॥ विष्णुपुराणम् ॥
॥ द्वितीयः
अंशः॥ ॥ षष्ठोऽध्यायः ॥
"भिन्न –
भिन्न नरक तसेच भगवन्नामाच्या माहात्म्याचे वर्णन"
पराशर उवाच
ततश्च नरका विप्र भुवोऽधः सलिलस्य च ।
पापिनो येषु पात्यन्ते ताञ्छृणुष्व महामुने ॥ १ ॥
रौरवः सूकरो रोधस्तालो विशसनस्तथा ।
महाज्वालस्तप्तकुम्भो लवणोऽथ विलोहितः ॥ २ ॥
रूधिराम्भो वैतरणिः कृमिशः कृमिभोजनः ।
असिपत्रवनं कृष्णो लालाभक्षश्च दारुणः ॥ ३ ॥
तथा पूयवहः पापो वह्निज्वालो ह्यधः शिराः
सन्दंशः कालसूत्रश्च तमश्चावीचिरेव च ॥ ४ ॥
श्वभोजनोऽथाप्रतिष्ठश्चाप्रचिश्च तथा परः ।
इत्येवमादयश्चान्ये नरका भृशदारूणाः ॥ ५ ॥
यमस्य विषये घोराः शस्त्राग्निभयदायिनः ।
पतन्ति येषु पुरुषाः पापकर्मरतास्तु ये ॥ ६ ॥
पराशर म्हणाले ;– हे
विप्रा ! त्यानन्तर पृथ्वी आणि जलाच्या खाली नरक आहे ज्यात पापी लोकांना टाकले
जाते. हे महामुने ! त्यांचे वर्णन ऐक. रौरव, सूकर, रोध, ताल, विशसन, महाज्वाल, तप्तकुंभ, लवण, विलोहित, रुधिराम्भ, वैतरणि, कृमांश, कृमिभोजन, असिपत्रवन, कृष्ण, लालाभक्ष, दारुण, पुयवह, पाप, वह्रिज्वाल, अध्:शिरा, सदंश, कालसूत्र, तमस, आवीचि, श्वभोजन, अप्रतिष्ठ
आणि अप्रचि – हे सर्व तसेच ह्यांच्या व्यतिरिक्त इतरही अनेक महाभयंकर नरक आहेत, जे
यमराजाच्या शासनाधीन आहेत आणि अति दारुण शस्त्र-भय तथा अग्नि-भय देणारे आहेत आणि
त्यांच्यात जे पुरुष पापरत होतात तेच पडतात .
कूटसाक्षी तथासम्यक्पक्षपातेन यो वदेत् ।
यश्चान्यदनृतं वक्ति स नरो याति रौरवम् ॥ ७ ॥
जो पुरुष कूटसाक्षी (खरे
माहित असूनही खोटी ग्वाही देणारा) असतो किंवा जो पक्षपाती होतो व खरे बोलत नाही
आणि जो मिथ्या भाषण करतो तो रौरव नावाच्या
नरकात जातो .
भ्रूणहा पुरहन्ता च गौघ्नश्च मुनिसत्तम ।
यान्ति ते नरकं रोधं यश्चोच्छ्वासनिरोधकः ॥ ८ ॥
हे मुनिसत्तमा ! भ्रूण
(गर्भ) नष्ट करणारे ग्रामनाशक आणि गो-हत्यारे लोक रोध नामक नरकात जातात जो
श्वासोच्छवास रोखणारा आहे .
सुरापो ब्रह्महा हर्ता सुवर्णस्य च सूकरे ।
प्रयान्ति नरके यश्च तैः संसर्गमुपैति वै ॥ ९ ॥
मद्य-पान करणारे, ब्रह्मघाती, सुवर्ण
चोरणारे तसेच जो पुरुष अशांची संगत करतो ते सर्व सूकरनरकात जातात .
राजन्यवैश्यहा ताले तथैव गुरुतल्पगः ।
तप्तकुण्डे स्वसृगामी हन्ति राजभटांश्च यः ॥ १० ॥
क्षत्रिय किंवा वैश्याचा वध
करणारा तालनरकात तसेच गुरुस्त्री सोबत गमन करणारा, भगिनीगामी
आणि राजदूतांना मारणारा पुरुष तप्तकुंडनरकात पड़तो .
साध्वीविक्रयकृद्बन्धपालः
केसरिविक्रयी ।
तप्तलोहे पतन्त्येते यश्च च
भक्तं परित्यजेत् ॥ ११ ॥
सती स्त्रीचा विक्रय करणारा, कारागृहरक्षक, अश्वविक्रेता
आणि भक्तपुरुषाचा त्याग करणारा हे सगळे लोक तप्तलोहनरकात जातात .
स्नुषां सुतां चापि गत्वा
महाज्वाले निपात्यते ।
अवमन्ता गुरूणां यो
यश्चाक्रोष्टा नराधमः ॥ १२ ॥
वेददूषयितायश्च
वेदविक्रयिकश्च यः ।
अगम्यगामी यश्च स्यात्ते
यान्ति लवणं द्विज ॥ १३ ॥
पुत्रवधु आणि पुत्री सोबत
विषयसंबंध करणार्या पुरुषाला महाज्वाल नरकात टाकतात, तसेच जो
नराधम गुरुजनांचा अपमान करणारा आणि त्यांना दुर्वचने बोलणारा असतो तसेच जो वेदांची
निंदा किंवा विक्रय करतो, किंवा जो अगम्या स्त्रीसोबत सम्भोग करतो, हे
द्विजा ! ते सर्व लवणनरकात जातात .
चोरो विलोहे पतति
मर्यादादूषकस्तथा ॥ १४ ॥
चोर तसेच मर्यादेचे उल्लंघन
करणारा पुरुष विलोहित नरकात पडतो .
देवद्विजपितृद्वेष्टा रत्नद्वषयिता
च यः ।
स याति कृमिभक्षे वै कृमिशे च दुरिष्टकृत् ॥ १५ ॥
देव, द्विज
आणि पितृगणांचा द्वेष करणारा तसेच रत्न दूषित करणारा कृमिभक्ष नरकात आणि अनिष्ट
यज्ञ करणारा कृमिश नरकात जातो .
पितृदेवातिथींस्त्यक्त्वा पर्यश्नाति नराधमः ।
लालाभक्षे स यात्ययुग्रे शरकर्ता च वेधके ॥ १६ ॥
जो नराधम पितृगण, देवगण
आणि अतिथिंना सोडून त्यांच्या आधी भोजन करतो तो अति उग्र लालाभक्ष नरकात पडतो, आणि बाण बनवणारा वेधकनरकात जातो .
करोति कर्णनो यश्च यश्च खङ्गादिकृन्नरः
।
प्रयान्त्येते विशसने नरके भृशदारुणे ॥ १७ ॥
जो मनुष्य कर्णी नामक बाण बनवतो आणि जो खड्गादी शस्त्र बनवतो तो अति
दारुण विशसन नरकात जातो .
असत्प्रतिगृहीता तु नरके
यात्यधोमुखे ।
अयाज्ययाजकश्चैव तथा
नक्षत्रसूचकः ॥ १८ ॥
असत् – प्रतिग्रह (चुकिच्या
मार्गे धन-संग्रह) करणारा, अयाज्य-याजक आणि नक्षत्रोपजीवी
(नक्षत्र-विद्या येत असल्याचे ढोंग करणारा) पुरुष अधोमुख नरकात जातो.
वेगी पूयवहे चैको याति
मिष्टान्नभुङ्गरः ॥ १९ ॥
लाक्षामांसरसानां च तिलानां
लवणस्य च ।
विक्रेता ब्रह्मणो याति
तमेव नरकं द्विज ॥ २० ॥
निष्ठुर कर्म करणारा पुयवह
नरकात जातो, तसेच पुत्र मित्रांशिवाय एकट्यानेच
स्वादु भोजन करणारा आणि लाख, मांस, रस, तिळ तसेच
लवण आदि विकणारा ब्राह्मणही त्याच पुयवह नरकात जातो .
मार्जारकुक्कुटच्छागश्ववराहविहङ्गमान् ।
पोषयन्नरकं याति तमेव द्विजसत्तम ॥ २१ ॥
हे द्विजश्रेष्ठा ! बिलाव, कुक्कुट, छाग, अश्व, शूकर
तसेच पक्ष्यांचे पालन करणारा पुरुषही त्याच नरकात जातो .
रङ्गोपजीवी कैवर्तः कुण्डाशी गरदस्तथा ।
सूची माहिषकश्चैव पर्वकारी
च यो द्विजः ॥ २२ ॥
अगारदाही मित्रघ्नः
शाकुनिर्ग्रामयाजकः ।
रुधिरान्धे पतन्त्येते सोमं
विक्रीणते च ये ॥ २३ ॥
नट किंवा मल्लवृत्तिने
राहणारा, धीवराचे कर्म करणारा, कुंढाचे
(उपपति पासून उत्पन्न सन्तान) अन्न खाणारा, विष
देणारा, चुगलीखोर, स्त्रीच्या
किंवा
असत्वृत्तिच्या आश्रयाने राहणारा, धन
आदिच्या लोभाने पर्व नसताना अमावास्या आदि पर्वदिनांचे कार्य करणारा द्विज, घरात आग
लावणारा, मित्राची हत्या करणारा, शकुन आदि
सांगणारा, ग्रामपुरोहित तसेच सोम (मदिरा) विक्रय
करणारा – हे सगळे रुधिरान्ध नरकात जातात .
मखहा ग्रामहन्ता च याति
वैतरणीं नरः ॥ २४ ॥
रेतः पातादिकर्तारो
मर्यादाभेदिनो हि ये ।
ते कृष्णे यान्त्यशौचाश्च
कुहकाजीविनश्च ये ॥ २५ ॥
यज्ञ अथवा ग्राम नष्ट
करणारा पुरुष वैतरणी नरकात जातो, तसेच जे
लोक वीर्यपातादि करणारे, शेताचा बांध तोडणारे, अपवित्र
आणि छलवृत्तिचा आश्रय घेऊन राहणारे कृष्ण नरकात जातात .
असिपत्रवनं याति वनच्छेदी
वृथैव यः ।
औरभ्रिको मृगव्याधो वह्निज्वाले पतन्ति वै ॥ २६ ॥
यान्त्येते द्विज तत्रैव ये चापाकेषु वह्निदाः ॥ २७ ॥
जो कारणाशिवाय वने नष्ट
करतो तो असिपत्रवन नरकात जातो . मेषोपजीवी
आणि व्याधगण वह्रीज्वाल नरकात जातात, तसेच हे
द्विजा ! जो कच्चा घडा किंवा वीट भाजण्यासाठी त्यात अग्नि घालतात, ते
सुद्धा वह्रीज्वाल नरकातच जातात .
व्रतानां लोपको यश्च
स्वाश्रमाद्विच्युतश्च यः ।
सन्दंशयातनामध्ये
पततस्तावुभावपि ॥ २८ ॥
व्रतांचा लोप करणारे तसेच
आपल्या आश्रमाचा त्याग करणारे, दोन्ही प्रकारचे पुरुष
संदेश नामक नरकात जातात .
दिवा स्वप्ने च स्कन्दन्ते ये नरा ब्रह्मचारिणः ।
पुत्रैरध्यापिता ये च ते
पतन्ति श्वभोजने ॥ २९ ॥
ज्या ब्रह्मचार्यांचा
दिवसा किंवा रात्री झोपेत [विषयी विचारांमुळे] वीर्यपात होतो, किंवा जे आपल्याच पुत्रांकडून शिकतात ते श्वभोजन नरकात जातात .
एते चान्ये च नरकाः शतशोथ
सहस्रशः ।
येषु दुष्कृतकर्माणः
पच्यन्ते यातनागताः ॥ ३० ॥
अशा प्रकारे, हे असे व
अन्य शेकड़ो हजारों नरक आहेत, जिथे
दुष्कर्मी लोक नाना प्रकारच्या यातना भोगतात .
यथैव पापान्येतानि तथान्यानि सहस्रशः ।
भुज्यन्ते तानि
पुरुषैर्नरकान्तरगोचरैः ॥ ३१ ॥
वर उल्लेख केलेल्या
पापांसारखीच आणखी सहस्र पाप-कर्म आहेत, ज्यांचे
फळ मनुष्य भिन्न-भिन्न नरकात भोगतात .
वर्णाश्रमविरुद्धं च कर्म
कुर्वन्ति ये नराः ।
कर्मणा मनसा वाचा निरयेषु
पतन्ति ते ॥ ३२ ॥
जे लोक आपल्या वर्णाश्रम
धर्मा विरुद्ध मन, वचन अथवा कर्माने आचरण करतात ते नरकात
जातात .
अधः शिरोभिदृश्यन्ते
नारकैर्दिवि देवताः ।
देवाश्चाधोमुखान्सर्वानधः
पश्यन्ति नारकान् ॥ ३३ ॥
अधोमुख नरक निवासींना
स्वर्गलोकात असलेले देवगण दिसतात आणि देवता गणांना खालील लोकात नारकी जीव दिसतात .
स्थावराः क्रिमयोऽब्जाश्च
पक्षिणः पशवो नराः ।
धार्मिकास्त्रिदशास्तद्वन्मोक्षिणश्च
यथाक्रमम् ॥ ३४ ॥
पापी लोग नरक भोगल्यावर
क्रमाने स्थावर, कृमि, जलचर, पक्षी, पशु, मनुष्य, धार्मिक
पुरुष, देवगण तथा मुमुक्षु होऊन जन्म ग्रहण
करतात .
सहस्रभागप्रथमा
द्वितीयानुक्रमास्तथा ।
सर्वे ह्येते महाभागा
यावन्मुक्तिसमाश्रयाः ॥ ३५ ॥
हे महाभागा !
मुमुक्षुपर्यन्त ह्या सर्वांमध्ये दुसर्या पेक्षा पहिले प्राणी सहस्त्रगुण अधिक
आहेत .
यावन्तो जन्तवः स्वर्गे तावन्तो नरकौकसः ।
पापकृद्याति नरकं
प्रायाश्चित्तपराङ्मुखः ॥ ३६ ॥
जितके जीव स्वर्गात आहेत
तितकेच नरकात आहेत, जे पापी
पुरुष प्रायश्चित करत नाहीत तेच नरकात जातात .
पापानामनुरूपाणि
प्रायश्चित्तानि यद्यथा ।
तथा तथैव संस्मृत्य
प्रोक्तानि परमर्षिभिः ॥ ३७ ॥
भिन्न-भिन्न पापांना अनुरूप
जी जी प्रायश्चिते आहेत त्यांनाच महर्षिंनी वेदार्थांचे स्मरण करून सांगितले आहे .
पापे गुरूणि गुरुणि
स्वल्पान्यल्पे च तद्विदः ।
प्रायश्चित्तानि मैत्रेय
जगुः स्वायम्भुवादयः ॥ ३८ ॥
हे मैत्रेया ! स्वायम्भुव मनु
आदि स्मृतिकारांनी महान पापांसाठी महान आणि लहान पापांसाठी अल्प प्रायश्चित्तांची
व्यवस्था केली आहे .
प्रायश्चित्तान्यशेषाणि
तपःकर्मत्मकानि वै ।
यानि तेषामशेषाणां
कृष्णानुस्मरणं परम् ॥ ३९ ॥
पण जी काही तपस्यात्मक आणि
कर्मात्मक प्रायश्चित्त आहेत त्या सर्वात श्रीकृष्ण स्मरण सर्वश्रेष्ठ आहे .
कृते पापेऽनुतापो वै यस्य पुंसः प्रजायते ।
प्रायश्चित्तं तु तस्यैकं
हरिसंस्मरणं परम् ॥ ४० ॥
ज्या पुरुषाच्या मनात पापकर्मा
नंतर पश्चाताप होतो त्याच्यासाठीच प्रायश्चित्त सांगितले आहे पण केवळ
हरिस्मरणच एकमात्र परम प्रायश्चित आहे .
प्रातर्निशि तथा
सन्ध्यामध्याह्नादिषु संस्मरन् ।
नारायणमवाप्नोति सद्यः
पापक्षयन्नरः || ४१ ||
प्रात:काल, सायंकाळ, रात्री
किंवा मध्यान्ह कोणत्याही वेळी श्रीनारायणाचे स्मरण केल्याने पुरुषांची समस्त पापे
तात्काळ क्षीण होतात .
विष्णुसंस्मरणात्क्षीणसमस्तक्लेशसञ्चयः
।
मुक्तिं प्रयाति
स्वर्गाप्तिस्तस्य विघ्नोऽनुमीयते ॥ ४२ ॥
श्रीविष्णुच्या स्मरणाने
समस्त पापराशी भस्म झाल्याने पुरुष मोक्षपद प्राप्त करतो, स्वर्ग-लाभ
त्याच्यासाठी विश्वरूप मानला जातो .
वासुदेवे मनो यस्य
जपहोमार्चनादिषु ।
तस्यान्तरायो मैत्रेय
देवेन्द्रत्वादिकं फलम् ॥ ४३ ॥
हे मैत्रेया ! ज्याचे चित्त
जप, होम आणि अर्चनादि करताना निरंतर भगवान
वासुदेवात गुंतलेले असते त्याच्यासाठी तर इंद्रपद आदि फळ म्हणजे विघ्नच आहे .
क्व नाकपृष्ठगमनं
पुनरावृत्तिलक्षणम् ।
क्व जपो वासुदेवेति
मुक्तिबीजमनुत्तमम् ॥ ४४ ॥
कुठे ती पुनर्जन्माच्या
चक्रात टाकणारी स्वर्ग-प्राप्ति आणि कुठे मोक्षाचे सर्वोत्तम बीज असलेला ‘वासुदेव’ नामक जप .
तस्मादहर्निशं विष्णु
संस्मरन्पुरुषो मुने ।
न याति नरकं मर्त्यः
संक्षीणाखिलपातकः ॥ ४५ ॥
म्हणून हे मुने !
श्रीविष्णुचे अहर्निश स्मरण केल्याने सम्पूर्ण पाप क्षीण झाल्याने मनुष्य परत
नरकात जात नाही .
मनः प्रीतिकरः स्वर्गो
नरकस्तद्विपर्ययः ।
नरकस्वर्गसंज्ञे वै
पापपुण्ये द्विजोत्तम ॥ ४६ ॥
मनाला प्रिय वाटणारा स्वर्ग
आहे आणि त्याच्या उलट अप्रिय वाटणारा नरक आहे . हे द्विजोत्तमा ! पाप आणि
पुण्याचे दूसरे नाव नरक आणि स्वर्ग आहे .
वस्त्वेकमेव दुःखाय
सुखायेर्ष्यागमाय च ।
कोपाय च यतस्तस्माद्वस्तु
वस्त्वात्मकं कुतः ॥ ४७ ॥
जेव्हा एकच वस्तु सुख आणि
दुःख तसेच ईर्ष्या आणि कोपाचे कारण बनते तेव्हा त्यात वस्तुता (नियतस्वभावत्व)
कुठे राहते ?
तदेव प्रीतये भूत्वा
पुनर्दुःखाय जायते ।
तदेव कोपाय यतः प्रसादाय च
जायते ॥ ४८ ॥
कारण एकच वस्तू कधी
प्रीतिचे कारण असते तर तीच दुसर्या वेळी दुःखदायिनी बनते आणि तीच कधी क्रोध
निर्माण करणारी तर कधी प्रसन्न करणारी होते .
तस्माद्दुःखात्मकं नास्ति न
च किञ्चित्सुखात्मकम् ।
मनसः परिमामोयं
सुखदुःखादिलक्षणः ॥ ४९ ॥
म्हणून कोणताही पदार्थ
दुःखमय किंवा सुखमय नसतो . हे
सुख-दुःख म्हणजे मनाचेच विकार आहेत .
ज्ञानमेव परं ब्रह्म ज्ञानं
बन्धाय चेष्यते ।
ज्ञानत्मकमिदं विश्वं न
ज्ञानाद्विद्यते परम् ॥ ५० ॥
विद्याविद्येति मैत्रेय
ज्ञानमेवोपधारय ॥ ५१ ॥
परमार्थत: ज्ञानच परब्रह्म
आहे आणि त्यावर अविद्येची उपाधि असेल तर तेच बंधनाचे कारणही आहे. हे
सम्पूर्ण विश्व ज्ञानमयच आहे. ज्ञानापासून
भिन्न अशी दुसरी कोणतीच वस्तु नाही. हे
मैत्रेया ! विद्या आणि अविद्येला सुद्धा तु ज्ञानच समझ .
एवमेतन्मयाख्यातं भवतो
मण्डलं भुवः ।
पातालानि च सर्वाणि तथैव
नरका द्विज ॥ ५२ ॥
हे द्विजा ! अशाप्रकारे मी
तुला समस्त भूमंडल, सम्पूर्ण पाताळलोक आणि नरकांचे वर्णन
सांगितले .
समुद्राः पर्वताश्चैव
द्वीपा वर्षाणि निम्नगाः ।
संक्षेपात्सर्वमाख्यातं किं
भूयः श्रोतुमिच्छसि ॥ ५३ ॥
समुद्र, पर्वत, द्वीप, वर्ष आणि
नद्या – ह्या सर्वांची संक्षेपात व्याख्या केली .