॥ विष्णुपुराणम्
॥
॥ प्रथमः
अंशः ॥ प्रथमोऽध्यायः ॥
''नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमम ।
देवी सरस्वती व्याप्तं ततो जयमुदिरयेत"।।
श्री सूत उवाच -
ॐ पराशरं मुनिवरं कृतपूर्वाह्णिकक्रियम् ।
मैत्रेयः
परिपप्रच्छ प्रणिपत्याभिवाद्य च ॥ १ ॥
श्री सूत म्हणाले -
मैत्रेयांनी आपली नित्यकर्मे उरकली आणि पराशर मुनींना प्रणाम करून आणि त्यांचे चरणस्पर्श करून त्यांना विचारले.
त्वत्तो
हि वेदाध्ययनमधीतमखिलं गुरो ।
धर्मशास्त्राणि
सर्वाणि तथाङ्गानि यथाक्रमम् ॥ २ ॥
‘हे
गुरुदेव ! मी आपल्याकडूनच संपूर्ण वेद, वेदांग आणि सकल धर्मशास्त्रांचे क्रमश: अध्ययन केले
आहे .
त्वत्प्रसादान्मुनिश्रेष्ठ
मामन्ये नाकृतश्रमम् ।
वक्ष्यन्ति
सर्वशास्त्रेषु प्रायशो येऽपि विद्विषः ॥ ३ ॥
हे मुनिश्रेष्ठ ! आपल्या कृपेने माझे विपक्षी
सुद्धा माझ्या बाबतीत असे म्हणू नाही शकणार की मी संपूर्ण शास्त्रांच्या
अभ्यासासाठी परिश्रम घेतले नाहीत .
सोऽहमिच्छामि
धर्मज्ञ श्रोतुं त्वत्तो यथा जगत् ।
बभूव
भूयश्च यथा महाभाग भविष्यति ॥ ४ ॥
हे धर्मज्ञा ! हे महाभागा ! आता मी आपल्यातोंडून
हे ऐकू इच्छितो की हे विश्व कशाप्रकारे उत्पन्न झाले आणि पुढे देखील (म्हणजे
दुसऱ्या कल्पाच्या आरंभी) ते कसे असेल ?
यन्मयं
च जगद्ब्रह्मन्यतश्चैतच्चराचरम् ।
लीनमासीद्यथा
यत्र लयमेष्यति यत्र च ॥ ५ ॥
तसेच हे ब्रह्मन ह्या संसाराचे उपदान कारण काय
आहे ? हे संपूर्ण चराचर कशातून उत्पन्न झाले आहे ? हे आधी कशात लीन होते आणि पुढे
कशात लीन होणार ?
यत्प्रमाणानि
भूतानि देवादीनां च संभवम् ।
समुद्रपर्वतानां
च संस्थानं च यथा भुवः ॥ ६ ॥
सूर्यादीनां च संस्थानं प्रमाणं मुनिसत्तम ।
देवादीनां
तथा वंशान्मनून्मन्वन्तराणि च ॥ ७ ॥
कल्पान् कल्पविकल्पांश्च चतुर्युगविकल्पितान् ।
कल्पान्तस्य
स्वरूपं च युगधर्मांश्च कृत्स्नशः ॥ ८ ॥
देवर्षिपार्थिवानां च चरितं यन्महामुने ।
वेदशाखाप्रणयनं
यथावद्व्यासकर्तृकम् ॥ ९ ॥
धर्मांश्च ब्राह्मणादीनां तथा चाश्रमवासिनाम् ।
श्रोतुमिच्छाम्यहं
सर्वं त्वत्तो वासिष्ठनन्दन ॥ १० ॥
ह्या व्यतिरिक्त आकाश, वायु,
जल, अग्नि आणि पृथ्वी ह्या
पंचमहाभूतांचे परिमाण, समुद्र, पर्वत देवता आदींची उत्पत्ति, पृथ्वी
व सूर्य आदींचे स्थान आणि परिमाण, देवता आदींचे
वंश, मनु, मन्वन्तर, कल्प आणि त्या
कल्पांचे विकल्प, वारंवार
येणारी युगे, प्रलयाचे
स्वरूप, चारही
युगांचे
वेगळे वेगळे असे संपूर्ण धर्म, देवर्षि और राजर्षिची चरित्रे, श्रीव्यासांनी वैदिक शाखांची केलेली रचना,
ब्राह्मणादि वर्ण और ब्रह्मचर्यादि आश्रमांचे धर्म – हे महामुने वासिष्ठनन्दना (वशिष्ठपुत्र शक्तिनंदना) मी आपल्याकडून हे सर्व ऐकू इच्छितो .
ब्रह्मन्प्रसादप्रवणं
कुरुष्व मयि मानसम् ।
येनाहमेतज्जानीयां
त्वत्प्रसादान्महामुने ॥ ११ ॥
हे ब्रह्मन, आपण आपले मन माझ्या प्रति प्रसन्न करावे जेणे करून हे महामुने मी आपल्या कृपेने हे सर्व जाणून घेऊ शकेन .
पराशर
उवाचः
साधु
मैत्रेय धर्मज्ञ स्मारितोऽस्मि पुरातनम् ।
पितुः
पिता मे भगवान् वसिष्ठो यदुवाच ह ॥ १२ ॥
पराशर म्हणाले - हे धर्मज्ञ मैत्रेया, खूपच छान,
माझ्या वडिलांचे वडील भगवान वशिष्ठ यांनी
जे वर्णन केले होते त्या पूर्व प्रसंगाचे तु मला स्मरण करून दिलेस .
विश्वामित्रप्रयुक्तेन रक्षसा भक्षितः मया ।
श्रुतस्तातस्ततः
क्रोधो मैत्रेयाभून्ममातुलः ॥ १३ ॥
हे मैत्रेया, जेव्हा मी ऐकले की विश्वामित्रांच्या प्रेरणेमुळे राक्षसाने माझ्या
वडिलांचे भक्षण केले तेव्हा मी अत्यंत क्रोधित झालो .
ततोऽहं
रक्षसां सत्रं विनाशाय समारभम् ।
भस्मीकृताश्च
शतशस्तस्मिन्सत्रे निशाचराः ॥ १४ ॥
आणि राक्षसांचा विनाश करण्यासाठी मी यज्ञसत्र सुरू
केले . ह्या यज्ञसत्रात शेकडो राक्षस जळून भस्म
झाले .
ततः सङ्क्षीयमाणेषु तेषु रक्षस्स्वशेषतः ।
मामुवाच
महाभागो वसिष्ठो मत्पितामहः ॥ १५ ॥
अशाप्रकारे ते राक्षस पूर्णपणे नष्ट होत असलेले
पाहून माझे आजोबा पितामह वशिष्ठ मला म्हणाले,
अलमत्यन्तकोपेन
तात मन्युमिमं जहि ।
राक्षसा
नापराध्यन्ते पितुस्ते विहितं तथा ॥ १६ ॥
हे वत्सा ! इतका क्रोध करणे बरोबर नहीं, तेव्हा आता
हा क्रोध आवर . हयात राक्षसांचा काहीही अपराध नाही , तुझ्या वडिलांबरोबर हे होणारच होतं (त्याच्या भाग्यात
असंच मरण निश्चित होतं ) .
मूढानामेष
भवति क्रोधो ज्ञानवतां कुतः ।
हन्यते
तात कः केन यतः स्वकृतभुक्पुमान् ॥ १७ ॥
क्रोध केवळ मूर्ख अज्ञानी माणसं करतात . ज्ञानी
माणसाला क्रोध कसा शक्य आहे ? हे वत्सा !
कोणी कोणाला मारतं का ? पुरुष स्वयं आपल्या कर्माचे फळ
भोगत असतो .
सञ्चितस्यापि
महता वत्स क्लेशेन मानवैः ।
यशसस्तपसश्चैव
क्रोधो नाशकरः परः ॥ १८ ॥
हे वत्सा ! हा क्रोध मनुष्याने अत्यंत कष्टाने
मिळवलेल्या यश आणि तपाचा अतिशय प्रबळ असा नाशक आहे .
स्वर्गापवर्गव्यासेधकारणं
परमर्षयः ।
वर्जयन्ति
सदा क्रोधं तात मा तद्वशो भव ॥ १९ ॥
हे बाळा ! इहलोक आणि परलोक दोन्हींचा नाश करणाऱ्या
ह्या क्रोधाचा महर्षिगण सर्वदा त्याग करतात .
म्हणूनच तु ह्या क्रोधाच्या वशीभूत होऊ नकोस .
अलं निशाचरैर्दग्धैर्दीनैरनपराधिभिः ।
सत्रं
ते विरमत्वेतत्क्षमासारा हि साधवः ॥ २० ॥
ह्या बिचाऱ्या निरपराध राक्षसांना जाळण्यात काहीही अर्थ नाही . म्हणून तु आपला हा यज्ञ थांबव कारण क्षमा हेच साधूपुरुषाचे खरे धन आहे .
एवं
तातेन तेनाहमनुनीतो महात्मना ।
उपसंहृतवान्सत्रं
सद्यस्तद्वाक्यगौरवात् ॥ २१ ॥
अशा प्रकारे
माझ्या महात्मा आजोबांनी मला
समजावल्यावर त्यांच्या बोलण्यावर विचार करून त्यांच्या आदरार्थ मी तो यज्ञ समाप्त
केला .
ततः
प्रीतः स भगवान्वसिष्ठो मुनिसत्तमः ।
संप्राप्तश्च
तदा तत्र पुलस्त्यो ब्रह्मणः सुतः ॥ २२ ॥
ह्यामुळे माझे आजोबा मुनिश्रेष्ठ भगवान वशिष्ठ अतिशय प्रसन्न झाले , त्याच वेळी ब्रह्मदेवाचे पुत्र पुलस्त्य देखील तिथे आले .
पितामहेन
दत्तार्घ्यः कृतासनपरिग्रहः ।
मामुवाच
महाभागो मैत्रेय पुलहाग्रजः ॥ २३ ॥
हे मैत्रेया ! पितामह वसिष्ठांनी त्यांना अर्घ्य दिले, तेव्हा महर्षि पुलह यांचे ज्येष्ठ बंधु
असलेले ते महाभाग पुलस्त्य आसन ग्रहण करून मला म्हणाले .
पुलस्त्य
उवाचः
वैरे
महति यद्वाक्याद्गुरोरद्याश्रिता क्षमा ।
त्वया
तस्मात् समस्तानि भवाञ्छास्त्राणि वेत्स्यति ॥ २४ ॥
पुलस्त्य म्हणाले –
तुझ्या मनात राक्षसांविषयी
वैरभाव
असूनही मोठ्यांचे म्हणजेच वसिष्ठमुनींच्या सांगण्यावरून तु राक्षसांना क्षमा केलीस. म्हणून तु संपूर्ण शास्त्रांचा ज्ञाता होशील .
संततेर्न ममोच्छेदः क्रुद्धेनापि यतः कृतः ।
त्वया
तस्मान्महाभाग ददाम्यन्यं महावरम् ॥ २५ ॥
हे महाभागा ! अत्यंत क्रोधित होऊन देखील तु
माझ्या संततीचा समूळ नाश केला नाहीस म्हणून मी तुला आणखी एक उत्तम वर देतो .
पुराणसंहिताकर्ता
भवान्वत्स भविष्यति ।
देवतापारमार्थ्यं
च यथावद्वेत्स्यते भवान् ॥ २६ ॥
हे वत्सा ! तु पुराणसंहितेचा वक्ता होशील आणि देवतांचे यथार्थ स्वरूप जाणशील .
प्रवृत्ते च निवृत्ते च कर्मण्यस्तमला मतिः ।
मत्प्रसादादसंदिग्धा
तव वत्स भविष्यति ॥ २७ ॥
तसेच माझ्या प्रसादाने प्रवृत्ति आणि निवृत्ति
(भोग और मोक्ष) उत्पन्न करणाऱ्या कर्मात सदैव तुझी बुद्धि नि:सन्देह निर्मळ राहील.
ततश्च
प्राह भगवान्वसिष्ठो मे पितामहः ।
पुलस्त्येन
यदुक्तं ते सर्वमेतद्भविष्यति ॥ २८ ॥
पुलस्त्यमुनींनी असे सांगितल्यावर माझे आजोबा भगवान
वशिष्ठ म्हणाले की “पुलस्त्यांनी
जे काही म्हटले आहे ते सगळे खरे होईल”
इति पूर्वं वसिष्ठेन पुलस्त्येन च धीमता ।
यद्उक्तं
तत् स्मृतिं यातं त्वत्प्रश्नादखिलं मम ॥ २९ ॥
हे मैत्रेया ! अशाप्रकारे पूर्वी बुद्धिमान
वसिष्ठमुनि और पुलस्त्यमुनि यांनी जे काही म्हटलेलं ते सगळं मला तुझ्या
ह्या प्रश्नामुळे आठवलं .
सोऽहं
वदाम्यशेषं ते मैत्रेय परिपृच्छते ।
पुराणसंहितां
सम्यक् तां निबोध यथातथम् ॥ ३० ॥
म्हणून हे मैत्रेया ! तुझ्या
विचारण्यावरून
मी ती संपूर्ण पुराणसंहिता आता तुला ऐकवतो . नीट लक्ष देऊन ऐक .
विष्णोः सकाशादुद्भूतं जगत् तत्रैव च स्थितम् ।
स्थितिसंयमकर्तासौ
जगतोऽस्य जगच् च सः ॥ ३१ ॥
हे जगत विष्णुपासून उत्पन्न झाले आहे, त्याच्यातच स्थित आहे . भगवान विष्णुच ह्या जगाची स्थिति आहेत आणि जगाच्या लयाचे कर्ता आहेत . तसेच हे जगत देखील तेच आहेत .
इति
श्रीविष्णुपुराणे प्रथमे अंशे प्रथमोऽध्यायः
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा