गुरुवार, १४ मे, २०२६

विष्णुपुराण, तृतीय अंश, पंचदश अध्याय | Vishnu Puran, Ansh 3 , Adhyay 15

 

विष्णुपुराणम्

॥ तृतीयः अंशः पञ्चदशोऽध्यायः ॥


 

श्राद्ध- विधि

और्व उवाच
ब्राह्मणान्भोजयेच्छ्राद्धे यद्‍गुणांस्तान्निबोध मे ॥ १ ॥

त्रिणाचिकेतस्त्रिमधुस्त्रिसुपर्णष्षडङ्‍गवित् ।
वेदविच्छ्रोत्रियो योगी तथा वै ज्येष्ठसामगः ॥ २ ॥

ऋत्विक्स्वस्त्रेयदौहित्रजामातृश्वशुरास्तथा ।
मातुलोऽथ तपोनिष्ठः पञ्चाग्न्यभिरतस्तथा ।
शिष्याःसम्बन्धिनश्चैव मातापितृरतश्च यः ॥ ३ ॥

एतान्नियोजयेच्छ्राद्धे पूर्वोक्तान्प्रथमे नृप ।
ब्राह्मणान्पितृतुष्ट्यर्थमनुकल्पेष्वनन्तरान् ॥ ४ ॥

 

और्व पुढे म्हणाले :- "हे राजपुत्रा ! श्राद्धकार्यात भोजनास पात्र असलेल्या ब्राह्मणाचे वर्णन ऐक. त्रिणाचिकेताचे, मधुव्रताचे व त्रिसुपर्णांचे अध्ययन करणारा,  सहा वेदांगांची जाण असलेला, वेदवेत्ता, श्रोत्रिय, योगी आणि ज्येष्ठसामग, बहिणीचा मुलगा, मुलीचा मुलगा, जावई, सासरा, मामा, तपस्वी, पंचाग्नि तापविणारा, शिष्य, संबंधी आणि मातृपितृ प्रेमी असलेल्या ब्राह्मणाला ह्या श्राद्धकार्यासाठी नियुक्त करावे. यजमानाने पुर्वकर्मासाठी वर सुरूवातीला दिलेल्या पैकी वर्णनाच्या त्रिणाचिकेत आदि ब्राह्मणांची निवड करावी आणि उत्तरकर्मासाठी ऋत्विक आदि इतर ब्राह्मणांची नेमणूक करावी. १-४ ॥

 

 

 

मित्रध्रुक्कुनखी क्लीबः श्यावदन्तस्तथा द्विजः ।
कन्यादूषयिता वह्निवेदोज्झःसोमविक्रयी ॥ ५ ॥

अभिशस्तस्तथा स्तेनः पिशुनो ग्रामयाजकः ।
भृतकाध्यापकस्तद्वद्‍भृतकाध्यापितश्च यः ॥ ६ ॥

परपूर्वापतिश्चैव मातापित्रोस्तथोज्झकः ।
वृषलीसूतिपोष्टा च वृषलीपतिरेव च ॥ ७ ॥

तथा देवलकश्चैव श्राद्धे नार्हति केतनम् ॥ ८ ॥

मित्रघाती, विकृत स्वभावाचा, घाणेरडी नखं किंवा काळे दात असलेला,नपुंसक, कन्यागामी, अग्नीहोत्र आणि वेदाभ्यासाचा त्याग केलेला, सोम वनस्पती विकणारा, गुन्ह्याचा आरोप असलेला माणूस, चोर, टोमणे मारणारा, अभद्र लोकांसाठी धार्मिक विधी करणारा; आपल्या सेवकाला वेदाभ्यास शिकवणारा, शुल्क घेऊन शिकविणारा, सेवकाकडून वेदाचे धडे घेणारा, पुनर्विवाहितेचा पति, पालकांप्रती निष्ठावान नसलेला, शूद्र स्त्रीचा पती, शूद्र संतानाचे पालन करणारा किंवा मूर्तीसेवा करणारी कोणताही व्यक्ति ह्या पुर्वजांच्या कार्यासाठी आमंत्रित करण्यायोग्य व्यक्ती नाहीत . ५-८

 

 


 प्रथमेह्नि बुधः शस्ताञ्छ्रोत्रियादीन्निमन्त्रयेत् ।
 कथयेच्च तथैवैषां नियोगान्पितृदैविकान् ॥ ९ ॥

“श्राद्धाच्या पहिल्या दिवशी विवेकी माणसाने वेदातील विद्वानांना व श्रोत्रिय आदि ब्राह्मणांना आमंत्रित करून त्यांच्या निर्देशानुसार देवतांना आणि पितरांना काय अर्पण करायचे ते ठरवावे . त्यांना म्हणावे, “तुम्हाला पितृश्राद्धात व विश्वेदेव श्राद्धात नियुक्त व्हायचे आहे”.

 

 

 

ततः क्रोधव्यवायादीनायासं तैर्द्विजैः सह ।
यजमानो न कुर्वीत दोषस्तत्र महानयम् ॥ १० ॥

ब्राह्मणांच्या संगतीत राहून स्वतःला कोध, कष्ट, असंयम आणि स्त्रीगमनापासून दूर रहावे कारण हे महान दोष आहेत. १०

 


 श्राद्धे नियुक्तो भुक्त्वा वा भोजयित्वा नियुज्य च ।
 व्यवायी रेतसो गर्ते मज्जयत्यात्मनः पितॄन् ॥ ११ ॥

जो श्राद्धात निमंत्रित होऊन भोजन करून किंवा ब्राह्मणांना भोजन देऊन त्यांना त्यांच्या कार्यात नियुक्त करून जो पुरूष स्त्रीसंग करतो तो असंयमी व दोषी मनुष्य आपल्या पितरांना अत्यंत लज्जास्पद अशा विर्याच्या कुंडात बुडवतो. ११

 


 तस्मात्प्रथममत्रोक्तं द्विजाग्र्याणां निमन्त्रणम् ।
 अनिमन्त्र्य द्विजानेवमागतान्भोजयेद्यतीन् ॥ १२ ॥

म्हणून श्राद्धाच्या पहिल्या दिवशी वर वर्णन केलेल्या नियमात बसणार्‍या ब्राह्मणांना निमंत्रित करावे. इतर कोणी अनिमंत्रित साधूपुरूष आले तर त्यांचेही योग्य आदरातिथ्य करून त्यांनाही भोजन द्यावे. १२

 

 


पादशौचादिना गेहमागतान्पूजयेद्‌ द्विजान् ॥ १३ ॥

पवित्रपाणिराचान्तानासनेषूपवेशयेत् ।
पितॄणामयुजो युग्मान्देवानामिच्छया द्विजान् ॥ १४ ॥

देवानामेकमेकं वा पितॄणां च नियोजयेत् ॥ १५ ॥

अतिथींची पादपूजा करून त्यांचे आदरपूर्वक स्वागत करावे, हात धुऊन त्यांनी आचमन केल्यावर त्यांना आसनस्थ करावे. यजमानाने आपल्या सामर्थ्यानुसार पितरांसाठी अयुग्म म्हणजे असमान संख्येनेदेवगणांसाठी युग्म (सम संख्येने) किंवा दोन्ही प्रसंगी फक्त एक एक असे ब्राह्मण नियुक्त करावे. १३-१५

 


 तथा मातामहश्राद्धं वैश्वदेवसमन्वितम् ।
 कुर्वीत भक्तीसम्पन्नस्तन्त्रं वा वैश्वदैविकम् ॥ १६ ॥

अशाच प्रकारे श्रद्धापुर्वक विश्वदेवांसह मातामह श्राद्ध करावे किंवा पितृगण आणि मातामहगण दोघांसाठी भक्तिभावाने एकच विश्वेदेव श्राद्ध करावे. १६

 

 
 प्राङ्‍मुखान्भोजयेद्विप्रान्देवानामुभयात्मकान् ।
 पितृमातामहानां च भोजयेच्चाप्युदङ्‍मुखान् ॥ १७ ॥

देवतागणासाठी असलेल्या ब्राह्मणांना पुर्वेकडे आणि पितृगण तसेच मातृगणासाठी असलेल्या ब्राह्मणांनात्तरेकडे तोंड करून बसवून भोजन द्यावे. १७

 

 


 पृथक्तयोः केचिदाहुः श्राद्धस्य करणं नृप ।
 एकत्रैकेन पाकेन वदन्त्यन्ये महर्षयः ॥ १८ ॥

काहींच्या मते पितृ व मातामह गणासाठी पितरांसाठी दोन वेगवेगळी श्राद्धकार्य करावीत, तर काहींच्या मते दोन्ही बाजूच्या पितरांना एकाच वेळी समान अनुष्ठान करावे. १८

 

 

विष्टरार्थं कुशं दत्त्वा सम्पूज्यार्घ्यं विधानतः ।
कुर्यादावाहनं प्राज्ञो देवानां तदनुज्ञया ॥ १९ ॥

