रविवार, १७ मे, २०२६

विष्णुपुराण, तृतीय अंश, षोडश अध्याय | Vishnu Puran, Ansh 3 , Adhyay 16

 

विष्णुपुराणम्

॥ तृतीयः अंशः षोडशोऽध्यायः


 

श्राद्धकर्मात योग्य आणि निषिद्ध गोष्टी.

और्व उवाच
हविष्यमत्स्यमासैस्तु शशस्य नकुलस्य च ।
सोकरच्छाकलैणेयरौरवैर्गवयेन च ॥ १ ॥

औरभ्रगव्यैश्च तथा मासवृद्ध्या पितामहाः ।
प्रयान्ति तृप्तिं मांसैस्तु नित्यं वार्ध्रीणसामिषैः ॥ २ ॥

 

और्व म्हणाले :-"तांदूळ किंवा इतर धान्याचा नैवेद्य, लोणी, मासे किंवा ससा, पक्षी, घुबड, बकरी, मृग, हरीण, गयाल ह्यांच्या मांसाचे हविष्य अर्पण केल्याने पितृगण कमशः महिनाभर अधिक तृप्त होतात. वाध्रीणस पक्ष्यांच्या मांसाने ते सदैव तृप्त असतात.


 
 खड्गमांसमतीवात्र कालशाकं तथा मधु ।
 शस्तानि कर्मण्यत्यन्ततृप्तिदानि नरेश्वर ॥ ३ ॥

श्राद्धकर्मात गेंड्याचे मांस, कालशाक आणि मध हे देखील पितरांना अतिशय तृप्त करतात.

 

गयामुपेत्य यः श्राद्धं करोति पृथिवीपते ।
सफलं तस्य तज्जन्म जायते पितृतुष्टिदम् ॥ ४ ॥

योग्य वेळी योग्य पद्धतिने पुर्वजांचे गया तीर्थक्षेत्री श्राद्धसंस्कार करणार्‍या वारसाच्या जन्माने पितरांना विशेष समाधान मिळते व त्याचा जन्म सफल होतो.

 


 प्रशान्तिकाःसमीवाराः श्यामाका द्विविधास्तथा ।
 वन्यौषधीप्रधानास्तु श्राद्धार्हाः पुरुषर्षभ ॥ ५ ॥

जंगलात आपणहून उगवलेले तांदूळ, (पांढरे किंवा काळे दोन्ही प्रजातींचे), जंगलात उगवलेल्या भाज्या, जव, गहू, तांदूळ, तिळ, विविध प्रकारच्या डाळी आणि मोहरी श्राद्धात अर्पण करण्यास योग्य मानल्या जातात.

 


 यवाः प्रियङ्‍गवो मुद्‍गा गोधूमा व्रीहयस्तिलाः ।
 निष्पावाः कोविदाराश्च सर्षपाश्चात्र शोभनाः ॥ ६ ॥

जव, कगनी, मूग, गहू, धान्य, तीळ, मटार, कचनार आणि मोहरी श्राद्धात उपयुक्त आहेत.

 

 अकृताग्रयणं यच्च धान्यजातं नरेश्वर ।
 राजमाषानणूंश्चैव मसूरांश्च विसर्जयेत् ॥ ७ ॥

अलाबुं गृञ्जनं चैव पलाण्डुं पिण्डमूलकम् ।
 गान्धारककरंबादिलवाणान्यौषराणि च ॥ ८ ॥

आरक्ताश्चैव निर्यासाः प्रत्यक्षलवणानि च ।
वर्ज्यान्येतानि वै श्राद्धे यच्च वाचा न शस्यते ॥ ९ ॥

ह्याउलट ऋतूच्या आरंभी धार्मिक संस्काराद्वारे पवित्र न केलेले धान्य, राजमास नावाची डाळ, बाजरी, मसूर, भोपळा, गाजर, शलगम, लाल रंगाच्या वस्तू, करवंद, लसूण, कांदे, गान्धारक, उसरभूमीत उत्पन्न झालेले मीठ, हिंग, लाल भाजीपाला इत्यादी कोणतीही वस्तू अर्पण करू नये. ह्या वस्तू श्राद्धाकार्यात त्याज्य मानल्या जातात.

 

नक्ताहृतमनुच्छिन्नं तृप्यते न च यत्र गौः ।
दुर्घधिफेनिलं चाम्बु श्राद्धयोग्यं न पार्थिव ॥ १० ॥

रात्रीच्या वेळी आणलेल्या, टाकून दिलेल्या, अप्रशंसनीय, अप्रतिष्ठित जलाशयातील, दुर्गंधी येणारे, फेसाने झाकलेले जल जे गाईला तृप्त करू शकत नाही अशा वस्तू श्राद्धकार्यात अयोग्य आहेत.

 

 

क्षिरमेकशफानां यदौष्ट्रमाविकमेव च ।
मार्गं च माहिषं चैव वर्जयेच्छ्राद्धकर्मणि ॥ ११ ॥

एक खूर असलेल्या प्राण्याचे, उंटाचे, शेळीचे, हरीणीचे किंवा म्हशीचे दूध, श्राद्धकर्मात अयोग्य आहे.

 

 

 षण्ढापविद्धचण्डालपापिपाषण्डरोगिभिः ।
 कृकवाकुश्वननग्नैश्च वानरग्रामसूकरैः ॥ १२ ॥

उदक्यासूतिकाशौचिमृतहारैश्च वीक्षिते ।
 श्राद्धे सुरा न पितरो भुञ्जते पुरुषर्षभ ॥ १३ ॥

नपुंसक, सत्पुरूषांनी बहिष्कृत केलेला, षंढ, चांडाळ, पाखंडी, मद्यधुंद, रोगग्रस्त, कोंबडा, नग्न, वानर, ग्रामसूकर, रजस्वला किंवा गर्भवती स्त्री, सोयर किंवा सुतकात असलेली व्यक्ती, शव घेऊन जाणारी व्यक्ति इत्यांदिंपैकी कोणाचीही दृष्टी श्राद्धकार्यावर पडली तर देव किंवा पितर श्राद्धकार्यातील आपल्या भागाचा स्वीकार करत नाहीत.

 

 

तस्मात्परीश्रिते कुर्याच्छ्राद्धं श्रद्धासमन्वितः ।
उर्व्यां च तिलविक्षेपाद्यातुधानान्निवारयेत् ॥ १४ ॥

म्हणून हे कार्य अतिशय काळजीपूर्वक बंदिस्त ठिकाणी करावे. आणि जमिनीवर तीळ टाकून राक्षसांना निवृत्त करावे.

 

नखादिना चोपपन्नं केशकीटादिभिर्नृप ।
न चैवाभिषवैर्मिश्रमन्नं पर्युषितं तथा ॥ १५ ॥

श्राद्धात नख, केस किंवा कीटकांमुळे खराब झालेले किंवा शिळे अन्न देऊ नये.

 

श्रद्धासमन्वितैर्दत्तं पितृभ्यो नामगोत्रतः ।
यदाहारास्तु ते जातास्तदाहारत्वमेति तत् ॥ १६ ॥

शुद्ध श्रद्धेने गोत्राचे व वंशाचे नाव घेऊन पितरांना दिलेले योग्य अन्नच त्यांना पोषण व आशीर्वाद देते.

 

 

श्रूयते चापि पितृर्भिगीता गाथा महीपते ।
 इक्ष्वाकोर्मनुपुत्रस्य कलापोपवने पुरा ॥ १७ ॥

हे पृथ्वीपते! पूर्वीच्या काळात, पितरांचे हे गीत मनुपुत्र इक्ष्वाकूने कलाप ( हिमालयाच्या पर्वतरांगांवर ) उपवनात ऐकले होते.

 

अपि नस्ते भविष्यन्ति कुले सन्मार्गशीलिनः ।
 गयामुपेत्य ये पिण्डान्दास्यन्त्यस्माकमादरात् ॥ १८ ॥

आमच्या कुळात धार्मिक मार्गाचे अनुसरण करणारा गया तीर्थक्षेत्रावर जाऊन आदरपुर्वक पिंडदान करणारा कोणी आहे का ?”

 

 अपि नः स कुले जायाद्यो नो दद्यात्त्रयोदशीम् ।
 पायसं मधुसर्पिर्भ्यां वर्षासु च मघासु च ॥ १९ ॥

आमच्या कुळात कोणी आहे का जो वर्षाऋतूत मघा नक्षत्रयुक्त त्रयोदशीला मध आणि तूप असलेली खीर दान करेल?

 

 गौरीं वाप्युद्वहेत्कन्यां नीलं वा वृषमुत्सृजेत् ।
 यजेत वाश्वमेधेन विधिवद्‌दक्षिणावता ॥ २० ॥

किंवा एखाद्या कुमारिकेशी लग्न करेल, काळ्या बैलाला मुक्त करेल किंवा ब्राह्मणांना दानदक्षिणा देऊन, विधिपुर्वक अश्वमेध यज्ञ करेल? असा वंशज आमच्या वंशात जन्माला येवो!”

 


इति श्रीविष्णुमहापुराणे तृतीये अंशे षोडशोऽध्यायः (१६)



 
 


 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

विष्णुपुराण, चतुर्थ अंश, त्रयोदश अध्याय | Vishnu Puran, Ansh 4 , Adhyay 13

  ॥ विष्णुपुराणम् ॥ ॥ चतुर्थ: अंशः ॥ त्रयोदशो ऽध्यायः ॥   "सत्वतच्या सन्ततिचे वर्णन आणि स्यमन्तक मण्याची कथा" श्रीप...