रविवार, ४ ऑक्टोबर, २०२६

विष्णुपुराण, पंचम अंश, विंश अध्याय | Vishnu Puran, Ansh 5 , Adhyay 20

 

॥ विष्णुपुराणम् ॥

॥ पञ्चमः अंशः ॥ ॥ विंशोऽध्यायः ॥


"कुब्जेवर कृपा, धनुर्भङ्ग, कुवलयापीड आणि चाणूरादि मल्लांचा नाश तसेच कंस-वध"

 

श्रीपराशर उवाच
राजमार्गे ततः कृष्णः सानुलेपनभाजनाम् ।
 ददर्श कुब्जामायान्तीं नवयोवनगोचराम् ॥ १ ॥
श्रीपराशर म्हणाले ;- त्यानन्तर श्रीकृष्णाने राजमार्गावर एका नवयौवना कुब्जा स्त्रीला अनुलेपनाचे पात्र घेऊन येताना पाहीले ॥ १ ॥


 तामाह ललितं कृष्णः कस्येदमनुलेपनम् ।
 भवत्या नीयते सत्यं वदेन्दीवरलोचने ॥ २ ॥

तेव्हा श्रीकृष्णाने तिला विलासपूर्वक म्हटले -"अगं कमललोचने ! तू खरं- खरं सांग हे अनुलेपन कोणासाठी घेऊन जात आहेस?" ॥२॥


 सकामेनेव सा प्रोक्ता सानुरागा हरिं प्रति ।
 प्राह सा ललितं कुब्जा तद्दर्शनबलात्कृता ॥ ३ ॥

भगवान कृष्णाने कामुकतेने अशा प्रकारे विचारल्यावर अनुरागिणी कुब्जाने त्यांच्या दर्शनाने आकृष्टचित्त होऊन अति ललित भावाने म्हटले -॥३॥

कान्त कस्मान्न जानासि कंसेन विनियोजिताम् ।
 नैकवक्रेति विख्यातामनुलेपनकर्मणि ॥ ४ ॥

"हे कान्त ! तुम्ही मला ओळखत नाही का? मी अनेकवक्रा नावाने विख्यात आहे, राजा कंसाने मला अनुलेपन-कार्यासाठी नियुक्त केले आहे ॥ ४ ॥


 नान्यपिष्टं हि कंसस्य प्रीतये ह्यनुलेपनम् ।
 भवाम्यहमतीवास्य प्रसादधनभाजनम् ॥ ५ ॥

राजा कंसाला केवळ माझ्याच हातचे कुटलेले उटणे आवडते म्हणून त्यांची माझ्यावर अत्यंत कृपादृष्टी आहे " ॥ ५ ॥




 श्रीकृष्ण उवाच
 सुगन्धमेतद्‌राजार्हं रुचिरं रुचिरानने ।
 आवयोर्गात्र सदृशं दीयतामनुलेपनम् ॥ ६ ॥

श्रीकृष्ण म्हणाले ;- हे सुमुखी! हे सुन्दर सुगन्धमय अनुलेपन राजाच्याच योग्य है, माझ्या शरीरासाठी योग्य असे कोणते अनुलेपन असल्यास दे ॥६॥


 श्रीपराशर उवाच
 श्रुत्वैतदाह सा कुब्जा गृह्यतामिति सादरम् ।
 अनुलेपनं च प्रददौ गात्रयोग्यमथोभयोः ॥ ७ ॥

श्रीपराशर म्हणाले ;- हे ऐकून कुब्जाने त्या दोघांना आदरपूर्वक त्यांच्या शरीरयोग्य चन्दनादि दिले ॥ ७ ॥


 भक्तिच्छेदानुलिप्ताङ्‍गौ ततस्तौ पुरुषर्षभौ ।
 सेन्द्रचापौ व्यराजेतां सितकृष्णाविवाम्बुदौ ॥ ८ ॥

त्यावेळी ते दोघे पुरुषश्रेष्ठ पत्ररचना विधिने अनुलिप्त होऊन इन्द्रधनुष युक्त श्याम व श्वेत मेघासमान सुशोभित झाले ॥ ८ ॥


 ततस्तां चुबुके शौरिरुल्लापनविधानवित् ।
 उत्पाट्य तोलयामास व्द्यङ्‍गुलेनाग्रपाणिना ॥ ९ ॥
 चकर्ष पद्‌भ्यां च तदा ऋजुत्वं केशवोऽनयत् ।
 ततः सा ऋजुतां प्राप्ता योषितमभवद्वरा ॥ १० ॥

नंतर उल्लापन (सरळ करणे) विधि जाणणार्‍या श्रीकृष्णाने तिची हनुवटीला आपल्या आपल्या दोन बोटांनी झटका दिला आणि तिच्या पायांवर आपल्या पायांनी दाब दिला. अशा प्रकारे केशवाने तिचे शरीर सरळ केले. सरळ झाल्यावर ती सर्वात सुंदर स्त्री झाली ॥ ९-१० ॥


 विलासलिलितं प्राह प्रेमगर्भभरालसम् ।
 वस्त्रे प्रगृह्य गोविन्दं मम गेहं व्रजेति वै ॥ ११ ॥

तेव्हा गोविंदाचे वस्त्र पकडून प्रेमळ विलासपूर्ण आवाजात ती म्हणाली - 'तुम्ही माझ्या घरी या' ॥ ११ ॥


एवमुक्तस्तया शौरी रामस्यालोक्य चाननम् ।
प्रहस्य कुब्जां तामाह नैकवक्रामनिन्दिताम् ॥ १२ ॥

तिने असे म्हटल्यावर श्रीकृष्णाने बलरामाकडे बघून हसत हसत आधी अनेक ठिकाणी वक्र असलेल्या पण आता सुंदर झालेल्या कुब्जाला म्हटले- ॥ १२ ॥


आयास्ये भवतीगेहमिति तां प्रहसन्हरिः ।
विससर्ज जहासोच्चै रामस्यालोक्य चाननम् ॥ १३ ॥

हो, तुझ्या घरी सुद्धा येणार’ असे म्हणून श्रीहरिने हसून तिचा निरोप घेतला बलभद्राकडे पाहून जोरजोरात हसू लागले ॥ १३ ॥


 भक्तिभेदानुनिप्ताङ्‍गौ नीलपीताम्बरौ तु तौ ।
 धनुःशालां ततो यातौ चित्रमाल्योपशोभितौ ॥ १४ ॥

त्यानन्तर पत्र-रचनेच्या विधिने अनुलिप्त झालेले तसेच चित्र-विचित्र माळांनी सुशोभित तसेच क्रमशः नीलाम्बर आणि पीताम्बर धारण केलेले राम आणि कृष्ण यज्ञशाळेपर्यंत आले ॥ १४ ॥

 


 आयागं तद्धनूरत्‍नं ताभ्यां पृष्टैस्तु रक्षिभिः ।
 आख्याते सहसा कृष्णो गृहीत्वा पूरयद्धनुः ॥ १५ ॥

तिथे पोहोचल्यावर त्यांनी यज्ञ रक्षकांना त्या यज्ञाचा उद्देश्य स्वरूप असलेल्या धनुष्याविषयी विचारले आणि त्यांनी सांगितल्यावर श्रीकृष्ण अचानक उठून त्यावर प्रत्यञ्चा चढवू लागले ॥ १५ ॥


 ततः पूरयता तेन भज्यमानं बलाद्धनुः ।
 चकार सुमहच्छब्दं मथुरा येन पूरिता ॥ १६ ॥

त्यावर बलपूर्वक प्रत्यञ्चा चढवताना ते धनुष्य तुटले, त्यावेळी झालेला भयंकर आवाज सम्पूर्ण मथुरेत घुमला ॥ १६ ॥


 अनुयुक्तौ ततस्तौ तु भग्ने धनुषि रक्षिभिः ।
 रक्षिसैन्यं निहत्योभौ निष्क्रान्तौ कार्मुकालयात् ॥ १७ ॥

धनुष्य तुटल्यावर तिथल्या रक्षकांनी त्यांच्यावर आक्रमण केले, त्या रक्षकांचा संहार करून ते दोन्ही बालक धनशाळेतून बाहर आले ॥ १७ ॥


 अक्रूरागमवृत्तान्तमुपलभ्य महद्धनुः ।
 भग्नं श्रुत्वा च कंसोऽपि प्राह चाणूरमुष्टिकौ ॥ १८ ॥

त्यानंतर अक्रूर आल्याचा समाचार मिळाल्याने तसेच ते महान धनुष्य भग्न झालेले ऐकून कंस चाणूर आणि मुष्टिकाला म्हणाला ॥ १८ ॥


 कंस उवाच
 गोपालदारकौ प्राप्तौ भवद्‌भ्यां तु ममाग्रतः ।
 मल्लयुद्धेन हन्तव्यौ मम प्राणहरौ दि तौ ॥ १९ ॥
 नियुद्धे तद्विनाशेन भवद्‍भ्यां तोषितो ह्य् अहम् ।
 दास्याम्यभिमतान्कामान्नान्यथैतौ महाबलौ ॥ २० ॥

कंस म्हणाला ;- इथे दोन्ही गोपालबालक आले आहेत. ते माझे प्राण हरण करणार आहेत, म्हणून तुम्ही दोघं मल्लयुद्धाने त्यांना माझ्या समोर मारून टाका. जर तुम्ही मल्लयुद्धात त्या दोघांचा विनाश करून मला सन्तुष्ट केलेत तर मी सर्व इच्छा पूर्ण करेन; माझ्या बोलणं खोटं समजू नका ॥१९-२०॥

 


 न्यायतोऽन्यायतो वापि भवद्‌भ्यां तौ ममाहितौ ।
 हन्ताव्यौ तद्वधाद्‌राज्यं सामान्यं वां भविष्यति ॥ २१ ॥

न्याय किंवा अन्याय कोणत्याही प्रकारे माझ्या ह्या महाबलवान् अपकारींना तुम्ही अवश्य मारून टाका. ते मारले गेल्यावर हे राज्य माझ्या इतकेच तुमचेही असेल ॥ २१ ॥



 इत्यादिश्य स तौ मल्लौ ततश्चाहूय हस्तिपम् ।
 प्रोवाचोच्चैस्त्वया मल्लसमाजद्वारि कुञ्जरः ॥ २२ ॥
 स्थाप्यः कुवलयापीडस्तेन तौ गोपदारकौ ।
 घातनीयौ नियुद्धाय रङ्‍गद्वारमुपागतौ ॥ २३ ॥

मल्लांना अशा प्रकारे आज्ञा देऊन कंसाने आपल्या माहुताला बोलावले आणि त्याला आज्ञा दिली की तू कुवलयापीड हत्तीला मल्लांच्या रंगभूमीच्या दरवाजावर उभे कर आणि जेव्हा ते गोपकुमार युद्धासाठी इथे येतील तेव्हा त्यांना नष्ट करा ॥ २२-२३ ॥


 तमप्याज्ञाप्य दृष्ट्‍वा च सर्वान्मञ्चानुपाकृतान् ।
 आसन्नमरणः कंसः सूर्योदयमुदैक्षत ॥ २४ ॥

अशा प्रकारे त्यांना आज्ञा देऊन सगळी सिंहासने जागेवर असलेली पाहून मृत्यु जवळ आलेला तो कंस सूर्योदयाची प्रतीक्षा करू लागला ॥ २४ ॥

 
 ततः समस्तमञ्चेषु नागरः स तदा जनः ।
 राजमञ्चेषु चारूढाः सह भृत्यैर्नराधिपाः ॥ २५ ॥

पहाट झाल्यावर सर्व मंचांवर नागरिक आणि राजमंचांवर आपआपल्या अनुचरांसह सर्व राजे बसले ॥२५॥


 मल्लप्राश्निकवर्गश्च रङ्‍गमध्यसमीपगः ।
 कृतः कंसेन कंसोऽपि तुङ्‍गमञ्चे व्यवस्थितः ॥ २६ ॥

त्यानंतर रंगभूमिच्या मध्यभागाजवळ कंसाने युद्धपरीक्षकांना बसवले आणि स्वतः सुद्धा एका उंच सिंहासनावर बसला ॥ २६ ॥


 अन्तःपुराणां मञ्चाश्च तथान्ये परिकल्पिताः ।
 अन्ये च वारमुख्यानामन्ये नागरयोषिताम् ॥ २७ ॥

तिथे अन्तःपुरातील स्त्रियांसाठी वेगळे मचाण बनवले होते तसेच मुख्य मुख्य वारांगना आणि नगरातील स्त्रियांसाठीही वेगळे मंच होते ॥ २७ ॥


 नन्दगोपादयो गोपा मञ्चेष्वन्येष्ववस्थिताः ।
 अक्रूरवसुदेवौ च मञ्चप्रान्ते व्यवस्थितौ ॥ २८ ॥

अन्य काही मंचांवर नन्दगोप आदि गोपगणांना बसवले होते आणि त्या मंचांजवळच अक्रूर आणि वसुदेव बसले होते ॥२८॥



 नागरीयोषितां मध्ये देवकीपुत्रगर्धिनी ।
 अन्तकालेऽपि पुत्रस्य द्रक्ष्यामीति मुखं स्थिता ॥ २९ ॥

नगरातील स्त्रियांमध्येच 'चला, निदान अन्तकाळी तरी पुत्राचे तोंड बघून घेईन' ह्या विचाराने पुत्रासाठी मङ्गलकामना करत देवकी बसली होती ॥ २९ ॥


 वाद्यमानेषु तुर्येषु चाणूरे चापि वल्गति ।
 हाहाकारपरे लोके ह्यास्फोटयति मुष्टिके ॥ ३० ॥
 ईषद्धसन्तौ तौ वीरौ बलभद्रजनार्दनौ ।
 गोपवेषधारौ बालौ रङ्‍गद्वारमुपागतौ ॥ ३१ ॥

त्यानंतर जेव्हा तूर्य वाजू लागले चाणूर उसळ्या मारू लागला आणि मुष्टिकाने ताल ठोकला तेव्हा दर्शकगण हाहाकार करत होते, गोपी वेषधारी वीर बालक बलभद्र आणि कृष्ण हसत हसत रंगभूमीच्या प्रवेशद्वारा जवळ आले ॥ ३० - ३१ ॥


 ततः कुवलयापीडो महामात्रप्रचोदितः ।
 अभ्यधावत वेगेन हन्तुं गोपकुमारकौ ॥ ३२ ॥

तिथे येताच माहुताने चिथवल्याने कुवलयापीड नावाचा हत्ती त्या दोघा गोपकुमारांना मारण्यासाठी वेगाने धावला ॥ ३२ ॥


 हाहाकारो महाञ्जज्ञे रङ्‍गमध्ये द्विजोत्तम ।
 बलदेवोऽनुजं दृष्ट्‍वा वचनं चेदमब्रवीत् ॥ ३३ ॥
 हन्तव्यो हि महाभाग नागोऽयं शत्रुचोदितः ॥ ३४ ॥

हे द्विजश्रेष्ठा ! त्यावेळी रंगभूमीवर मोठा हाहाकार माजला आणि बलदेवाने आपल्या अनुज कृष्णाकडे बघून म्हटले - "हे महाभागा ! ह्या हत्तीला शत्रुनेच चिथवलं आहे म्हणून त्याला मारून टाकले पाहीजे" ॥ ३३ - ३४ ॥
   

 इत्युक्तः सोऽग्रजेनाथ बलदेवेन वै द्विज ।
 सिंहनादं ततश्चक्रे माधवः परवीरहा ॥ ३५ ॥

हे द्विजा ! ज्येष्ठ भ्राता बलरामाने असे म्हटल्यावर शत्रुसूदन श्रीश्यामसुन्दराने मोठ्याने सिंहनाद केला ॥ ३५ ॥


 करेण करमाकृष्य तस्य केशिनिषूदनः ।
 भ्रामयामास तं शौरिरैरावतसमं बले ॥ ३६ ॥

मग केशी दैत्याचा वध करणार्‍या भगवान श्रीकृष्णाने ऐरावता समान अशा त्या महाबली हत्तीची सोंड आपल्या हातात पकडून फिरवली ॥ ३६ ॥


 ईशोपि सर्वजगतां बाललीलानुसारतः ।
 क्रीडित्वा सुचिरं कृष्णः करिदन्तपदान्तरे ॥ ३७ ॥
 उत्पाट्य वामदन्तं तु दक्षिणेनैव पाणिना ।
 ताडयामास यन्तारं तस्यासीच्छतधा शिरः ॥ ३८ ॥

भगवान कृष्ण जरी सम्पूर्ण जगताचे स्वामी असले तरी त्यांनी खूप वेळ त्या हत्तीच्या दात आणि पायांच्या मध्ये खेळत खेळत आपल्या उजव्या हाताने त्याचा डावा दात उपटून त्यानेच माहूतावर प्रहार केला. त्यामुळे त्याच्या मस्तकाचे शेकडो तुकडे झाले ॥ ३७-३८ ॥


 दक्षिण दन्तमुत्पाट्य बलभद्रोऽपि तत्क्षणात् ।
 स रोषस्तेन पार्श्वस्थान् गजपालानपोथयत् ॥ ३९ ॥

त्याचवेळी बलभद्राने सुद्धा रागाने त्याचा उजवा दात उपटून आजूबाजूला उभ्या असलेल्या माहूतांना मारून टाकले ॥ ३९ ॥



 ततस्तूत्प्लुत्य वेगेन रौहिणेयो महाबलः ।
 जघान वामपादेन मस्तके हस्तिनं रुषा ॥ ४० ॥

त्यानंतर महाबली रोहिणीनंदनाने रोषपूर्वक अति वेगाने ऊसळी मारून त्या हत्तीच्या मस्तकावर आपली डावी लाथ मारली ॥ ४० ॥

 


 स पपात हतस्तेन बलभद्रेण लीलया ।
 सहस्राक्षेण वज्रेण ताडितः पर्वतो यथा ॥ ४१ ॥

अशाप्रकारे तो हत्ती बलभद्रा द्वारा लीलापूर्वक मारला जाऊन इन्द्र-वज्राने आहत पर्वता समान खाली पडला ॥ ४१ ॥




 

 हत्वा कुवलयापीडं हस्त्यारोहप्रचोदितम् ।
 मदासृगनुलिप्ताङ्‍गौ हस्तिदन्तवरायुधौ ॥ ४२ ॥
 मृगमध्ये यथा सिंहौ गर्वलीलावलोकिनौ ।
 प्रविष्टौ सुमहारङ्‍गं बलभद्रजनार्दनौ ॥ ४३ ॥

तेव्हा माहूताने चिथवलेल्या कुवलयापीडला मारून त्याच्या मदाने आणि रक्ताने लडबडलेले राम व कृष्ण त्याचे दात उपटल्याच्या गर्वयुक्त लीलेमुळे मृग-समूहा मध्ये चालणार्‍या सिंहासारखे निरीक्षण करत त्या महान रंगभूमिवर आले ॥ ४२-४३ ॥


 हाहाकारो महाञ्जज्ञे महारङ्‍गे त्वनन्तरम् ।
 कृष्णोऽयं बलभद्रोयमिति लोकस्य विस्मयः ॥ ४४ ॥

त्यावेळी रंगभूमिवर प्रचंड कोलाहल होऊ लागला आणि लोक 'हा कृष्ण आहे, हा बलभद्र आहे' असे विस्मयाने पाहू लागले ॥ ४४ ॥



 सोऽयं येन हता घोरा पूतना बालघातिनी ।
 क्षिप्तं तु शकटं येन भग्नौ तु यमलार्जुनौ ॥ ४५ ॥
 सोयं यः कालियं नागं ममर्दारुह्य बालकः ।
 धृतो गोवर्धनो येन सप्तरात्रं महागिरिः ॥ ४६ ॥

ते म्हणू लागले "ज्याने बालघातिनी घोर राक्षसी पूतनाला मारले होते, शकट उलटवले होते, यमलार्जुनांना उपटून काढले होते तो हाच आहे. ज्या बालकने कालियानागावर चढून त्याचे मान-मर्दन केले होते आणि सात रात्र महापर्वत गोवर्धनाला आपल्या हातावर धारण केले होते तो हाच आहे ॥ ४५-४६ ॥


 
 अरिष्टो धेनुकः केशी लीलयैव महात्मना ।
 निहता येन दुर्वृत्ता दृश्यतामेष सोऽच्युतः ॥ ४७ ॥

ज्या महात्म्याने अरिष्टासुर, धेनुकासुर आणि केशी आदि दुष्टांना लीलेनेच मारून टाकले होते; बघा, तो अच्युत हाच आहे ॥ ४७ ॥

 


 अयं चास्य महाबाहुर्बलभद्रोऽग्रतोऽग्रजः ।
 प्रयाति लीलया योषिन्मनोनयननन्दनः ॥ ४८ ॥

त्यांच्या पुढे जे लीलापूर्वक चालत आहेत ते त्यांचे थोरले बंधु महाबाहु बलभद्र. ते स्त्रियांच्या मनाला व नेत्रांना अत्यंत आनन्द देणारे आहेत ॥ ४८ ॥

 


 अयं स कथ्यते प्राज्ञैः पुराणार्थविशारदैः ।
 गोपालो यादवं वंशं मग्नमभ्यद्धरिष्यति ॥ ४९ ॥

पुराणार्थवेत्ता विद्वान्लोग म्हणतात की हे गोपाळ बुडालेल्या यदुवंशाचा उद्धार करणार ॥ ४९ ॥

 


 अयं हि सर्वलोकस्य विष्णोरखिलजन्मनः ।
 अवतीर्णो महीमंशो नूनं भारहरो भुवः ॥ ५० ॥

हे सर्वलोकमय आणि सर्वकारण भगवान विष्णुचाच अंश आहेत, त्यांनी पृथ्वीचा भार हलका करण्यासाठीच पृथ्वीवर अवतार घेतला आहे" ॥ ५० ॥




 इत्येवं वर्णिते पौरै रामे कृष्णे च तत्क्षणात् ।
 उरस्तताप देवक्याः स्नेहस्नुतपयोधरम् ॥ ५१ ॥

राम आणि कृष्णाविषयी पुरवासी असे बोलत असताना देवकीच्या स्तनांतून स्नेहामुळे दूध वाहू लागले आणि तिच्या हृदयात अनुताप झाला ॥ ५१॥

 


 महोत्सवमिवासाद्य पुत्राननविलोकनात् ।
 युवेव वसुदेवोऽभूद्विहायाभ्यागतां जराम् ॥ ५२ ॥

पुत्रांचे तोंड पाहून अत्यन्त उल्हसित झाल्याने वसुदेव म्हातारपणाचा त्याग करून जणू परत नवयुवक झाले होते ॥ ५२ ॥




 विस्तारिताक्षियुगलो राजान्तःपुरयोषिताम् ।
 नागारस्त्रीसमूहश्च द्रष्टुं न विरराम तम् ॥ ५३ ॥

राजाच्या अन्तःपुरातील स्त्रिया तसेच नगरवासी महिला देखील त्यांना न थकता एकटक न्याहाळत होत्या ॥ ५३ ॥

 


 सख्यः पश्यत कृष्णस्य मुखमत्यरुणेक्षणम् ।
 गजयुद्धकृतायासस्वेदाम्बुकणिकाचितम् ॥ ५४ ॥
 विकासिशरदम्भोजमपश्यायजलोक्षितम् ।
 परिभूयं स्थितं जन्म सफलं क्रियतां दृशः ॥ ५५ ॥

[त्या परस्परांना सांगू लागल्या] "अगं सखे ! अरुण नयनांनी युक्त श्रीकृष्णाचे अति सुन्दर मुख तर पहा, जे कुवलयापीडा सोबत युद्ध केल्याच्या परिश्रमाने घामाघूम होऊन हिमकणांचे सिंचन झालेल्या शरत्कालीन प्रफुल्ल कमळालाही लज्जित करत आहे। अगं ! ह्याचे दर्शन करून आज आपले नेत्र सार्थक करून घ्या" ॥ ५४-५५ ॥



 


 श्रीवत्सांकं महद्धाम बालस्यैतद्विलोक्यताम् ।
 विपक्षक्षपणं वक्षो भुजयुग्यं च भामिनि ॥ ५६ ॥

[एक स्त्री म्हणाली] "अगं भामिनी ! ह्या बालकाचे हे श्रीवत्साङ्कयुक्त परम तेजस्वी वक्षःस्थल व शत्रुंना पराजित करणार्‍या दोन्ही भुजा तरी बघा !” ॥ ५६ ॥

 
 किं न पश्यसि दुग्धेन्दुमृणालधवलाकृतिम् ।
 बलभद्रमिमं नीलपरिधानमुपागतम् ॥ ५७ ॥

[दुसरी] "अगं ! नीलाम्बर धारण करून येणार्‍या दूघ, चन्द्र किंवा कमलनाळा समान शुभ्रवर्ण बलदेवांना तुम्ही पाहात नाही आहात का?"॥ ५७ ॥

 
 वल्गता मुष्टिकेनैव चाणूरेण तथा सखि ।
 क्रीडतोबलभद्रस्य हरेर्हास्यं विलोक्यताम् ॥ ५८ ॥

[तिसरी] "अगं सखींनो ! कुस्तीच्या मैदानात चकरा मारणार्‍या चाणूर आणि मुष्टिक सोबत क्रीडा करणार्‍या बलभद्र आणि कृष्णाचे हास्य तरी बघा" ॥ ५८ ॥


 सख्यः पश्यत चाणूरं नियुद्धार्थमयं हरिः ।
 समुपैति न सन्त्यत्र किं वृद्धा मुक्तकारिणः ॥ ५९ ॥

[चौथी]"सख्यांनो ! बघा चाणूर सोबत लढण्यास हरी पूढे जात आहेत, त्यांना सोडवणारे इथे कोणीच वृद्ध वडिलधारे नाहीत का ? ॥ ५९ ॥



 क्व यौवनोन्मुखीभूतसुकुमारतनुर्हरिः ।
 क्व वज्रकठिनाभोगशरीरोऽयं महासुरः ॥ ६० ॥

कुठे ते यौवनात प्रवेश करणारे सुकुमार शरीराचे श्याम आणि कुठे तो वज्रा समान कठोर शरीराचा महान असुर ! ॥ ६० ॥


 इमौ सुललितैरङ्‍गैर्वर्तेते नवयौवनौ ।
 दैतेयमल्लाश्चाणूरप्रमुखास्त्वतिदारुणाः ॥ ६१ ॥

हे दोघे नवयुवक अतिशय सुकुमार शरीराचे आहेत पण त्यांचे प्रतिपक्षी चाणूर आदि दैत्यमल्ल अत्यंत दारुण आहेत ॥ ६१ ॥


 नियुद्धप्राश्निकानां तु महानेष व्यतिक्रमः ।
 यद्‍बालबलिनोर्युद्धं मध्यस्थैः समुपेक्ष्यते ॥ ६२ ॥

मल्लयुद्धाच्या परीक्षकांचा गुणांच्या बाबतीत हा फार मोठा अन्याय आहे. ते मध्यस्थ असूनही ह्या बालक आणि बलवान मल्लांच्या युद्धाकडे दुर्लक्ष करत आहेत" ॥ ६२ ॥


 श्रीपारशर उवाच
 इत्थं पुरस्त्रीलोकस्व वदतश्चालयन्भुवम् ।
 ववल्ग बद्धकक्ष्योऽन्तर्जनस्य भगवान्हरिः ॥ ६३ ॥

श्री पराशर म्हणाले ;- नगरातील स्त्रिया अशा प्रकारे वार्तालाप करत होत्या तेव्हा भगवान कृष्णाने आपली कंबर कसून पृथ्वीला कंपित करत सर्व दर्शकांच्या मध्ये रङ्गभूमीत उडी मारली ॥ ६३ ॥


 
 बलभद्रोऽपि चास्फोट्य ववल्ग ललितं तथा ।
 पदे पदे तथा भूमिर्यन्न शीर्णा तदद्‍भुतम् ॥ ६४ ॥

श्रीबलभद्र सुद्धा आपले भुजदंड ठोकत अत्यंत मनोहर भावाने उसळू लागले. तेव्हा त्यांच्या पावलांमुळे पृथ्वी फाटली नाही हेच फार मोठे उपकार होते ॥६४॥


 चाणूरेण ततः कृष्णो ययुधेऽमितविक्रमः ।
 नियुद्धकुशलो दैत्यौ बलभद्रेण मुष्टिकः ॥ ६५ ॥

त्यानंतर अमित-विक्रम कृष्ण चाणूरासोबत व द्वंद्व युद्धात कुशल असलेला राक्षस मुष्टिक बलभद्रा सोबत युद्ध करू लागले ॥ ६५ ॥


 सन्निपातावधूतैस्तु चाणूरेण समं हरिः ।
 प्रक्षेपणैर्मुष्टिभिश्च कीलवज्रनिपातनैः ॥ ६६ ॥
 पादोद्धूतैः प्रमृष्टैश्च तयोर्युद्धमभून् महत् ॥ ६७ ॥

श्रीकृष्ण चाणूरासोबत परस्पर भिडून, खाली पाडवत, हवेत उसळवत, वज्रा समान ठोसे मारत, पायांनी मारत एकमेकांचे अंग रगडत लढू लागले. त्यांच्यात महान युद्ध होऊ लागले ॥६६-६७ ॥



 अशस्त्रमतिघोरं तत्तयोर्युद्धं सुदारुणम् ।
 बलप्राणविनिष्पाद्यं समाजोत्सवसन्निधौ ॥ ६८ ॥

अशाप्रकारे त्या समाजोत्सवा वेळी केवळ बळ आणि प्राणशक्तिमुळेच सम्पन्न झालेलं त्यांचं अति भयंकर आणि दारुण असं शस्त्रहीन युद्ध झालं ॥६८॥


 यावद्यावच्च चाणूरो युयुधे हरिणा सह ।
 प्राणहानिमवापाग्र्यां तावत्तावल्लवाल्लवम् ॥ ६९ ॥

चाणूर जसजसा भगवंतांना भिडत होता तसतशी त्याची प्राणशक्ति हळुहळु अत्यन्त क्षीण होत गेली ॥ ६९ ॥


 कृष्णोऽपि युयुधे तेन लीलयैव जगन्मयः ।
 खेदाच्चालयता कोपान्निजशेखरकेसरम् ॥ ७० ॥

जगन्मय भगवान कृष्ण सुद्धा, श्रम आणि रागामुळे आपल्या पुष्पमय शिरोभूषणां मध्ये असलेले केशर हलविणार्‍या त्या चाणूराशी लीलाने लढू लागले ॥ ७० ॥


 बलक्षयं विवृद्धिं च दृष्ट्‍वा चाणूरकृष्णयोः ।
 वारयामास तूर्याणि कंसः कोपपरायणः ॥ ७१ ॥

तेव्हा चाणूराच्या बळाचा होणारा क्षय आणि कृष्णाच्या बळाचा उदय पाहून कंसाने खजील होऊन तूर्य आदि वाजत असलेले बाजे बंद केले ॥ ७१ ॥


 मृदङ्‍गादिषु तूर्येषु प्रतिषिद्धेषु तत्क्षणात् ।
 खे सङ्‍गतान्यवाद्यन्त देवतूर्याण्यनेकशः ॥ ७२ ॥

रङ्गभूमिवरील मृदंग आणि तूर्य आदि वाजायचे बंद झाल्यावर आकाशत अनेक दिव्य तूर्य एकाच वेळी वाजू लागले ॥ ७२ ॥


 जय गोविन्द चाणूरं जहि केशव दानवम् ।
 अन्तर्धानगता देवास्तमूचुरतिहर्षिताः ॥ ७३ ॥

आणि देवगण अत्यन्त हर्षाने अलक्षित भावाने म्हणू लागले -“हे गोविन्दा ! आपला जय हो! हे केशवा ! आपण शीघ्र ह्या चाणूर दानवाला मारून टाका" ॥ ७३ ॥



 चाणूरेण चिरं कालं पीडित्वा मधुसूदनः ।
 उत्पाट्य भ्रमयामास तद्वधाय कृतोद्यमः ॥ ७४ ॥

भगवान मधुसूदन खूप वेळ चाणूरासोबत खेळत राहीले आणि मग त्याचा वध करण्यासाठी त्याला उचलून फिरवले ॥ ७४ ॥

 


 भ्रामयित्वा शतगुणं दैत्यमल्लममित्रजित् ।
 भूभावास्फोटयामास गगने गतजीवितम् ॥ ७५ ॥

शत्रुविजयी श्रीकृष्णाने त्या दैत्य मल्लाला शेकडो वेळा फिरवून आकाशातच हो निर्जीव झाल्यावर त्याला पृथ्वीवर आपटले ॥ ७५ ॥

 

 भूमावास्फोटितस्तेन चाणूरः शतधाभवत् ।
 रक्तस्रावमहापङ्‍कां चकार च तदा भवम् ॥ ७६ ॥

भगवंता द्वारा पृथ्वी वर आपटले जाताच चाणूराच्या शरीराचे शेकडो तुकडे झाले आणि त्याच्या रक्तस्रावाने पृथ्वीवर प्रचंड चिखल केला ॥ ७६ ॥


 बलदेवोऽपि तत्कालं मुष्टिकेन महाबलः ।
 ययुधे दैत्यमल्लेन चाणूरेण यथा हरिः ॥ ७७ ॥

इथे, ज्याप्रकारे भगवान कृष्ण चाणूरासोबत लढत होते त्याचप्रकारे महाबली बलभद्र सुद्धा तिथे दैत्य-मल्ल मुष्टिकासोबत लढत होते ॥ ७७ ॥



 सोऽप्येनं मुष्टिना मूर्ध्नि वक्षस्याहत्य जानुना ।
 पातयित्वा धरापृष्ठे निष्पिपेष गतायुषम् ॥ ७८ ॥

बलरामाने त्याच्या मस्तकावर ठोशांनी आणि वक्षस्थळावर गुढघ्यांनी प्रहार केले आणि त्या गतायु दैत्याला पृथ्वीवर आपटून चिरडले ॥ ७८॥


 कृष्णस्तोशलकं भूयो मल्लराजं महाबलम् ।
 वाममुष्टिप्रहारेण पातयामास भूतले ॥ ७९ ॥

त्यानंतर श्रीकृष्णाने महाबली मल्लराज तोशल ह्याला डाव्या हाताने ठोसा मारून जमिनीवर पाडवले ॥ ७९ ॥


 चाणूरे नहते मल्ले मुष्टिके विनिपातिते ।
 नीते क्षयं तोशलके सर्वे मल्लाः प्रदुद्रुवुः ॥ ८० ॥

मल्लश्रेष्ठ चाणूर आणि मुष्टिक मारले गेल्यावर तसेच मल्लराज तोशल नष्ट झाल्यावर समस्त मल्लगण पळून गेले ॥ ८० ॥

 


 ववल्गतुस्ततो रङ्‍गे कृष्णसंकर्षणावुभौ ।
 समानवयसो गोपान्बलादाकृष्य हर्षितौ ॥ ८१ ॥

तेव्हा कृष्ण आणि संकर्षण आपल्या समवयस्क गोपांना जबरदस्तीने खेचून मीठी मारत आनंदाने रंगभूमीवर उड्या मारू लागले ॥ ८१ ॥


 कंसोऽपि कोपरक्ताक्षः प्राहोच्चैर्व्यायतान्नरान् ।
 गोपावेतौ समाजौघान्निष्क्राम्येतां बलादितः ॥ ८२ ॥

नंतर कंसाने क्रोधामुळे नेत्र लाल करून तिथे एकत्रित पुरूषांना म्हटले -"अरे ! ह्या समाजातून ह्या दोन्ही ग्वालबालांना बलपूर्वक बाहेर काढा ॥ ८२॥

 


 नन्दोऽपि गृह्यतां पापो निर्गलैरायसैरिह ।
 अवृद्धार्हेण दण्डेन वसुदेवोऽपि वध्यताम् ॥ ८३ ॥

पापी नंदाला लोखंडाच्या बेड्या बांधून पकडा आणि वृद्ध पुरुषांना अयोग्य असा दण्ड देऊन वसुदेवाला सुद्धा मारून टाका ॥ ८३ ॥


 वल्गन्ति गोपाः कृष्णेन ये चेमे सहिताः पुराः ।
 गावो निगृह्यतामेषां यच्चास्ति वसु किञ्चन ॥ ८४ ॥

माझ्या समोर कृष्णा सोबत हे गोपगण उड्या मारत आहेत त्या सर्वांना सुद्धा मारून टाका आणि त्याच्या गाई आणि जे काही धन असेल ते हस्तगत करा" ॥ ८४ ।।


 एवमाज्ञापयन्तं तु प्रहस्य मधुसूदनः ।
 उत्प्लुत्यारुह्य तं मञ्चं कंसं जग्राह वेगतः ॥ ८५ ॥

जेव्हा कंस अशी आज्ञा देत होता तेव्हा श्री मधुसूदन हसत-हसत उडी मारून मंचावर चढला आणि त्वरेने त्याला पकडले ॥ ८५ ॥


 केशेष्वाकृष्य विगलत्किरीटमवनीतले ।
 सं कंसं पातयामास तस्योपरि पपात च ॥ ८६ ॥

त्याचे केस पकडून खेचत त्याला जमिनीवर आपटले आणि स्वतः त्याच्यावर उडी मारली, तेव्हा कंसाचा मुकुट मस्तकावरून खाली पडला ॥ ८६ ॥


 अशेषजगदाधारगुरुणा पततोपरि ।
 कृष्णेन त्याजितः प्राणानुग्रसेनात्मजो नृपः ॥ ८७ ॥

सम्पूर्ण जगताचे आधार भगवान कृष्ण कंसावर पडताच उग्रसेनात्मज राजा कंसाने आपल्या प्राणांचा त्याग केला ॥८७॥

 


 मृतस्य केशेषु तदा गृहीत्वा मधुसूदनः ।
 चकर्ष देहं कंसस्य रङ्‍गमध्ये महाबलः ॥ ८८ ॥

तेव्हा महाबली कृष्णाने मृत कंसाचे केस पकडून त्याचे शरीर रङ्गभूमिवर खेचले ॥ ८८ ॥

 


 गौरवेणातिमहता परिघातेन कृष्यता ।
 कृता कंसस्य देहेन वेगेनेव महाम्भसः ॥ ८९ ॥

कंसाचा देह वजनाने भारी असल्याने, त्या खेचण्याने महान जलप्रवाहाच्या वेगाने पडलेल्या भेगेसारखी पृथ्वीवर भेग पडली ॥ ८९ ॥



 कंसे गृहीते कृष्णेन तद्‍भ्राताऽभ्यागतो रुषा ।
 सुनामा बलभद्रेण लीलयैव निपातितः ॥ ९० ॥

श्रीकृष्णद्वारा कंस पकडला गेल्यावर त्याचा भाऊ सुमाली ह्याने क्रोधपूर्वक आक्रमण केले. बलरामाने त्याला लीलया मारून टाकले ॥ ९० ॥

 

 ततो हाहाकृतं सर्वमासीत्तद्‌रङ्‍गमण्डलम् ।
 अवज्ञया हतं दृष्ट्‍वा कृष्णेन मथुरेश्वरम् ॥ ९१ ॥

अशा प्रकारे मथुरापति कंस कृष्णाकडून अवज्ञा पूर्वक मारला गेलेला पाहिल्यावर रङ्गभूमिवर उपस्थित सर्वजण हाहाकार करू लागले ॥ ९१ ॥

 


 कृष्णेऽपि वसुदेवस्य पादौ जग्राह सत्वरः ।
 देवक्याश्च महाबाहुर्बलदेवसहायवान् ॥ ९२ ॥

त्याचवेळी महाबाहु कृष्णाने बलदेवा सहित वसुदेव आणि देवकीचे चरण पकडले ॥ ९२ ॥



 उत्थाप्य वसुदेवस्तं देवकी च जनार्दनम् ।
 स्मृतजन्मोक्तवचनौ तावे व प्रणतौ स्थितौ ॥ ९३ ॥

तेव्हा जन्मवेळी सांगितलेल्या भगवद्वाक्यांच्या स्मरणाने वसुदेव आणि देवकीने श्रीजनार्दनाला जमिनीवरून उठवले आणि त्याच्यासमोर प्रणत भावाने उभे राहिले ॥ ९३ ॥


 श्रीवसुदेव उवाच
 प्रसीद सीदतां दत्तो देवानां यो वरः प्रभो ।
 तथावयोः प्रसादेन कृतोद्धारः स केशव ॥ ९४ ॥

श्रीवसुदेव म्हणाले ;- हे प्रभो ! आता तुम्ही आमच्यावर प्रसन्न व्हा. हे केशवा ! आपण देवगणांना जो वर दिला होता तो आम्हा दोघांवर अनुग्रह करून पूर्ण केलात ॥ ९४ ॥


 आराधितो यद्‍भगवानवतीर्णो गृहे मम ।
 दुर्वृत्तनिधनार्थाय तेन नः पावितं कुलम् ॥ ९५ ॥

भगवन ! माझ्या आराधनेमुळे आपण दुष्टजनांच्या नाशासाठी माझ्या घरी जो जन्म घेतला, त्याने आमचे कुळ पवित्र झाले आहे ॥ ९५ ॥

 

 त्वमन्तः सर्वभूतानां सर्वभूतमयस्थितः ।
 प्रवर्तेते समस्तात्मंस्त्वत्तो भूतभविष्यति ॥ ९६ ॥

आपण सर्वभूतमय आहात आणि समस्त भूतांमध्ये स्थित आहात. हे समस्तात्मना ! भूत आणि भविष्य आपल्यापासूनच प्रवृत्त होतात ॥ ९६ ॥


 यज्ञैस्त्वमिज्यसेऽचिन्त्य सर्वदेवमयाच्युत ।
 त्वमेव यज्ञो यष्टा च यज्वनां परमेश्वरः ॥ ९७ ॥

हे अचिन्त्या ! हे सर्वदेवमया ! हे अच्युता ! समस्त यज्ञांनी आपलेच यजन केले जाते तथा हे परमेश्वरा ! आपणच यज्ञ करणार्‍यांचे याजक आणि यज्ञ स्वरूप आहात ।। ९७ ॥

 


 समुद्‍भवः समस्तस्य जगतस्त्वं जनार्दन ॥ ९८ ॥
 सापह्नवं मम मनो यदेतत्त्वयि जायते ।
 देवक्याश्चात्मजप्रीत्या तदत्यन्तविडम्बना ॥ ९९ ॥

हे जनार्दना ! आपण सम्पूर्ण जगताचे उत्पत्ति स्थान आहात, आपल्या प्रति पुत्र वात्सल्यामुळे माझे व देवकीचे चित्त भ्रमित होत आहे हे फार हास्यास्पद आहे ॥ ९८-९९ ।।


 त्वं कर्ता सर्वभूतानामनादिनिधनो भवान् ।
 त्वं मनुष्यस्य कस्यैषा जिह्वा पुत्रेति वक्ष्यति ॥ १०० ॥

आपण आदि व अन्तरहित आहात तसेच समस्त प्राण्यांचे उत्पत्ति कर्ता आहात , असा कोण मनुष्य आहे ज्याची जीभ आपल्याला 'पुत्र' म्हणून सम्बोधन करेल ? ।।१००।।


 जगदेतज्जगन्नाथ सम्भूतमखिलं यतः ।
 कया युक्त्या विना मायां सोऽस्मत्तः सम्भविष्यति ॥ १०१ ॥

हे जगन्नाथा ! ज्या आपल्यापासून हे सम्पूर्ण जगत उत्पन्न झाले आहे तेच आपण मायाशक्ति शिवाय आणखी कोणत्या प्रकारे आमच्यापासून उत्पन्न होऊ शकाल ॥ १०१॥


 यस्मिन्प्रतिष्ठितं सर्वं जगत्स्थावरजङ्‍गमम् ।
 स कोष्ठोत्सङ्‍गशयनो मानुषो जायते कथम् ॥ १०२ ॥

ज्यांच्यात सम्पूर्ण स्थावर-जंगम जगत स्थित आहे त्या प्रभुच्या कुशीत व मांडीवर शयन करणारा मनुष्य कसा होऊ शकेल ? ॥ १०२ ॥


स त्वं प्रसीद परम्श्वर पाहि विश्व

मंशावतारकरणैर्न ममासि पुत्रः ।
आब्रह्मपादपमिदं जगदेतदीशत्वत्तो

विमोहयसि किं पुरुषोत्तमास्मान् ॥ १०३ ॥

हे परमेश्वरा ! तेच आपण आमच्यावर प्रसन्न व्हा आणि आपल्या अंशावताराने विश्वाची रक्षा करा. आपण माझे पुत्र नाही आहात. हे ईश ! ब्रह्मापासून वृक्षादिंपर्यन्त हे सम्पूर्ण जगत आपल्यापासूनच उत्पन्न झाले आहे, मग हे पुरुषोत्तमा ! आपण आम्हाला मोहित का करत आहात ? ॥ १०३ ॥


मायाविमोहितदृशा तनयो ममेतिकं

साद्‍भयं कृतमपास्तभयातितीव्रम् ।
नीतोऽसि गोकुलमरातिभयाकुलेन

वृद्धिंगतोऽसि मम नास्ति ममत्वमीश ॥ १०४ ॥

हे निर्भया ! आपण माझे पुत्र आहात' ह्या मायेने मोहित होऊन मी कंसाला घाबरून होतो आणि भयामुळेच मी आपल्याला गोकुळात घेऊन गेलो. हे ईशा ! आपण तिथे राहुन इतके मोठे झालात, म्हणून आता आपल्यात माझी ममता राहीली नाही ॥ १०४ ।।

 
कर्माणि रुद्रमरुदश्विशतक्रतूनां
साध्यानि यस्य न भवन्ति निरीक्षितानि ।
त्वं विष्णुरीश जगतामुपकारहेतोः
प्राप्तोसि नः परिगतो विगतो हि मोहः ॥ १०५ ॥

आतापर्यंत मी आपली अशी अनेक कर्म पाहीली जी रुद्र, मरुद्गण, अश्विनी कुमार आणि इंद्रालाही साध्य नाहीत। आता माझा मोह दूर झाला आहे, हे ईशा ! आपण साक्षात् श्रीविष्णु भगवानच जगताच्या उपकारासाठी प्रकट झाला आहात ॥ १०५ ॥


 इति श्रीविष्णुमहापुराणे पञ्चमे अंशे विंशोध्यायः (२०)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

विष्णुपुराण, पंचम अंश, त्रिंश अध्याय | Vishnu Puran, Ansh 5 , Adhyay 30

  ॥ विष्णुपुराणम् ॥ ॥ पञ्चमः अंशः ॥ ॥ त्रिंशोऽध्यायः ॥   "पारिजात-हरण"   श्रीपराशर उवाच गरुडो वारुणं छत्रं तथैव मणिपर...