॥ विष्णुपुराणम्
॥
॥
पञ्चमः अंशः ॥ ॥ अष्टादशोऽध्यायः
॥
"भगवंताचे मथुरा प्रस्थान, गोपिकांची विरह कथा आणि अक्रूरचा मोह"
श्रीपराशर उवाच
चिन्तयन्नितिगोविन्दमुपगम्य
स यादवः ।
अक्रुरोस्मीति
चरणौ ननाम शिरसा हरेः ॥ १ ॥
श्रीपराशर म्हणाले ;- हे मैत्रेया ! यदुवंशी अक्रूराने अशाप्रकारे चिन्तन करत गोविंदा जवळ जाऊन त्यांच्या चरणांवर मस्तक झुकवले आणि “मी अक्रूर आहे” असे म्हणून प्रणाम केला ॥ १ ॥
सोऽप्येनं
ध्वजवज्राब्जकृतचिह्नेन पाणिना ।
संस्पृश्याकृष्य
च प्रीत्य सुगाढं परिषस्वजे ॥ २ ॥
भगवंताने देखील आपल्या ध्वजा-वज्र-पद्माक्ङित करकमलांनी त्यांना स्पर्श करून प्रेमाने आपल्या जवळ घेऊन घट्ट मिठी मारली ॥ २ ॥
कृतसंवन्दनौ
तेन यथावद्बलकेशवौ ।
ततः
प्रवीष्टौ संहृष्टौ तमादायात्ममन्दिरम् ॥ ३ ॥
त्यानन्तर अक्रूराने यथायोग्य प्रणाम वगैरे केल्यानंतर बलराम आणि श्रीकृष्ण अत्यानंदाने त्यांना आपल्या घरी घेऊन गेले ॥ ३ ॥
सह ताभ्यां
तदाक्रूरः कृतसंवन्दनादिकः ।
भुक्तभोज्यो
यथान्याय्यमाचचक्षे ततस्तयोः ॥ ४ ॥
यथा
निर्भत्सितस्तेन कंसेनानकदुन्दुभिः ।
यथा
च देवकी देवी दानवेन दुरात्मना ॥ ५ ॥
उग्रसेने
यथा कंसः स दुरात्मा च वर्तते ।
यं चैवार्थं
समुद्दिश्य कंसेन तु विसर्जितः ॥ ६ ॥
मग त्यांच्या द्वारा सत्कृत होऊन यथायोग्य भोजनादि केल्यानंतर अक्रुराने त्यांना सम्पूर्ण वृत्तान्त सांगितला की कसे दुरात्मा दानव कंसाने आनकदुन्दुभि वसुदेव आणि देवी देवकीला फटकारले तसेच कशा प्रकारे तो दुरात्मा आपले पिता उग्रसेन ह्यांच्याशी दुर्व्यवहार करत आहे आणि त्याने अक्रूराला वृन्दावनात का पाठवले आहे वगैरे ॥ ४ - ६ ॥
तत्सर्वं
विस्तराच्छ्रुत्वा भगवान्देवकीसुतः ।
उवाचाखिलमप्येतज्ज्ञातं
दानपते मया ॥ ७ ॥
देवकीनंदनाने हा सम्पूर्ण वृत्तान्त विस्तारपूर्वक ऐकून म्हटले -“हे दानपते ! ह्या सर्व गोष्टी मला कळल्या आहेत ॥ ७॥
करिष्ये तन्महाभाग यदत्रौपयिकं
मतम् ।
विचिन्त्यं नान्यथैतत्ते विद्धि कंसं हतं मया ॥ ८ ॥
हे महाभागा ! ह्या संदर्भात मला जे योग्य वाटतं तेच मी करणार. आता कंस माझ्याकडून मारला गेलाच असेच तूम्ही समजा. ह्या विषयी कोणताही संदेह बाळगू नका ॥८ ॥
अहं
रामश्च मथुरां श्वो यास्यावः सह त्वया ।
गोपवृद्धाश्च
यास्यन्ति ह्यादायोपायनं बहु ॥ ९ ॥
बलरामदादा आणि मी आम्ही दोघे उद्याच तुमच्यासोबत मथुरेला येतो, आमच्या सोबत इतर वृद्ध वडिलधारी गोप सुद्धा भरपूर उपहार घेऊन येतील ॥ ९॥
निशेयं
नीयतां वीर न चिन्तां कर्तुमर्हसि ।
त्रिरात्राभ्यन्तरे
कंसं निहनष्यामि सानुगम् ॥ १० ॥
हे वीरा ! आपण ही रात्र सुखपूर्वक व्यतित करा, कोणत्याच प्रकारची काळजी करू नका. तीन रात्रीत मी कंसाला त्याच्या अनुचरां सहित अवश्य मारून टाकेन" ॥१०॥
श्रीपराशर
उवाच
समादिश्य
ततो गोपानक्रूरोऽपि च केशवः ।
सुष्वाप
बलभद्रश्च नन्दगोपगृहे ततः ॥ ११ ॥
श्रीपराशर म्हणाले ;- त्यानंतर अक्रूर, श्रीकृष्ण आणि बलराम समस्त गोपिंना कंसाची आज्ञा ऐकवून नन्दगोपाच्या घरी झोपी गेले ॥ ११ ॥
ततः
प्रभाते विमले कृष्णरामौ महाद्युती ।
अक्रूरेण
समं गन्तुमुद्यतौ मथुरां पुरीम् ॥ १२ ॥
दृष्ट्वा
गोपीजनः सास्रः श्लथद्वलयबाहुकः ।
निःशश्वासातिदुःखार्तः
प्राह चेदं परस्परम् ॥ १३ ॥
दुसर्या दिवशी पहाट होताच महातेजस्वी राम आणि कृष्णाला अक्रूरा सोबत मथुरेला जाण्याची तयारी करताना पाहून ज्यांच्या भुजांमधील कंकण सैल पडले होते अशा गोपिका डोळ्यात पाणी आणून दुःखी होऊन दीर्घ निःश्वास सोडत एकमेकींना सांगू लागल्या -॥ १२-१३ ॥
मथुरां
प्राप्य गोविन्दः कथं गोकुलमेष्यति ।
नगरस्त्रीकलालापमधु
श्रोत्रेण पास्यति ॥ १४ ॥
"आता मथुरापुरीला जाऊन श्रीकृष्ण परत गोकुळात कशाला येतील ? कारण तिथे तर ते आपल्या कानांनी नरनारींच्या मधुर आलापरूपी मधुपान करणार ॥ १४ ॥
विलासिवाक्यपानेषु
नागरीणां कृतास्पदम् ।
चित्तमस्य
कथं भूयो ग्राम्यगोपीषु यास्यति ॥ १५ ॥
नगरातील विद्ग्ध वनितांच्या विलासयुक्त वचनांच्या रसपानात आसक्त झाल्यावर मग त्यांचे चित्त गावठी गोपिकांमध्ये का रमेल ? ॥ १५ ॥
सारं
समस्तगोष्ठस्य विधिना हरता हरिम् ।
प्रहृतं
गोपयोषित्सु निर्घृणेन दुरात्मना ॥ १६ ॥
आज निर्दयी दुरात्मा विधात्याने समस्त ब्रजाचे सारभूत असलेल्या सर्वस्वस्वरूप श्रीहरिला आमच्यापासून हिरावून आम्हा गोपिकांवर घोर आघात केला आहे ॥ १६ ॥
भावगर्भस्मितं
वाक्यं विलासललिता गतिः ।
नागरीणामतीवैतत्कटाक्षेक्षितमेव
च ॥ १७ ॥
ग्राम्यो
हरिरयं तासां विलासनिगडैर्युतः ।
भवतीनां
पुनः पार्श्वं कया युक्त्या समेष्यति ॥ १८ ॥
नगरातील स्त्रियांमध्ये भावपूर्ण हसरी बोली, विलास ललित गति आणि कटाक्षपूर्ण चित्तस्वभावाची अधिकता असते. त्यांच्या विलास-बन्धनात बांधला गेल्यावर हा ग्राम्य हरि तुमच्याजवळ कसा येणार ?॥ १७-१८ ॥
एषैष
रथमारुह्य मथुरां याति केशवः ।
क्रूरेणाक्रूरकेणात्र
निर्घृणेन प्रतारितः ॥ १९ ॥
बघा, बघा, क्रूर निर्दयी अक्रूराच्या बोलण्यात येऊन हा कृष्ण रथात बसून मथुरेला जात आहे ॥ १९ ॥
किं
न वेत्ति नृशंसोयमनुरागपरं जनम् ।
येनैवमक्ष्णोराह्लादं
नयत्यन्यत्र नो हरिम् ॥ २० ॥
ह्या नृशंस अक्रूराला अनुरागी लोकांच्या हृदयातील भाव जराही कळत नाही का ? जो अशाप्रकारे आमच्या नयनानन्दवर्धन नन्दनन्दनाला दुसरीकडे घेऊन जात आहे ॥ २० ॥
एष रामेण
सहितः प्रयात्यत्यन्तनिर्घृणः ।
रथमारुह्य
गोविन्दस्त्वर्यतामस्य वारणे ॥ २१ ॥
बघा , हा अत्यन्त निष्ठूर गोविन्द रामासोबत रथावर चढून जात आहे; अगं ! त्यांना कसंही करून थांबवुया ॥ २१ ॥
गुरूणामग्रतो
वक्तुं किं ब्रवीषि न नः क्षमम् ।
गुरवः
किं करिष्यन्ति दग्धानां विरहाग्निना ॥ २२ ॥
“अगं ! काय म्हणतेस तू ,की आपल्या गुरुजनां समोर आपण असं बोलू नये ? 'पण मग विरहाग्निने भस्मीभूत झालेल्या आमचे गुरुजन काय करतील ? ॥ २२ ॥
नंदगोपमुखा गोपा गन्तुमेते
समुद्यताः ।
नोद्यमं कुरुते कश्चिद्गोविन्दविनिवर्तने ॥ २३ ॥
बघा; हे नन्दगोप आदि गोपीसुद्धा त्यांच्या सोबत जायची तयारी करत आहेत. ह्यातील कोणीही गोविन्दाला परत आणण्याचा प्रयत्न नाही करत आहे ॥ २३ ॥
सुप्रभाताद्य
रजनी मथुरावासयोषिताम् ।
पास्यन्त्यच्युतवक्त्राब्जं
यासां नेत्रालिपङ्क्तयः ॥ २४ ॥
आजची रात्री मथुरावासी स्त्रियांसाठी सुन्दर प्रभात घेऊन येणार आहे, कारण आज त्यांचे नयन-भृङ्ग श्रीअच्युताच्या मुखारविंदाचे मकरन्दपान करणार ॥२४ ॥
धन्यास्ते
पथि ये कृष्णमितो यान्त्यनिवारिताः ।
उद्वहिष्यन्ति
पश्यन्तः स्वदेहं पुलकाञ्चितम् ॥ २५ ॥
जे लोक इथून कोणत्याही अडथळ्याशिवाय श्रीकृष्णाचे अनुगमन करत आहेत ते धन्य आहेत, कारण ते त्यांचे दर्शन करत आपल्या रोमाञ्चयुक्त शरीराचा निर्वाह करणार ॥ २५ ॥
मथुरानगरीपौरनयनानां
महोत्सवः ।
गोविन्दावयवैर्दृष्टैरतीवाद्य
भविष्यति ॥ २६ ॥
आज गोविंदाच्या प्रत्यक्ष दर्शनाने मथुरावासींच्या नेत्रांसाठी महान महोत्सव असेल ॥ २६ ॥
को नु
स्वप्रः सभाग्याभिर्दृष्टस्ताभिरधोक्षजम् ।
विस्तारिकांतिनयना
या द्रक्ष्यन्त्यनिवारिताः ॥ २७ ॥
आज त्या भाग्यशाली लोकांनी कोणते शुभ स्वप्न पाहीले की त्या कान्तिमय विशाल नयनांच्या मथुरेतील स्त्रिया स्वच्छन्दतेने अधोक्षजाला निरखून पाहतील ? ॥ २७ ॥
अहो
गोपीजनस्यास्य दर्शयित्वा महानिधिम् ।
उत्कृत्तान्यत्र
नेत्राणि विधिना करुणात्मना ॥ २८ ॥
अहो ! निष्ठुर विधात्याने गोपिकांना महानिधि दाखवून आज त्यांचे नेत्रच काढून घेतले ॥ २८ ॥
अनुरागेण
शैथिल्यमस्मासु व्रजिते हरौः ।
शैथिल्यमुपयान्त्याशु
करेषु वलयान्यपि ॥ २९ ॥
बघा, आमच्या प्रति श्रीहरिच्या अनुरागात शिथिलता आल्याने आमच्या हातातील काकणंसुद्धा सैल पडली ॥ २९ ॥
अक्रूरः
क्रूरहृदयः शीघ्रं प्रेरयते हयान् ।
एवमार्तासु
योषित्सु कृपा कस्य न जायते ॥ ३० ॥
आमच्या सारख्या, दुःखि अबलांवर कोणाला दया नाही येणार ? पण बघा, हा क्रूर-हृदय अक्रूर किती वेगाने घोडे हाकत आहे ! ॥ ३० ॥
एष कृष्णरथस्योच्चैश्चक्ररेणुर्निरीक्ष्यताम्
।
दूरीभूतो
हरिर्येन सोऽपि रेणुर्नलक्ष्यते ॥ ३१ ॥
बघा, कृष्णाच्या रथाची धूळ दिसत आहे पण अरेरे ! आता तर श्रीहरि इतके दूर निघून गेले की ती धूळ सुद्धा दिसत नाही ॥ ३१ ॥
श्रीपराशर
उवाच
इत्येवमतिहार्द्देन
गोपीजननिरीक्षितः ।
तत्याज
व्रजभूभागं सह रामेण केशवः ॥ ३२ ॥
श्रीपराशर म्हणाले ;- अशाप्रकारे गोपिकांचा अनुराग बघत बघत श्रीकृष्णांनी बलरामा सहित व्रजभूमिचा त्याग केला ॥ ३२ ॥
गच्छन्तो जवनाश्वेन रथेन यमुनातटम् ।
प्राप्ता मध्याह्नसमये रामाक्रूरजनार्दनाः ॥ ३३ ॥
तेव्हा
राम, कृष्ण आणि अक्रूर शीघ्रगामी घोड्यांच्या रथातून मध्याह्न समयी यमुना तटावर आले ॥ ३३ ॥
अथाह कृष्णमक्रूरो भवद्भ्यां
तावदास्यताम् ।
यावत्करोमि कालिन्द्या आह्निकार्हणमम्भसि ॥ ३४ ॥
तिथे पोहोचल्यावर अक्रूराने श्रीकृष्णास म्हटले -" जोवर मी यमुना जलात मध्याह्न कालीन उपासना करतो तोवर तुम्ही दोघं इथेच थांबा " ॥ ३४ ॥
श्रीपराशर
उवाच
तथेत्युक्तस्ततस्नातः
स्वाचान्तः स महामतिः ।
दध्यौ
ब्रह्म परं विप्र ग्रविष्टो यमुनाजले ॥ ३५ ॥
श्रीपराशर म्हणाले ;- हे विप्रा ! तेव्हा भगवंताने ‘ठीक आहे’ म्हटले व महामति अक्रूर यमुनाजलात स्नान आणि आचमन करून परब्रह्माचे ध्यान करू लागले ॥३५॥
फणासहस्रमालाढ्यं
बलभद्रं ददर्श सः ।
कुन्दमालाङ्गमुन्निद्रपद्मपत्रायतेक्षणम्
॥ ३६ ॥
तेव्हा त्यांनी सहस्रफणांनी सुशोभित असलेल्या बलभद्राला पाहीले, त्याचे शरीर कुन्दमाला सारखे शुभ्रर्वर्ण आहे आणि नेत्र प्रफुल्ल कमलदला समान विशाल आहेत ॥ ३६ ॥
वृतं
वासुकिरम्भाद्यैर्महद्भिः पवनाशिभिः ।
संस्तूयमानमुद्गन्धिवनमालाविभूषितम्
॥ ३७ ॥
वासुकि आणि रम्भ आदि महासर्प त्यांना घेरून त्यांची प्रशंसा करत होते व ते अत्यन्त सुगन्धित वरमालेने विभूषित होते ॥ ३७ ॥
दधानमसिते वस्त्रे चारुरूपावतंसकम्
।
चारुकुण्डलिनं भान्तमन्तर्जलतले स्थितम् ॥ ३८ ॥
दोन श्याम वस्त्र धारण करून , कमळांची सुन्दर आभूषणे घालून तसेच मनोहर कुण्डली मारून ते जलात विराजमान होते ॥ ३८ ॥
तस्योत्सङ्गे
घनश्याममाताम्रायतलोचनम् ।
चतुर्बाहुमुदाराङ्गं
चक्राद्यायुधभूषणम् ॥ ३९ ॥
पीते
वसानं वसने चित्रमाल्योपशोभितम् ।
शक्रचापतडिन्मालाविचित्रमिव
तोयदम् ॥ ४० ॥
श्रीवत्सवक्षसं
चारु स्फुरन्मकरकुण्डलम् ।
ददर्श
कृष्णमक्लिष्टं पुण्डरीकावतंसकम् ॥ ४१ ॥
त्यांच्या मांडीवर त्यांनी पाहीले की मेघासमान श्यामवर्ण, लाल विशाल नयन असलेले, चतुर्भुज, मनोहर अंगप्रत्यंग तसेच शंख-चक्रादि आयुधांनी सुशोभित, पीताम्बर नेसलेले आणि विलक्षण वनमालांनी विभूषित आनन्दमय कुलभूषण श्रीकृष्ण, इन्द्रधनुष्य व विद्युन्माला मण्डित सजल मेघासमान भासत आहेत आणि त्यांच्या वक्ष:स्थलावर श्रीवत्सचिह्न व कानात देदीप्यमान मकराकृत कुण्डले विराजमान आहेत ॥ ३९-४१॥
सनन्दनाद्यैर्मुनिभिः
सिद्धयोगैरकल्मषैः ।
सञ्चिन्त्यमानं
तत्रस्थैर्नासाग्रन्यस्तलोचनैः ॥ ४२ ॥
अक्रूरांनी हे देखील पाहीले की सनकादि मुनिजन आणि निष्पाप सिद्ध तथा योगिजन त्या जलातच स्थित होऊन नासिकाग्र दृष्टिने त्या श्रीकृष्णाचेच चिन्तन करत आहेत ॥ ४२ ॥
बलकृष्णौ
तथाक्रूरः प्रत्यभिज्ञाय विस्मितः ।
अचिन्तयद्रथाच्छीघ्रं
कथमत्रागताविति ॥ ४३ ॥
अशाप्रकारे तिथे राम आणि कृष्णाला पाहून अक्रूर विस्मित झाले आणि विचार करू लागले की हे इतक्या शीघ्रतेने रथातून इथे कसे आले? ॥४३॥
विवक्षोस्तम्भयामास
वाचं तस्य जनार्दनः ।
ततो
निष्क्रम्य सलिलाद्रथमभ्यागतः पुनः ॥ ४४ ॥
ददर्श
तत्र चैवोभौ रथस्योपरि निष्ठितौ ।
रामकृष्णौ
यथापूर्वं मनुष्यवपुषान्वितौ ॥ ४५ ॥
जेव्हा त्यांनी काही बोलायचा प्रयत्न केला तेव्हा भगवंताने त्यांची वाणी रोखली. तेव्हा ते जलातून बाहेर रथाजवळ आले आणि पाहीले की तिथे सुद्धा मनुष्य-शरीर धारण केलेले राम आणि कृष्ण दोघेही पूर्ववत रथात बसलेले आहेत ।। ४४ - ४५॥
निमग्नश्च
पुनस्तोये ददर्श च तथैव तौ ।
संस्तूयमानौ
गन्धर्वैर्मुनिसिद्धमहोरगैः ॥ ४६ ॥
त्यानंतर त्यांनी जलात जाऊन परत त्या दोघांची गन्धर्व, सिद्ध, मुनि आणि नागादिकांकडून स्तुति होत असलेली पाहीली ॥ ४६ ॥
ततो विज्ञातसद्भावः स
तु दानपतिस्तदा ।
तुष्टाव सर्व विज्ञानमयमच्युतमीश्वरम् ॥ ४७ ॥
तेव्हा दानपति अक्रूर वास्तविक रहस्य कळल्याने त्या सर्वविज्ञानमय अच्युत भगवंताची स्तुति करू लागले ॥४७॥
अक्रूर
उवाच
सन्मात्ररूपिणेऽचिन्त्यमहिम्ने
परमात्मने ।
व्यापिने
नैकरूपैकस्वरूपाय नमो नमः ॥ ४८ ॥
अक्रूर म्हणाले ;- जो सन्मात्रस्वरूप, अचिन्त्य महिम, सर्वव्यापक तसेच कार्यरूपाने अनेक आणि कारणरूपाने एक रूप आहे त्या परमात्म्याला नमस्कार आहे नमस्कार आहे ॥ ४८ ॥
सर्वरूपाय
तेऽचिन्त्य हविर्भूताय ते नमः ।
नमो
विज्ञानपाराय पराय प्रकृतेः प्रभोः ॥ ४९ ॥
हे अचिन्तनीय प्रभो! सर्वरूपी हविःस्वरूप परमेश्वरा आपणाला नमस्कार. आपण बुद्धिच्या अतीत आणि प्रकृतिच्या पलीकडे आहात, आपणाला वारंवार नमस्कार ।। ४९ ॥
भूतात्मा
चेन्द्रियात्मा च प्रधानात्मा तथा भवान् ।
आत्मा
च परमात्मा च त्वमेकः पञ्चधा स्थितः ॥ ५० ॥
आपण भूतस्वरूप, इन्द्रियस्वरूप प्रधानस्वरूप आहात तसेच आपणच जीवात्मा व परमात्मा आहात. अशाप्रकारे आपण एकटेच पाच प्रकारे स्थित आहात ॥ ५० ॥
प्रसीद सर्व सर्वात्मन् क्षराक्षरमयेश्वर ।
ब्रह्मविष्णुशिवाख्याभिः कल्पनाभिरुदीरितः ॥ ५१ ॥
हे सर्वा ! हे सर्वात्मना ! हे क्षराक्षरमय ईश्वरा ! आपण प्रसन्न व्हा. एक आपणच ब्रह्मा, विष्णु व शिव आदि कल्पनांनी वर्णन केले जाता ॥५१॥
अनाख्येयस्वरूपात्मन्ननाख्येयप्रयोजन
।
अनाख्येन
भिधानं त्वां नतोऽस्मि परमेश्वर ॥ ५२ ॥
हे परमेश्वरा ! आपले स्वरूप, प्रयोजन आणि नाम आदि सर्वच अनिर्वचनीय आहे. मी आपणाला नमस्कार करतो ।। ५२ ॥
न यत्र
नाथ विद्यन्ते नामजात्यादिकल्पनाः ।
तद्ब्रह्म
परमं नित्यमविकारि भवानजः ॥ ५३ ॥
हे नाथा ! जिथे नाव आणि जात आदि कल्पनांचा सर्वथा अभाव अभाव आहे आपण तेच नित्य अविकारी आणि अजन्मा परब्रह्म आहात॥५३॥
न कल्पनामृतेऽर्थस्य सर्वस्याधिगमो
यतः ।
ततः कृष्णच्युतानन्तविष्णुसंज्ञाभिरिड्यते ॥ ५४ ॥
कारण कल्पनेशिवाय कोणत्याही पदार्थाचे ज्ञान होत नाही, म्हणूनच आपले कृष्ण, अच्युत, अनन्त आणि विष्णु आदि नावांमनी स्तवन केले जाते ॥ ५४ ॥
सर्वार्थस्त्वमज
विकल्पनाभिरेतैर्देवाद्यैर्भवति हि यैरनन्तविश्वम् ।
विश्वात्मा
त्वमिति विकारहीनमेतत्सर्वस्मिन्न हि भवतोऽस्ति किञ्चिदन्यत् ॥ ५५ ॥
हे अजा !ज्या देवता आदि कल्पनामय पदार्थात अनंत विश्वाची उत्पत्ति झाली आहे ते समस्त पदार्थ आपणच आहात तसेच आपणच विकारहीन आत्मवस्तु आणि विश्वरूप आहात। हे प्रभो ! ह्या समस्त पदार्थात आपल्याहून भिन्न आणखी काहीही नाही ॥ ५५॥
त्वं
ब्रह्मा पशुपतिर्यमा विधाता धाता त्वं त्रिदशपतिः समीरणोऽग्निः ।
तोयेशो
धनपतिंरतकस्त्वमेको भिन्नार्थैर्जगदभिपासिशक्तिभेदैः ॥ ५६ ॥
आपणच ब्रह्मा, महादेव, अर्यमा, विधाता, धाता, इन्द्र, वायु, अग्नि, वरुण, कुबेर आणि यम आहात. अशा प्रकारे एक आपणच भिन्न-भिन्न कार्यांनी आपल्या शक्तिभेदाने ह्या सम्पूर्ण जगाची रक्षा करत आहात ॥५६॥
विश्वं
भवान्सृजति सूर्यगभस्तिरूपोविश्वेश ते गुणमयोयमतः प्रपञ्चः ।
रूपं
परं सदिति वाचकमक्षरं यज्ज्ञानात्मने सदसते प्रणतोऽस्मि तस्मै ॥ ५७ ॥
हे विश्वेशा ! सूर्याच्या किररूपात आपणच वृष्टि द्वारा विश्वाची रचना करता, म्हणून हा गुणमय प्रपंच आपलेच रूप आहे. 'सत्' पद ज्याचे वाचक आहे ते 'ॐ' अक्षर आपले परम स्वरूप आहे, आपल्या त्या ज्ञानात्मा सदसत्स्वरूपाला नमस्कार ॥ ५७ ॥
ॐ नमो
वासुदेवाय नमः संकर्षणाय च ।
प्रद्युम्नाय
नमस्तुभ्यमनिरुद्धाय ते नमः ॥ ५८ ॥
हे प्रभो ! वासुदेव, संकर्षण, प्रद्युम्न आणि अनिरुद्ध स्वरूपा आपणाला वारंवार नमस्कार ।।५८॥
इति श्रीविष्णुमहापुराणे पञ्चमे अंशे अष्टादशोऽध्यायः (१८)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा