॥ विष्णुपुराणम् ॥
॥ तृतीयः अंशः ॥ चतुर्दशोऽध्यायः ॥
श्राद्धप्रशंसा,
श्राद्धात पात्र अपात्र विचार
और्व उवाच
ब्रह्मेन्द्ररुद्रनासत्यसूर्याग्निवसुमारुतान्
।
विश्वेदेवान्पितृगणान्वयांसि
मनुजान्पशुन् ॥ १ ॥
सरीसृपानृषिगणान्यच्चान्यद्भूत
संज्ञितम् ।
श्राद्धं
श्रद्धान्वितः कुर्वन्प्रीणयत्यखिलं जगत् ॥ २ ॥
और्व म्हणाले :- हे राजन, "श्राद्धसहित
श्राद्धकर्म केल्याने ब्रह्मा, इंद्र, रुद्र, आश्विन, सूर्य, अग्नी, वसुगण, मरूद्गण, विश्वेदेव, पितृगण,
पक्षी,
पुरुष,
प्राणी,
सरपटणारे प्राणी, ऋषिगण आणि समस्त जगत प्रसन्न
होते. ॥
१-२
॥
मासि मास्यसिते
पक्षे पञ्चदश्यां नरेश्वर ।
तथाष्टकासु
कुर्वीत काम्यान्कालाञ्छृणुष्व मे ॥ ३ ॥
प्रत्येक महिन्याला कृष्णपक्षातील पंधराव्या
(अमिवस्या) दिवशी आणि हेमंत शिशिर आदि चार ऋतूंच्या महिन्यातील अष्टमीला श्राद्ध (नित्यश्राद्धकाल)
करावे. आता काम्यश्राद्धाचा काळ सांगतो. ॥ ३ ॥
श्राद्धार्हमागतं
द्रव्यं विशिष्टमथ वा द्विजम् ।
श्राद्धं कुर्वीत
विज्ञाय व्यतीपातेऽयने तथा ॥ ४ ॥
“घरी प्रतिष्ठित ब्राह्मण अतिथी आला
असता, श्राद्धयोग्य पदार्थ असतील तर, किंवा उत्तरायण वा दक्षिणायनाच्या आरंभ किंवा व्यतीपातकाळी काम्यश्राद्धाचे अनुष्ठान
करावे. ॥ ४ ॥
विषुवे
चापि सम्प्राप्ते ग्रहणे शशिसूर्ययोः ।
समस्तेष्वेव
भूपाल राशिष्वर्के च गच्छति ॥ ५ ॥
नक्षत्रग्रहपीडासु
दुष्टस्वप्नावलोकने ।
इच्छाश्राद्धानि
कुर्वीत नवसस्यागमे तथा ॥ ६ ॥
विषुवसंक्रांतीच्या काळात,
सूर्य आणि चंद्र ग्रहणाच्या
वेळी,
सूर्याचा प्रत्येक राशीत
प्रवेश होतो तेव्हा, ग्रह आणि नक्षत्रांची पीडा असेल तर, अशुभ स्वप्ने पडल्यास आणि नवीन कापणीचे
धान्य घरी आल्यावरही गृहस्थाने काम्यश्राद्धाचे अनुष्ठान करावे. ॥ ५-६ ॥
अमावास्या यदा
मैत्रविशाखास्वातियोगिनी ।
श्रीद्धैः पितृगणस्तृप्तिं
तथाप्नोत्यष्टवार्षिकीम् ॥ ७ ॥
अमवास्या
यदा पुष्ये रौद्रे चर्क्षे पुनर्वसौ ।
द्वादशाब्दं
तदा तृप्तिं प्रयान्ति पितरोऽर्चिताः ॥ ८ ॥
अनुराधा, विषाखा किंवा स्वाती नक्षत्रयुक्त
अमावास्येला केलेले श्राद्ध पितरांना आठ वर्षे तृप्ती देते आणि पुष्य आर्द्रा किंवा
पुनर्वसु नक्षत्रयुक्त अमावास्येला केलेले श्राद्ध पितरांना बारा वर्षे तृप्ती देते . ॥ ८ ॥
वासवाजैकपादर्क्षे
पितॄणां तृप्तिमिच्छताम् ।
वारुणे वाप्यमावास्या
देवानामपि दुर्लभा ॥ ९ ॥
धनिष्ठ, पूर्वाभाद्रपद किंवा शताभिषा
नक्षत्रयुक्त अमावस्येला पितरांची किंवा देवतांची पूजा करू इच्छिणाऱ्या माणसासाठी अतिशय
दुर्लभ आहे . ॥ ९ ॥
नवस्वृक्षेष्वमावास्या
यदैतेष्ववनीपते ।
तदा हि तृप्तिदं
श्राद्धं पितॄणां शृणु चापरम् ॥ १० ॥
गीतं सनत्कुमारेण
यथैलाय महात्मने ।
पृच्छते पितृभक्ताय
प्रश्रयावनताय च ॥ ११ ॥
ह्या नऊ नक्षत्रांनी युक्त अमावस्येला
केलेल्या श्राद्धाने पितृगण अत्यंत तृप्त होतात. पितृभक्त इलापुत्र महात्मा पुरूरव्याने
अत्यंत विनम्रतेने विचारल्यावर सनत्कुमाराने ज्या अन्य तिथि सांगितल्या त्या सुद्धा
ऐक. ॥
१०-११
॥
सनत्कुमार उवाच
वैशाखमासस्य
च या तृतीया नवम्यसौ कर्तिकशुक्लपक्षे
।
नभस्यमासस्य
च कृष्णपक्ष त्रयोदशी पञ्चदशी
च माघे ॥ १२ ॥
एता युगाद्याः
कथिताः पुराणे- ष्वनन्तपुण्यास्तिथयश्चतस्त्रः ।
उपप्लवे चन्द्रमसो
रवेश्च त्रिष्वष्टकास्वप्ययनद्वये च ॥ १३ ॥
पानीयमप्यत्र
तिलैर्विमिश्रं दद्यात्पितृभ्यः प्रयतो मनुष्यः ।
श्राद्धं कृतं
तेन समासहस्रं रहस्यमेतत्पितरो वदन्ति ॥ १४ ॥
सनत्कुमार
म्हणाले, “वैशाख शुक्ल तृतीया, कार्तिक शुक्ल नवमी; भाद्रपद कृष्ण त्रयोदशी
आणि माघ अमावस्या ह्या चार तिथिंना पुराणात युगाद्या (युगारंभ) म्हटले आहे. हे दिवस अतिशय पवित्र मानले
जातात. प्रत्येक सूर्य आणि चंद्र ग्रहणाच्या वेळी, अग्रहयाण, माघ किंवा फाल्गुन कृष्णाष्टमीला,
किंवा उत्तरायण वा दक्षिणायनाच्या आरंभी जो पुरूष एकाग्रचित्ताने पितृगणांना तीळ मिश्रित
जल अर्पण करतो ते कार्य पितरांना हजार वर्षांपर्यंत संतृष्ट ठेवते असे रहस्य पितृगणांनी
स्वतः सांगितले आहे. ॥ १२-१४ ॥
माघेऽसिते
पञ्चदशी कदाचिदुपैति योगं यदि वारुणेन ।
ऋक्षेण
कालःस परः पितॄणां न ह्यल्पपुण्यैर्नृप
लभ्यतेसौ ॥ १५ ॥
जर माघ महिन्यातील अमिवस्या शतभिषान
नक्षत्रयुक्त असेल तर पितृगणांच्या तृप्तीसाठी हा परम उत्कृष्ट काळ असतो. अल्प पुण्यवान
लोकांना अशी संधी मिळत नाही. ॥ १५ ॥
काले
धनिष्ठा यदि नाम तस्मिन्भवेत्तु भूपाल तदा पितृभ्यः ।
दत्तं
जलान्नं प्रददाति तृप्तिं वर्षायुतं तत्कुलजैर्मनुष्यैः
॥ १६ ॥
जर माघ अमावस्या धनिष्ठ नक्षत्रयुक्त
असेल तर संबंधित कुटुंबातील गृहस्थाने दिलेल्या अन्न व जलाच्या अर्पणाने पितर दहा हजार वर्षे संतुष्ट
होतात.
॥ १६ ॥
तत्रैव
चेद्भाद्रपदानुपूर्वा काले यथावत्क्रियते पितृभ्यः
।
श्राद्धं
परां तृप्तिमुपेत्य तेन युगं सहस्रं पितरःस्वपन्ति ॥ १७ ॥
त्याचबरोबर जर पुर्वाभाद्रपद नक्षत्रयोग
असेल तर त्यावेळी केलेल्या श्राद्धकार्याने पितरांची परमतृप्ती होते व ते एक सहस्र
युगांपर्यंत शयन करत राहतात. ॥ १७ ॥
गङ्गां
शतद्रूं यमुनां विपाशां सरस्वतीं नैमिशगोमतीं वा ।
तत्रावगाह्यार्चनमादरेण कृत्वा
पितॄणां दुरितानि हन्ति ॥ १८ ॥
“पितरांचे श्राद्धकार्य केल्यावर जो
पुरूष गंगा,
सतलज, यमुना, विपाशा, सरस्वती
किंवा नैमिषारण्यातील गोमती नदीत स्नान करतो,
तो सर्व पापांतून मुक्त
होतो. ॥
१८ ॥
गायन्ति चैतत्पितरः
कदानु वर्षामघातृप्तिमवाप्य भूयः ।
माघासितान्ते
शुभतीर्थतोयैर्यास्याम तृप्तिं तनयादिदत्तैः ॥ १९ ॥
पितृगण सदैव गायन करतात की, “ भाद्रपद शुक्ल त्रयोदशीच्या
मघा नक्षत्रात तृप्ती मिळाल्यावर, माघ महिन्यातील अमावस्येला आमच्या पुत्र
पौत्रादिंद्वारा दिलेल्या पुण्यतिर्थांच्या जलांजलिमुळे आम्हाला केव्हा तृप्ती मिळेल.”
॥ १९ ॥
चित्तं
च वित्तं च नृणां विशुद्धं शस्तं च कालः कथितो
विधिश्च ।
पात्रं
यथोक्तं परमा च भक्तिर्नृणां प्रयच्छन्त्यभिवाञ्छितानि ॥ २० ॥
शुद्धचित्त, अखंड संपत्ती, समृद्ध ऋतू, परिपूर्ण संस्कार आणि पहम भक्ति मनुष्याला
इच्छित फळ देतात. ॥ २० ॥
पितृगीतान्तथैवात्र
श्लोकांस्तञ्छृणु पार्थिव ।
श्रुत्वा
तथैव भवता भाव्यं तत्रादृतात्मना ॥ २१ ॥
हे राजपुत्रा आता पितृगणांनी गायलेल्या गीताचे
श्लोक ऐक ज्याच्या श्रवणाने तुला फायदा होईल. ॥ २१ ॥
अपि धन्यः कुले
जायादस्माकं मतिमान्नरः ।
अकुर्वन्वित्तशाठ्यं
यः पिण्डान्नो निर्वपिष्यति ॥ २२ ॥
पितृगण म्हणतात, “आमच्या कुटुंबात असा ज्ञानी व
मतिमान पुरूष जन्माला येईल का जो आपल्या संपत्तीचा अभिमान न ठेवता,
आम्हाला पिंडदान करेल. ॥ २२ ॥
रत्नं
वस्त्रं महायानं सर्वभोगादिकं वसु ।
विभवे
सति विप्रेभ्यो योऽस्मानुद्दिश्य दास्यति ॥ २३ ॥
जो आमच्या सन्मानार्थ ब्राह्मणांना
आपल्या ऐपतीनुसार दागदागिने, वस्त्र, जमीन, वाहन, किंवा अन्य मौल्यवान भेटवस्तू देईल.
॥ २३ ॥
अन्नेन
वा यथाशक्त्या कालेऽस्मिन्भक्तिनम्रधीः ।
भोजयिष्यति
विप्राग्र्यांस्तन्मात्रविभवो नरः ॥ २४ ॥
किंवा त्याच्याकडे केवळ अन्न वस्त्रच
असल्यास जो श्राद्धकाळी आपल्या ऐपतीनुसार ब्राह्मणांना भोजन देईल. ॥ २४ ॥
असमर्थोन्नदानस्य
धान्यमामं स्वशक्तितः ।
प्रदास्यति
द्विजाग्रेभ्यः स्वल्पाल्पां वापि दक्षिणाम् ॥ २५ ॥
जर तो ब्राह्मणांना वस्त्र व अन्न देण्यासही
असमर्थ असेल तर त्याने आपल्या क्षमतेनुसार, त्यांना कच्चे धान्य व थोडीशी दक्षिणा
द्यावी. ॥ २५ ॥
तत्राप्यसामर्थ्ययुतः कराग्राग्रस्थितांस्तिलान् ।
प्रणम्य द्विजमुख्याय कस्मैचिद्भूप दास्यति ॥ २६ ॥
तिलैः सप्ताष्टभिर्वापि समवेतं जलाञ्जलिम् ।
भक्तिनम्रः समुद्दिश्य भुव्यस्माकं प्रदास्यति ॥ २७ ॥
जर हे करण्यासही तो पूर्णपणे असमर्थ
असेल तर त्याने एखाद्या प्रतिष्ठीत ब्राह्मणापुढे नतमस्तक होऊन, एक मूठभर तीळ किंवा भक्तिभावाने
आमच्यासाठी पृथ्वीवर सात आठ तीळांची जलांजलि तरी द्यावी. ॥ २६-२७ ॥
यतः कुताश्चित्सम्प्राप्य
गोभ्यो वापि गवाह्निकम् ।
अभावे प्रीणयन्नस्माञ्च्छ्रद्धायुक्तः
प्रदास्यति ॥ २८ ॥
आणि हेही शक्य नसेल तर मग त्याने एक
दिवसाचा चारा गोळा करून गायीला खाऊ घालावा. हे सर्व त्याने खर्या श्रद्धेने केल्यास आम्हाला तृप्ती
व समाधान
लाभेल. ॥ २८ ॥
सर्वाभावे वनं
गत्वा कक्षमूलप्रदर्शकः ।
सूर्यादिलोकपालानामिदमुच्चेर्वदिष्यति
॥ २९ ॥
न मेऽस्ति वित्तं
न धनं च नान्यच्छ्राद्धोपयोग्यं स्वपितॄन्नतोस्मि ।
तृप्यन्तु भक्तया
पितरो मयैतौ कृतौ भुजौ वर्त्मनि मारुतस्य ॥ ३० ॥
जर हे देखील करण्यास तो असमर्थ असेल,
तर त्याने अरण्यात जाऊन
आकाशात सूर्य व इतर नक्षत्रांच्या दिशेने आपले हात करून उच्च स्वरात म्हणावे, “माझ्याकडे
पितरांना अर्पण करण्यासाठी पैसा, मालमत्ता, धान्य किंवा इतर काहीही नाही. मी माझ्या
पितरांसमोर नतमस्तक होत आहे, ते माझ्या भक्तीभावानेच तृप्त होवोत.” ॥ २९-३० ॥
और्व उवाच
इत्येतत्पितृभिर्गीतं
भावाभावप्रयोजनम् ।
यः करोति कृतं
तेन श्राद्धं भवति पार्थिव ॥ ३१ ॥
और्व म्हणाले, “हे राजन, धन असल्यास किंवा नसल्यास पितृगणांनी ज्याप्रमाणे सांगितले
तसेच जो पुरूष आचरण करतो तो त्या विधिंनी वाधिपुर्वक श्राद्धच करतो.” ॥ ३१ ॥
इति श्रीविष्णुमहापुराणे
तृतीये अंशे चतुर्दशोऽध्यायः (१४)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा