॥ विष्णुपुराणम् ॥
॥ चतुर्थ: अंशः ॥ द्वितीयोऽध्यायः ॥
"इक्ष्वाकुच्या वंशजाचे वर्णन आणि सौभरिचरित्र"
श्रीपराशर उवाच
यावच्च ब्रह्मलोकात्स ककुद्मी रैवतो नाभ्येति तावत्पुण्यजनसंज्ञा राक्षसास्तामस्य पुरीं
कुशस्थलीं नजघ्नुः ॥ १ ॥
श्रीपराशर म्हणाले ;- ज्यावेळी रैवत ककुद्मी ब्रह्माकडून
परत आले नव्हते तेव्हा पुण्यजन नावाच्या राक्षसाने त्यांच्या कुशस्थली पुरीचा विध्वंस
केला ॥१॥
तच्चास्य भ्रातृशतं पुण्यजनत्रासाद्दिशो भेजे ॥ २ ॥
त्यांचे शंभर बंधू पुण्यजन राक्षसाच्या भितीने दाही दिशांना
धावून गेले ॥२॥
तदन्वयाश्च क्षत्रियाःसर्वदिक्ष्वभवन्
॥ ३ ॥
त्यांच्याच वंशात उप्तन्न झालेले क्षत्रियच समस्त दिशांना पसरले होते ॥३॥
धृष्टस्यापि
धार्ष्टकं क्षत्रमभवत् ॥ ४ ॥
धृष्टच्या वंशात धार्ष्टक नामक क्षत्रिय झाले ॥४॥
नाभागस्यात्मजो
नाभागसंज्ञोभवत् ॥ ५ ॥ तस्याप्यम्बरीषः ॥ ६ ॥
अम्बरीषस्यापि
विरूपोऽभवत् ॥ ७ ॥
विरूपात्पृषदश्वो जज्ञे ॥ ८ ॥
ततश्च
रथीतरः ॥ ९ ॥
नाभागला नाभाग नावाचाच पुत्र झाला, त्या
पुत्राला अम्बरीष आणि अम्बरीषला विरुप नावाचा पुत्र झाला,
विरुपापासून पृषदश्वचा जन्म झाला आणि त्याच्यापासून रथीतर झाला ॥५-९॥
आत्रायं
श्लोकः -
एते
क्षत्रप्रसूता वै पुनश्चाङ्गिरसाः स्मृता ।
रथीतराणां
प्रवराः क्षत्रोपेता द्विजातयः ॥ १० ॥
रथीतरच्या संबंधी हा श्लोक प्रसिद्ध आहे- 'रथीतर ह्याचे
वंशज क्षत्रिय संतति असूनही आंगिरस म्हणून ओळखले गेले; म्हणून ते क्षत्रोपेत ब्राह्मण
झाले ॥१०॥
क्षुतवतश्च मनोरिक्ष्वाकुः पुत्रो जज्ञे घ्राणतः ॥ ११ ॥
शिंकताना मनुच्या घ्राणेन्द्रियापासून इक्ष्वाकु नामक पुत्राचा
जन्म झाला ॥११॥
तस्य
पुत्रशतप्रधाना विकुक्षिनिमिदण्डाख्यास्त्रयः पुत्रा बभूवुः ॥ १२ ॥ शकुनिप्रमुखाः पञ्चाशत्पुत्राः उत्तरापथरक्षितारो बभूवुः ॥ १३ ॥ चत्वारिंशदष्टौ च दक्षिणापथभूपालाः ॥ १४ ॥
त्याच्या शंभर पुत्रांमधील विकुक्षि, निमि आणि दण्ड नामक
तीन पुत्र प्रधान झाले, शकुनि आदि पन्नास पुत्र उत्तरपथ आणि उरलेले अठ्ठेचाळीस दक्षिणपथाचे
शासक बनले ॥१२-१४॥
स चेक्ष्वाकुरष्टकायाश्श्राद्धमुत्पाद्य श्राद्धार्हं मांसमानयेति विकुक्षिमाज्ञापयामास
॥ १५ ॥
इक्ष्वाकुने अष्टकाचे श्राद्ध आरम्भ करून आपला पुत्र विकुक्षीला
श्राद्धासाठी योग्य मांस आणायची आज्ञा केली ॥१५॥
स तथे
ति गृहीताज्ञो विधृतशारासनो वनमभ्येत्यानेकशो मृगान् हत्वा श्रान्तोऽतिक्षुत्परीतो
विकुक्षिरेकं शशमभक्षयत् । शेषं च मांसमानीय
पित्रेनिवेदयामास ॥ १६ ॥
त्याने 'बरे’ असे म्हणून पित्याची आज्ञा शिरोधार्य मानली
व धनुष्य-बाण घेऊन वनात जाऊन अनेक पशुंचा वध केला. पण अतिशय थकल्याने आणि खूप भूक लागल्याने
विकुक्षीने त्यातील एका सशाचे मांस खाल्ले व उरलेले मांस आणून आपल्या पित्याला दिले ॥१६॥
इक्ष्वाकुकुलाचार्यो
वशिष्ठस्तत्प्रोक्षणाय चोदितः प्राह ।
अलमनेनामेध्येनामिषेण
दुरात्मना तव पुत्रेणैतन्मांसमुपहतं यतोऽनेन शशो भक्षितः ॥ १७ ॥
त्या मांसाचे प्रोक्षण करण्याची प्रार्थना केल्यावर इक्ष्वाकु
कुलपुरोहित वसिष्ठ म्हणाले 'ह्या अपवित्र मांसाची काय आवश्यकता? तुझ्या दुरात्मा पुत्राने
हे भ्रष्ट केले आहे, कारण त्याने त्यातील एक ससा खाल्ला आहे" ॥१७॥
ततश्चासौ
विकुक्षिर्गुरूणैवमुक्तः शशादसंज्ञामवाप पित्रा च परित्यक्तः ॥ १८ ॥
गुरुने असे म्हटल्याने विकुक्षीचे नाव शशाद पडले आणि पित्याने
त्याचा त्याग केला ॥१८॥
पितर्युपरते
चासावखिलामेतां पृथ्वीं धर्मतः शशास ॥ १९ ॥
पित्याच्या मृत्युनंतर त्याने ह्या पृथ्वीवर धर्मानुसार
शासन केले ॥१९॥
शशादस्य
तस्य पुरञ्जयोनाम पुत्रोभवत् ॥ २० ॥ तस्येदं चान्यत् ॥ २१ ॥
त्या शशादला पुरञ्जय नामक पुत्र झाला ॥२०॥ पुत्रजया हे दुसरे नावही त्याला पडले - ॥२१॥
पुरा
हि त्रेतायां देवासुरयुद्धमतिभीषणमभवत् ॥ २२ ॥
पूर्वकाळी त्रेता युगात एकदा अति भीषण देवासुर युद्ध झाले
॥२२॥
तत्र
चातिबलिभिरसुरैरमराः पराजितास्ते भगवन्तं विष्णुमाराधयाञ्चक्रुः ॥ २३ ॥
त्यात महाबलवान् दैत्यगणांकडून पराजित झालेल्या देवतांनी
