सोमवार, १ जून, २०२६

विष्णुपुराण, चतुर्थ अंश, तृतीय अध्याय | Vishnu Puran, Ansh 4 , Adhyay 3

  विष्णुपुराणम्

चतुर्थ: अंशः तृतीयोऽध्यायः

 

"मान्धाताची सन्तति, त्रिशंकुचे स्वर्गारोहण तथा सगराची उप्तत्ति आणि विजय"



पराशर उवाच
अतश्च मान्धातुः पुत्रसन्ततिरभिधीयते ॥ १ ॥

श्रीपराशर म्हणाले;- आता मी मान्धाताच्या पुत्रांच्या संततिचे वर्णन करतो ॥१॥


 अम्बरीषस्य मान्धातृतनयस्य युवनाश्वः पुत्रोऽभूत् ॥ २ ॥

मान्धाताचा पुत्र अम्बरीष ह्याला युवनाश्च नामक पुत्र झाला ॥२॥


 तस्माद्धारीतः यतोऽङ्‌‍गिरसो हारीताः ॥ ३ ॥

त्याच्यापासून हारीत झाला ज्याच्यापासून अंगिरा-गोत्रीय हरीतगण झाले ॥३॥


रसातले मौनेया नाम गन्धर्वा बभूवुःषट्कोटिसंख्यातास्तैरशेषाणि नागकुलान्यपहृतप्रधानरत्‍नाधिपत्यान्यक्रियन्त ॥ ४ ॥

पूर्वकाळी रसातळात मौनेय नामक सहा करोड़ गन्धर्व रहात असत. त्यांनी समस्त नागकुळांचे प्रधान प्रधान रत्न आणि अधिकार बळकावले ॥४॥


तैश्च गन्धर्ववीर्यावधूतैरुरगेश्वरैः स्तूयमानो भगवानशेषदेवेशः स्तवच्छ्रवणोन्मीलितोन्निद्रपुण्डरीकनयनो जलशयनो निद्रावसानात् प्रबुद्धः प्रणिपत्याभिहितः । भगवन्नस्माकमेतेभ्यो गन्धर्वेभ्यो भयमुत्पन्नं कथमुपशममेष्यतीति ॥ ५ ॥

गन्धर्वांच्या पराक्रमाने अपमानित झालेल्या नागेश्वरांनी केलेली स्तुति श्रवण केल्याने ज्यांचे विकसित कमळासमान नेत्र निद्रेनंतर उघडले त्या जागे झालेल्या जलशायी भगवान सर्वदेवेश्वरांना प्रणाम करून नागगणाने त्यांना म्हटले, भगवान ! ह्या गन्धर्वांपासून आम्हाला उप्तन्न झालेले भय कशा प्रकारे शान्त होईल ? " ॥५॥


 आह च भगवाननादिनिधनपुरुषोत्तमो योऽसौ यौवनाश्वस्य मान्धातुः पुरुकुत्सनामा पुत्रस्तमहामनुप्रविश्य तानशेषान् दुष्टगन्धर्वानुपशमं नयिष्यामीति ॥ ६ ॥

तेव्हा आदि अन्तरहित भगवान पुरुषोत्तम म्हणाले - ' युवनाश्वचा पुत्र मान्धाताचा जो पुरुकुत्स नामक पुत्र आहे त्याच्यात प्रविष्ट होऊन मी त्या सर्व दुष्ट गन्धर्वांचा नाश करेन ॥६॥


तदाकर्ण्य भगवते जलशायिने कृतप्रणामाः पुनर्नागलोकमागताः पन्नगाधिपतयो नर्मदां च पुरुकुत्सानयनाय चोदयामासुः ॥ ७ ॥

हे ऐकून भगवान जलशायींना प्रणाम करून समस्त नागाधिपतिगण नागलोकी परतले आणि पुरुकुत्सला आणण्यासाठी (आपली बहीण व पुरुकुत्सची भार्या) नर्मदा हीला प्रेरित केले ॥७॥


 सा चैनं रसातलं नीतवती ॥ ८ ॥

त्यानन्तर नर्मदा पुरुकुत्सला रसातळात घेऊन आली ॥८॥


 रसातलगतश्चासौ भगवत्तेजसाप्यायितात्मवीर्यःसकलगन्धर्वान्निजघान ॥ ९ ॥
 पुनश्च स्वपुरमाजगाम ॥ १० ॥

रसातळात येऊन पुरुकुत्सने भगवंताच्या तेजाने आपल्या शरीरबळाने समस्त गन्धर्वांना मारून टाकले व परत आपल्या नगरीत आला ॥९-१०॥


 सकलपन्नगाधिपतयश्च नर्मदायै वरं ददुः ।  यस्तेऽनुस्मरणसमवेतं नामग्रहणं करिष्यति न तस्य सर्पविषभयं भविष्यतीति ॥ ११ ॥

त्यावेळी समस्त नागराजांनी नर्मदेला वर दिला की जो कोणी तुझे स्मरण करून तुझे नाव घेईल त्याला सर्पविषाचे भय उरणार नाही ॥११॥


 अत्र च श्लोकः ॥ १२ ॥

ह्या विषयी हा श्लोक आहे ॥१२॥


 नर्मदायै नमः प्रातर्नर्मदायै नमो निशि ।
 नमोऽस्तु नर्मदे तुभ्यं त्राहि मां विषसर्पतः ॥ १३ ॥

‘नर्मदेला प्रात:काळी नमस्कार आणि रात्रीसमयी सुद्धा नर्मदेला नमस्कार. हे नर्मदे ! तुला वारंवार नमस्कार, तु माझी विषापासून आणि सर्पापासून रक्षा कर' ॥१३॥


इत्युच्चार्याहर्निशमन्धकारप्रवेशे वा सर्पैर्न दश्यते न चापि कृतानुस्मरणभुजो विषमपि भुक्तमुपघाताय भवति ॥ १४ ॥

ह्याचे उच्चरण करून दिवसा किंवा रात्री कोणत्याही वेळी काळोखात गेले असता सर्प दंश करत नाही तसेच ह्या श्लोकाचे स्मरण करून भोजन करणार्‍याला खाल्लेले विष घातक ठरत नाही ॥१४॥


 पुरुकुत्साय सन्ततिविच्छेदो न भविष्यतीत्युरगपतयो परं ददुः ॥ १५ ॥

पुरुकुत्सला नागपतिंनी वर दिला की तुझ्या संततिचा कधीच अन्त होणार नाही ॥१५॥

पुरुकुत्सो नर्मदायां त्रसद्दस्युमजीजनत् ॥ १६ ॥ त्रसद्दस्युतःसम्भूतोऽनरण्यः, यं रावणोदिग्विजये जघान ॥ १७ ॥

पुरुकुत्सने नर्मदेपासून त्रसद्दस्यु नामक पुत्र उत्पन्न केला ॥१६॥ त्रसद्दस्युला अनरण्य झाला, ज्याला दिग्विजयाचे समयी रावणाने मारून टाकले ॥१७॥


 अनरण्यस्य पृषटश्वः पृषदश्वस्य हर्यश्वः पुत्रोऽभवत् ॥ १८ ॥ तस्य च हस्तः पुत्रोऽभवत् ॥ १९ ॥  ततश्च सुमनास्तस्यापि त्रिधन्वा त्रिधन्वनस्त्रय्यारुणिः ॥ २० ॥ त्रय्यारुणेःसत्यव्रतः योऽसौ त्रिशङ्‍कुसंज्ञामवाप ॥ २१ ॥

अनरण्यला पृषदश्व, पृषदश्वला हर्यश्व, हर्यश्वला हस्त, हस्तला सुमना, सुमनाला त्रिधन्वा, त्रिधन्वाला त्रय्यारुणि और त्रय्यारुणिला सत्यव्रत नामक पुत्र झाला, जो नंतर त्रिशंकु म्हणून ओळखला गेला ॥१८-२१॥


स चण्डालतामुपगतश्च ॥ २२ ॥

हा त्रिशकुं चाण्डाळ झाला होता ।।२२॥


द्वादशवर्षिक्यामनावृष्ट्यां विश्वामित्रकलत्रापत्यपोषणार्थं चण्डालप्रतिग्रहपरिहरणाय च जाह्नवीतीरन्यग्रोधे मृगमांसमनुदिनं बबन्ध ॥ २३ ॥

एकेकाळी बारा वर्षांपर्यत अनावृष्टी होती . तेव्हा विश्वमित्र मुनिंच्या स्त्री-मुलांच्या पोषणार्थ तसेच आपल्या चाण्डाळतेपासून सूटका मिळवण्यासाठी तो गंगेच्या तटावर एका वट वृक्षावर दररोज जनावराचे मांस बांधून यायचा ॥२३॥



 स तु परितुष्टेन विश्वामित्रेण सशरीरःस्वर्गमारोपितः ॥ २४ ॥

ह्यावर प्रसन्न होऊन विश्वामित्रांनी त्याला सदेह स्वर्गात पाठवले ॥२४॥



 त्रिशङ्‍कोर्हरिश्चन्द्रस्तस्माच्च रोहिताश्वस्ततश्च हरितो हरितस्य चञ्चुश्चञ्चोर्विजयवसुदेवौ रुरुको विजयाद्‌रुकस्य वृकः ॥ २५ ॥

त्रिशंकुला हरिश्चन्द्र, हरिश्चन्द्रला रोहिताश्व, रोहिताश्वला हरित, हरितला चञ्चु, चञ्चुला विजय आणि वसुदेव, विजयला रुरुक आणि रुरुकपासून वृक ह्याचा जन्म झाला ॥२५॥


ततो वृकस्य बाहुः योऽसौ हैहयतालजङ्‍घादिभिः पराजितोऽन्तर्वत्‍न्या महिष्या सह वनं प्रविवेश ॥ २६ ॥

वृकला बाहु नामक पुत्र झाला जो हैहय आणि तालजंघ आदि क्षत्रियांकडून पराजित होऊन आपल्या गर्भवती पट्टराणीसोबत वनात निघून गेला ॥२६॥


तस्याश्च सपत्‍न्या गर्भस्तम्भनाय गरो दत्तः ॥ २७ ॥

पट्टराणीच्या सवतीने तिचा गर्भ रोखण्यासाठी तिला विष दिले ॥२७॥


 तेनास्य गर्भःसप्तवर्षाणि जठर एव तस्थौ ॥ २८ ॥

ज्याच्या प्रभावाने तिचा गर्भ सात वर्ष गर्भाशयातच राहीला ॥२८॥


स च बाहुर्वृद्धभावादौर्वाश्रमसमीपे ममार ॥ २९ ॥

शेवटी, बाहु वृद्धावस्थेमुळे और्व मुनिंच्या आश्रमाजवळ मृत्यु पावला ॥२९॥


सा तस्य भार्या चितां कृत्वा तमारोप्यानुमरणकृतनिश्चयाऽभूत् ॥ ३० ॥

तेव्हा त्याच्या पट्टराणीने चिता बनवून त्यावर पतिचे शव स्थापित केले व त्याच्यासोबत सती जायचा निश्चय केला ॥३०॥


अथैतामतीतानागतवर्तमानकालत्रयवेदी भगवानौर्वःस्वाश्रमान्निर्गत्याब्रवीत् ॥ ३१ ॥

त्याच वेळी भूत, भविष्यत आणि वर्तमान तीनही काळ जाणणार्‍या भगवान और्व ह्यांनी आपल्या आश्रमाबाहेर येऊन म्हटले - ॥३१॥

 


अलमलमनेनासद्‍ग्राहेणाखिलभूमण्डलपतिरतिवीर्यपराक्रमो नैकयज्ञकृदरातिपक्षक्षयकर्ता तवोदरे चक्रवर्ती तिष्ठति ॥ ३२ ॥

' साध्वि ! हा व्यर्थ दुराग्रह सोड ! तुझ्या उदरात सम्पूर्ण भूमण्डलाचा स्वामी, अत्यन्त बल पराक्रमशील, अनेक यज्ञांचे अनुष्ठान करणारा आणि शत्रुंचा नाश करणारा चक्रवर्ती राजा आहे ॥३२॥


नैवमतिसाहसाध्यवसायिनी भवती भवत्वित्युक्ता सा तस्मादनुमरणनिर्बन्धाद्विरराम ॥ ३३ ॥

तू असा दुस्साहसी उद्योग करू नकोस.' असे म्हटल्यावर तिने सति जाण्याचा हट्ट सोडून दिला ॥३३॥


 तेनैव च भगवता स्वाश्रममानीता ॥ ३४ ॥

आणि भगवान् और्व तिला आपल्या आश्रमात घेऊन गेले ॥३४॥


तत्र कतिपयदिनाभ्यन्तरे च सहैव तेन गरेणाति तेजस्वी बालको जज्ञे ॥ ३५ ॥

तिथे काही दिवसातच, तिच्या उदरातून गर (विष) सहीत एक अति तेजस्वी बालकाचा जन्म झाला ॥३५॥


 तस्यौर्वो जातकर्मादिक्रिया निष्पाद्य सगर इति नाम चकार ॥ ३६ ॥
 कृतोपनयनं चैनमौर्वो वेदशास्त्राण्यस्त्रं चाग्नेयं भार्गवाख्यमध्यापयामास ॥ ३७ ॥

भगवान और्वने त्याचे जातकर्म आदि संस्कार करून त्याचे नाव 'सगर' ठेवले तसेच त्याचा उपनयनसंस्कार झाल्यावर और्वानेच त्याला वेद, शास्त्र एवं भार्गव नामक आग्नेय शस्त्रांची शिक्षा दिली ॥३६-३७॥


उत्पन्नबुद्धिश्च मातरमब्रवीत् ॥ ३८ ॥

बुद्धिचा विकास झाल्यावर त्या बालकने आपल्या मातेला म्हटले - ॥३८॥

 अम्ब कथमत्र वयं क्व वा तातोऽस्माकमित्येवमादिपृच्छन्तं माता सर्वमेवावोचत् ॥ ३९ ॥

" माते ! मला सांग, ह्या तपोवनात आपण का राहतो आणि माझे पिता कुठे आहेत ? 'अशा प्रकारे अनेकदा विचारल्यावर त्याच्या मातेने त्याला सम्पूर्ण वृतान्त सांगितला ॥३९॥

 


 ततश्च पितृराज्यपहरणादमर्षितो हैहयतालजङ्‍घादिवधाय प्रतिज्ञामकरोत् ॥ ४० ॥

यशश्च हैहयतालजङ्‍घाञ्जघान ॥ ४१ ॥
तेव्हा आपल्या पित्याचे राज्यापहरण सहन न झाल्याने त्याने हैहय आणि तालजंघ आदि क्षत्रियांना मारून टाकायची प्रतिज्ञा केली आणि समस्त हैहय एवं तालजंघ वंशीय राजांना नष्ट केले ॥४०-४१॥


शकयवनकाम्बोजपारदपह्लवाः हन्यमानास्तत्कुलगुरुं वसिष्ठं शरणं जग्मुः ॥ ४२ ॥

त्यांच्या पश्चात शक, यवन, काम्बोज, पारद आणि पह्लवगण सुद्धा हताहत होऊन सगरचे कुलगुरु वसिष्ठ ह्यांना शरण गेले ॥४२॥


अथैनान्वसिष्ठो जीवनमृतकान् कृत्वा सगरमाह ॥ ४३ ॥ वत्सालमेभिर्जीवन्मृतकैरनुसृतैः ॥ ४४ ॥

वसिष्ठांनी त्यांना जीवन्मृत ( जीवंतपणी मेल्यासमान ) करून सगरला म्हटले - " बाळा ह्या जीवंतपणी मेलेल्यांचा पाठलाग करून काय लाभ ? ॥४३-४४॥


 एते च मयैव त्वत्प्रतिज्ञापरिपालनाय निजधर्मद्विजसङ्‍गपरित्यागं कारिताः ॥ ४५ ॥

बघ तुझी प्रतिज्ञा पूर्ण करण्यासाठी मी ह्यांना स्वधर्म आणि द्विजातिंच्या संसर्गापासून वंचित केले आहे" ॥४५॥



 तथेति तद्‍गुरुवचनभिनन्द्य तेषां वेषान्यत्वमकारयत् ॥ ४६ ॥

राजाने ‘जशी आज्ञा' म्हणून गुरुच्या म्हणण्याला अनुमोदन दिले आणि त्यांना वेष बदलायला लावला ॥४६॥


 यवनान्मुण्डितशिरसोऽर्धमुण्डिताञ्च्छकान् प्रलम्बकेशान् पारदान् पह्लवाञ्श्मश्रुधरान् निःस्वाध्यायवषट्कारानेतानन्यांश्च क्षत्रियांश्चकार ॥ ४७ ॥

त्याने यवनांच्या मस्तकाचे मुंडन केले, शकांना अर्द्धमुण्डित केले, पारदांचे लांब केस ठेवले, पल्हवांच्या दाढी मिशा ठेवल्या तसेच त्यांना व त्यांच्या सारख्या अन्यान्य क्षत्रियांनाही स्वध्याय आणि वषट्कार आदिंपासून बहिष्कृत केले ॥४७॥


एते चात्मधर्मपरित्यागाद्‍बाह्मणैः परित्यक्ता म्लेच्छतां ययुः ॥ ४८ ॥

आपला धर्म सोडून दिल्या कारणाने ब्राह्मणांनीही ह्या सर्वाचा परित्याग केला; म्हणून हे म्लेच्छ झाले ॥४८॥


सगरोपि स्वमधिष्ठानमागम्यास्खलितचक्रःसप्तद्वीपवतीमिमामुर्वीं प्रशशास ॥ ४९ ॥

त्यानन्तर महाराज सगर आपल्या राजधानीत येऊन अप्रतिहत सैन्याने युक्त होऊन सम्पूर्ण सप्तद्वीप पृथ्वीचे शासन करू लागला ॥४९॥


 इति श्रीविष्णुमहापुराणेचतुर्थे अंशे तृतीयोऽध्यायः (
)



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

विष्णुपुराण, चतुर्थ अंश, त्रयोदश अध्याय | Vishnu Puran, Ansh 4 , Adhyay 13

  ॥ विष्णुपुराणम् ॥ ॥ चतुर्थ: अंशः ॥ त्रयोदशो ऽध्यायः ॥   "सत्वतच्या सन्ततिचे वर्णन आणि स्यमन्तक मण्याची कथा" श्रीप...