॥ विष्णुपुराणम् ॥
॥ तृतीयः अंशः ॥ अष्टादशोऽध्यायः ॥
"मायामोह आणि असुरांचा
संवाद तसेच राजा शतधनुची कथा"
श्रीपराशर उवाच
तपस्यभिरतान्सोऽथ
मायामोहो महासुरान् ।
मैत्रेय
ददृशे गत्वा नर्मदातीरसंश्रितान् ॥ १ ॥
श्रीपराशर म्हणाले ;– हे मैत्रेया ! त्यानन्तर मायामोहाने जाऊन पाहिले की असुरगण नर्मदेच्या
तटावर तपस्या करत होते || १ ||
ततो दिगम्बरो
मुण्डो बर्हिपिच्छधरो द्विज ।
मायामोहोऽसुरान्
श्लक्ष्णमिदं वचनमब्रवीत् ॥ २ ॥
तेव्हा त्या मयूरपंखधारी
दिगम्बर आणि मुण्डितकेश मायामोहाने असुरांना अति मधुर वाणीत असे म्हटले || २ ||
मायामोह उवाच
हे दैत्यपतयो
ब्रूत यदर्थ तप्यते तपः ।
ऐहिकं वार्थ
पारत्र्यं तपसः फलमिच्छथ ॥ ३ ॥
मायामोह
म्हणाला;– हे दैत्यपतिगण ! मला सांगा, तुम्ही कोणत्या उद्देशाने तपस्या करत आहाता, तुम्हाला लौकिक फळाची इच्छा आहे
की पारलौकिक ? || ३ ||
असुरा
ऊचुः
पारत्र्यफललाभाय
तपश्चर्या महामते ।
अस्माभिरियमारब्धा
किं वा तेऽत्र विवक्षितम् ॥ ४ ॥
असुरगण म्हणाले ;– हे महामते ! आम्ही पारलौकिक फळाच्या कामनेने तपस्या आरम्भ केली
आहे . ह्या विषयी तुला आमच्याशी काय
बोलायचे आहे ? || ४ ||
मायामोह
उवाच
कुरुध्वं
मम वाक्यानि यदि मुक्तिमभीप्सथ ।
अर्हध्वमेतं
धर्मं च मुक्तिद्वारमसंवृतम् ॥ ५ ॥
मायामोह म्हणाला ;– जर तुम्हाला मुक्तिची इच्छा आहे तर जसं मी सांगतो तसं करा . तुम्ही मुक्तिच्या उघड्या दरवाजावर
ह्या धर्माचा आदर करा || ५ ||
धर्मो
विमुक्तेरर्होयं नैतस्मादपरो वरः ।
अत्रैव
संस्थिताः स्वर्गं विमुक्तिं वा गमिष्यथ ॥ ६ ॥
अर्हध्वं
धर्ममेतं च सर्वे यूयं महाबलाः ॥ ७ ॥
हा धर्म मुक्तिसाठी परमोपयोगी
आहे . ह्याहून श्रेष्ठ अन्य कोणताच
धर्म नाही . ह्याचे अनुष्ठान केल्याने तुम्ही
स्वर्ग अथवा मुक्ति ज्याची कामना कराल ते प्राप्त होईल . तुम्ही सगळे महाबलवान आहात, म्हणून ह्या धर्माचा आदर करा
|| ६ – ७ ||
श्रीपराशर
उवाच
एवम्प्रकारैर्बहुभिर्युक्तिदर्शनचर्चितैः
।
मायामोहेन
ते दैत्या वेदमार्गादपाकृताः ॥ ८ ॥
श्रीपराशर म्हणाले ;– अशाप्रकारे नाना प्रकारच्या
युक्तिंनी आणि अतिरंजित वाक्यांनी मायामोहाने दैत्यगणांना वैदिक मार्गापासून भ्रष्ट
केले || ८ ||
धर्मायैतदधर्माय
सदेतन्न सदित्यपि ।
विमुक्तये
त्विदं नैतद्विमुक्तिं सम्प्रयच्छति ॥ ९ ॥
परमार्थोऽयमत्यर्थं
परमार्थो न चाप्ययम् ।
कार्यमेतदकार्यं
च नैतदेवं स्फुटं त्विदम् ॥ १० ॥
दिग्वाससामयं
धर्मो धर्मोऽयं बहुवाससाम् ॥ ११ ॥
इत्यनेकान्तवादं
च मायामोहेन नैकधा ।
तेन
दर्शयता दैत्याःस्वधर्मं त्याजिता द्विज ॥ १२ ॥
हे धर्मयुक्त आहे
व हे धर्मविरुद्ध, हे सत आहे आणि हे असत, हे मुक्तिकारक आहे आणि ह्यामुळे मुक्ति मिळत नाही, हा आत्यन्तिक परमार्थ आहे व हा
परमार्थ नाही आणि हे स्पष्टपणे असेच आहे, हा दिगम्बरांचा धर्म आहे आणि हा साम्बरांचा धर्म आहे – हे द्विजा
! असे अनेक प्रकारचे असंख्य वाद दाखवून मायामोहाने दैत्यांना स्वधर्मापासून च्युत केले
|| ९ – १२ ||
अर्हतैतं महाधर्मं मायामोहेन
ते यतः ।
प्रोक्तास्तमाश्रिता धर्ममर्हतास्तेन तेऽभवन् ॥ १३ ॥
मायामोहाने दैत्यांना
सांगितले होते की तुम्ही ह्या महाधर्माचा ‘अर्हत’ अर्थात आदर करा . म्हणून त्या धर्माचे अवलम्बन
केल्याने ते ‘आर्हत’ म्हणून विख्यात झाले || १३ ||
त्रयीधर्मसमुत्सर्गं
मायामोहेन तेऽसुराः ।
कारीतास्तन्मया
ह्यासंस्ततोन्ये तत्प्रचोदिताः ॥ १४ ॥
मायामोहाने असुरगणांना
त्रयीधर्मापासून विमुक्त केले व ते मोहग्रस्त झाले; त्यानंतर त्यांनी अन्य दैत्यांनाही
ह्याच धर्मात प्रवृत्त केले || १४ ||
तैरप्यन्ये
परे तैश्च तैरप्यन्ये परे च तैः ।
अल्पैरहोभिः
सन्त्यक्ता तैर्दैत्यैः प्रायशस्त्रयी ॥ १५ ॥
त्यांनी दुसर्या
दैत्यांना, दुसर्यांनी तिसर्याला, तिसर्यांनी चौथ्यांना व त्यांनी इतरांना ह्याच धर्मात
प्रवृत्त केले . अशाप्रकारे थोड्याच दिवसात दैत्यगणांनी
वेदत्रयीचा त्याग केला || १५ ||
पुनश्च रक्ताम्बरधृङ्
मायामोहो जितेन्द्रियः ।
अन्यानाहासुरान्
गत्वा मृद्वल्पमधुराक्षरम् ॥ १६ ॥
त्यानन्तर जितेन्द्रिय
मायामोहाने रक्तवस्त्र धारण करून अन्यान्य असुरांजवळ जाऊन त्यांच्याशी मृदु, अल्प व मधुर शब्दात म्हटले || १६ ||
स्वर्गार्थं
यदि वो वाञ्छा निर्वाणार्थमथासुराः ।
तदलं पशुघातादिदुष्टधर्मैर्निबोधत
॥ १७ ॥
‘हे असुरगणांनो ! जर तुम्हाला स्वर्ग अथवा मोक्षाची इच्छा आहे
तर पशुहिंसा आदि दुष्टकर्मांचा त्याग करून बोध प्राप्त करा || १७ ||
विज्ञानमयमेवैतदशेषमवगच्छत
।
बुध्यध्वं
मे वचः सम्यग्बुधैरेवमिहोदितम् ॥ १८ ॥
जगदेतदनाधारं
भ्रान्तिज्ञानार्थतत्परम् ।
रागादिदुष्टमत्यर्थं
भ्राम्यते भवसंकटे ॥ १९ ॥
हे सम्पूर्ण जगत विज्ञानमाय
आहे – असे जाणा . माझ्या बोलण्यावर पूर्ण लक्ष
द्या . ह्या संसार संकटात जीव अत्यंत
भटकता राहतो || १८-१९ ||
एवं बुध्यत बुध्यध्वं बुध्यतैवमितीरयन् ।
मायामोहः स
दैतेयान्धर्ममत्याञ्जयन्निजम् ॥ २० ॥
अशाप्रकारे ‘बुध्यत (जाणा), बुध्यर्ध्व (समजा), आदि शब्दांनी बुद्धधर्माचा निर्देश
करून मायामोहाने दैत्यांना त्यांचा निजधर्म सोडायला लावला || २० ||
नानाप्रकारवचनं स तेषां युक्तियोजितम् ।
तथा तथा त्रयीधर्मं तत्यजुस्ते यथा यथा ॥ २१ ॥
मायामोहाने अशी अनेक
प्रकारची युक्तियुक्त वाक्य सांगितली ज्यामुळे दैत्यगणांनी त्रयीधर्माचा त्याग केला
|| २१ ||
तेऽप्यन्येषां तथैवोचुरन्यैरन्ये तथोदिता ।
मैत्रेय तत्यजुर्धर्मं
वेदेस्मृत्युदितं परम् ॥ २२ ॥
त्या दैत्यगणांनी
अन्य दैत्यांना व त्यांनी इतरांना अशीच वाक्य सांगितली . हे मैत्रेया ! अशाप्रकारे त्यांनी श्रुतिस्मृतिविहित आपल्या परम
धर्माचा त्याग केला || २२ ||
अन्यानप्यन्यपाषण्डप्रकारैर्बहुहिर्द्विज
।
दैतेयान्मोहयामास
मायामोहोदिमोहकृत् ॥ २३ ॥
हे द्विजा ! मोह्कारी
मायामोहाने इतरही अनेकानेक दैत्यांना अशाच प्रकारे मोहित केले || २३ ||
स्वल्पेनैव हि कालेन मायामोहेन तेऽसुराः ।
मोहितास्तत्यजुःसर्वां
त्रयीमार्गाश्रितां कथाम् ॥ २४ ॥
थोड्याच काळाने मायामोह
द्वारा मोहित होऊन असुरगणाने वैदिक धर्माविषयी बोलणे सुद्धा सोडून दिले || २४ ||
केचिद्विनिन्दां
वेदानां देवानामपरे द्विज ।
यज्ञकर्मकलापस्य तथान्ते च द्विजन्मनाम् ॥ २५ ॥
हे द्विजा ! त्यांच्यापैकी
कोणी वेदांची की, कोणी देवतांची, कोणी याज्ञिक कर्म – कलापांची तसेच कोणी ब्राह्मणांची निंदा करू लागले || २५ ||
नैनद्युक्तिसहं वाक्यं हिंसा धर्माय चेष्यते
।
हवींष्यनलदग्धानि
फलायेत्यर्भकोदितम् ॥ २६ ॥
हिंसेतही धर्म असतो
– ही गोष्ट अजिबात युक्तिसंगत नाही . अग्नित हवि जाळल्याने
फळ मिळेल - हे तर अबोध बालकाने सांगितल्यासारखं वाटतं || २६ ||
यज्ञैरनेकैर्देवत्वमवाप्येन्द्रेण
भुज्यते ।
शम्यादि यदि
चेत्काष्ठं तद्वरं पत्रभुक्पशु ॥ २७ ॥
अनेक यज्ञां द्वारा
देवत्वाचा लाभ मिळाल्यावरही इंद्राला जर शमी आदि काष्ठाचे भोजन करावे लागत असेल तर
त्यापेक्षा पालापाचोळा खाणारा पशुच जास्त चांगला || २७ ||
निहतस्य पशोर्जज्ञे स्वर्गप्राप्तिर्यदीष्यते
।
स्वपिता यजमानेन
किन्नु तस्मान्न हन्यते ॥ २८ ॥
जर यज्ञात बळी दिलेल्या
पशुला स्वर्गप्राप्ति होते तर मग यजमान आपल्या पित्यालाच का नाही मारून टाकत ? || २८ ||
तृप्तये जायते पुंसो भुक्तमन्येन चेत्ततः ।
कुर्याच्छ्राद्धं श्रमायान्नं न वहेयुः प्रवासिनः ॥ २९ ॥
जर कोणा अन्य पुरुषाने
भोजन केल्यामुळे दुसरा कोणी पुरुष तृप्त होतो तर विदेशी यात्रेत खाद्यपदार्थ घेऊन जायचे
परिश्रम घेण्याची काय आवश्यकता आहे; पुत्रगण घरातच श्राद्ध करू देत || २९ ||
जनश्रद्धेयमित्येतदवगम्य ततोऽत्र वः ।
उपेक्षा श्रेयसे
वाक्यं रोचतां यन्मयेरितम् ॥ ३० ॥
म्हणून हे समजून की
‘हे (श्राद्धादि कर्मकांड) लोकांची अंध-श्रद्धाच आहे’ त्याच्या प्रति उपेक्षा करायला
हवी आणि आपल्या श्रेय साधनासाठी जे काही मी सांगितले ते आवडीने करावे || ३० ||
न ह्यप्तवादा
नभसो निपतन्ति महासुराः ।
युक्तिमद्वचनं
ग्राह्यं मयान्यैश्च भवद्विधैः ॥ ३१ ॥
हे असुरगणांनो ! श्रुति
आदि आप्तवाक्य आकाशातून पडत नाहीत . आम्ही, तुम्ही आणि अन्य सर्वांनीच युक्तियुक्त वाक्यांचे ग्रहण करायला हवे || ३१ ||
श्रीपराशर उवाच
मयामोहेन ते
दैत्याः प्रकारैर्बहुभिस्तथा ।
वृथापिता यथा
नैषां त्रयी कश्चिदरोचयत् ॥ ३२ ॥
श्रीपराशर म्हणाले ;– अशाप्रकारे अनेक युक्त्या
वापरून मायामोहाने दैत्यांना विचलित केले ज्यामुळे त्याच्यातील कोणालाही वेदत्रयीत
रूचि उरली नाही || ३२ ||
इत्थमुन्मार्गयातेषु
तेषु दैत्येषु तेऽमराः ।
उद्योगं परमं
कृत्वा युद्धाय समुपस्थिताः ॥ ३३ ॥
अशाप्रकारे दैत्य
विपरीत मार्गात प्रवृत्त झाल्यावर भरपूर तयारी करून देवगण त्यांच्याशी युद्ध करायला
गेले || ३३ ||
ततो दैवासुरं
युद्धं पुनरेवाभवद् द्विज ।
हताश्च तेऽसुरा
दैवैः सन्मार्गपरिपन्थिनः ॥ ३४ ॥
हे द्विजा ! तेव्हा
देवता आणि असुरांमध्ये पुन्हा युद्ध छेडले गेले . त्यात सन्मार्गविरोधी दैत्यगण देवतांद्वारा मारले गेले || ३४ ||
स्वधर्मकवचं
तेषामभूद्यत्प्रथमं द्विज ।
तेन रक्षाभवत्पूर्वं
नेशुर्नष्टे च तत्र ते ॥ ३५ ॥
हे द्विजा ! आधी दैत्यांजवळ
जे स्वधर्मरूपी कवच होते त्यामुळे त्यांचे त्यांची रक्षा झाली होती . ह्यावेळी ते नष्ट झाल्याने ते दैत्य सुद्धा
नष्ट झाले || ३५ ||
ततो मैत्रेय
तन्मार्गवर्तिनो येऽभवञ्जनाः ।
नग्नास्ते तैर्यतस्त्यक्तं
त्रयीसंवरणं तथा ॥ ३६ ॥
हे मैत्रेया ! तेव्हापासून
जे लोक मायामोह द्वारा प्रवर्तित मार्गाचे अवलम्बन करू लागले ते ‘नग्न’ म्हणवले गेले कारण
त्यांनी वेदत्रयीरूप वस्त्राचा त्याग केला होता ||३६ ||
ब्रह्मचारीगृहस्थश्च
वानप्रस्थस्तथाश्रमी ।
परिव्राड् वा
चतुर्थोऽत्र पञ्चमो नोपपद्यते ॥ ३७ ॥
ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ व संन्यासी – हे चारच
आश्रमी आहेत . ह्यांच्या व्यतिरिक्त पाचवा आश्रमी
आणखी कोणीही नाही || ३७ ||
वस्तु सन्त्यज्य
गार्हस्थ्यं वानप्रस्थो न जायते ।
परिव्राट् चापि
मैत्रेय स नग्नः पापकृन्नरः ॥ ३८ ॥
हे मैत्रेया ! जो
पुरुष गृहस्थाश्रमाचा त्याग केल्यानंतर वानप्रस्थ किंवा संन्यासी होत नाही तो पापी
सुद्धा नग्नच आहे || ३८ ||
नित्यानां कर्मणां
विप्र यस्य हानिरहर्निशम् ।
अकुर्वन्विहितं
कर्म शक्तः पतति तद्दिने ॥ ३९ ॥
हे विप्रा ! सामर्थ्य
असूनही जो विहित कर्म करत नाही तो त्याच दिवशी पतित होतो आणि त्या एक दिवस-रात्रीतच
त्याच्या सम्पूर्ण नित्यकर्मांचा क्षय होतो || ३९ ||
प्रायश्चित्तेन महता शुद्धिमाप्नोत्यनापदि ।
पक्षं नित्यक्रियाहानेः कर्ता मैत्रेय मानवः ॥ ४० ॥
हे मैत्रेया ! आपत्तिकाळ
सोडून इतर वेळी एका पक्षापर्यंत नित्यकर्माचा त्याग करणारा पुरुष महान प्रायश्चित्तानेच
शुद्ध होऊ शकतो || ४० ||
संवत्सरं क्रियाहानिर्यस्य
पुंसोऽभिजायते ।
तस्यावलोकनात्सूर्यो
निरीक्ष्यःसाधुभिः सदा ॥ ४१ ॥
जो पुरुष एक वर्ष
नित्य-क्रिया करत नाही त्याच्यावर दृष्टि पडल्यास साधू पुरुषाला सदा सूर्याचे दर्शन
करणे गरजेचे आहे || ४१ ||
स्पृष्टे स्नानं
सचैलस्य शुद्धेर्हेतुर्महामते ।
पुंसो भवति
तस्योक्ता न शुद्धिः पापकर्मणः ॥ ४२ ॥
हे महामते ! अशा पुरुषाचा
स्पर्श झाला तर वस्रसहित स्नान केल्याने शुद्धि होऊ शकते व त्या पापात्म्याची शुद्धि
मात्र कोणत्याही प्रकारे होऊ शकत नाही || ४२ ||
देवर्षिपितृभूतानि
यस्य निःश्वस्य वेश्मनि ।
प्रयान्त्यनर्चितान्यत्र
लोके तस्मान्न पापकृत् ॥ ४३ ॥
ज्या मनुष्याच्या
घरून देवगण, ऋषिगण, पितृगण व भूतगण पूजित न झाल्याने नि:श्वास सोडत अन्यत्र जातात जगात त्याच्याहून मोठा पापी कोणी
नाही || ४३ ||
सम्भाषणानुप्रश्नादि
सहास्यां चैव कुर्वतः ।
जायते तुल्यता
तस्य तेनैव द्विज वत्सरात् ॥ ४४ ॥
हे द्विजा ! अशा पुरुषासोबत
एक वर्ष सम्भाषण, कुशलप्रश्न आणि उठबस केलेला मनुष्य त्याच्याच समान पापात्मा होतो || ४४ ||
देवादिनिःश्वासहतं
शरीरं यस्य वेश्म च ।
न तेन संकरं
कुर्याद् गृहासनपरिच्छदैः ॥ ४५ ॥
ज्याचे शरीर अथवा गृह देवता आदिंच्या
नि:श्वासाने निहत आहे त्याच्या सोबत आपले गृह, आसन किंवा वस्त्र आदि वापरू नये || ४५ ||
अथ भुक्तं गृहे
तस्य करोत्यास्यां तथासने ।
शेते चाप्येकशयने
स सद्यस्तत्समो भवेत् ॥ ४६ ॥
जो पुरुष अशा माणसाच्या घरी भोजन
करतो, त्याचे आसन ग्रहण
करतो किंवा त्याच्या बरोबर एकाच शय्येवर शयन करतो तो लवकरच त्याच्याच समान होतो || ४६ ||
देवतापितृभूतानि
तथानभ्यर्च्य योऽतिथीन् ।
भुक्ते
स पातकं भुङ्क्ते निष्कृतिस्तस्य नेष्यते ॥ ४७ ॥
जो मनुष्य देवता, पितर, भूतगण आणि अतिथिंचे पूजन केल्या
शिवाय स्वयं भोजन करतो तो पापमय भोजन करतो; त्याला शुभगति मिळत नाही || ४७ ||
ब्राह्मणाद्यास्तु
ये वर्णाःस्वधर्मादन्यतोमुखाः ।
यान्ति
ते नग्नसंज्ञां तु हीनकर्मस्ववस्थिताः ॥ ४८ ॥
जे ब्राह्मणादि वर्ण स्वधर्माला सोडून परधर्मात प्रवृत्त होतात अथवा हीनवृत्तिचे
अवलम्बन करतात त्यांना ‘नग्न’ म्हणतात ||४८ ||
चतुर्णां यत्र
वर्णानां मैत्रेयात्यन्तसंकरः ।
तत्रास्या साधुवृत्तिनामुपघाताय
जायते ॥ ४९ ॥
हे मैत्रेया ! ज्या ठिकाणी चारही
वर्णांचे अत्यंत मिश्रण झालेले आहे तशा ठिकाणी राहिल्याने पुरुषाच्या साधूवृत्तिंचा
क्षय होतो || ४९ ||
अनभ्यर्च्य
ऋषीन्देवान्पितृभूतातिथींस्तथा ।
यो भुङ्क्ते
तस्य सँल्लापात्पतन्तिनरके नराः ॥ ५० ॥
जो पुरुष ऋषि, देव, पितृ, भूत आणि अतिथिगणांचे पूजन केल्याशिवाय
भोजन करतो त्याच्याशी सम्भाषण केल्याने सुद्धा लोक नरकात पडतात || ५० ||
तस्मादेतान्नरो
नग्नांस्त्रयीसन्त्यागदूषितान् ।
सर्वदा वर्जयेत्प्राज्ञ
आलापस्पर्शनादिषु ॥ ५१ ॥
अत: वेदत्रयीच्या त्यागामुळे
दूषित झालेल्या ह्या नग्नांसोबत प्राज्ञपुरुष सर्वदा सम्भाषण व स्पर्श आदिचा सुद्धा
त्याग करतात || ५१ ||
श्रद्धावद्भिः
कृतं यत्नाद्देवान्पितृपितामहान् ।
न प्रीणयति
तच्छ्राद्धं यद्येभिरवलोकितम् ॥ ५२ ॥
जर त्यांची दृष्टि
पडली तर श्रद्धावान पुरुषांनी यत्नपूर्वक केलेल्या श्राद्धाने देवता अथवा पितृपितामहगणांची
तृप्ति होत नाही || ५२ ||
श्रूयते च पुरा
ख्यातो राजा शतधनुर्भुवि ।
पत्नी च शैव्या
तस्याभूदतिधर्मपरायणा ॥ ५३ ॥
"राजा शतधनुची कथा" - असे ऐकीवात आहे की, पूर्वकाळी पृथ्वीतलावर शतधनु नावाचा एक विख्यात राजा होता . त्याची पत्नी शैव्या अत्यंत धर्मपरायणा
होती || ५३ ||
पतिव्रता महाभागा
सत्यशौचदयान्विता ।
सर्वलक्षणसम्पन्ना
विनयेन यनेन च ॥ ५४ ॥
ती महाभाग पतिव्रता, सत्य, शौच व दयेने युक्त तसेच विनय
आणि निति आदि सम्पूर्ण सुलक्षणांनी सम्पन्न होती || ५४ ||
स तु राजा तया सार्धं देवदेवं जनार्दनम् ।
आराधयामास विभुं परमेण समाधिना ॥ ५५ ॥
त्या महाराणी सोबत राजा शतधनुने
परम-समाधिद्वारा सर्वव्यापक, देवदेव श्रीजनार्दनाची आराधना केली ||५५ ||
होमैर् जपैस्तथा
दानैरुपवासैश्च भक्तितः ।
पुजाभिश्चानुदिवसं
तन्मना नान्यमानसः ॥ ५६ ॥
ते प्रतिदिन तन्मय होऊन अनन्यभावाने
होम, जप, दान, उपवास आणि पूजन आदिद्वारा भगवंताची
भक्तिपूर्वक आराधना करू लागले ||५६ ||
एकदा तु समं
स्नातौ तौ तु भार्यापती जले ।
भागीरथ्याःसमुत्तीर्णौ
कार्त्तिक्यां समुपोषितौ ।
पाषण्डिनमपश्येतामायान्तं
संमुखं द्विज ॥ ५७ ॥
हे द्विजा ! एके दिवशी कार्तिकी
पौर्णिमेला उपवास करून त्या दोघा पति-पत्निने गंगा नदीत एकत्र स्नान केल्यानंतर बाहेर
आले तेव्हा एका पाखंडीला आपल्या समोर पाहीलं || ५७ ||
चापाचार्यस्य
तस्यासौ सखा राज्ञो महात्मनः ।
अतस्तद्गौरवात्तेन
सखाभावमथाकरोत् ॥ ५८ ॥
हा ब्राह्मण त्या महात्मा राजाच्या
धनुर्वेदाचार्याचा मित्र होता; म्हणून आचार्याचा गौरव करण्याच्या कारणाने राजाने सुद्धा त्याच्याशी
मित्रासारखा व्यवहार केला || ५८ ||
न तु सा वाग्यता
देवी तस्य पत्नी पतिव्रता ।
उपोषितास्मीति
रविं तस्मिन्दृष्टे ददर्श च ॥ ५९ ॥
पण त्याच्या पतिव्रता पत्नीने
त्याचा जराही आदर केला नाही; माझा उपवास आहे असा विचार करून मौन पाळून तिने सूर्याचे दर्शन
केले || ५९ ||
समागम्य यथान्यायं
दम्पती तौ यथाविधि ।
विष्णोः पूजादिकं
सर्वं कृतंवतौ द्विजोत्तम ॥ ६० ॥
हे द्विजोत्तना ! नंतर त्या दोघ्
स्त्री-पुरुषांनी यथारीति येऊन भगवान विष्णुची पूजा आदि सर्व कर्म विधिपूर्वक केले
|| ६० ||
कालेन
गच्छता राजा ममारासौ सपत्नजित् ।
अन्वारुरोह
तं देवी चितास्थं भूपतिं पतिम् ॥ ६१ ॥
कालान्तराने तो शत्रुजित राजा मृत्यु पावला . तेव्हा, देवी शैव्याने सुद्धा चितारुढ
होऊन महाराजाचे अनुगमन केले || ६१ ||
स तु
तेनापचारेण श्वा जज्ञे वसुधाधिपः ।
उपोषितेन
पाषण्डसँल्लापो यत्कृतोऽभवत् ॥ ६२ ॥
राजा शतधनुने उपवास-अवस्थेत पाखण्डी
सोबत वार्तालाप केला होता . त्या पापामुळे त्या
राजाने कुत्र्याचा जन्म घेतला || ६२ ||
सा तु जातिस्मरा
जज्ञे काशीराजसुता शुभा ।
सर्वविज्ञानसम्पूर्णा
सर्वलक्षणपूजिता ॥ ६३ ॥
आणि ती शुभलक्षणा काशीनरेशाची कन्या झाली, जी सर्व प्रकारच्या विज्ञानाने
युक्त, सर्वलक्षण सम्पन्ना
आणि जातिस्मरा (पूर्वजन्माचे वृतांत जाणणारी)होती || ६३ ||
तां पिता दातुकामोऽभूद्वराय
विनिवारितः ।
तयैव तन्व्या
विरतो विवाहारम्भतो नृपः ॥ ६४ ॥
राजाच्या मनात तिला कोणा एका
वराला द्यायचे होते, पण त्या सुन्दरीने थांबविल्याने राजा तिच्या विवाहादि पासून उपरत झाला || ६४ ||
ततःसा
दिव्यया दृष्ट्या दृष्ट्वा श्वानं निजं पतिम् ।
विदिशाख्यं
पुरं गत्वा तदवस्थं ददर्श तम् ॥ ६५ ॥
तेव्हा तिला दिव्य दृष्टिने आपला
पति श्वान झाल्याचे कळले आणि विदिशा नामक नगरात जाऊन तिथे तिने त्याला कुत्र्याच्या
अवस्थेत पाहिले || ६५ ||
तं दृष्ट्वैव महाभागं
श्वभूतं तु पतिं तदा ।
ददौ तस्मै वराहारं सत्कारप्रवणं शुभा ॥ ६६ ॥
आपल्या महाभाग पतिला श्वानरूपात पाहून त्या सुन्दरीने सत्कारपूर्वक त्याला अति उत्तम
भोजन करवले || ६६ ||
भुञ्जन्दत्तं
तया सोऽन्नमतिमृष्टमभीप्सितम् ।
स्वजाति ललितं
कुर्वन्बहु चाटु चकार वै ॥ ६७ ॥
तिने दिलेले अति मधुर आणि इच्छित
अन्न खाऊन तो आपल्या जातिला अनुकूल नाना प्रकारे चाटुता प्रदर्शित करू लागला || ६७ ||
अतीव व्रीडिता
बला कुर्वता चाटु तेन सा ।
प्रणामपूर्वमाहेदं
दयितं तं कुयोनिजम् ॥ ६८ ॥
त्याच्या चाटुता करण्याने अत्यंत
संकुचित होऊन त्या बालिकेने कुत्सित योनित उत्पन्न झालेल्या त्या आपल्या प्रियतमाला
प्रणाम करून म्हणले || ६८ ||
स्मर्यतां तन्महाराज
दाक्षिण्यललितं त्वया ।
येन श्वयोनिमापन्नो
मम चाटुकरो भवान् ॥ ६९ ॥
“महाराज ! आपण आपल्या त्या उदारतेचे स्मरण करा ज्यामुळे आज आपणाला श्वान-योनि
प्राप्त होऊन माझी चाटुता करत आहात || ६९ ||
पाषण्डिनं समाभाष्य तीर्थस्नानादनन्तरम् ।
प्राप्तोसि कुत्सितां योनिं किन्न स्मरसि तत्प्रभो ॥ ७० ॥
हे प्रभो! तीर्थस्नानानंतर त्या पाखण्डी सह वार्तालाप केल्यामुळेच
आपल्याला ही कुत्सित योनि मिळाली आहे ह्याचे आपल्याला स्मरण नाही का?” || ७० ||
श्रीपराशर उवाच
तयैवं स्मारीति
तस्मिन्पूर्वजातिकृते तदा ।
दध्यौ चिरमथावाप
निर्वेदमतिदुर्लभम् ॥ ७१ ॥
श्रीपराशरजी म्हणाले ;– काशिराज सुताद्वारा अशा प्रकारे आठवण करून दिल्यावर त्याने बराचवेळ
आपल्या पूर्वजन्माचे चिन्तन केले . तेव्हा त्याला अति दुर्लभ निर्वेद प्राप्त झाला || ७१ ||
निर्विण्णचित्तः
स ततो निर्गम्य नगराद्बहिः ।
मरुत्प्रपतनं
कृत्वा सार्गाली योनिमागतः ॥ ७२ ॥
त्याने अति उदास चित्ताने नगरातून
बाहेर येऊन प्राणांचा त्याग केला आणि मग शृगाल योनित जन्म घेतला || ७२ ||
सापि द्वितीये
सम्प्राप्ते वीक्ष्य दिव्येन चक्षुषा ।
ज्ञात्वा शृगालं
तं द्रष्टुं ययौ कोलाहलं गिरिम् ॥ ७३ ॥
तेव्हा काशिराज कन्येने दिव्य दृष्टिने
त्याला दुसर्या जन्मात शृगाल झालेले पाहून त्याला भेटायला कोलाहल पर्वतावर गेली || ७३ ||
तत्रापि दृष्ट्वा तं प्राह शार्गालीं योनिमागतम्
।
भर्तारमपि चार्वङ्गी
तनया पृथिवीक्षितः ॥ ७४ ॥
तिथे सुद्धा आपल्या पतिला शृगालयोनित
उत्पन्न झालेले पाहून ती सुन्दरी राजकन्या त्याला म्हणाली || ७४ ||
अपि स्मरसि राजेन्द्र श्वयोनिस्थस्य यन्मया
।
प्रोक्तं ते
पूर्वचरितं पाषण्डालापसंश्रयम् ॥ ७५ ॥
“हे राजेन्द्रा ! श्वानयोनित जन्म घेतल्याने मी पाखण्डी सोबतचा वार्तालाप विषयक
आपला पूर्वजन्माचा वृतांत सांगितलेला आपल्याला आठवतो का ?” || ७५ ||
पुनस्तयोक्तं
स ज्ञात्वा सत्यं सत्यवतां वरः ।
कानने स निराहारस्तत्याज
स्वं कलेवरम् ॥ ७६ ॥
तेव्हा सत्यनिष्ठांमध्ये
श्रेष्ठ राजा शतधनुने तीने असे म्हटल्यावर सर्व सत्य वृतांत जाणून निराहार राहून वनात
आपल्या शरीराचा त्याग केला || ७६ ||
भूयस्ततो वृको
जज्ञे गत्वा तं निर्जने वने ।
स्मारयामास
भर्तारं पूर्ववृत्तमनिन्दिता ॥ ७७ ॥
मग तो एक लांडगा झाला; तेव्हासुद्धा त्या अनिंदिता राजकन्येने
निर्जन वनात जाऊन आपल्या पतिला त्याच्या पूर्वजन्मीच्या वृतांताचे स्मरण करवले || ७७ ||
न त्वं वृको
महाभाग राजा शतधनुर्भवान् ।
श्वा भूत्वा
त्वं सृगालोऽभूर्वृकत्वं साम्प्रतं गतः ॥ ७८ ॥
“हे महाभागा ! तुम्ही लांडगा नाही, राजा शतधनु आहात . तुम्ही आपल्या पूर्वजन्मात क्रमश: कुकुर और शृगाल व आता लांडगा म्हणून जन्मले
आहात” || ७८ ||
स्मारितेन यथा व्यक्तस्तेनात्मा गृध्रतां गतः
।
अपापा सा पुनश्चैनं
बोधयामास भामिनी ॥ ७९ ॥
अशा प्रकारे तिने स्मरण करविल्या
नंतर राजाने जेव्हा लांडग्याचे शरीर त्यागले तेव्हा गृध योनित त्याने जन्म घेतला . तेव्हाही त्याच्या निष्पाप भार्येने
त्याला परत समजावले || ७९ ||
नरेद्र स्मर्यतामात्मा
ह्यलं ते गृध्रचेष्टया ।
पाषण्डालापजातोऽयं
दोषो यद्गृध्रतां गतः ॥ ८० ॥
“हे नरेन्द्रा ! तुम्ही आपले स्वरूप आठवा; ह्या गृध-चेष्टा सोडा . पाखण्डी सोबत वार्तालाप केल्याच्या
दोषामुळेच तुम्ही गृध झाला आहात ” || ८० ||
ततः
काकत्वमापन्नं समनन्तरजन्मनि ।
उवाच
तन्वी भर्तारमुपलभ्यात्मयोगतः ॥ ८१ ॥
नंतर दुसर्या जन्मात काकयोनि प्राप्त झाल्यावरही योगबलाने आपल्या
पतिला भेटून ती सुन्दरी म्हणाली || ८१ ||
अशेषभूभृतः
पूर्वं वश्या यस्मै बलिं ददुः ।
स त्वं काकत्वमापन्नो
जातोद्य बलिभुक् प्रभो ॥ ८२ ॥
“हे प्रभो ! ज्यांना वशीभूत होऊन सम्पूर्ण सामंतगण नाना प्रकारच्या वस्तु भेंट
करायचे तेच आपण आज काकयोनि प्राप्त होऊन बलिभोजी झाला आहात ” || ८२ ||
एवमेव बकत्वेपि
स्मारितस्य पुरातनम् ।
तत् त्याज भूपतिः
प्राणान्मयूरत्वमवाप च ॥ ८३ ॥
काकयोनितही पूर्वजन्माचे स्मरण
करवून दिल्याने राजाने प्राणत्याग केला व मयूरयोनित जन्म घेतला || ८३ ||
मयूरत्वे
ततः सा वै चकारानुगतिं शुभा ।
दत्तैः
प्रतिक्षणं भोज्यैर्बाला तज्जातिभोजनैः ॥ ८४ ॥
मयूरावस्थेतही काशिराजकन्या त्याला
क्षणोक्षणी अति सुंदर मयुरोचित आहार देत त्याच्यासोबतच राहात असे || ८४ ||
ततस्तु जनको राजा वाजिमेधं महाक्रतुम् ।
चकार तस्यावभृथे स्नापयामास तं तदा ॥ ८५ ॥
त्यावेळी राजा जनकाने अश्वमेध
नामक महायज्ञाचे अनुष्ठान केले; त्या यज्ञात अवभृथ स्नानाच्या वेळी त्या मयूराला स्नान करविले
|| ८५ ||
सस्नौ स्वयं
च तन्वङ्गी स्मारयामास चापि तम् ।
यथासौ श्वसृगालादियोनिं
जग्राह पार्थिवः ॥ ८६ ॥
तेव्हा त्या सुन्दरीने स्वतः
सुद्धा स्नान करून राजाला स्मरण करविले की कशा प्रकारे त्याने श्वान, शृगाल आदि योनी
ग्रहण केल्या होत्या || ८६ ||
स्मृतजन्मक्रमःसोऽथ
तत्त्याज स्वकलेवरम् ।
जज्ञे स जनकस्यैव
पुत्रोऽसौ सुमहात्मनः ॥ ८७ ॥
आपल्या जन्म परम्परेचे स्मरण झाल्यावर राजाने आपल्या शरीराचा त्याग केला आणि महात्मा
जनकाकडेच पुत्ररूपात जन्म घेतला || ८७ ||
ततः सा पितरं
तन्वी विवाहार्थमचोदयत् ।
स चापि कारयामास
तस्या राजा स्वयंवरम् ॥ ८८ ॥
तेव्हा त्या सुन्दरीने आपल्या पित्याला विवाहासाठी प्रेरित केले . तिच्या प्रेरणेने राजाने तिचे स्वयंवर आयोजित केले || ८८ ||
स्वयंवरे कृते
सा तं सम्प्राप्तं पतिमात्मनः ।
वरयामास भूयोऽपि
भर्तृभावेन भामिनी ॥ ८९ ॥
स्वयंवरात त्या राजकन्येने स्वयंवरात
आलेल्या आपल्या त्याच पतिला परत पतिभावाने वरले || ८९ ||
बुभुजे च तया
सार्धं सम्भोगान्नृपनन्दनः ।
पितर्युपरते
राज्यं विदेहेषु चकार सः ॥ ९० ॥
त्या राजकुमाराने काशिराजाच्या
कन्येसोबत नाना प्रकारच्या भोगांचा उपभोग घेतला व पिता परलोकवासी झाल्यावर विदेहनगरीवर
राज्य केले || ९० ||
इयाज जज्ञान्सुबहून्ददौ
दानानि चार्थिनाम् ।
पुत्रानुत्पादयामास
युयुधे च सहारिभिः ॥ ९१ ॥
त्याने अनेक यज्ञ केले, याचकांना नाना प्रकारची दाने
दिली, अनेक पुत्र उत्पन्न
केले आणि शत्रुंसोबत अनेक युद्ध केली || ९१ ||
राज्यं भुक्त्वा
यथान्यायं पालयित्वा वसुन्धराम् ।
तत्त्याज स
प्रियान्प्राणान्सङ्ग्रामे धर्मतो नृपः ॥ ९२ ॥
अशाप्रकारे त्या राजाने पृथ्वीचे
न्यायानुकुल पालन करत राज्यभोग घेतला व शेवटी आपले प्रिय प्राण धर्मयुद्धात त्यागले
|| ९२ ||
ततश्चितास्थं तं भूयो भर्तारं सा शुभेक्षणा
।
अन्वारुरोह विधिवद्यथापूर्वं मुदान्विता ॥ ९३ ॥
तेव्हा त्या सुलोचनेने आधी सारखेच
परत आपल्या चितारुढ पतिचे विधिपूर्वक प्रसन्न-मनाने अनुगमन केले || ९३ ||
ततोऽवाप तया
सार्धं राजपुत्र्या स पार्थिवः ।
ऐन्द्रानतीत्य
वै लोकाँल्लोकान्प्राप तदाक्षयान् ॥ ९४ ॥
ह्यामुळे त्या राजाला त्या राजकन्येसह
इन्द्रलोका पेक्षाही उत्कृष्ट अक्षय लोक प्राप्त झाला || ९४ ||
स्वर्गाक्षयत्वमतुलं
दाम्पत्यमतिदुर्लभम् ।
प्राप्तं
पुण्यफलं प्राप्य संशुद्धिं तां द्विजोत्तम ॥ ९५ ॥
हे द्विजश्रेष्ठा ! अशाप्रकारे
शुद्ध झाल्याने त्याने अतुलनीय अक्षय स्वर्ग, अति दुर्लभ दाम्पत्य आणि आपल्या
पुर्वार्चित सम्पूर्ण पुण्याचे फल प्राप्त केले || ९५ ||
एष पाषण्डसम्भाषाद्दोषः
प्रोक्तो मया द्विज ।
तथाऽश्वमेधावभृथस्नानमाहात्म्यमेव
च ॥ ९६ ॥
हे द्विजा ! अशाप्रकारे मी तुला
पाखण्डी सोबत सम्भाषण करण्याचा दोष आणि अश्वमेध-यज्ञात स्नान करण्याचे माहात्म्य ह्याचे
वर्णन केले || ९६ ||
तस्मात्पाषण्डिभिः पापैरालापस्पर्शनं
त्यजेत् ।
विशेषतः क्रियाकाले यज्ञादौ चापि दीक्षितः ॥ ९७ ॥
म्हणूनच पाखण्डी व पापी लोकांशी
कधी वार्तालाप व स्पर्श करू नये; विशेषत: नित्य-नैमित्तिक कर्मांच्या वेळी आणि ज्याने यज्ञादि
क्रियांची दीक्षा घेतली आहे त्याने तर अशांचा संसर्ग त्यागणे अत्यावश्यक आहे || ९७ ||
क्रियाहानिर्गृहे
यस्य मासमेकं प्रजायते ।
तस्यावलोकनात्सूर्यं
पश्येत मतिमान्नरः ॥ ९८ ॥
ज्याच्या घरी एक महिन्यापर्यंत
नित्यकर्मांचे अनुष्ठान झालेले नसेल त्याला पाहीले तर बुद्धिमान मनुष्याने सूर्याचे
दर्शन करावे || ९८ ||
किं पुनर्यैस्तु
सन्त्यक्ता त्रयी सर्वात्मना द्विज ।
पाषण्डभोजिभिः
पापैर्वेदवादविरोधिभिः ॥ ९९ ॥
ज्यांनी वेदत्रयीचा सर्वथा त्याग
केला आहे तसेच जे पाखण्डींचे अन्न खातात व वैदिक मताचा विरोध करतात त्या पापात्मांचे
दर्शन केल्यावर काय बोलावे ? || ९९ ||
सहालापस्तु
संसर्गः सहास्या चातिपापिनी ।
पाषण्डिभिर्दुराचारैस्तस्मात्तां
परिवर्जयेत् ॥ १०० ॥
ह्या दुराचारी पाखण्डींसोबत वार्तालाप
करणे, सम्पर्क ठेवणे व उठबस
करणे महान पाप आहे; म्हणून ह्या सर्व गोष्टींचा त्याग करावा || १०० ||
पाषण्डिनो विकर्मस्थान्वैडालव्रतिकाञ्छठान्
।
हैतुकान्बकवृत्तींश्च
वाङ्मात्रेणापि नार्चयेत् ॥ १०१ ॥
पाखण्डी, विकर्मी, विडाल-व्रतवाले [अर्थात लपुन
छपुन पाप करणे वैडाल नामक व्रत आहे. असं करणार्याला
‘विडाल-व्रतवाला’ म्हणतात], दुष्ट, स्वार्थी आणि ढोंगी लोकांचा वाचेनेही आदर करू नये || १०१ ||
द्वरतस्तैस्तु सम्पर्कस्त्याज्यश्चाप्यतिपापिभिः
।
पाषण्डिभिर्
दुराचारैस्तस्मात्तान्परिवर्जयेत् ॥ १०२ ॥
ह्या पाखण्डी, दुराचारी व अति पापींचा संसर्ग
दुरूनच त्यागण्या योग्य आहे . म्हणून त्यांचा सर्वदा
त्याग करावा || १०२ ||
एते नग्नास्तवाख्याता
दृष्टा श्राद्धोपघातकाः ।
येषां सम्भाषणात्पुंसां
दिनपुण्यं प्रणश्यति ॥ १०३ ॥
अशाप्रकारे मी तुला नग्नांची व्याख्या
सांगितली, ज्यांच्या केवळ दर्शनानेही श्राद्ध नष्ट होते व ज्यांच्या सोबत सम्भाषण केल्याने
मनुष्याचे एक दिवसाचे पुण्य क्षीण होते || १०३ ||
एते पाषण्डिनः
पापा न ह्येतानालपेद् बुधः ।
पुण्यं नश्यति
सम्भाषादेतेषां तद्दिनोद्भवम् ॥ १०४ ॥
हे पाखण्डी अतिशय पापी असतात, बुद्धिमान पुरुषाने ह्यांच्याशी
कधीच सम्भाषण करू नये || १०४ ||
पुंसां जटाधरणमैण्ड्यवतां
वृथैव मोघाशिनामखिलशौचनिराकृतानाम् ।
तोयप्रदानपितृपिण्डबहिष्कृतानां सम्भाषणादपि नरा नरकं प्रयान्ति ॥ १०५ ॥
जो बिना कारण जटा
धारण करतो अथवा मूँडन करतो, देवता, अतिथि आदिंना भोजन करविल्या शिवाय स्वयं भोजन करतो, सर्वप्रकारे शौचहीन असतो तसेच
जल-दान, पितृ-पिण्ड आदि देखील ज्याने बहिष्कृत केले आहे, त्यांच्याशी वार्तालाप केल्यानेसुद्धा
लोग नरकात जातात || १०५ ||
"इति श्रीविष्णुपुराणे
तृतीये अंशे अष्टोदशोऽध्यायः" (१८)
इति श्रीविष्णुमहापुराणे तृतीयांऽशः समाप्तः ।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा