सोमवार, ६ जुलै, २०२६

विष्णुपुराण, चतुर्थ अंश, द्वादश अध्याय | Vishnu Puran, Ansh 4 , Adhyay 12

 

विष्णुपुराणम्

चतुर्थ: अंशः द्वादशोऽध्यायः

 

"यदुपुत्र क्रोष्टुचा वंश"

 

श्रीपराशर उवाच
क्रोष्टोस्तु यदुपुत्रस्यात्मजो ध्वजिनीवान् ॥ १ ॥

श्रीपराशर म्हणाले;- यदुपुत्र क्रोष्टुला ध्वजिनीवान् नामक पुत्र झाला ॥१॥


 ततश्च स्वातिस्ततो रुशङ्‍कू रुशङ्‍कोश्चित्ररथः ॥ २ ॥
 तत्तनयः शशिबिन्दुश्चतुर्दशमहारत्‍नेशश्चक्रवर्त्यभवत् ॥ ३ ॥

त्याला स्वाति, स्वातिला रुशंकु, रुशंकुला चित्ररथ आणि चित्ररथला शशिबिन्दु नामक पुत्र झाला जो चौदा महारत्नांचा स्वामी तथा चक्रवर्ती सम्राट होता ॥२-३॥


 तस्य च शतसहस्रं पत्‍नी नामभवत् ॥ ४ ॥ दशलक्षसंख्याश्च पुत्राः ॥ ५ ॥

शशिबुन्दुला एक लाख स्त्रिया आणि दहा लाख पुत्र होते ॥४-५॥


तेषां च पृथुश्रवाः पृथुकर्मा पृथुकीर्तिः पृथुयशाः पृथुजयः पृथुदानः षट् पुत्राः प्रधानाः ॥ ६ ॥

त्यांच्यात पृथुश्रवा, पृथुकर्मा, पृथुकीर्ति, पृथुयशा, पृथुजय आणि पृथुदान - हे सहा पुत्र प्रधान होते ॥६॥


पृथुश्रवसश्च पुत्रः पृथुतमः ॥ ७ ॥
तस्मादुशना यो वाजिमेधानां शतमाजहार ॥ ८ ॥

पृथुश्रवाचा पुत्र पृथुतम आणि त्याचा पुत्र उशना होता ज्याने शंभर अश्वमेध यज्ञ केले ॥७-८॥



 तस्य च शितपुर्नाम पुत्रोऽभवत् ॥ ९ ॥

उशनाला शितपु नामक पुत्र झाला ॥९॥

 


तस्यापि रुक्मकवचस्ततः परवृत् ॥ १० ॥
 तस्य परावृतो रुक्मेषुपृथुज्यामघवलितहरितसंज्ञास्तस्य पञ्चात्मजा बभूवुः ॥ ११ ॥

शितपुला रुक्मकवच, रुक्मकवचला पुरावृत्त आणि परावृत्तला रुक्मेषु, पृथु, ज्यामघ, वलित आणि हरित नामक पाच पुत्र झाले ॥१०-११॥




तस्माद्यापि ज्यामघस्य श्लोको गीयते ॥ १२ ॥

ह्यातील ज्यामघ विषयी आजही हा श्‍लोक म्हटला जातो ॥१२॥


 भार्यावश्यास्तु ये केचिद्‍भविष्यन्त्यथ वा मृताः ।
 तेषां तु ज्यामघः श्रेष्ठः शैव्यापतिरभून्‍नृपः ॥ १३ ॥

ह्या जगात स्त्रिच्या वशीभूत जे लोक होतील आणि जे ह्याआधी होऊन गेले त्यात शैव्याचा पति राजा ज्यामघच सर्वश्रेष्ठ आहे ॥१३॥


 अपुत्रा तस्य सा पत्‍नी शैव्या नाम तथाप्यसौ ।
 अपत्यकामोऽपि भयान्‍नान्यां भार्यामविन्दत ॥ १४ ॥

त्याची स्त्री शैव्या जरी निःसन्तान असली तरी संततिची इच्छा असतानाही त्याने तिच्या भयामुळे दुसर्‍या स्त्रीशी विवाह केला नाही ॥१४॥


 स त्वेकदा प्रभूतरथतुरग गजसंमर्दातिदारुणे महाहवे युद्ध्यमानः सकलमेवारिचक्रमजयत् ॥ १५ ॥

एके दिवशी खूपशा रथ, घोड़े आणि हत्ती संघटित करून अत्यन्त भयानक महायुद्धात लढताना त्याने आपल्या समस्त शत्रुंचा पराजय केला ॥१५॥



तच्चारिचक्रमपास्त पुत्रकलत्रबन्धुबलकोशं स्वमधिष्ठानं परित्यज्य दिशः प्रति विद्रुतम् ॥ १६ ॥

त्यावेळी ते समस्त शत्रुगण पुत्र, मित्र, स्त्री, सेना आणि कोशादिने हीन होऊन आपआपले स्थान सोडून दाहीदिशांना धावून गेले ॥१६॥



तस्मिंश्च विद्रुतेऽतित्रासलोलायत लोचनयुगलं त्राहि त्राहि मां ताताम्ब भ्रातरित्याकुलविलापविधुरं स राजकन्यारत्‍नमद्राक्षीत् ॥ १७ ॥

ते धावून गेल्यावर त्याने एका राजकन्येला पाहिले जी अत्यन्त भयभीत होऊन आपल्या विशाल नेत्रांनी पाहात म्हणाली 'हे तात, हे मात;, हे भ्रातः, माझी रक्षा करा, रक्षा करा' अशाप्रकारे ती व्याकुलतापूर्वक विलाप करत होती ॥१७॥



 तद्दर्शनाच्च तस्यामनुरागानुगतान्तरात्मा स नृपोऽचिन्तयत् ॥ १८ ॥

तिला पाहून तिच्यावर चित्त जडल्याने राजाने विचार केला ॥१८॥




 साध्विदं ममापत्यरहितस्य वन्ध्याभर्तुः साम्प्रतं विधिनापत्यकारणं कन्यारत्‍नमुपपादितम् ॥ १९ ॥

'हे बरंच झालं; मी पुत्रहीन आणि वांझ स्त्रीचा पति आहे; असे वाटते की संतति प्राप्तीसाठी ही कन्या विधात्यानेच ह्यावेळी इथे पाठवले आहे ॥१९॥


 तदेतत्समुद्वहामीति ॥ २० ॥

म्हणून मला हिच्याशी विवाह करायला हवा ॥२०॥


 अथ वैनां स्यन्दनमारोप्य स्वमधिष्ठानं नयामि ॥ २१ ॥
 तयैव देव्या शैव्ययाहमनुज्ञातःसमुद्वहामीति ॥ २२ ॥

किंवा हिला माझ्या रथात बसवून माझ्रा निवासस्थानी घेऊन जातो आणि तिथे देवी शैव्याची आज्ञा घेऊनच तिच्याशी विवाह करेन' ॥२१-२२॥


 अथैनां रथमारोप्य स्वनगरमगच्छत् ॥ २३ ॥

त्यानन्तर तो तिला रथात बसवून आपल्या नगरात घेऊन गेला ॥२३॥


विजयिनं च राजानमशेष पौरभृत्ययरिजनामात्यसमेता शैव्या द्रष्टुमधिष्ठनद्वारमागता ॥ २४ ॥

तिथे विजयी राजाच्या दर्शनासाठी सम्पूर्ण पुरवासी, सेवक, कुटुम्बीजन आणि मंत्रीवर्गासह महाराणी शैव्या नगराच्या द्वारावर आली होती ॥२४॥

 

 सा चावलोक्य राज्ञः सव्यपार्शववर्त्तिनीं कन्यामीषदुद्‍भूतामर्षस्फुरदधरपल्लवा राजानमवोचत् ॥ २५ ॥

तिने राजाच्या डाव्याबाजूला बसलेल्या राजकन्येला पाहून रागाने थरथरणार्‍या ओठांनी विचारले - ॥२५॥

 
 अतिचपलचित्तात्र स्यन्दने केयमारोपितेति ॥ २६ ॥

" हे अति चपलचित्ता! तुझ्या रथात ही कोण बसली आहे?" ॥२६॥

 असावप्यनालोचितोत्तरवचनोऽतिभयात्तामाह स्नुषा ममेयमिति ॥ २७ ॥

राजाला काय उत्तर द्यावे हे सुचले नाही म्हणून तो घाबरत घाबरत म्हणाला - " ही माझी पुत्रवधू आहे." ॥२७॥

 
अथैनं शैव्योवाच ॥ २८ ॥

तेव्हा शैव्या म्हणाली - ॥२८॥

 

 नाहं प्रसूता पुत्रेण नान्या पत्‍न्यभवत्तव ।
 स्नुषासम्बन्धता ह्येषा कतमेन सुतेन ते ॥ २९ ॥
"मला तर पुत्र झालेला नाही आणि तुझी दुसरी कोणती स्त्री सुद्धा नाही, मग कोणत्या पुत्रामुळे तुझे हिच्याशी पुत्रवधुचा सम्बन्ध जुळतो?" ॥२९॥

 
 श्रीपराशर उवाच
 इत्यात्मेर्ष्याकोपकलुषितवचनमुषितविवेको भयाद्दुरुक्तापरिहारार्थमिदमवनीपतिराह ॥ ३० ॥

श्रीपराशर म्हणाले;- अशा प्रकारे, शैव्याच्या ईर्ष्या आणि क्रोध-कलुषित वचनांनी विवेकहीन होऊन घाबरून बोललेल्या असंबद्ध गोष्टीविषयी संशय दूर करण्यासाठी राजा म्हणाला - ॥३०॥


 यस्ते जनिष्यत आत्मजस्तस्येयं अनागतस्यैव भार्या निरूपितेत्याकर्ण्योद्‍भूतमृदुहासा तथेत्याह ॥ ३१ ॥ प्रविवेश च राज्ञा सहाधिष्ठानम् ॥ ३२ ॥

" तुला जो पुत्र होणार आहे त्या भावी शिशुसाठी मी आधीच ही भार्या निश्चित केली आहे." हे ऐकून राणी गोड हसून म्हणाली - 'बरं, असेच होवो’ आणि तिने राजा बरोबर नगरात प्रवेश केला ॥३१-३२॥


अनन्तरं चातिशुद्धलग्नहोरांशकावयवोक्तकृत पुत्रजन्मलाभगुणाद्वयसः परिणाममुपगतापि शैव्या स्वल्पैरेवाहोभिर्गर्भमवाप ॥ ३३ ॥
 कालेन च कुमारमजीजनत् ॥ ३४ ॥

त्यानन्तर पुत्र लाभाच्या गुणांनी युक्त अशा त्या अति विशुद्ध लग्न होरांशकर अवयवाचे वेळी झालेल्या पुत्रजन्म विषयक वार्तालापाच्या प्रभावाने गर्भधारणेसाठी योग्य अवस्था नसतानाही काही दिवसातच शैव्याला गर्भ राहिला आणि योग्यवेळी एक पुत्र उप्तन्न हुआ ॥३३-३४॥

 
तस्य च विदर्भ इति पिता नाम चक्रे ॥ ३५ ॥

पित्याने त्याचे नाव विदर्भ ठेवले ॥३५॥


 स च तां स्नुषामुपयेमे ॥ ३६ ॥

आणि त्याच्याशीच त्या पुत्रवधूचे पाणिग्रहण झाले ॥३६॥


 तस्यां चासौ क्रथकैशिकसंज्ञौ पुत्रावजनयत् ॥ ३७ ॥

तिच्यापासून विदर्भने क्रथ आणि कैशिक नामक दोन पुत्र उप्तन्न केले ॥३७॥


पुनश्च तृतीयं रोमपादसंज्ञं पुत्रमजीजनद्यो नारदादवाप्तज्ञानवानभवत् ॥ ३८ ॥

फिर रोमपाद नामक तिसर्‍या पुत्राला जन्म दिला जो नारदाच्या उपदेशाने ज्ञान विज्ञान सम्पन्न झाला होता ॥३८॥


 रोमपादाद्‍बभ्रुः बभ्रोर्धृतिर्धृतेः कैशिकः कैशिकस्यापि चेदिः पुत्रोऽभवद् यस्य सन्ततौ चैद्या भूपालाः ॥ ३९ ॥

रोमपदला बभ्रु, बभ्रुला धृति, धृतिला कैशिक आणि कैशिकला चेदि नामक पुत्र झाला ज्याच्या संततिमध्ये चैद्य राजांनी जन्म घेतला ॥३९॥


 क्रथस्य स्नषापुत्रस्य कुन्तिरभवत् ॥ ४० ॥

ज्यामघच्या पुत्रवधुचा पुत्र क्रथ ह्याला कुन्ति नामक पुत्र झाला ॥४०॥


 कुन्तेर्धृष्टिः धृष्टेर्निधृतिः निधृतेर्दशार्हस्ततश्च व्योमस्तस्यापि जीमूतस्ततश्च विकृतिस्ततश्च भीभरथः तस्मान्‍नवरथस्तस्यापि दशरथस्ततश्च शकुनिः तत्तनयः करम्भिः करम्भेर्देवरातोऽभवत् ॥ ४१ ॥ तस्माद्देवक्षत्रस्तस्यापि मधुर्मधोः कुमारवंशः कुमारवंशादनुः अनोः पुरुमित्रः पृथिवीपतिरभवत् ॥ ४२ ॥ ततश्चांशुस्तस्माच्च सत्वतः ॥ ४३ ॥ सत्वतादेते सात्वताः ॥ ४४ ॥

कुन्तिला धृष्टि, धृष्टीला निधृति, निधृतिला दशार्ह, दशार्हला व्योमा, व्योमाला जीमूत, जीमूतला विकृति, विकृतिला भीमरथ, भीमरथला नवरथ, नवरथला दशरथ, दशरथला शकुनि, शकुनिला करभ्मि, करम्भिला देवरात, देवरातला देवक्षत्र, देवक्षत्रला मधु, मधुला कुमारवंश, कुमारवंशला अनु, अनुला राजा पुरुमित्र, पुरुमित्रला अंशु आणि अंशुला सत्वत नामक पुत्र झाला. तसेच सत्वत पासूनच सात्वतवंशाचा प्रादुर्भाव झाला ॥४१-४४॥




 इत्येतां ज्यामघस्य सन्ततिं सम्यक्च्रद्धासमन्वितः श्रुत्वा पुमान् मैत्रेय स्वपापैः प्रमुच्यते ॥ ४५ ॥

हे मैत्रेया! अशाप्रकारे ज्यामघच्या संततिचे श्रद्धापूर्वक योग्यप्रकारे श्रवण केल्याने मनुष्य आपल्या समस्त पापांतून मुक्त होतो ॥४५॥


 
इति श्रीविष्णुमाहापुराणे चतुर्थांशे द्वादशोऽध्यायः (१२)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

विष्णुपुराण, चतुर्थ अंश, त्रयोदश अध्याय | Vishnu Puran, Ansh 4 , Adhyay 13

  ॥ विष्णुपुराणम् ॥ ॥ चतुर्थ: अंशः ॥ त्रयोदशो ऽध्यायः ॥   "सत्वतच्या सन्ततिचे वर्णन आणि स्यमन्तक मण्याची कथा" श्रीप...