प्रथम कुश गवताचे आसन करून, विधिपुर्वक अर्घ्यदान करून, विवेकी पुरुषाने उपस्थित ब्राह्मणांच्या अनुमतिने देवतांचे आवाहन करावे. १९

 

 
 यवाम्बुना च देवानां दद्यादर्घ्यं विधानवित् ।
 स्रग्गन्धधूपदीपांश्च तेभ्यो दद्याद्यथाविधि ॥ २० ॥

मग श्राद्धविधी जाणणार्‍या व्यक्तिने यवमिश्रित जलाने अर्घ्यदान करून देवतांना फुले, गंध, दीप आणि धूप अर्पण करावे. २०

 


पितॄ्णामपसव्यं तत्सर्वमेवोपकल्पयेत् ।
अनुज्ञां च ततः प्राप्य दत्त्वा दर्भान्द्विधाकृतान् ॥ २१ ॥

मन्त्रपूर्वं पितॄणां तु कुर्याच्चावाहनं बुधः ।
तिलाम्बुना चापसव्यं दद्यादर्घ्यादिकं नृप ॥ २२ ॥

हे सर्व विधि यज्ञोपवित उजव्या खांद्यावर ठेऊन करावेत णि मग ब्राह्मणांच्या संमतीने कुशाचे  दोन भाग करून, मंत्रोच्चारांनी पितृगणांना कार्यात येण्याचे आवाहन करावे. यज्ञोपवित उजव्या खांद्यावर ठेऊनच तिलोदकाची जलांजलि अर्पण करावी. २१-२२

 

 

 काले तत्रातिथिं प्राप्तमन्नकामं नृपाध्वगम् ।
 ब्रह्मणैरभ्यनुज्ञातः कामं तमपि भोजयेत् ॥ २३ ॥

ह्यावेळी भोजनेच्छेने येणार्‍या  किंवा रस्त्याने जाणाऱ्या इतरांना ब्राह्मणांच्या सम्मतिने भोजन द्यावे. २३

 

 

 योगिनो विविधै रूपैर्नरामामुपकारिणः ।
 भ्रमन्ति पृथिवीमेतामविज्ञातस्वरूपिणः ॥ २४ ॥

कारण साधूपुरूष, तपस्वी व इतर परोपकारी  मनुष्य कल्याणासाठी नानावेषात पृथ्वीवर फिरत असतात. २४

 

 
 तस्मादभ्यर्चयेत्प्राप्तं श्राद्धकालेऽतिथिं बुधः ।
श्राद्धक्रियाफलं हन्ति नरेद्रापूजितोऽतिथिः ॥ २५ ॥

म्हणून विवेकी माणसाने अशा वेळी आलेल्या प्रत्येक व्यक्तीचे स्वागत करावे. कारण अतिथीकडे दुर्लक्ष केल्यास पितृकार्याचे संपूर्ण फळ नष्ट होते. २५

 

 
 जुहुयाद्‌व्यञ्जनक्षारवर्जमन्नं ततोऽनले ।
 अनुज्ञातो द्विजैस्तैस्तु त्रिकृत्वः पुरुषर्षभ ॥ २६ ॥

त्यानंतर यज्ञकर्त्याने सहाय्यक ब्राह्मणांच्या संमतीने, मीठ व शाकरहित अन्नाची अग्नीत तीन वेळा आहुति द्यावी . २६

 


 
अग्नये कव्यवाहाय स्वधेत्यादौ नृपाहुतिः ।
सोमाय वै पितृमते दातव्या तदनन्तरम् ॥ २७ ॥

वैवस्वताय चैवान्या तृतीया दीयते ततः ।
हुतावशिष्टमल्पान्नं विप्रपात्रेषु निर्वपेत् ॥ २८ ॥

हे राजन, “पहिली आहुति “अग्नये कव्यवाहनाय स्वाहा” दुसरी आहुति “सोमाय पितृमते स्वाहा आणि तिसही आहुति “वैवस्वताय स्वाहा” असे म्हणून द्यावी. नंतर ब्राह्मणांच्या ताटात अर्पण केलेल्या आहुतितील अवशेष अन्नाचा भाग वाढावा. २७-२८

 


 ततोन्नं मृष्टमत्यर्थमभीष्टमतिसंस्कृतम् ।
 दत्त्वा जुषध्वमिच्छातो वाच्यमेतदनिष्ठुरम् ॥ २९ ॥

आणि मग त्यांना त्यांच्या आवडीनुसार संस्कारयुक्त रुचकर अन्न वाढावे आणि, तुम्ही आता भोजन करा” असे म्हणावे. २९

 

 
 भोक्तव्यं तैश्च तच्चित्तैर्मौनिभिः सुमुखैः सुखम् ।
 अक्रुद्ध्यता चात्वरता देयं तेनापि भक्तितः ॥ ३० ॥

नंतर ब्राह्मणांनी शांतपणे, प्रसन्न चेहऱ्याने आणि आरामात भोजन करावे. यज्ञकर्त्याने सुद्धा क्रोधरहित राहून, प्रसन्न चेहर्‍याने श्रद्धापूर्वक ब्राह्मणांना भोजन वाढत राहावे. ३०

 

रक्षोघ्नमन्त्रपठनं भूमेरास्तरणं तिलैः ।
कृत्वाध्येयाःस्वपितरस्त एव द्विजसत्तमाः ॥ ३१ ॥

"त्यानंतर घातक आत्म्यांपासून रक्षणासाठी रक्षोघ्न मंत्राचा पाठ करून श्राद्धभूमीवर तीळ पसरवून, ब्राह्मणांना पितरांप्रमाणे संबोधित करून म्हणावे, ३१

 

 


 पिता पितामहश्चैव तथैव प्रपितामहः ।
 मम तृप्तिं प्रयान्त्वद्य विप्रदेहेषु संस्थिताः ॥ ३२ ॥

या ब्राह्मणांच्या शरीरात स्थित असलेल्या माझ्या वडील, आजोबा आणि पणजोबांना समाधान लाभो! ३२

 


 पिता पितामहश्चैव तथैव प्रपितामहः ।
 मम तृप्तिं प्रयान्त्वद्य होमाप्यायितमूर्तयः ॥ ३३ ॥

माझे वडील, आजोबा आणि पणजोबांना या यज्ञात अग्नीला अर्पण केलेल्या हविष्यातून पोषण मिळो! ३३

 


 पिता पितामहश्चैव तथैव प्रपितामहः ।
 तृप्तिं प्रयान्तु पिण्डेन मया दत्तेन भूतले ॥ ३४ ॥

माझे वडिल, आजोबा आणि पणजोबांना मी जमिनीवर ठेवलेल्या पिंडांमधून तृप्ती मिळो! ३४

 


 पिता पितामहश्चैव तथैव प्रपितामहः ।
 तृप्तिं प्रयान्तु मे भक्त्या मयैतत्समुदाहृतम् ॥ ३५ ॥

माझे वडील, आजोबा आणि पणजोबा यांना मी आजच्या दिवशी जे काही श्रद्धेने अर्पण केले त्याचा त्यांना आनंद होवो! ३५

 


 मातामहस्तृप्तिमुपैतु तस्य तथा पिता तस्य पिता ततोऽन्यः ।
 विश्वे च देवाः परमां प्रयान्तु  तृप्तिं प्रणश्यन्तु च यातुधानाः ॥ ३६ ॥

माझे आजोबा, त्यांचे वडील आणि त्यांचे वडील यांनाही ह्या कार्यामुळे समाधान लाभो! सर्व देवांना संतुष्ट होवोत आणि सर्व दुष्ट जीवांचा नाश होवो! माझे मातामह, त्यांचे पिता व त्यांचेही पिता तसेच विश्वेदेवगण परम तृप्त होवोत आणि सर्व दुष्ट आत्मे आणि राक्षसगण नष्ट होवोत . ३६

 


 यज्ञेश्वरो हव्यसमस्तकव्य-भोक्ताव्ययात्मा हरिरीश्वरोऽत्र ।
 तत्संनिधानादपयान्तु सद्यो रक्षांस्यशेषण्यसुराश्च सर्वे ॥ ३७ ॥

इथे समस्त हव्यकव्याचे भोक्ता यज्ञेश्वर भगवान विराजमान आहेत म्हणून त्यांचे सान्निध्य असल्याने सर्व दुष्टात्मे आणि राक्षसगण इथून दूर जावोत .३७

 

 


 तृप्तेष्वेतेषु विकिरेदन्नं विप्रेषु भूतले ।
 दद्यादाचमनार्थाय तेभ्यो वारी सकृत्सकृत् ॥ ३८ ॥

नंतर ब्राह्मण पोटभर जेवून तृप्त झाले की यजमानाने काही अन्न जमिनीवर पसरवावे आणि आचमनासाठी परत एक एक वेळा जल द्यावे . ३८

 


 सुतृप्तैस्तैरनुज्ञातःसर्वेणान्नेन भूतले ।
 सतिलोन ततः पिण्डान्सम्यग्दद्यात्समाहितः ॥ ३९ ॥

मग संतुष्ट ब्राह्मणांच्या संमतीने, भाताचे व तिळाचे पिंड बनवून जमिनीवर ठेवावे. ३९

 


पितृतीर्थेन सतिलं तथैव सलिलाञ्जलिम् ।
मातामहेभ्यस्तेनैव पिण्डांस्तीर्थेन निर्वपेत् ॥ ४० ॥

पितृतीर्थाने तिळयुक्त जलांजलि देऊन मातामह आदिंसाठीही पितृतीर्थानेच पिंडदान करावे. ४०

 


 दक्षिणाग्रेषु दर्भेषु पुष्पधूपादिपूजितम् ।
 स्वपित्रे प्रथमं पिण्डं दद्यादुच्छिष्टसन्निधौ ॥ ४१ ॥

ब्राह्मणांच्या उच्छिष्टा जवळ दक्षिणेकडे अग्रभाग करून पसरविलेल्या कुशा वर आधी आपल्या पित्यासाठी पुष्प धूप आदिने पुजित पिंडदान करावे . ४१

 

 
 पितामहाय चैवान्यं तत्पित्रे च तथापरम् ।
 दर्भमूले लेपभुजः प्रीणयेल्लेपघर्षणैः ॥ ४२ ॥

नंतर एक पिंड आजोबांना आणि एक पणजोबांना अर्पण करावा. कुश गवताच्या मुळांना लागलेले अन्न हाताने पुसून “लेपभागभुजस्तृप्यन्ताम्” म्हणजे लेपभोजी पितृगणांना तृप्त करो असे म्हणावे. ४२

 


 पिण्डैर्मातामहांस्तद्वद्‍गन्धमाल्यादिसंयुतैः ।
 पूजयित्वा द्विजाग्र्याणां दद्याच्चाचमनं ततः ॥ ४३ ॥

ह्याप्रकारे गंध, पुष्पमाळांनी युक्त पिंडांनी मातामह आदिंचे पूजन करावे आणि ब्राह्मणांचे आचमन करावे. ४३

 

 


 
पितृभ्यः प्रथमं भक्त्या तन्मनस्को नरेश्वर ।
सुस्वधेत्याशिषा युक्तां दद्याच्छक्त्या च दक्षिणाम् ॥ ४४ ॥

दत्त्वा च दक्षिणां तेभ्यो वाचयेद्‌वैश्वदेविकान् ।
प्रीयन्तामिह ये विश्वेदेवास्तेन इतीरयेत् ॥ ४५ ॥

त्यानंतर भक्तिभावाने वैश्वेदेविक ब्राह्मणांजवळ जाऊन त्यांना दक्षिणा द्यावी आणि विश्वदेव ह्या दक्षिणेने प्रसन्न होवोत!' असे म्हणून ब्राहमणांकडे आशीर्वादाची याचना करावी. ४४-४५

 


 तथेति चोक्ते तैर्विप्रैः प्रार्थनीयास्तथाशिषः ।
 पश्चाद्विसर्जयेद्देवान्पूर्वं पित्र्यान्महीपते ॥ ४६ ॥

मागितलेले आशीर्वाद ब्राह्मणांनी दिल्या नंतर, यजमानाने प्रथम पितृगणांचा आणि नंतर देवगणांच्या ब्राह्मणांचा निरोप घ्यावा. ॥ ४६ ॥

 


 मातामहानामप्येवं सह देवैः क्रमः स्मृतः ।
 भोजयेच्च स्वशक्त्या च दाने तद्वद्विसर्जने ॥ ४७ ॥

विश्वेदेवा बरोबरच मातिमह आदिंच्या श्राद्धातसुद्धा ब्राह्मणभोजन, दान आणि विसर्जन आदिंचे विधिक्रम वरीलप्रमाणेच आहे. ४७

 

 

आपादशौचनात्पूर्वं कुर्याद्देवद्विजन्मसु ।
विसर्जनं तु प्रथमं पैत्रमातामहेषु वै ॥ ४८ ॥

पितृगण आणि मातामहगणाच्या श्राद्धात पाय धुणे वगैरे विधि आधी देवपक्षाच्या ब्राह्मणांच्या कराव्यात पण निरोप घेताना मात्र आधी पितृगण किंवा मातामहगणाच्या ब्राह्मणांचा घ्यावा. ४८

 


 विसर्जयेत्प्रीतिवचःसंमान्याभ्यर्थितास्ततः ।
 निवर्तेताभ्यनुज्ञात आद्वारं ताननुव्रजेत् ॥ ४९ ॥

यजमानाने मधुर भाषण आणि योग्य सन्मानाने  आदरातिथ्य करून ब्राह्मणांना निरोप द्यावा व  श्राद्धाच्या शेवटी परतण्याची परवानगी मिळेपर्यंत तिथे उपस्थित राहावे. ४९

 


 ततस्तु वैश्वदेवाख्यं कुर्यान्नित्यक्रियं बुधः ।
 भुञ्ज्याच्चैव समं पूज्य भृत्यबन्धुभिरात्मनः ॥ ५० ॥

नंतर त्याने विश्वदेवांचे अखंड पूजन करत आपले मित्र, नातेवाईक आणि आश्रितांसह स्वतः भोजन करावे. ५०

 


 एवं श्राद्धं बुधः कुर्यात्पैत्र्यं मातामहं तथा ।
 श्राद्धैराप्यायिता दद्युःसर्वान्कामान्पितामहाः ॥ ५१ ॥

अशा प्रकारे बुद्धिमान गृहस्थाने आपल्या पितृ आणि मातृ पूर्वजांचे श्राद्ध करावे म्हणजे संतुष्ट होऊन, पितर त्याच्या सर्व इच्छा पूर्ण करतात. ५१

 


 त्रीणि श्राद्धे पवित्राणि दौहित्रः कुतपस्तिलाः ।
 रजतस्य कथा दानं तथा संकीर्तनादिकम् ॥ ५२ ॥

कन्येचा मुलगा, कुतप (दिवसाचा आठवा मुहूर्त) आणि तीळ ह्या तीन गोष्टी तसेच चांदीचे दान व त्याबद्दल बोलणे हे सर्व उपासनेत पवित्र मानले आहे. ५२

 


 वर्ज्यानि कुर्वता श्राद्धं क्रोधोध्वगमनं त्वरा ।
 भोक्तुरप्यत्र राजेन्द्र त्रयमेतन्न शस्यते ॥ ५३ ॥

श्राद्ध करणाऱ्या व्यक्तीने क्रोधित होणे, चालणे, उतावळेपणा तीन गोष्टी अतिशय आक्षेपार्ह असल्याने टाळाव्यात. श्राद्धात भोजन करणार्‍यांनी सुद्धा ह्या तीन गोष्टी टाळाव्यात. ५३

 


 विश्वेदेवाःसपितरस्तथा मातामहा नृप ।
 कुलं चाप्यायते पुंसां सर्वं श्राद्धं प्रकुर्वताम् ॥ ५४ ॥

“विश्वदेव, पितृगण, मातामहगण व गृहस्थाच्या कुटुंबातील सदस्य सर्वचजणांना पितरांच्या श्राद्धकार्यामुळे पोषण मिळते."५४

 


 सोमाधारः पितृगणो योगाधारश्च चन्द्रमाः ।
 श्राद्धे योगिनियोगस्तु तस्माद्‍भूपाल शस्यते ॥ ५५ ॥

पितृगणाचा आधार चंद्र आहे आणि चंद्राचा आधार योग आहे म्हणून  श्राद्धकार्यासाठी योगीजनांची नियुक्ती करणे इष्ट आहे. ५५

 


 सहस्रस्यापि विप्राणां योगी चेत्पुरतःस्थितः ।
 सर्वान्भोक्तॄंस्तारयति यजमानं तथा नृप ॥ ५६ ॥

हजार श्राद्धभोजी ब्राह्मणांसमोर एक योगी बसवल्याने तो यजमानासह त्या सर्वांचा उद्धार करण्यास समर्थ असतो. ५६

 


 इति श्रीविष्णुमहापुराणे तृतीये अंशे पञ्चदशोऽध्यायः (१५)

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

विष्णुपुराण, चतुर्थ अंश, त्रयोदश अध्याय | Vishnu Puran, Ansh 4 , Adhyay 13

  ॥ विष्णुपुराणम् ॥ ॥ चतुर्थ: अंशः ॥ त्रयोदशो ऽध्यायः ॥   "सत्वतच्या सन्ततिचे वर्णन आणि स्यमन्तक मण्याची कथा" श्रीप...