भगवान विष्णूची आराधना केली ॥२३॥
प्रसन्नश्च देवानामनादिनिधनोऽखिलजमत्परायणो नारायणः प्राह ॥ २४ ॥ ज्ञातमेतन्मया युष्माभिर्यदभिलषितं तदर्थमिदं श्रूयताम् ॥ २५ ॥
तेव्हा आदि-अन्त-शून्य, अशेष जगत प्रतिपालक, श्रीनारायण
देवतांवर प्रसन्न होऊन म्हणाले ॥२४॥ "तुमचे
जे अभीष्ट आहे ते मला कळले । त्याविषयी हे ऐका - ॥२५॥
पुरञ्जयो नाम राजर्षेः शशादस्य तनयः क्षत्रियवरो यस्तस्य शरीरेऽहमंशेन स्वयमेवावतीर्य
तानशेषनसुरान्निहनिष्यामि तद्भवद्भिः पुरञ्जयोऽसुरवधार्थमुद्योगं कार्यतामिति ॥
२६ ॥
राजर्षि शशादचा जो पुत्रजय नामक पुत्र आहे त्या क्षत्रिय
श्रेष्ठाच्या शरीरात मी अंशमात्राने स्वयं अवतीर्ण होऊन त्या समस्त दैत्यांचा नाश करेन
म्हणून तुम्ही परिजन दैत्यांच्या वधाची तयारी करा" ॥२६॥
एतच्च श्रुत्वा प्रणम्य भगवन्तं विष्णुममराः पुरञ्जयसकाशमाजग्मुरूचुश्चैनम्
॥ २७ ॥
हे ऐकून देवतांनी विष्णुला प्रणाम केला आणि पुरजय जवळ जाऊन
त्याला म्हटले - ॥२७॥
भो भो
क्षत्रियवर्यास्माभिरभ्यर्थितेन भवतास्माकमरातिवधोद्यतानां कर्तव्यं साहाय्यमिच्छामस्तद्भवतास्माकमभ्यागतानां
प्रणयभङ्गो न कार्य इत्युक्तः पुरंजयः प्राह ॥ २८ ॥
" हे क्षत्रिय श्रेष्ठा! आमची इच्छा आहे की आपल्या
शत्रुच्या वधासाठी प्रवृत्त असणार्या आमची तु सहायता करावीस. आम्हा अभ्यागतांचा मानभंग करू नकोस ." हे ऐकून पुरजय म्हणाला - ॥२८॥
त्रैलोक्यनाथो
योयं युष्माकमिद्रः शतक्रतुरस्य यद्यहं स्कन्धाधिरूढो युष्माकमरातिभिःसह योत्स्ये तदहं
भवतां सहायः स्याम् ॥ २९ ॥
“हा जो त्रैलोक्यनाथ शतक्रतु तुमचा इन्द्र आहे, जर मी त्याच्या
खांद्यावर चढून तुमच्या शत्रुशी युद्ध केलेले तुम्हाला चालत असेल तर मी तुमचा सहायक
होऊ शकतो ॥२९॥
इत्याकर्ण्य समस्तदेवैरिन्द्रेण च बाढमित्येवं समन्वीप्सितम् ॥ ३० ॥
हे ऐकून समस्त देवगणांनी आणि इंद्राने ‘बरे’ असे म्हणून
त्याच्या म्हणण्याचा स्वीकार केला ॥३०॥
ततश्च शतक्रतोर्वृषरूपधारीणः ककुदि स्थितोऽतिरोषसमन्वितो भगवतश्चराचरगुरोरच्युतस्य
तेजसाप्यायितो देवासुरसङ्ग्रामे समस्तानेवासुरान्निजघान ॥ ३१ ॥
नंतर वृषभ रूपधारी इन्द्राच्या पाठीवर चढून चराचरगुरु भगवान
अच्युताच्या तेजाने परिपूर्ण होऊन राजा पुरञ्जयने रोषपूर्वक सर्व दैत्यांचा वध केला
॥३१॥
यतश्च वृषभककुदि स्थितेन राज्ञा दैतेयबलं निषूदितमतश्चासौ ककुत्स्थसंज्ञामवाप ॥ ३२
॥
त्या राजाने बैलाच्या खांद्यावर बसून दैत्य सेनेचा वध केला
होता, म्हणून त्याचे नाव ककुत्स्थ पडले ॥३२॥
ककुत्स्थस्याप्यनेनाः पुत्रोऽभवत् ॥ ३३ ॥ पुथुनेनसः
॥ ३४ ॥ पुथोर्विष्टराश्वः ॥ ३५ ॥ तस्यापि चान्द्रो युवनाश्वः
॥ ३६ ॥ चान्द्रस्य तस्य युवनाश्वस्य शावस्तः यः पुरीं शावस्तीं निवेशयामास ॥ ३७ ॥
ककुत्स्थला अनेन नामक पुत्र झाला ॥३३॥ अनेनाचा पुत्र पृथु, पृथुचा विष्टराश्व,
त्याचा चान्द्र युवनाश्व आणि चान्द्र युवनाश्वचा शावस्त नामक पुत्र झाला. शावस्ताने
श्रावस्ती पुरी वसवली होती.॥३४-३७॥
शावस्तस्य बृहदश्वः ॥ ३८ ॥ तस्यापि कुवालायाश्वः
॥ ३९ ॥ योऽसावुदकस्य महर्षेरपकारिणं धुन्धुनामानमसुरं वैष्णवेन तेजसाप्यायितः पुत्रसहस्रैरेकविंशद्भिः
परिवृतो जघान धुन्धुमारसंज्ञामवाप ॥ ४० ॥
शावस्ताला बृहदश्व, बृहदश्वापासून कुवलाश्वचा जन्म झाला,
ज्याने वैष्णव तेजाने पूर्णता लाभल्याने आपल्या एकवीस हजार पुत्रांसह मिळून महर्षि
उदकांना अपकारी असलेल्या धुन्धु नामक दैत्याला मारले होते ; म्हणून त्याचे नाव धुन्धुमार
पडले ॥ ३८-४०॥
तस्य च तनयास्समस्ता एव धुन्धुमुखनिश्वासाग्निना विप्लुष्टा विनेशुः ॥ ४१ ॥
त्याचे सर्व पुत्र धुन्धुच्या मुखातून निघालेल्या निःश्वासाग्नित
जळून मृत्यु पावले ॥ ४१॥
दृढाश्वचन्द्राश्वकपिलाश्वाश्च त्रयः केवलं शेषिताः ॥ ४२ ॥
त्यांच्यातील केवळ दृढ़ाश्व, चन्द्रश्व आणि कपिलाश्व हे
तीघेच वाचले ॥४२॥
वृढाश्वाद्धर्यश्वः ॥ ४३ ॥ तस्माच्च निकुम्भः
॥ ४४ ॥ निकुम्भस्यामिताश्वः ॥ ४५ ॥ ततश्च कृशाश्वः ॥
४६ ॥ तस्माच्च प्रसेनजित् ॥ ४७ ॥ प्रसेनजितो
युवनाश्वोऽभवत् ॥ ४८ ॥
दृढाश्वला हर्यश्व, हर्यश्वला निकुम्भ, निकुम्भला अमिताश्व,
अमिताश्वला कृशाश्व, कृशाश्वला प्रसेनजित् आणि प्रसेनजितपासून युवनाश्वचा जन्म झाला
॥४३-४८॥
तस्य चापुत्रस्यातिनिर्वेदान्मुनीनामाश्रममण्डले निवसतो दयाभिर्मुनिभिरपत्योत्पादनायेष्टिः
कृता ॥ ४९ ॥
युवनाश्व निःसन्तान असल्याने खिन्न मनाने तो मुनींच्या आश्रमात राहायचा;
त्याच्या दुःखाने द्रवीभूत होऊन दयाळू मुनिजनांनी त्याच्या पुत्रप्राप्तीसाठी यज्ञाचे
अनुष्ठान केले ॥४९॥
तस्यां
च मध्यारात्रौ निवृत्तायां मन्त्रपूतजलपूर्णं कलशं वेदिमध्ये निवेश्य ते मुनयः सुषुपुः
॥ ५० ॥
मध्यरात्रीच्या वेळी यज्ञ समाप्त झाल्यावर यज्ञात मुनिजन
मन्त्रपूत जलकलश वेदांमध्ये ठेऊन झोपी गेले ॥५०॥
सुप्तेषु तेषु अतीव तृट्परीतः स भूपालस्तमाश्रमं विवेश ॥ ५१ ॥ सुप्तांश्च तानृषीन्नैवोत्थापयामास
॥ ५२ ॥
ते निद्राधीन झाल्यावर अत्यन्त पिपासाकुल होऊन राजाने त्या
स्थानी प्रवेश केला आणि झोपलेले असल्या कारणाने त्याने त्या ऋषिंना उठवले नाही ॥५१-५२॥
तच्च
कलशमपरिमेयमाहात्म्यमन्त्रपूतं पपौ ॥ ५३ ॥
आणि त्या अपरिमित माहात्म्यशाली कलशातील मन्त्रपूत जल त्याने
पिऊन टाकले ॥५३॥
प्रबुद्धाश्च
ऋषयः पप्रच्छुः केनैतन्मन्त्रपूतं वारि पीतम् ॥ ५४ ॥
झोपेतून उठल्यावर ऋषिंनी विचारले, हे मन्त्रपूत जल कोण
प्यायले? ॥५४॥
अत्र
हि राज्ञो युवनास्वश्य पत्नी महाबलपराक्रमं पुत्रं जनयिष्यति ।
इत्याकर्ण्य
स राजा अजानता मया पीतमित्याह ॥ ५५ ॥
त्या जलाचे पान केल्यावरच युवनाश्वाची पत्नी महाबलविक्रमशील
पुत्र उप्तन्न करणार ." हे ऐकून राजा म्हणाला-
"मला हे ठाऊक नसल्याने मीच ते जल प्यायलो " ॥५५॥
गर्भश्च
युवनाश्वस्योदरे अभवत् क्रमेण च ववृधे ॥ ५६ ॥
म्हणून युवनाश्वाच्या उदरात गर्भ स्थापित झाला आणि क्रमशः
वाढू लागला ॥५६॥
प्राप्तसमयश्च
दक्षिण कुक्षिमवनिपतेर्निर्भिद्य निश्चक्राम ॥ ५७ ॥
यथासमय बालक राजाची ऊजवी कोख फाडून बाहेर आला ॥५७॥
स चासौ
राजा ममार ॥ ५८ ॥
पण त्यामुळे राजाचा मृत्यु झाला नाही ॥५८॥
जातो
नामैष कं धास्यतीति ते मुनयः प्रोचुः ॥ ५९ ॥
त्याच्या जन्मानंतर मुनिंनी विचारले - "हा बालक कसले
पान करून जीवित राहील?" ॥५९॥
अथागत्य
देवराजोब्रजीत् मामयं धास्यतीति ॥ ६० ॥
त्यावेळी देवराज इन्द्राने येऊन सांगितले की 'हा माझ्या
आधारे जीवित राहील' ॥६०॥
ततो
मान्धातृनामा सोभवत् ।
वक्रे
चास्य प्रदेशिनी न्यस्ता देवेन्द्रेण न्यस्ता तां पपौ ॥ ६१ ॥
तां
चामृतस्त्राविणीमास्वाद्याह्नैव स व्यवर्धत ॥ ६२ ॥
म्हणून त्याचे नाव मान्धता पडले. देवेन्द्राने त्याच्या तोंडात आपली तर्जनी दिली आणि ती
तो चोखू लागला. त्या अमृतमय बोटाचे आस्वादन
केल्याने तो एकच दिवसात मोठा झाला ॥६१-६२॥
ततस्तु
मान्धाता चक्रवर्ती सप्तद्वीपां महीं बुभुजे ॥ ६३ ॥
तेव्हापासून चक्रवर्ती मान्धाता सप्तद्वीप पृथ्वीचे राज्य
भोगू लागला ॥६३॥
तत्रायं श्लोकः ॥ ६४ ॥
ह्या विषयी हा श्लोक सांगितला जातो ॥६४॥
यावत्सूर्य
उदेत्यस्तं यावच्च प्रतितिष्ठति ।
सर्वं
तद्यौवनाश्वस्य मान्धातुः क्षेत्रमुच्यते ॥ ६५ ॥
'जिथून सूर्योदय होतो आणि जिथे तो अस्त होतो तितकं सर्व
क्षेत्र युवनाश्वाचा पुत्र मान्धाता ह्याचे आहे' ॥६५॥
मान्धाता
शतबिन्दोर्दुहितरं बुन्दुमतीमुपयेमे ॥ ६६ ॥ पुरुकुत्समम्बरीषं
मुचुकुन्दं च तस्यां पुत्रत्रयमुत्पादयामास ॥ ६७ ॥ पञ्चाशद्दुहितरस्तस्यामेव तस्य नृपतेर्बभूवुः ॥ ६८ ॥
मान्धाताने शरतबिन्दुची पुत्री बिन्दुमती सोबत विवाह केला
आणि तिच्यापासून पुरुकुत्स, अम्बरीष आणि मुचुकुन्द नामक तीन पुत्र उप्तन्न केले तसेच
त्याला बिन्दुमतीपासून पन्नास कन्या झाल्या ॥६६-६८॥
तस्मिन्नन्तरे
बह्वृचश्च सौभरिर्नाम महर्षिरन्तर्जले द्वादशाब्दं कालमुवास ॥ ६९ ॥
त्याचवेळी बहुवचन सौभरी नामक महर्षिने बारा वर्षांपर्यंत
जलात निवास केला ॥६९॥
तत्र चान्तर्जले संमदो नामातिबहुप्रजोतिमात्रप्रमाणो मीनाधिपतिरासीत् ॥ ७० ॥
त्या जलात सम्मद नामक एक खूप संतति असलेला अति दीर्घकाय
मत्स्यराज होता ॥७०॥
तस्य
च पुत्रपौत्रदौहित्राः पृष्ठतोऽग्रतः पार्श्वयोः पक्षपुच्छशिरसां चोपरि भ्रमन्तस्तेनैव
सदाहर्निशमतिनिर्वृत्ता रेमिरे ॥ ७१ ॥
त्याचे पुत्र, पौत्र, दौहित्र आदि त्याचे मागेपुढे व त्याच्या
पंख, शेपटी व डोक्याच्या आजूबाजूला फिरायचे, आनंदित होऊन रात्रंदिवस त्याच्या सोबत
क्रिडा करत राहायचे ॥७१॥
स चापत्यस्पर्शोपचीयमानप्रहर्षप्रकर्षो
बहुप्रकारं तस्य ऋषेः पश्यतस्तैरात्मजपुत्रपौत्रदौहित्रादिभिः सहानुदिनं सुरां रेमे
॥ ७२ ॥
तसेच तो सुद्धा आपल्या संततिच्या सुकोमल स्पर्शाने अत्यन्त
हर्षयुक्त होऊन त्या मुनिश्वराला बघतबघत आपल्या पुत्र, पौत्र दौहित्र आदि सह अहर्निश
क्रीडा करत राहहायचा ॥७२॥
अथान्तर्जलावस्थितःसौभरिरेकाग्रतःसमाधिमपहायानुदिनं
तस्य मत्स्यस्यात्मजपुत्रपौत्रदौहित्रादिभिःसहातीरमणीयतातामवेक्ष्याचिन्तयत् ॥ ७३ ॥
अशा प्रकारे जलात स्थित सौभरि ऋषिंनी एकाग्रतारूप समाधि
सोडून रात्रंदिवस त्या मत्स्यराजाच्या आपल्या पुत्र, पौत्र आणि दौहित्र आदि सोबत चालत
असलेल्या अति रमणीय क्रीडा बघून विचार केला ॥७३॥
अहो धन्योयमीदृशमनभिमतं योन्यन्तरमवाप्यैभिरात्मजपुत्रपौत्रदौहित्रादिभिः सह रममाणोऽतीवास्माकं
स्पृहामुत्पादयति ॥ ७४ ॥
'अहो ! हा धन्य आहे, जो अशा अनिष्ट योनीत उप्तन्न होऊनही
आपल्या पुत्र, पौत्र आणि दौहित्रांसह नित्य रमण करत माझ्या हृदयात दाह उप्तन्न करतो
॥७४॥
वयमप्येवं पुत्रादिभिः सह ललितं रंस्यामहे इत्येवमभिकाङ्क्षन् स तस्मादन्तर्जलान्निष्क्रम्य
सन्तानाय निवेष्टुकामः कन्यार्थं मान्धातारं राजानमगच्छत् ॥ ७५ ॥
मी सुद्धा असाच आपल्या पुत्रांसह ललित क्रीडा करेन . ह्या इच्छेने ते जलातून बाहेर आले आणि संतान प्राप्तीसाठी
गृहस्थाश्रमात प्रवेश करण्याच्या इच्छेने कन्या ग्रहण करण्यासाठी राजा मांधाताकडे गेले
॥७५॥
आगमनश्रवणसमनन्तरं चोत्थाय
तेन राज्ञा सम्यगर्घ्यादिना सम्पूजितः कृतासनपरिग्रहः सौभरिरुवाच राजानम् ॥ ७६ ॥
मुनिवरांच्या आगमनाविषयी ऐकताच राजाने उठून अर्ध्यदान देऊन
त्यांचे उत्तम प्रकारे पूजन केले . तदनन्तर सौभारि मुनिने
आसन ग्रहण करून राजाला म्हटले- ॥७६॥
सौभरिरुवाच
-
निवेष्टुकामोऽस्मि
नरेन्द्र कन्यां प्रयच्छ मे मा प्रणयं विभाङ्क्षीः ।
न ह्यर्थिनः
कार्यवशादुपेताः ककुत्स्थवंशे विमुखा प्रयान्ति ॥ ७७ ॥
सौभरि म्हणाले ;- हे राजन् ! मी कन्या-परिग्रहाची अभिलाषा
करतो आहे, म्हणून तू मला एक कन्या दे; माझा प्रणय भंग नको करूस . ककुत्स्थवंशात कार्यवश आलेला कोणीही प्रार्थी पुरुष कधीच
रिकाम्या हाताने परत जात नाही ॥७७॥
अन्येपि
सन्त्येव नृपाः पृतिव्यां मान्धातरेषां तनयाः
प्रसूताः ।
किं
त्वर्थिनामर्थितदानदीक्षा- कृतव्रतं श्लाघ्यमिदं
कुलं ते ॥ ७८ ॥
हे मान्धाता ! पृथ्वीतलावर आणखीही अनेक राजा आहेत आणि त्यांनाही
कन्या आहेत ; पण याचकांनी मागितलेली वस्तु दान देण्याच्या नियमात दृढप्रतिज्ञ केवळ
तुझेच प्रशंसनीय कुळ आहे ॥७८॥
शतार्धसंख्यास्तव
सन्ति कन्यास्तासां ममैकां नृपते प्रयच्छ ।
यत्प्रार्थनाभङ्गभयाद्बिभेमि तस्मादहं राजवरादिदुःखात् ॥ ७९ ॥
हे राजन् ! तुझ्या पन्नास कन्या आहेत, त्यातील केवळ एकच
मला दे . नृपश्रेष्ठा ! मी ह्यावेळी
प्रार्थना भंगाच्या आशंकेने अतिशय दुःखी आणि भयभीत होत आहे ॥७९॥
श्रीपराशर
उवाच
इति
ऋषिवचनमाकर्ण्य स राजा जरार्जरित
देहमृषिमालोक्य
प्रत्याख्यानकातरस्तस्माच्च
शापभीतो
बिभ्यत्किञ्चिदधोमुखश्चिरं दध्यौ च ॥ ८० ॥
श्रीपराशर म्हणाले ;- ऋषिचे हे बोलणे ऐकून राजा त्याच्या
जराजीर्ण देहाला पाहून शापाच्या भयाने त्याची मागणी अस्वीकार करायला घाबरला आणि खाली
मान घालून मनातल्या मनात विचार करू लागला ॥८०॥
सौभरिरुवाच
नरेद्रकस्मात्सुमुपैषि
चीन्तामह्यमुक्तं न मयात्र किञ्चित् ।
यावश्यदेया
तनया तयैवकृतार्थता नो यदि किं न लब्धा ॥ ८१ ॥
सौभरि म्हणाले ;- हे नरेन्द्रा ! तु चिन्तित का होत आहेस
? मी कोणती असह्य गोष्ट तर बोललो नाही, जी कन्या तुला एक दिवस अवश्य द्यायचीच आहे तीला
दिल्याने जर मी कृतार्थ झालो तर तुला अप्राप्त असे काय राहील ? ॥८१॥
श्रीपराशर उवाच
अथ तस्य
भगवतः शापभीतः स प्रश्रयस्तमुवाचासौ राजा ॥ ८२ ॥
श्रीपराशर म्हणाह ;- तेव्हा भगवान सौभरिंच्या शापाने भयभीत
होऊन राजा मान्धाता नम्रतापूर्वक त्यांना म्हणाला ॥८२॥
राजोवाच
भगवन्
अस्मत्कुलस्थितिरियं य एव कन्याभिरुचितोऽभिजनवान्वरस्तस्मै कन्या प्रदीयते भगवद्याच्ञा
चास्मन्मनोरथानामप्यतिगोचरवर्तिनी कथमप्येषा संजाता तदेवमुपस्थिते न विद्मः किं कुर्म
इत्येतन्मया चिन्त्यत इत्यभिहिते च तेन भूभुजा मुनिरचिन्तयत् ॥ ८३ ॥
राजा म्हणाला ;- भगवन ! आमच्या कुळाची अशी रीत आहे की ज्या
सत्कुलोप्तन्न वराला कन्या पसन्द करते त्यालाच ती दिली जाते . आपली प्रार्थना तर आमच्या कल्पने पलीकडे आहे . ही इच्छा कशी उत्पन्न झाली कळत नाही ? अशा अवस्थेत काय
करावं हे मला कळत नाही आहे ? मी ह्याच काळजीत आहे . महाराज मान्धाता
असे म्हणाल्यावर मुनिवर सौभारिने विचार केला - ॥८३॥
अयमन्योऽस्मत्प्रत्याख्यानोपायो
वृद्धोयमनभिमतः स्त्रीणां किमुत कन्याकानामित्यमुना सञ्चिन्त्यैतदभिहितमेवमस्तु तथा
करिष्यामीति सञ्चिन्त्य मान्धातारमुवाच ॥ ८४ ॥
'मला टाळण्यासाठी हा एक उपाय आहे . ' हा वृद्ध आहे, प्रौढ़ा स्त्रिया सुद्धा ह्याला पसन्द
नाही करणार, मग कन्यांची गोष्ट काय ?' असा विचार करूनच राजाने असं सांगितलं आहे. अच्छा, ठीक आहे , मी पण एक उपाय करतो.' असा विचार करून ऋषिंनी मान्धाताला म्हटले - ॥८४॥
यद्येवं
तदादिश्यतामस्माकं प्रवेशाय । कन्यान्तःपुरवर्षवरो
यदि कन्यैव काचिन्मामभिलषति तदाहं दारसङ्ग्रहं करिष्यामि अन्यथा चेत्तदलमस्माकम् एतेनातीतकालारम्भणेनेत्युक्त्वा विरराम ॥ ८५ ॥
'जर असे आहे तर कन्यांच्या अन्तःपुर-रक्षक हिजड्यांना मला
तिथे प्रवेश करवण्याची आज्ञा दे. जर कोणा कन्येने मला पसंत
केले तरच मी स्त्री ग्रहण करेन नाहीतर ह्या वृद्धावस्थेत मला हा व्यर्थ उद्योग करण्याचे
काहीच प्रयोजन नाही . " असे म्हणून तो मौन
झाला ॥८५॥
ततश्च मान्धात्रा मुनिशापशङ्कितेन कन्यान्तःपुरवर्षवरःसमाज्ञप्तः ॥ ८६ ॥
तेव्हा मुनिच्या शापाच्या भयाने मान्धात्याने कन्यांच्या
अन्तःपुर-रक्षकाला आज्ञा दिली ॥८६॥
तेन सह कन्यान्तःपुरं प्रविशान्नेव भगवानखिलसिद्धगन्धर्वेभ्योतिशयेन कमनीयं रूपमकरोत्
॥ ८७ ॥
त्याच्या सोबत अन्तःपुरात प्रवेश करताना भगवान सौभरिने
आपले रूप समस्त सिद्ध आणि गंधर्वांहूनही मनोहर बनवले ॥८७॥
प्रवेश्य
च तमृषिमन्तःपुरे वर्षधरस्ताः कन्याः प्राह ॥ ८८ ॥
त्या ऋषिवराला अन्तःपुरात नेऊन अन्तःपुर रक्षक त्या कन्यांना
म्हणाला - ॥८८॥
भवतीनां
जनयिता महाराजःसमाज्ञापयति ॥ ८९ ॥ अयमस्मान् ब्रह्मर्षिः कन्यार्थं समभ्यागतः ॥ ९०
॥ मया चास्य प्रतिज्ञातं यद्यस्मत्कन्या या काचिद्भगवन्तं
वरयति तत्कन्याच्छन्दे नाहं परिपंथानं करिष्यामीत्याकर्म्य सर्वा एव ताः कन्याः सानुरागाः
सप्रमदाः करेणव इवेभमृगयूथपतिं तमृषिमहमहमिकया वरयाम्बभूवुरूचुश्च ॥ ९१ ॥
"तुमच्या पिता महाराज मान्धातांची आज्ञा आहे की हे
ब्रह्मर्षि आपल्याकडे एका कन्येसाठी आले आहेत आणि मी त्यांना शब्द दिला आहे की माझी
जी कोणती कन्या श्रीमानांचे वरण करेल तिच्या इच्छेत मी कोणत्याही प्रकारे बाधा आणणार
नाही. " हे ऐकून सर्व कन्यांनी युथपति गजराजाला वरणार्या हत्तिणीं सारखा
अनुराग केला आणि आनन्दपूर्वक ' फक्त मीच - फक्त मीच वरते ' असे म्हणून त्यांना वरले
. त्या एकमेकींना म्हणू लागल्या ॥ ८९-९१॥
अलं
भगिन्योहमिमं वृणोमि वृणोम्यहं नैष तवानुरूपः ।
ममैष
भर्ता विधिनैव सृष्टस्सृष्टाहमस्योपशमं प्रयाहि ॥ ९२ ॥
अगं भगिनी ! व्यर्थं प्रयत्न का करतेस ? मी ह्यांचे वरण
करते, हे तुझ्या अनुरूप नाहीच आहेत. विधात्यानेच ह्यांना माझा
भर्त्ता आणि मला त्यांची भार्या बनवले आहे . म्हणून तुम्ही
सगळ्या शान्त व्हा ॥९२॥
वृतो
मयायं प्रथमं मयायं गृहं विशन्नेव विहन्यसे किम् ।
मया
मयोतिक्षितिपात्मजानां तदर्थमत्यर्थकलिर्बभूव ॥ ९३ ॥
ते अन्तःपुरात येताच सर्वात आधी मीच त्यांना वरले होते.
तुम्ही का त्यांच्यावर जीव सोडता ? अशा प्रकारे ' मी वरले आहे - आधी मी वरले आहे असे
म्हणत त्या राजकन्यांमध्ये त्यांच्या साठी मोठा कलह सुरू झाला ॥९३॥
यदा
मुनिस्ताभिरतीवहार्दाद्वृतःस कन्याभिरनिन्द्यकीर्तिः ।
तदा
स कन्याधिकृतो नृपाय यथावजाचष्ट विनम्रमूर्तिः ॥ ९४ ॥
जेव्हा त्या समस्त कन्यांनी अतिशय अनुरागवश त्या अनिन्द्यकीर्ति
मुनिवराचे वरण केले तेव्हा कन्या रक्षकाने नम्रतापूर्वक राजाला सम्पूर्ण वृतान्त जशाच्या
तसा सांगीतला॥९४॥
श्रीपराशर
उवाच
तदवगमात्किङ्किमेतत्कथमेतत्किं
किं करोमि किं मयाभिहितमित्याकुलमतिरनिच्छन्नपि कथमपि राजानुमेने ॥ ९५ ॥
कृतानुरूपविवाहश्च
महर्षिःसकला एव ताः कन्याःस्वमाश्रममनयत् ॥ ९६ ॥
श्रीपराशर म्हणाले;- हे कळल्यावर राजाने
'हे काय बोलतोस? असे कसे झाले ? मी काय करू? मी का त्यांना आत जायला सांगितले?’ असा
विचार करून अतिशय व्याकुळ मनाने इच्छा नसताना आपल्या वचनाचे पालन केले. आणि आपल्या
अनुरूप विवाह संस्कार संपन्न झाल्यावर महर्षि सौभरि त्या सर्व कन्यांना आपल्या आश्रमात
घेऊन गेले ॥९५-९६॥
तत्र
चाशेषशिल्पकल्पप्रणेतारं धातारमिवान्यं विश्वकर्माणमाहूय सकलकन्यानामेकैकस्याः प्रोत्फुल्लपङ्कजाः
कूजत्कलहंसकारण्डवादिविहङ्गमाभिरामजलाशयाःसोपधानाः ।
सावकाशाःसाधुशय्यापरिच्छदाः
प्रासादाः क्रियन्तामित्यादिदेश ॥ ९७ ॥
तिथे येऊन जणू दुसर्या विधात्या समान अशा अशेषशिल्प कल्पप्रणेता
विश्वकर्माला बोलावून सांगितले की ह्या समस्त
कन्यांमधील प्रत्येकी साठी वेगळे महाल बनव ज्यात फुललेली कमळं, सुन्दर हंस तथा कारण्डव आदि जल पक्ष्यांनी सुशोभित जलाशय असेल, सुन्दर
वस्तु, शय्या, वस्त्र आणि भरपूर मोकळी जागा असेल ॥ ९७॥
तच्च
तथैवानुष्ठितमशेषशिल्पविसेषाचार्यस्त्वष्टा दर्शितवान् ॥ ९८ ॥
तेव्हा सम्पूर्ण शिल्पविद्येचे विशेष आचार्य असलेल्या विश्वकर्माने
देखील त्यांच्या आज्ञेनुसार सर्व काही तयार केले व त्यांना दाखवले ॥९८॥
ततः
परमर्षिणा सौभरिणाज्ञप्तस्तेषु गृहेष्वनिवार्यानन्दनामामहानिधिरासाञ्चक्रे ॥ ९९ ॥
त्यानंतर महर्षि सौभारिच्या आज्ञेने त्या महालांमध्ये अनिवार्यानन्द
नावाची महानदी निवास करू लागली ॥९९॥
ततोऽनवरतेन
भक्ष्यभोज्यलेह्याद्युपभोगैरागतानुगतभृत्यादीनहर्निशमशेषगृहेषु ताः क्षितिशदुहिरतो
भोजयामासुः ॥ १०० ॥
तेव्हा सर्व महालांमध्ये नाना प्रकारचे भक्ष्य, भोज्य आणि
लेह्य आदि सामग्रिंनी त्या राजकन्या आलेल्या अतिथिंना आणि आपल्या अनुगत भृत्यवर्गाला
तृप्त करू लागल्या ॥१००॥
एकदातु
दुहितृस्नेहाकृष्टहृदयःस महीपतिरतिदुःखितास्ता उत सुखिता वा इति विचिन्त्य तस्य महर्षेराश्रमसमीपमुपेत्य
स्फुरदंशुमालाललामां स्फटिकमयप्रासादमालामतिरम्योपवनजलाशयां ददर्श ॥ १०१ ॥
एके दिवशी कन्यांवरील स्नेहामुळे राजा मान्धता त्या दुःखी
आहेत की सुखी हे पाहायला गेला. महर्षि सौभरिच्या आश्रमाजवळ आल्यावर त्याने तिथे अति
रमणीय उपवन आणि जलाशयांनी युक्त स्फटिकशिलांच्या महलांची रांग पाहिली जी परसलेल्या
मयूरमालांपेक्षाही मनोहर दिसत होती ॥ १०१
॥
प्रविश्य
चैकं प्रासादमात्मजां परिष्वज्य कृतासनपरिग्रहः प्रवृद्धस्नेहनयनाम्बुगर्भनयनोऽब्रवीत्
॥ १०२ ॥
त्यानन्तर तो एका महालात जाऊन आपल्या कन्येला स्नेहाने
आलिंगन देऊन आसनावर बसला आणि आत्यंतिक प्रेमामुळे अश्रुभरल्या डोळ्यांनी म्हणाला -
॥ १०२॥
अप्यत्र
वत्से भवत्याःसुखमुत किञ्चिदसुखमपि ते महर्षिःस्नेहवानुत न, स्मर्यतेस्मद्गुहवास इत्युक्ता तं तनया पितरमाह ॥ १०३ ॥
'बाळा ! तुम्ही सगळ्या इथे सुखात आहात ना ? तुम्हाला कोणत्या
प्रकारचे कष्ट तर नाहीत ना ? महर्षि सौभरि
तुमच्यावर प्रेम करतात ना ? तुम्हाला घरची आठवण येते का ? " पित्याच्या अशा म्हणण्यावर
त्या राजकन्येने म्हटले - ॥१०३॥
तातातिरमणीयः
प्रासादोऽत्रातिमनोज्ञमुपवनमेते कलवाक्यविहङ्गमाभिरुताः प्रोत्फुल्लपद्माकरजलाशया
मनोऽनुकूलभक्ष्यभोज्यानुलेपनवस्त्रभूषणादिभोगो मृदूनि शयनासनानि सर्वसम्पत्समेतं मे
गार्हस्थ्यम् ॥ १०४ ॥
'बाबा ! हा महल अति रमणीय आहे, हे उपवनादि देखील अतिशय
मनोहर आहेत, फुललेल्या कमळांनी युक्त ह्या जलाशयांमध्ये जलपक्षिगण सुन्दर बोली बोलतात.
भक्ष्य, भोज्य आदि खाद्य पदार्थ, उटणे आणि वस्त्राभूषण आदि भोग तसेच सुकुमार शय्यासनादि
सर्वकाही मनाला अनुकूल असेच आहे; अशा प्रकारे आमचं गार्हस्थ यद्यापि सर्वसम्पत्तिसम्पन्न
है ॥१०४॥
तथापि
केन वा जन्मभूमिर्न स्मर्यते ॥ १०५ ॥
तरीही आपल्या जन्मभूमिची आठवण कोणाला बरं नाही येणार ? ॥१०५ ॥
त्वत्प्रसादादिदमशेषमतिशोभनम्
॥ १०६ ॥
तुमच्या कृपेने अजूनपर्यंत सर्व काही मंगलमय आहे ॥१०६॥
किं
त्वेकं ममैतद्दुःखकारणं यदस्मद्गृहान्महर्षिरयंमद्भर्ता न निष्क्रामति ममैव केवलमतिप्रीत्या
समीपपरिवर्ती नान्यासामस्मद्भगिनीनाम् ॥ १०७ ॥
तरी मला फार मोठे दुख आहे की आमचे पति असलेले हे महर्षि
माझ्या घरून कधीच बाहेर जात नाहीत. माझ्यावरील आत्यंतिक प्रेमामुळे
ते केवळ माझ्याजवळ राहातात. माझ्या अन्य बहिणींजवळ जातच नाहीत ॥१०७॥
एवं
च मम सोदर्योतिदुःखिता इत्येवमतिदुःखकारणमित्युक्तस्तया द्वितीयं प्रासादमुपेत्य स्वतनयां
परिष्वज्योपविष्टस्तथैव पृष्टवान् ॥ १०८ ॥
त्यामुळे माझ्या बहिणी फार दुःखी असतील . हेच माझ्या दुःखाचे कारण आहे.
तिच्या अशा म्हणण्यावर राजाने दुसर्या महालात जाऊन आपल्या दुसर्या कन्येला आलिंगन
केले आणि आसनावर बसल्यावर तिलाही तसाच प्रश्न विचारला ॥१०८॥
तयापि
च सर्वमेतत्तत्प्रासादाद्युपभोगसुखं भृशमाख्यातं ममैव केवलमतिप्रीत्या पार्श्वपरिवर्ती, नान्यासामस्मद्भगिनीनामित्येवमादि श्रुत्वा समस्तप्रासादेषु राजा प्रविवेश
तनयां तनयां तथैवावृच्छत् ॥ १०९ ॥
तिनेही तशाच प्रकारे महाल आदि सम्पूर्ण उपभोगांच्या सुखाचे
वर्णन केले व म्हटले की अत्यंत प्रेमामुळे महर्षि केवळ माझ्यासोबतच राहातात व दुसर्या
कोणा बहाणीकडे जात नाहीत . अशा प्रकारे परत ऐकल्यावर
राजा एक एक करून प्रत्येक महलात गेला व प्रत्येक कन्येला त्याने असेच विचारले ॥१०९॥
सर्वाभिश्च ताभिस्तथैवाभिहितः परितोषविस्मयनिर्भरविवशहृदयो भगवन्तं सौभरिमेकान्तावस्थितमुपेत्य
कृतपृजोब्रवीत् ॥ ११० ॥
आणि त्या सर्वांनी त्याला तसेच उत्तर दिले . शेवटी आनन्द आणि विस्मयाने भारावून विवशचित्त होऊन त्याने
एकान्तात स्थित भगवान सौभरिंची पूजा करून नंतर त्यांना म्हटले ॥११०॥
दृष्टस्ते
भगवन् सुमहानेष सिद्धिप्रभावो नैवंविधमन्यस्य कस्यचिदस्माभिर्विभूतिभिर् विलासितमुपलक्षितं
यदेतद्भगवतस्तपसः फलमित्यभिपूज्य तमृषिं तत्रैव तेन ऋषिवर्येण सह किञ्चित्कालमभिमतोपभोगान्
बुभुजे स्वपुरं च जगाम् ॥ १११ ॥
भगवान ! आपल्याच योगसिद्धिचा हा महान् प्रभाव पाहिला. अशा प्रकारे
महान वैभव असलेला इतर कोणीही असा विलास करताना मी बघितला नाही ; हे सर्व तुमच्या तपस्येचेच
फळ आहे .' अशा प्रकारे त्यांचे अभिवादन
करून काही काळा पर्यंत तो त्या मुनिवरासोबतच अनेक भोग भोगत राहिला आणि शेवटी आपल्या
नगरात परतला ॥१११॥
कालेन
गच्छता तस्य तासु राजतनयासु पुत्रशतं सार्धमभवत् ॥ ११२ ॥
कालक्रमाने त्या राजकन्यांपासून सौभरि मुनिंना दिडशे पुत्र
झाले ॥११२॥
अनुदिनानुरूढस्नेहप्रसरश्च
स तत्रातीव ममताकृष्टहृदयोऽभवत् ॥ ११३ ॥
अशा प्रकारे दिवसेंदिवस मिळत असलेल्या स्नेह प्रसादाने
त्यांचे हृदय अतिशय ममतामय झाले ॥११३॥
अप्येतेऽस्मत्पुत्राः
कलभाषिणः पद्भ्यां गच्छेयुः अप्येते यौवनिनो भवेयुः, अपि कृतदारानेतान् पश्येयमप्येषां पुत्रा भवेयुः अप्येतत्पुत्रान्पुत्रसमन्वितान्पश्यामीत्यादिमनोरथाननुदिनं
११४ ॥
ते विचार करू लागले- ' माझे हे पुत्र मधुर बोल बोलतील का
? आपल्या पायांनी चालतील का? त्यांना युवावस्था प्राप्त होईल का ? त्यावेळी मी त्यांना
सपत्नीक पाहू शकेन का? त्यांचीही पुरे असतील का व मी त्यांना त्यांच्या पुत्र पौत्रांनी
युक्त पाहू शकेन का ? ' अशा प्रकारे कालक्रमाने दिवसेंदिवस वाढत चाललेल्या मनोरथांविषयी
ते विचार करू लागले - ॥ ११४॥
अहो
मे मोहस्यातिविस्तारः ॥ ११५ ॥
अरेरे ! माझ्या मोहाचा हा किती विस्तार झाला ? ॥११५॥
मनोरथानां
न समाप्तिरस्तिवर्षायुतेनापि तथाब्दलक्षैः ।
पूर्णेषु
पूर्णेषु मनोरथानामुत्पत्तयःसन्ति पुनर्नवानाम् ॥ ११६ ॥
माझ्या मनोरथांचा तर हजारों - लाखों वर्षांनीही अंत नाही
होणार . त्यातील काही जरी पूर्ण
झाले तरी त्यांच्या जागी अन्य नवीन मनोरथ तयार होतील ॥११६॥
पद्भ्यां
गता यौवनिनश्च जाता दारैश्च संयोगमिताः प्रसूताः ।
दृष्टाः
सुतास्तत्तनयप्रसूतिं द्रष्टुं पुनर्वाञ्च्छति मेऽन्तरात्मा ॥ ११७ ॥
माझे पुत्र पायांनी चालू लागले, मग युवा झाले, त्यांचा
विवाह झाला व त्यांना संतति झाली - हे सर्व तर माझे पाहून झाले. पण आता जर ॥११७॥
द्रक्ष्यामि
तेषामिति चेत्प्रसूतिं मनोरथो मे भविता ततोऽन्यः ।
पूर्णेऽपि
तत्राप्यपरस्य जन्म निवार्यते केन मनोरथस्य ॥ ११८ ॥
त्यांचा जन्मसुद्धा मी पाहीला तर परत माझ्या मनात दुसरे
मनोरथ निर्माण होईल आणि जर तेही पूर्ण झाले तर आणखी दुसरे मनोरथ निर्माण होण्यापासून
कोण रोखू शकेल ? ॥११८॥
आमृत्युतो
नैव मनोरथानामन्तोऽस्ति विज्ञातमिदं मयाद्य ।
मनोरथासक्तिपरस्य
चित्तं न जायते वै परमार्थसङ्गि ॥ ११९ ॥
मला आता खूप चांगल्या प्रकारे समजलं आहे की मृत्युपर्यंन्त
मनोरथांचा अन्त शक्य नाही आणि ज्या मनात मनोरथांची आसक्ति असते ते कधीच परमार्थात लागू
शकत नाही ॥११९॥
स मे
समाधिर्जलवासमित्रमत्स्यस्य सङ्गात्सहसैव नष्टः ।
परिग्रहःसङ्गकृतो
मयायंपरिग्रहोत्था च ममातिलिप्सा ॥ १२० ॥
अरेरे ! माझी ती समाधि जलवासातील साथी मत्स्याच्या संगामुळे अकस्मात नष्ट
झाली त्याच्याच संगामुळे मी स्त्री व धन आदिचा परिग्रह केला आणि ह्या परिग्रहामुळेच
आता माझी तृष्णा आणखी वाढली आहे ॥१२०॥
दुःखं
यदैवैकशरीरजन्म शतार्धसंख्याकमिदं प्रसूतम् ।
परिग्रहेण
क्षितिपात्मजानां सुतैरनेकैर्बहुलीकृतं तत ॥ १२१ ॥
एक शरीर ग्रहण करणेच महान दुःख आहे आणि मी तर ह्या राजकन्यांचा
परिग्रह करून त्याला पन्नास पट वाढवले आहे. तसेच अनेक
पुत्रांमुळे
ते आणखी खूप वाढले आहे ॥१२१॥
सुतात्मजैस्तत्तनयैश्च
भूयोभूयश्च तेषां च परिग्रहेण ।
विस्तारमेष्यत्यदिदुःखहेतुः
परिग्रहो वै ममताभिधानः ॥ १२२ ॥
ह्यापुढे सुद्धा पुत्रांचे पुत्र तसेच त्यांचे पुत्र आणि
त्यांचे पुन्हापुन्हा विवाह सम्बन्ध केल्याने ते आणखी वाढेल . हा ममतारूप विवाहसम्बन्ध खचितच मोठ्या दुःखाचे कारण आहे
॥१२२॥
चीर्णं
तपो यत्तु जलाश्रयेणतस्यार्धिरेषा तपसोऽन्तरायः ।
मत्स्यस्य
सङ्गादभवच्च यो मे सुतादिरागो मुषितोऽस्मि तेन ॥ १२३ ॥
जलाशयात राहून मी जी तपस्या केली होती त्याचे फळ म्हणून
प्राप्त झालेली ही सम्पत्ति तपस्येला बाधक आहे . मत्स्याच्या
संगामुळे माझ्या मनात पुत्र आदिंविषयी जे प्रेम उप्तन्न झालेले त्यामुळेच मी फसलो ॥१२३॥
निःसङ्गता
मुक्तिपदं यतीनां सङ्गादशेषाः प्रभवन्ति दोषाः ।
आरूढयोगो
विनिपात्यतेऽधस्सङ्गेन योगी किमुताल्पबुद्धिः ॥ १२४ ॥
निस्संगताच यतिंना मुक्ति देणारी आहे, समस्त दोष संगामुळेच
उप्तन्न होतात. संगामुळेच योगारुढ यति
देखील पतित होतात, मग मन्दगति मनुष्याबद्दल काय बोलणार? ॥१२४॥
अहं
चरिष्यामि तदात्मनोऽर्थे परिग्रहग्राहगृहीतबुद्धिः ।
यदा
हि भूयः परिहीनदोषो जनस्य दुःखैर्भविता न दुःखी ॥ १२५ ॥
परिग्रहरूपी ग्राहाने माझी बुद्धि भ्रमित केली . आता मी असा उपाय करेन ज्यामुळे दोषांतून मुक्त होऊन परत
आपल्या कुटुम्बियांच्या दुःखानी मी दुःखी होऊ नये ॥१२५॥
सर्वस्य
धातारम चिन्त्यरूपमणोरणीयांसमतिप्रमाणम् ।
सितासितं
चेश्वरमीश्वराणामाराधयिष्ये तपसैव विष्णुम् ॥ १२६ ॥
आता मी सर्वांचा विधाता, अचिन्त्यरूप, अणु पेक्षाही अणु
आणि सर्वात महान् सत्त्व आणि तमः स्वरूप तसेच ईश्वरांचाही ईश्वर भगवान विष्णुची तपस्या
करून आराधना करेन ॥१२६॥
तस्मिन्नशेषौजसि
सर्वरूपिण्यव्यक्तविस्पष्टतनावनन्ते ।
ममाचलं
चित्तमपेतदोषं सदास्तु विष्णावमवाय भूयः ॥ १२७ ॥
त्या सम्पूर्ण तेजोमय, सर्वस्वरूप, अव्यक्त, विस्पष्टशरीर,
अनन्त श्रीविष्णू भगवानांमध्ये माझे दोषरहित चित्त सदा निश्वल राहो ज्यामुळे मला परत
जन्म घ्यावा लागू नये ॥१२७॥
समस्तभूतादमलादनन्तात्सर्वेश्वरादन्यदनादिमध्यात्
।
यस्मान्न
किञ्चित्तमहं गुरूणां परं गुरुं संश्रयमेमि विष्णुमा ॥ १२८ ॥
ज्या सर्वरूप, अमल, अनन्त, सर्वेश्वर आणि आदि मध्य शून्य
ह्याहून पृथक काहीही नाही अशा त्या गुरुजनांच्याही परम गुरु भगवान विष्णूला मी शरण
जातो' ॥१२८॥
श्रीपराशर
उवाच
इत्यात्मानमात्मनैवाभिधायासौ
सौभरिरपहाय पुत्रगृहासनपरिच्छदादिकमशेषमर्थजातं सकलभार्यासमन्वितो वनं प्रविवेश ॥ १२९
॥
श्रीपराशर म्हणाले ;- अशा प्रकारे मनात विचार करून सौभरि
मुनि पुत्र, गृह, आसन, परिच्छद आदि सम्पूर्ण पदार्थांचा त्याग करून आपल्या समस्त स्त्रियांसह
वनात गेले १२९॥
तत्राप्यनुदिनं वैखानसनिष्पाद्यमशेषक्रियाकलापं निष्पाद्य क्षपितसकलपापः परिपक्वमनोवृत्तिरात्मन्यग्नीन्समारोप्य
भिक्षुरभवत् ॥१३० ॥
तिथे, वानप्रस्थांच्या योग्य समस्त क्रिया कलापांचे अनुष्ठान
करत हुए सर्व पापांचा क्षय झाल्यावर व मनोवृत्ति राग द्वेषहीन झाल्यावर, आहवनीयादि
अग्निंना आपल्यात स्थापित करून ते संन्यासी झाले ॥१३० ॥
भगवत्यासज्याखिलं
कर्मकलापं हित्वानन्तमजमनादिनिधनमविकारमरणादिधर्ममवाप परमनन्तं परवतत्मच्युतं पदम्
॥ १३१ ॥
नंतर भगवंतात आसक्त होऊन सम्पूर्ण कर्मकलापांचा त्याग करून
परमात्मा परायण पुरुषांचे अच्युतपद (मोक्ष) प्राप्त केले, जे अजन्मा, अनादि, अविनाशी,
विकार आणि मरणादि धर्म ह्यांनी रहित, इन्द्रियांच्या अतीत व अनन्त आहे ॥१३१॥
इत्येतन्मान्धातृदुहितृसम्बन्धादाख्यातम् ॥ १३२ ॥
यश्चैतत्सौभरिचरितमनुस्मरति
पठति पाठयति शृणोति श्रावयति धरत्यवधारयति लिखति लेखयति शिक्षयत्यध्यापयत्युपदिशति
वा तस्य षट् जन्मानि दुःसन्ततिरसद्धर्मो वाङ्मनसयोरसन्मार्गाचरणमशेषहेतुषु वा ममत्वं
न भवति ॥ १३३ ॥
अशा प्रकारे मान्धाताच्या कन्यां सम्बन्धी मी हे चरित्र
वर्णन केले. जो कोणी ह्या सौभरि चरित्राचे
स्मरण करतो, ते वाचतो, वाचून घेतो, ऐकतो, ऐकवतो, धारण करतो, लिहीतो लिहून घेतो, शिकतो
शिकवतो किंवा उपदेश करतो त्याला पुढील सहा जन्म दुःसन्तति, असद्धर्म आणि वाणी किंवा
मनात कुमार्ग प्रवृति तसेच कोणत्याही पदार्थाविषयी ममत्त्व निर्माण होत नाही ॥१३२-१३३॥
इति श्रिविष्णुमहापुराणे चतुर्थे अंशे द्वितीयोऽध्यायः (२)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा