॥ विष्णुपुराणम् ॥
॥ चतुर्थ: अंशः ॥ प्रथमोऽध्यायः ॥
"वैवस्वतमनुच्या वंशाचे विवरण"
मैत्रेय उवाच
भगवन्यन्नरैः कार्यं साधुकर्मण्यवस्थितैः ।
तन्मह्यं गुरुणाख्यातं नित्यनैमित्तिकात्मकम् ॥ १ ॥
श्रीमैत्रेय म्हणाले ;– हे भगवन ! सत्कर्मामध्ये प्रवृत्त
राहणार्या पुरुषांनी करायच्या सर्व नित्य-नैमित्तिक कर्मांचे आपण वर्णन केले. || १ ||
वर्मधर्मास्तथाख्याता
धर्मा ये चाश्रमेषु च ।
श्रोतुमिच्छाम्यहं
वंशं राज्ञां तद्ब्रूहि मे गुरो ॥ २ ॥
हे गुरू ! आपण वर्ण-धर्म आणि आश्रम-धर्माची व्याख्या देखील
केलीत. आता मला राजवंशाचे विवरण ऐकण्याची इच्छा आहे, म्हणून आपण
त्याचे वर्णन करावे || २ ||
श्रीपराशर
उवाच
मैत्रेय
श्रूयतामयमनेकयज्वशूरवीरधीरभूपालालङ्कृतो ब्रह्मादिर्मानवो वंशः ॥ ३ ॥
श्रीपराशर म्हणाले ;– हे मैत्रेया ! आता तु अनेक यज्ञकर्ता,
शूरवीर आणि धैर्यशाली भूपालांनी सुशोभित ह्या मनुवंशाचे वर्णन ऐक ज्याचे आदिपुरुष श्रीब्रह्मा
आहेत || ३ ||
तदस्य वंशस्यनुपूर्वीमशेषवंशपापप्रणाशनाय मैत्रेयैतां कथं शृणु ॥ ४ ॥
हे मैत्रेया ! आपल्या वंशाचे सम्पूर्ण पाप नष्ट करण्यासाठी
ह्या वंश-परम्परेच्या कथेचे क्रमश: श्रवण कर || ४ ||
तद्यथा सकलजगतामादिरनादिभूतस्स ऋग्यजुःसामादिमयो भगवान् विष्णुस्तस्य ब्रह्मणो मूर्तं
रूपं हिरण्यगर्भो ब्रह्माण्डभूतो ब्रह्मा भगवान् प्राग्बभूव
॥ ५ ॥
ह्याचे विवरण अशाप्रकारे आहे – सकल संसाराचे आदिकारण भगवान
विष्णु आहेत. ते अनादि तथा ऋक – साम
– यजु: स्वरुप आहेत . त्या ब्रह्मस्वरूप भगवान
विष्णुचे मूर्त्तरूप म्हणजेच ब्रह्माण्डमय हिरण्यगर्भ भगवान ब्रह्मा सर्वात आधी प्रकट झाले || ५ ||
ब्रह्मणश्च दक्षिणाङ्गुष्ठजन्मा दक्षप्रजापतिः दक्षस्याप्यदितिरदितेर्विवस्वान् विवस्वतो
मनुः ॥ ६ ॥
ब्रह्माच्या उजव्या अंगठ्यापासून दक्षप्रजापति झाले, दक्षापासून
अदिति, अदितिपासून विवस्वान आणि विवस्वानापासून मनुचा जन्म झाला || ६ ||
मनोरिक्ष्वाकुनृगधृष्टशर्यातिनरिष्यन्तप्रांशुनाभगदिष्टकरूषपृषध्राख्या
दश पुत्रा बभूवुः ॥ ७ ॥
मनुला इक्ष्वाकु, नृग, धृष्ट, शर्याति, नरिश्यंत, प्रांशु,
नाभाग, दिष्ट, करूप, आणि पृषध्र असे दहा पुत्र झाले || ७ ||
इष्टिं च मित्रावरुणयोर्मनुः पुत्रकामश्चकार ॥ ८ ॥
मनुने पुत्रप्राप्तीच्या इच्छेने मित्रावरुण नामक दोन देवतांच्या
यज्ञाचे अनुष्ठान केले || ८ ||
तत्र तावदपह्नुते होतुरपचारादिला नाम कन्या बभूव ॥ ९ ॥
किन्तु यज्ञात होताने विपरीत संकल्प केल्याने विपर्यय झाला
आणि त्याला ‘इला’ नामक कन्या झाली || ९ ||
सैव च मित्रावरुणयोः प्रसादात्सुद्युम्नो नाम मनोः पुत्रो मैत्रेय आसीत् ॥ १० ॥
हे मैत्रेया ! मित्रावरुणांच्या कृपेने ही इला मनुचा ‘सुद्युम्न’
नामक पुत्र झाली || १० ||
पुनश्चेश्वरकोपात्स्त्री
सती सा तु सोममूनोर्बुधस्याश्रमसमीपे बभ्राम ॥ ११ ॥
त्यानंतर महादेवाच्या कोपप्रयुक्त शापामुळे ती परत स्त्री
होऊन चंद्राचा पुत्र बुध ह्याच्या आश्रमाजवळ भटकू लागली || ११
||
सानुरागाश्च तस्यां बुधः पुरूरवसमात्मजमुत्पादयामास ॥ १२ ॥
बुधाने अनुरक्त होऊन त्या स्त्रीपासून पुरुरवा नामक पुत्र
उत्पन्न केला || १२ ||
जातेपि
तस्मिन्नमिततेजोभिः परमर्षिभिरिष्टिमय ऋङ्मयो यजुर्मयस्साममयोऽथर्वणमयस्सर्ववेदमयो
मनोमयो ज्ञानमयो न किञ्चिन्मयोन्नमयो भगवान् यज्ञपुरुषस्वरूपी सुद्युम्नस्य पुंस्त्वमभिलषद्भिर्यथाव
दिष्टस्तत्प्रसादादिला पुनरपु सुद्युम्नोऽभवत् ॥ १३ ॥
पुरुरवाच्या जन्मानंतर सुद्धा परमर्षिगणांनी सुद्युम्नाला
पुरुषत्वलाभ व्हावा ह्या आकांक्षेने क्रतुमय ऋग्यजु: सामाथर्वमय, सर्ववेदमय, मनोमय,
ज्ञानमय, अन्नमय आणि परमार्थतः अकिचिन्मय भगवान यज्ञपुरुषाचे यथावत यजन
केले . तेव्हा त्यांच्या कृपेने
इला परत सुद्युम्न बनली || १३ ||
तस्याप्युतकलगयविनतास्त्रयः
पुत्रा बभूवुः ॥ १४ ॥
त्या सुद्युम्नाला सुद्धा उत्कल, गय आणि विनत नामक तीन
पुत्र झाले || १४ ||
सुद्युम्नस्तु स्त्रीपूर्वकत्वाद्राज्यभागं न लेभे ॥ १५ ॥
आधी स्त्री असल्याने सुद्युम्नाला राज्याधिकार प्राप्त
नाही झाले || १५ ||
तत्पित्रा तु वसिष्ठवचनात्प्रतिष्ठानं
नाम नगरं सुद्युम्नाय दत्तं तच्चासौ पुरूरवसे प्रादात् ॥ १६ ॥
वसिष्ठांच्या सांगण्यावरून त्याच्या पित्याने त्याला प्रतिष्ठान नामक नगर दिले होते तेच त्याने पुरुरवाला दिले || १६ ||
तदन्वयाश्च क्षत्रियाःसर्वै दिक्ष्वभवन् ।
पृषध्रस्तु मनुपुत्रो गुरुगोवधाच्छूद्रत्वमगमत् ॥ १७ ॥
पुरुरवाची संतति सम्पूर्ण दिशांमध्ये पसरलेले क्षत्रियगण
झाली. मनुचा पृषध्र नामक पुत्र
गुरूच्या गाईचा वध केल्यामुळे शुद्र झाला. || १७
||
मनोः पुत्रः करूषः करूषात्कारूषाः क्षत्रिया महाबलपराक्रमबभूवः ॥ १८ ॥
मनुचा दुसरा पुत्र करुष होता. करुष पासून
कारुष नामक महाबली आणि पराक्रमी क्षत्रियगण उत्पन्न झाले || १८ ||
दिष्टपुत्रस्तु नाभागो वैश्यतामगमत्तस्माद्बलन्धनः पुत्रोभवत् ॥ १९ ॥
दिष्टचा पुत्र नाभाग वैश्य झाला होता, त्याला बलन्धन नामका
पुत्र झाला || १९ ||
बलन्धनाद्वत्सप्रीतिरुदारकीर्तिः
॥ २० ॥ वत्सप्रीतेः प्रांशुरभवत् ॥ २१ ॥
प्रजापतिश्च
प्रांशोरेकोऽभवत् ॥ २२ ॥
बलन्धन पासून महान कीर्तिमान वत्सप्रीति, वत्सप्रीति पासून
प्रांशु आणि प्रांशुला प्रजापति नामक एकुलताएक पुत्र झाला || २० – २२ ||
ततश्च
खनित्रः ॥ २३ ॥ तस्माच्चाक्षुषः ॥ २४ ॥
चक्षुषाच्चातिबलपराक्रमो
विंशोऽभवत् ॥ २५ ॥
प्रजापतिला खनित्र, खनित्राला चाक्षुष आणि चाक्षुषाला अति
बल-पराक्रम- सम्पन्न विंश नावाचा पुत्र झाला || २३ – २५ ||
ततो
विविंशकः ॥ २६ ॥ तस्माच्च खनिनेत्रः ॥ २७ ॥ ततश्चाति-विभूतिः ॥ २८
॥
अतिविभूतेरतिबलपराक्रमः
करन्धमः पुत्रोऽभवत् ॥ २९ ॥
विंश पासून विविंशक, विविंशका पासून खनिनेत्र, खनिनेत्रा
पासून अतिविभूति आणि अतिविभूतिपासून अति बलवान आणि शूरवीर करन्धम नामक पुत्र झाला
|| २६ – २९ ||
तस्मादप्य-विक्षित्
॥ ३० ॥ अविक्षितोप्यतिबलपराक्रमः पुत्रो मरुत्तो नामाभवत्
।
यस्येमावद्यापि
श्लोकौ गीयेत् ॥ ३१ ॥
करन्धमाचा पुत्र होता अविक्षित आणि अविक्षिताला मरुत्त
नामक अति बल-पराक्रमयुक्त पुत्र झाला, ज्याच्या विषयी आजही हे दोन श्लोक गायले जातात
|| ३० – ३१ ||
मरुत्तस्य
यथा यज्ञस्तथा कस्याभवद्भुवि ।
सर्वं
हिरण्मयं यस्य यज्ञवस्त्वतिशोभनम् ॥ ३२ ॥
‘मरुत्ताचा जसा यज्ञ झाला होता तसा ह्या पृथ्वीवर आणखी
कोणाचाही झालेला नाही, त्या यज्ञातील सर्व याज्ञिक वस्तु सुवर्णमय आणि अति सुंदर होत्या
|| ३२ ||
अमाद्य-दिन्द्रस्सोमेन दक्षिणाभिर्द्विजातयः ।
मरुतः परिवेष्टारःसदस्याश्च दिवौकसः ॥ ३३ ॥
त्या यज्ञात इंद्र सोमरसामुळे आणि ब्राह्मणगण दक्षिणेमुळे परीतृत्प झाले होते, तसेच त्यात मरुद्रण वाढपी होते आणि देवगण सदस्य होते’ || ३३||
स मरुत्तश्चक्रवर्ति
नरिष्यन्तनामानं पुत्रमवाप ॥ ३४ ॥
तस्माच्च
दमः ॥ ३५ ॥ दमस्य पुत्रो राजवर्धनो जज्ञे ॥ ३६ ॥
त्या चक्रवर्ती मरुत्ताला नरिश्यंत नामक पुत्र झाला आणि
नरिश्यंताला दम आणि दमाला राजवर्धन नामक पुत्र झाला || ३४ – ३६ ||
राजवर्धनात्सुवृद्धिः
॥ ३७ ॥ सुवृद्धेः केवलः ॥ ३८ ॥ केवलात्सुधृतिरभूत्
॥ ३९ ॥
राजवर्धनला सुवृद्धि, सुवृद्धिला केवल आणि केवलापासून सुधृतिचा
जन्म झाला || ३७ – ३९ ||
ततश्च नरः ॥ ४० ॥
तस्माच्चन्द्रः ॥ ४१ ॥ ततः केवलोभूत् ॥ ४२ ॥
सुधृतिला नर, नराला चन्द्र आणि चन्द्राला केवल नावाचा पुत्र
झाला || ४० – ४२ ||
केवलाद्बन्धुमान्
॥ ४३ ॥ बन्धुमतो वेगवान् ॥ ४४ ॥ वेगवतो बुधः ॥ ४५ ॥
ततश्च
तृणबिन्दुः ॥ ४६ ॥
तस्याप्येका कन्या इलविला नाम ॥ ४७ ॥ ततश्चालम्बुषा नाम वराप्सरास्तृणबिन्दुं भेजे ॥ ४८ ॥तस्यामप्यस्य विशालो जज्ञे
यः पुरीं विशालं निर्ममे ॥ ४९ ॥
केवलाला बन्धुमान, बन्धुमानाला वेगवान, वेगवानाला बुध,
बुधाला तृणबिंदु झाला. तृणबिंदुच्या आधी इलविला नावाची एक कन्या झाली होती, पण नंतर
अलम्बुसा नावाची एक सुन्दर अप्सरा त्याच्यावर अनुरक्त झाली . तिच्यापासून तृणबिंदुला विशाल नामक पुत्र झाला, ज्याने
विशाला नावाची पुरी वसवली || ४३ – ४९ ||
हेमचन्द्रश्च विशालस्य
पुत्रोभवत् ॥ ५० ॥
ततश्चन्द्रः ॥ ५१ ॥ तत्तनयो धूम्राक्षः ॥ ५२ ॥ तस्यापि सृंजयोऽभूत् ॥ ५३ ॥सृञ्जयात्सहदेवः ॥ ५४ ॥ ततश्च कृशाश्वो नाम पुत्रोऽभवत्
॥ ५५ ॥
विशालचा पुत्र हेमचन्द्र झाला, हेमचन्द्राचा चन्द्र, चन्द्राचा
धूम्राक्ष, धूम्राक्षचा सृज्जय, त्याचा सहदेव आणि सहदेवचा पुत्र कृशाश्व झाला || ५०
– ५५ ||
सोमदत्तः कृशाश्वाज्जज्ञे योऽश्वमेधानां शतमाजहार ॥ ५६ ॥ तत्पुत्रो जनमेजयः ॥ ५७ ॥ जनमेजयात्सुमतिः
॥ ५८ ॥ एते वैशालिका भूभृतः ॥ ५९ ॥ श्लोकोऽप्यत्र गीयते ॥ ६० ॥
कृशाश्वाला सोमदत्त नामक पुत्र झाला, ज्याने शंभर अश्वमेध
यज्ञ केले होते . त्याच्यापासून जनमेजय झाला
आणि जनमेजयापासून सुमतिचा जन्म झाला . हे सर्व विशालवंशी राजा
झाले . ह्यांच्या विषयी हा श्लोक
प्रसिद्ध आहे || ५६ – ६० ||
तृणबिन्दोः
प्रसादेन सर्वे वैशालिका नृपाः ।
दीर्घायुषो
महात्मानो वीर्यवन्तोऽतिधर्मिकाः ॥ ६१ ॥
तृणबिंदुच्या प्रसादामुळे विशालवंशी समस्त राजा दीर्घायु,
महात्मा, वीर्यवान आणि धर्मपरायण झाले || ६१ ||
शर्यातेः
कन्या सुकन्यानामाभवत् यामुपयेमे च्यवन् ॥ ६२ ॥
मनुपुत्र शर्यातिला सुकन्या नावाची एक कन्या झाली, जिचा
विवाह च्यवन ऋषि सोबत झाला || ६२ ||
आनर्तनामा
परमधार्मिकः शर्यातिपुत्रोऽभवत् ॥ ६३ ॥
आनर्तस्यापि रेवतनामा पुत्रो जज्ञे योऽसावानर्त्तविषयं बुभुजे पुरीं च कुशस्थलीमध्युवास
॥ ६४ ॥
शर्यातिला आनर्त्त नामक एक परम धार्मिक पुत्र झाला. आनर्त्तला रेवत नामक पुत्र झाला ज्याने कुशस्थली नगरीत राहून आनर्त्तदेशाचा राज्यभोग केला || ६३- ६४ ||
रेवतास्यापि रैवतः पुत्रः ककुद्मिनामा धर्मात्मा भ्रातृशतस्य ज्योष्ठोऽभवत् ॥ ६५ ॥
रेवताला रैवत ककुद्यी नामक एक अति धर्मात्मा पुत्र होता,
जो आपल्या शंभर भावांमध्ये सर्वात मोठा होता || ६५ ||
तस्य रेवती नामकन्याभवत् ॥ ६६ ॥
त्याला रेवती नावाची एक कन्या झाली || ६६ ||
स तामादाय कस्येयमर्हतीति
भगवन्तमब्जयोनिं प्रष्टुं ब्रह्मलोकं जगाम् ॥ ६७ ॥
महाराज रैवत तिला घेऊन ब्रह्माला हे विचारायला कि ‘ही कन्या
कोणत्या वरासाठी योग्य आहे’ ब्रह्मलोकात गेला || ६७ ||
तावच्च
ब्रह्मणोऽन्तिके हाहाहूहूसंज्ञाभ्यां गन्धर्वाभ्यामतितानं नाम दिव्यं गान्धर्वमगीयत
॥ ६८ ॥
त्यावेळी ब्रह्मा जवळ हाहा आणि हूहू नामक दोन गन्धर्व अतितान
नामक दिव्य गायन करत होते || ६८ ||
तच्च त्रिमार्गपरिवृत्तैरनेकयुगपरिवृत्तिं तिष्ठन्नपि रैवतः शृण्वन्मुहूर्त्तमिव मेने
॥ ६९ ॥
तिथे गायन-सम्बन्धी चित्रा, दक्षिणा आणि धात्री नामक त्रिमार्गाच्या परिवर्तनासह त्यांचे विलक्षण गायन ऐकताना अनेक युगांच्या परिवर्तन-काळापर्यंत राहूनही रैवताला केवळ एकच मुहूर्त काळ गेल्यासारखा वाटला|| ६९ ||
गीतावसाने चज भगवन्तमब्जयोनिं प्रणम्य रैवतः कन्यायोग्यं वरमपृच्छत् ॥ ७० ॥
गायन समाप्त झाल्यावर रैवताने कमलयोनि भगवानांना प्रणाम
करून त्यांच्याकडे आपल्या कन्येसाठी योग्य वराची विचारणा केली || ७० ||
ततश्चासौ भगवानकथयत कथय योऽभिमतस्ते वर इति ॥ ७१ ॥
भगवान ब्रह्मा म्हणाले – “तुझ्या मनात जे वर आहेत ते सांग
” || ७१ ||
पुनश्च
प्रणम्य भगवते तस्मै यथाभिमतानात्मनस्स वरान् कथयामास ।
क एषां
भगवतोऽभिमत इति यस्मै कन्यामिमां प्रयच्छामीति ॥ ७२ ॥
तेव्हा रैवताने भगवान ब्रह्माला पुन्हा प्रणाम करून आपल्या
मनातील समस्त वरांचे वर्णन केले व विचारले की ‘ह्याच्यातील तुम्हाला कोणता वर पसंत
आहे ज्याला मी माझी ही कन्या देऊ ?’ || ७२ ||
ततः
किञ्चिदवनतशिरास्सस्मितं भगवानब्जयोनिराह ॥ ७३ ॥
ह्यावर भगवान कमलयोनि ब्रह्मा हसून म्हणाले || ७३ ||
य एते भवतोऽभिमता नैतेषां साम्प्रतं पुत्रपौत्रापत्यापत्यसन्ततिरस्त्यवनीतले ॥ ७४ ॥
तुला जो जो वरअभिप्रेत आहे आता तर पृथ्वीवर त्यांच्यापैकी
कोणाची पुत्र-पौत्रादि संतति देखील शिल्लक नाही || ७४ ||
बहूनि तवात्रैव गान्धर्वं शृण्वतश्चतुर्यगान्यतीतानि ॥ ७५ ॥
कारण इथे गन्धर्वांचे गायन ऐकताना कितीतरी चतुर्युग होऊन
गेली आहेत|| ७५ ||
साम्प्रतं
महीतलेऽष्टाविंशतितममनोश्चतुर्युगमतीतप्रायं वर्तते ॥ ७६ ॥ आसन्नो हि कलिः ॥ ७७ ॥
आता पृथ्वीतलावर अट्ठावीसाव्या मनुचे चतुर्युग समाप्त झाले
आहे || ७६ || आणि कलियुगाचा प्रारम्भ होणार आहे || ७७ ||
अन्यस्मै
कन्यारत्नमिदं भवतैकाकिनाभिमताय देयम् ॥ ७८ ॥
भवतोपि
पुत्रमित्रकलत्रमन्त्रिभृत्यबन्धुबलकोशादयःसमस्ताः कालेनैतेनात्यन्तमतीताः ॥ ७९ ॥
आता तु एकटाच राहीला आहेस, म्हणून हे कन्या-रत्न कोणा योग्य
वराला दे . इतक्या काळात तुझे पुत्र,
मित्र, कलत्र, मंत्रिवर्ग, भूत्यगण, बन्धुगण, सेना और कोशादि सर्वांचा अभाव झाला आहे
म्हणजेच ह्यापैकी काहीही आता उरलेले नाही ” || ७८-७९ ||
ततः पुनरप्युत्पन्नसाध्वसो राजा भगवन्तं प्रणम्य पप्रच्छ ॥ ८० ॥ भगवन्नेवमवस्थिते मयेयं
कस्मै देयेति ॥ ८१ ॥ ततःस भगवान् किञ्चिदवनम्रकन्धरः कृताञ्जलिर्भूत्वा सर्वलोकगुरुरम्भोजयोनिराह
॥ ८२ ॥
तेव्हा राजा रैवताने अत्यंत भयभीत होऊन भगवान ब्रह्माला पुन्हा प्रणाम करून विचारले || ८० || ‘भगवन ! असे असेल तर आता हीला मी कोणाला देऊ ?’ || ८१ || तेव्हा सर्वलोकगुरु भगवान कमलयोनि हात जोडून म्हणाले || ८२ ||
ब्रह्मोवाच
न ह्यादिमध्यान्तमजस्य
यस्य विद्मो वयं सर्वमयस्य धातुः ।
न च
स्वरूपं न परं स्वभावं न चैव सारं परमेश्वरस्य
॥ ८३ ॥
श्रीब्रह्मा म्हणाले ;– ज्या अजन्मा, सर्वमय, विधाता परमेश्वराचा
आदि, मध्य, अंत, स्वरूप, स्वभाव आणि सार आपण कोणीच जाणत नाही || ८३ ||
कलामुहूर्त्तादिमयश्च
कालो न यद्विभूतेः परिणामहेतुः ।
अज्मनाशस्य
सदैकमुर्त्ते-रनामरूपस्य सनातनस्य ॥ ८४ ॥
कला मुहुर्त आदिमय काळ सुद्धा ज्याच्या विभूतिच्या परिणामाचे
कारण नाही होऊ शकत, ज्याचा जन्म आणि मृत्यु होत नाही, जो सनातन आणि सर्वदा एकरूप आहे
तसेच नाम रूपाने रहित आहे || ८४ ||
यस्य
प्रसादादहमच्युतस्य भूतः प्रजासृष्टिकरोऽन्तकारी
।
क्रोधाच्च
रुद्रः स्थितिहेतुभूतो यस्माच मध्ये पुरुषः परस्मात्
॥ ८५ ॥
ज्या अच्युताच्या कृपेने मी प्रजेचा उत्पत्तिकर्ता आहे,
ज्याच्या क्रोधापासून उत्पन्न झालेला रूद्र सृष्टिचा अंतकर्त्ता आणि आणि ज्या परमात्म्यापासून
मध्ये जगत्स्थितिकारी विष्णुरूप पुरुषाचा प्रादुर्भाव झाला आहे || ८५ ||
मद्रूपमास्थाय
सृजत्यजो यः स्थितौ च योऽसौ पुरुषस्वरूपी ।
रुद्रस्वरूपेण
च योऽत्ति विश्वं
धत्ते तथानन्तवपुःसमस्तम् ॥ ८६ ॥
जो अजन्मा माझे रूप धारण करून संसाराची रचना करतो, स्थितिच्या
समयी जो पुरुषरूप आहे आणि रुद्ररूपाने सम्पूर्ण विश्वाचा ग्रास करतो तसेच अनंतरूपाने
सम्पूर्ण जगताला धारण करतो || ८६ ||
पाकाय
योग्नित्वमुपैति लोकान्बिभर्त्ति पृथ्वीवपुरव्यायात्मा ।
शक्रादिरूपी
परिपाति विश्वमर्केन्दुरूपश्च तमो हिनस्ति ॥ ८७ ॥
जो अव्ययात्मा पाक साठी अग्निरूप होतो, पृथ्वीरूपाने सम्पूर्ण
लोकांना धारण करतो, इन्द्रादिरूपाने विश्वाचे पालन करतो आणि सूर्य तथा चन्द्ररूप होऊन
सम्पूर्ण अन्धकाराचा नाश करतो || ८७ ||
करोति
चेष्टाः श्वसनस्वरूपीलोकस्य तृप्तिं च जलान्नरूपी ।
ददाति
विश्वस्थितिसंस्थितस्तुसर्वावकाशं च नभःस्वरूपी ॥ ८८ ॥
जो श्वास-प्रश्वासरूपाने जीवांमध्ये चेष्टा करतो, जल व
अन्नरूपाने लोकांची तृप्ति करतो, तसेच विश्वस्थितीत संलग्न राहून जो आकाशरूपाने सर्वांना
अवकाश देतो || ८८ ||
यःसृज्यते
सर्गकृदात्मनैव यः पाल्यते पालयिता च देवः ।
विश्वात्मकःसंहृयतेन्तकारी
पृथक् त्रयस्यास्य च योव्ययात्मा ॥ ८९ ॥
जो सृष्टिकर्ता असूनही विश्वरूपाने स्वतःच स्वतःची रचना
करतो, जगताचा पालनकर्ता असूनही स्वतःच पालित होतो आणि संहारकारी असूनही स्वयं संहृत
होतो आणि जो ह्या तीन्हींपेक्षा पृथक त्यांचा अविनाशी आत्मा आहे || ८९ ||
यस्मिञ्जगद्यो
जगदेतदाद्यो यं चाश्रितोस्मिञ्जगति स्वयम्भूः ।
स सर्वभूतप्रभवो
धरित्र्यां स्वांशेन विष्णुर्नृपतेऽवतीर्णः ॥ ९० ॥
ज्याच्यात हे जगत स्थित आहे, जो आदिपुरुष जगत स्वरूप आहे
आणि ह्या जगताचाच आश्रित तथा स्वयम्भू आहे, हे नृपते ! सम्पूर्ण भूतांचा उद्भवस्थान
तो विष्णू धरातलावर आपल्या अंशाने अवतीर्ण झाला आहे || ९० ||
कुशस्थली
या तव भूप रम्या पुरी पुराभूदमरावतीव ।
सा द्वारका
सम्प्रति तत्र चास्ते स केशवांशो बलदेवनामा
॥ ९१ ॥
हे राजन ! पूर्वकाळी तुझी जी अमरावती समान कुशस्थली नावाची
पुरी होती ती आता द्वारकापुरी झाली आहे . तिथेच हे बलदेव नामक भगवान
विष्णुचे अंश विराजमान आहेत || ९१ ||
तस्मै
त्वमेनां तनयां नरेन्द्र प्रायच्छ मायामनुजाय जायाम्
।
श्लोघ्यो
वेरोऽसौ तनया तवेयं स्त्रीरत्नभूता सदृशो
हि योगः ॥ ९२ ॥
हे नरेन्द्रा ! तु तुझी ही कन्या त्या मायामानव श्रीबलदेवाला
पत्नीरूपात दे . हा बलदेव संसारात अति प्रशंसनीय
आहे आणि तुझी कन्या सुद्धा स्त्रियांमध्ये रत्नस्वरूपा आहे, म्हणून ह्यांचा योग सर्वथा
उपयुक्त आहे || ९२ ||
श्रीपराशर
उवाच
इतीरितोऽसौ
कमलोद्भवेन भुवं समासाद्य पतिः प्रजानाम् ।
ददर्श
ह्रस्वान् पुरुषान् विरूपानल्पौजसःस्वल्पविवेकविर्यान् ॥ ९३ ॥
श्रीपराशर म्हणाले ;– भगवान ब्रह्माने असे म्हटल्यावर प्रजापति
रैवत पृथ्वी तलावर आले. त्यांनी पाहिले कि सर्व माणसं छोटीछोटी, कुरूप, अल्प-तेजोमय,
अल्पवीर्य तथा विवेकहीन झाली होती || ९३ ||
कुशस्थलीं
तां च पुरीमुपेत्य दृष्ट्वान्यरूपां प्रददौ स कन्याम् ।
सीरायुधाय
स्फटिकाचलाभ- वक्षःस्थलायातुलधीर्नरेद्रः ॥ ९४ ॥
अतुलबुद्धि महाराज रैवताने आपल्या कुशस्थली नामक पुरीचे
वेगळेच रूप पाहिले आणि स्फटिक पर्वतासमान ज्याचे वक्ष:स्थल आहे त्या भगवान् हलायुधाला
आपली कन्या दिली || ९४ ||
उच्चप्रमाणामिति
तामवेक्ष्यस्वलाङ्गलाग्रेण च तालकेतुः ।
विनम्रयामास
ततश्च सापि बभूव सद्यो वनिता यथान्या ॥ ९५ ॥
भगवान बलदेवाने ती खूप ऊंच असलेली पाहून तिला हलकेच आपल्या
अग्रभागाने दाबून थोडे खाली केले | तेव्हा रेवती सुद्धा तत्कालीन अन्य स्त्रियांसारखी
झाली || ९५ ||
तां
रेवतीं रैवतभूपकन्यां सीरायुधोऽसौ विधिनोपयेमे ।
दत्त्वाथ
कन्यां स नृपो जगाम हेमालयं वै तपसे धृतात्मा
॥ ९६ ॥
त्यानन्तर बलरामाने महाराज रैवताची कन्या रेवती हिच्यासोबत
विधिपूर्वक विवाह केला तसेच राजा रेवत सुद्धा कन्यादान केल्यानंतर एकाग्रचित्ताने तपस्या
करण्यासाठी हिमालयावर निघून गेला || ९६ ||
इति श्रीविष्णुमहापुराणे चतुर्थे अंशे प्रथमोध्यायः (१)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा