्यवश्यं वरो ग्राह्यस्तन्ममायुः कथ्यतामिति ॥ ७८
॥
"जर मला वर ग्रहण करावाच लागेल तर मला
माझी आयु सांगा " ॥७८॥
अनन्तरं च तैरुक्तं एकमुहूर्तप्रमाणं तवायुरित्युक्तोऽथाःस्खलितगतिना विमानेन लघिमगुणो
मर्त्यलोकमागम्येदमाह ॥ ७९ ॥
तेव्हा देवतांनी असे सांगितले की तुझे
आयुष्य आणखी केवळ एक मुहूर्तच उरले आहे. तेव्हा (देवतांनी दिलेल्या) एक
अनारुद्धगति विमानात बसून तो शीघ्रतेने मर्त्यलोकी आला आणि म्हणाला - ॥७९॥
यथा न ब्राह्मणेभ्यः सकाशादात्मापि
मे प्रियतरो न च स्व धर्मोल्लङ्घनं मया कदाचिदप्यनुष्ठितं न च सकलदेवमानुषपशुपक्षिवृक्षादिकेषु
अच्युतव्यतिरेकवती दृष्टिर्ममाभूत् तथा तमेवं मुनिजनानुस्मृतं भगवन्तमस्खलितगतिः प्रापयेयमित्यशेषदेवगुरौ
भगवत्यनिर्देश्यवपुषि सत्तामात्रात्मन्यात्मानं परमात्मनि वासुदेवाख्ये युयोज तत्रैव
च लयमवाप ॥ ८० ॥
'जर मला ब्राह्मणांपेक्षा माझा आत्मा सुद्धा
जास्त प्रिय नसेल, जर मी कधीच स्वधर्माचे उल्लघंन केले नसेल आणि समस्त देव,
मनुष्य, पशु, पक्षी आणि वृक्षादिंमध्ये श्रीअच्युता अतिरिक्त माझी अन्य दृष्टि
झालेली नसेल तर मी निर्विघ्नतापूर्वक त्या मुनिजन नन्दित प्रभुला प्राप्त व्हावे.' असे म्हणून राजा खट्वांगने समस्त
देवतांचे गुरु, अकथनीयस्वरूप, सत्तामात्रशरीर, परमात्मा भगवान वासुदेवात आपले
चित्त एकाग्र केले आणि त्याच्यातच तो लीन झाला ॥८०॥
अत्रापि श्रूयते श्लोको गीतःसप्तर्षिभिः पुरा ।
खट्वाङ्गेन समो नान्यः कश्चिदुर्व्यां भविष्यति ॥ ८१ ॥
येन स्वर्गादिहागम्य मुहूर्तं प्राप्य जीवितम् ।
त्रयोऽभिसंहिता लोका बुद्ध्या सत्येन चैव हि ॥ ८२ ॥
ह्या विषयी सुद्धा पूर्वकाळी
सप्तर्षिंद्वारा सांगितलेला एक श्लोक आहे.
“खट्वांगा समान पृथिवीतलावर अन्य कोणीही राजा होणार नाही, ज्याने केवळ एक
मूहूर्तमात्र आयुष्य राहिले असता स्वर्गलोकातून भुमण्डलावर येऊन आपल्या
बुद्धिद्वारा तीन्ही लोकांना सत्यस्वरूप भगवान वासुदेवमय असलेले पाहिले "
॥८१-८२॥
खट्वाङ्गाद्दीर्घबाहुः पुत्रोऽभवत् ॥ ८३ ॥ ततो रघुरभवत्
॥ ८४ ॥ तस्मादप्यजः ॥ ८५ ॥ अजाद्दशरथः ॥ ८६
॥
खट्वांगला दीर्घबाहु नामक पुत्र झाला. त्याला रघु, रघुला अज आणि अजने दशरथाला
जन्म दिला ॥८३-८६॥
तस्यापि भगवानब्जनाभो जगतः स्थित्यर्थमात्मांशेन रामलक्ष्मणभरतशत्रुघ्नरूपेण चतुर्धा
पुत्रत्वमायासीत् ॥ ८७ ॥
दशरथाला जगताच्या स्थितिसाठी भगवान
कमलनाभाच्या अंशापासून राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न ह्या चार रूपात पुत्र
प्राप्त झाले ॥८७॥
रामोपि बाल एव विश्वमित्रयागरक्षणाय गच्छंस्ताटकां जघान ॥ ८८ ॥ यज्ञे च मारीचमिषुवाताहतं समुद्रे चिक्षेप ॥ ८९ ॥ सुबाहुप्रमुखांश्च क्षयमनयत् ॥ ९० ॥
रामाने बाल्यवस्थेतच विश्वामित्रांच्या
यज्ञरक्षेसाठी जाताना मार्गातच ताटका राक्षसीला मारले, मग यज्ञशाळेत जाऊन मारीचला
बाणरूपी वायुने जखमी करून समुद्रात फेकून दिले आणि सुबाहु आदि राक्षसांचा नाश केला
॥८८-९०॥
दर्शनमात्रेणाहल्यामपापां चकार ॥ ९१ ॥ जनकगृहे च माहेश्वरं चापमनायासेन बभञ्ज ॥ ९२ ॥ सीतामयोनिजां जनकराजतनयां वीर्यशुल्कां लेभे ॥ ९३ ॥
त्याने आपल्या केवळ दर्शनाने अहिल्येला
निष्पाप केले, जनकाच्या राजभवनात अगदी सहजपणे महादेवाचे धनुष्य तोडले आणि
पुरुषार्थानेच प्राप्त होणारी अयोनिजा जनक राजनन्दिनी सीतेला पत्नीरूपात प्राप्त
केले ॥९१-९३॥
सकलक्षत्रियक्षयकारिणं अशेषहैहयकुलधूमकेतुभूतं च परशुराममपास्तवीर्यबलावलेपं चकार ॥
९४ ॥
आणि त्यानन्तर सम्पूर्ण क्षत्रियांना नष्ट
करणार्या, समस्त हैहयकुलासाठी अग्निस्वरूप परशुरामाच्या बलवीर्याचा गर्व नष्ट
केला ॥९४॥
पितृवचनाच्चागणितराज्याभिलाषो भ्रातृभार्यासमेतो वनं प्रविवेश ॥ ९५ ॥
मग पित्याच्या वचनाचे पालन करण्यासाठी
राज्यलक्ष्मीचा त्याग करून भाऊ लक्ष्मण आणि धर्मपत्नी सीतेसोबत वनात गेला ॥९५॥
विराधखरदूषणादीन्
कबन्धवालिनौ च निजघान ॥ ९६ ॥ बद्धा चाम्भोनिधिमशेष
राक्षसकुलक्षयं कृत्वा दशाननापहृतां भार्यं तद्वधादपहृतकलङ्कामपि अनलप्रवेश शुद्धामशेषदेवसङ्घैः
स्तूयमानशीलां जनकराजकन्यामयोध्यामानिन्ये ॥ ९७ ॥
तिथे विराध, खर दूषण आदि राक्षस तथा कबन्ध
आणि वालिचा वध केला आणि समुद्रावर पुल बांधून सम्पूर्ण राक्षसकुळाचा विध्वंस केला.
रावणद्वारा हरण झालेली आणि त्याच्या वधाने कलंकहीन झाल्यावरही अग्नि-प्रवेशाने
शुद्ध झालेली व समस्त देवगणांकडून प्रशंसित झालेली आपली भार्या जनक राजकन्या
सीतेला अयोध्येत घेऊन आला ९६-९७॥
ततश्चाभिषेकमङ्गलं मैत्रेय वर्षशतेनापि वक्तुं न शक्यते संक्षेपेण श्रूयताम् ॥ ९८
॥
हे मैत्रेया ! त्यावेळी त्याचा जो मंगल
राज्यभिषेक झाला त्याचे पुढील शंभर वर्षातही
वर्णन केले जाऊ शकत नाही; तरीही संक्षेपात ऐक ॥९८॥
लक्ष्मणभरतशत्रुघ्न विभीषणसुग्रीवाङ्गदजाम्बवद् हनुमत्प्रभृतिभिः समुत्फुल्ल वदनै
श्छत्रचामरादियुतैः सेव्यमानो दाशरथिर्ब्रह्मेन्द्राग्नि यमनिर्ऋतिवरुणवायु कुबेर ईशान
प्रभृतिभिः सर्वामरैः वसिष्ठवामदेववाल्मीकि मार्कण्डेय विश्वामित्र भरद्वाज अगस्तय
प्रभृतिभिः मुनिवरैः ऋग्यजुसामाथर्वभिः संस्तूयमानो नृत्यगीत वाद्यादि अखिललोक मङ्गलवाद्यैः
वीणावेणुमृदङ्गभेरीपटह शङ्खकाहल गोमुख प्रभृतिभिः सुनादैः समस्त भूभृतां मध्ये सकललोकरक्षार्थं
यथोचितमभिषिक्तो दाशरथिः कोसलेन्द्रो रघुकुल तिलको जानकीप्रियो भ्रातृत्रयप्रियः सिंहासनगत
एकादशाब्दसहस्रं राज्यमकरोत् ॥९९॥
दशरथ नन्दन श्रीरामचंद्र प्रसन्नवदन
लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न, विभीषण, सुग्रीव, अंगद जाम्बवान आणि हनुमान आदिंकडून
छत्र-चामरादिद्वारा सेवित होऊन , ब्रह्मा, इन्द्र, अग्नि, यम, निऋति, वरुण, वायु,
कुबेर आणि ईशान आदि सम्पूर्ण देवगण, वसिष्ठ, वामदेव, वाल्मीकि, मार्कण्डेय,
विश्वामित्र, भरद्वाज आणि अगस्त्य आदि मुनिजन तसेच ऋक् यजुः साम आणि
अथर्ववेदांकडून स्तुति केली जात असताना तसेच नृत्य, गीत वाद्य आदि सम्पूर्ण मंगल
सामग्रिसहित वीणा, वेणु, मृदंग, भेरी पटह शंख, काहल आणि गोमुख आदिंच्या घोषासहीत
समस्त राजांच्या मध्ये सम्पूर्ण लोकांच्या रक्षेसाठी विधिपूर्वक अभिषिक्त झाले. अशा प्रकारे दशरथकुमार कोसलाधिपति,
रघुकुलतिलक, जानकीवल्लभ, तीनही भ्रातांचे प्रिय असलेल्या श्रीरामचन्द्राने
सिंहासनारुढ़ होऊन अकरा हजार वर्ष राज्यशासन केले ॥९९॥
भरतोऽपि गन्धर्वविषयसाधनाय गच्छन् सङ्ग्रामे गन्धर्वकोटीस्तिस्त्रो जघान ॥१००॥
शत्रुघ्नेनाप्यमितबलपराक्रमो
मधुपुत्रो लवणो नाम राभसो निहातो मथुरा च निवेशिता ॥ १०१ ॥
भरतानेसुद्धा गन्धर्वलोक जिंकायला जाऊन युद्धात
तीन करोड़ गन्धर्वांचा वध केला आणि शत्रुघ्नानेसुद्धा अतुलित बलशाली महापराक्रमी
मधूपुत्र लवण राक्षसाचा संहार करून मथुरा नामक नगरीची स्थापना केली ॥१००-१०१॥
इत्येवमाद्यतिबलपराक्रमविक्रमणैः अतिदुष्टसंहारिणोऽशेषस्य जगतो निष्पादितस्थितयो रामलक्षमण
भरतशत्रुघ्नाः पुनरपि दिवमारूढाः ॥ १०२ ॥
अशा प्रकारे आपल्या बलपराक्रमाने महान
दुष्टांचा नाश करणारे भगवान राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न सम्पूर्ण जगाची यशोचित
व्यवस्था केल्यावर परत स्वर्गलोकी गेले ॥१०२॥
येऽपि तेषु भगवदंशेष्वनुरागिणः
कोसलनगरजानपदास्तेऽपि तन्मनसस्तत्सालोक्यतामवापुः ॥ १०३ ॥
त्यांच्या सोबतच जे अयोध्यानिवासी त्या
भगवदंशस्वरूपांचे अनुरागी होते त्यांनासुद्धा तन्मय झाल्या कारणाने सालोक्य मुक्ति
प्राप्त झाली ॥१०३॥
अतिदुष्टसंहारिणो रामस्य कुशलवो द्वौ पुत्रौ लक्ष्मणस्य अङ्गदचन्द्रकेतू तक्षपुष्कलौ
भरतस्य सुबाहुशुरसेनौ शत्रुघ्नस्य ॥ १०४ ॥
दुष्टांचा नाश करणार्या भगवान रामाला कुश
आणि लव नामक दोन पुत्र झाले.
तसेच लक्ष्मणाला अंगद आणि चन्द्रकेतु, भरताला तक्ष आणि पुष्कल तसेच शत्रुघ्नाला
सुबाहु आणि शुरसेन नामक पुत्र झाले ॥१०४॥
कुशस्यातिथिरतिथेरपि
निषधः पुत्रोऽभूत् ॥ १०५ ॥ निषधस्याप्यनलस्तस्मादपि
नभाः नभसः पुण्डरीकस्तत्तनयः क्षेमधन्वा तस्य च देवानीकस्तस्याप्यहीनकोऽहीनकस्यापि
रुरुस्तस्य च पारियात्रकः पारियात्रकाद्देवलो देवलाद्वच्चलः तस्याप्युत्कः उत्काच्च
वज्रनाभः तस्माच्छङ्खणः तमाद्युषिताश्वस्ततश्च विश्वसहो जज्ञे ॥ १०६ ॥
कुशला, अतिथि, अतिथिला निषध, निषधला अनल,
अनलला नभ, नभला पुण्डरीक, पुण्डरीकला क्षेमधन्वा, क्षेमधन्वाला देवानीक, देवानीकला
अहीनक, अहीनकला रुरु, रुरुला पारियात्रक, पारियात्रकला देवल, देवलला वच्चल,
वच्चलला उत्क, उत्कला वज्रनाभ, वज्रनाभला शंखण, शंखणला युषिताश्च आणि युषिताश्वला
विश्वसह नामक पुत्र झाला ॥१०५-१०६॥
तस्माद्धिरण्यनाभः यो महायोगीश्वराज्जैमिनेः शिष्याद्याज्ञवल्क्याद्योगमवाप ॥ १०७॥
हिरण्यनाभस्य पुत्रः पुष्यस्तस्माद् ध्रुवसन्धिस्ततःसुदर्शनः तस्मादग्निवर्णस्ततः शीघ्रगस्तस्मादपि
मरुः पुत्रोऽभवत् ॥१०८॥ योऽसौ योगमास्थायाद्यापि
कलापग्राममाश्रित्य तिष्ठति ॥ १०९ ॥
विश्वसहला हिरण्यनाभ नामक पुत्र झाला ज्याने
जैमिनिचा शिष्य महायोगीश्वर याज्ञवल्क्या कडून योगविद्या प्राप्त केली होती . हिरण्यनाभचा पुत्र पुष्य होता, त्याचा ध्रुवसन्धि,
ध्रुवसन्धिचा सुदर्शन, सुदर्शनचा अग्निवर्ण , अग्निवर्णचा शीघ्रग तसेच शीघ्रगचा
पुत्र मरु होता जो आजही योगाभ्यासात तत्पर असून कलापग्रामात स्थित आहे ॥१०७-१०९॥
आगामियुगे
सूर्यवंशक्षत्रप्रवर्तयिता भविष्यति ॥ ११० ॥
आगामी युगात हा सूर्यवंशीय क्षत्रियांचा
प्रवर्त्तक होणार ॥११०॥
तस्यात्मजः प्रसुश्रुतस्तस्यापि सुसन्धिस्ततश्चाप्यमर्षस्तस्य च सहस्वांस्ततश्च विश्वभवः
॥१११॥ तस्य बृहद्बलः योऽर्जुनतनयेनाभिमन्युनाभारतयुद्धे क्षयमनीयत ॥ ११२ ॥
मरुचा पुत्र प्रसुश्रुत, प्रसुश्रुतचा
सुसन्धि, सुसन्धिचा अमर्ष, अमर्षचा सहस्वान्, सहस्वानचा विश्वभव तसेच विश्वभवचा
पुत्र बृहद्वल झाला ज्याला भारतीय युद्धात अर्जुनाचा पुत्र अभिमन्युने मारले होते
॥१११-११२॥
एते इक्ष्वाकुभूपालाः प्राधान्येन मयेरिताः । एतेषां
चरितं शृण्वन् सर्वपापैः प्रमुच्यते ॥ ११३ ॥
अशा प्रकारे मी ह्या इक्ष्वाकुकुलाच्या
प्रधान-प्रधान राजांचे वर्णन केले.
त्यांचे चरित्र ऐकल्याने मनुष्य सकल पापांपासून मुक्त होतो ॥११३॥
इति श्रीविष्णुमहापुराणे चतुर्थे अंशे चतुर्थोऽध्यायः (४)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा